आठवड्याचे समालोचन – १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१६ – दे दान सुटे गिराण (ग्रहण)

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
solar_eclipse_2010-01-15_05-41_ut
बँक ऑफ जपान, फेड, ओपेक यांच्या धोरणात्मक निर्णयासाठी असलेल्या मीटिंग, आणी त्यांत घेतले जाणारे निर्णय असे अनेक चिंतेचे ढग जमा झाले होते. पण बँक ऑफ जपान आणी फेडने आपल्या रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत.अशा प्रकारे ग्रहण सुटले. त्यामुळे चिंता दूर झाली. आभाळ बरेचसे साफ झाले. सरकारसुद्धा योग्य ती धोरणात्मक पावले उचलत आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटीत ‘डाटा’ समजणाऱ्या आणी त्यांचे विश्लेषण करू शकणाऱ्या प्रसिद्ध अभ्यासू लोकांचा ४ वर्षांसाठी केलेला समावेश हे सुधारणा करण्याच्या दृष्टीने टाकलेले योग्य पाउल यामुळे गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणीत झाला. त्यामुळे मार्केटने आपली खुशी जाहीर केली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • फेडरल रिझर्वने आपल्या दोन दिवसांच्या मीटिंग मध्ये त्यांचे पॉलिसी रेट बदलले नाहीत. पण वर्षअखेर डिसेंबर २०१६ मध्ये रेट वाढण्याची तसेच २०१७ मध्ये दोनदा ०.२५ % वाढवण्याची शक्यता व्यक्त केली. घरगुती खर्चामध्ये वाढ झाली असली आणी जॉब डेटा सुधारलेला असला तरी बिझिनेस मधील गुंतवणूक हवी तशी वाढलेली नाही, असे कारण देत रेट वाढवणे पुढे ढकलले.
 • बँक ऑफ जपानने रेटमध्ये किंवा बॉंड खरेदीच्या विषयी धोरणांत कुठलाही फरक केला नाही.
 • २७ सप्टेंबर ला ओपेकची मीटिंग आहे त्यांत नायजेरिया आपले क्रूडचे उत्पादन फ्रीज करते की वाढवते हे समजेल

सरकारी announcements

 • सरकारने जाहीर केले की २०१७-२०१८ आर्थिक वर्षाकरता वेगळे रेल्वे अंदाजपत्रक सादर केले जाणार नाही. तसेच एकत्र सदर केलेल्या अंदाजपत्रकांत प्लान आणी नॉनप्लान खर्च वेगवेगळा दाखविला जाणार नाही. अंदाज पत्रक सादर करण्याची तारीख एक महिना अलीकडे म्हणजेच १ फेबृआरीच्या आसपास बदली केली जाईल. अंदाजपत्रक सादर होऊन ते दोन्ही सभागृहांत मंजूर होण्याची प्रक्रिया ३१ मार्च पूर्वी पूर्ण केली जाईल.
 • रेल्वे अंदाजपत्रक वेगळे सादर होणार नसले तरी रेल्वे खात्याला असणारी स्वायत्तता अबाधित राहील असे सरकारने जाहीर केले.
 • सरकारने मार्बल उद्योगामध्ये असलेल्या कंपन्यांना कोणतेही लायसेन्स घेण्याची गरज नाही असे सांगितले. लायसेन्स राज बंद केले. याचा फायदा मुरुडेश्वर सिरामिक्स, निटको टाईल्स, या कंपन्यांना होईल.
 • या अंदाजपत्रकांत सरकार नवीन इलेक्ट्रिसिटी पॉलिसी जाहीर करण्याची शक्यता आहे,
 • सरकारने NBCC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला केंद्र सरकारच्या आजारी PSE(पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस) साठी LAND MANAGEMENT एजन्सी म्हणून नेमले आहे.
 • सरकारने स्मार्ट सिटी योजनेची यादी जाहीर केली. या योजनेसाठी INFRASTRUCTURE योजनेसाठी अधिक सवलती दिल्या जातील.
 • सरकार निर्यातीला प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे निर्यातीसाठी जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये बर्याच प्रोडक्ट्सचा समावेश केला आहे. याचा फायदा ग्लास, लेदर, उद्योगांना होईल. यांत सेंट मोबेन, मिर्झा INTERNATIONAL, डेअरी प्रोडक्ट्स यांना होईल.
 • ज्या आस्थापनाचा वार्षिक टर्नओवर Rs २० (पूर्वोत्तर राज्यासाठी Rs १० लाख) लाखपेक्षा जास्त आहे त्यांना GST लागू होईल असा निर्णय जाहीर झाला. ज्या आस्थापनांचा वार्षिक टर्न ओवर Rs १.५ कोटी पर्यंत आहे ती राज्याच्या अखत्यारीत असतील. Rs १.५ कोटींपेक्षा जास्त टर्नओवर असलेली आस्थापने केंद्र आणी राज्य यांच्या संयुक्त अखत्यारीत असतील.
 • सरकारने ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी Rs ६०००० कोटींचा करार फ्रान्सबरोबर केला.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सरकारने RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी वर तीन RBI च्या बाहेरचे सदस्य नेमले. हे सदस्य अर्थशास्त्रातील मान्यवर व्यक्ती असून या कमिटी सदस्यांची मुदत ४ वर्षे किंवा सरकारच्या इच्छेवर अवलंबून राहील. अशा रीतीने RBI गव्हरनरला असलेला मॉनेटरी पॉलिसीवर धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अधिकारावर मर्यादा आल्या.
 • RBI आपली मॉनेटरी पोलिसी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी जाहीर करेल. पाउस पुरेसा झाल्यामुळे खरीप पिके चांगली येतील. कामगारांची मजुरी कमी त्यामुळे महागाई कमी होईल. हायर CONSUMPTION आणी कमी गुंतवणूक अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे १०० बेस पाईंटपर्यंत रेट कट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 • सेबीने रेटिंग एजन्सीजना आपले रेटिंग त्या कसे करतात हे स्पष्ट करण्यास सांगितले. विशेषतः कर्जदारांचे गेल्या तीन वर्षातील रेटिंग आणी त्यांनी आणलेल्या सिक्युरिटीजचे व्याज दर आणी कधी त्यांच्या रेटिंगमध्ये डाऊनग्रेड केले आहे का हे डिस्क्लोज केले पाहिजे. हे रेटिंग कंपनीच्या कर्जरोखे, तसेच कंपनी DEPOSIT साठी विचारांत घेतले जाते.
 • बाल्टिक ड्राय इंडेक्स वाढला आहे. याचा परिणाम मर्केटर लाइन सारख्या शिप्पिंग कंपन्यांना होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ‘FUTURE’ GROUP ने संगम डायरेक्ट चेन खरेदी केली आणी त्यांची हेरीटेज फूड्सचा रिटेल बिझिनेस विकत घेण्यासाठी त्यांच्या बरोबर बोलणी चालू आहेत. ह्या शेअरची किंमत जवळ जवळ ३० पट वाढली आहे. हेरीटेज फूड्स ही कंपनी चंद्राबाबू नायडू यांनी स्थापन केली आहे. ही कंपनी विविध उद्योगांत आहे.
 • हेन्केन या कंपनीने युनायटेड ब्रुवरीज या कंपनीतील स्टेक वाढवला. त्याच प्रमाणे डिएजो ही कंपनी ग्लोबल स्पिरीट या कंपनीत स्टेक घेणार आहे. भारतातील लिकर मार्केट आकर्षक वाटत आहे.
 • IT क्षेत्रातील BFSI सेगमेंटमध्ये स्पर्धा असल्यामुळे आर्थिक वर्ष २०१७ साठी १०.५ %ते १२% रेव्हेन्यू ग्रोथ होईल असे सांगितले. त्यामुळे इन्फोसिस त्यांचा गायडंस ९% ते १०% एवढा करणार आहे. ते मार्जिन कमी ठेवणार आहेत. इन्फोसिसचा शेअर आर्थिक वर्ष 18 च्या हिशेबानी १५च्या पटींत चालू आहे.
 • स्टेट बँकेमध्ये SBT SBBJ आदी सहा बँकांच्या मर्जरची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्टेट बँकेच्या चेअरमनपदाची मुदत १ वर्षापर्यंत वाढवली.
 • जयश्री टी ही कंपनी ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट करणार आहे.
 • मुंबई विमानतळ आणी HDIL यांच्यातील वादविवाद सामोपचाराने मिटला.. या प्रमाणे दोन्ही साईडवर कोणतीही CONTINGENT लायबिलीटी किंवा क्लेम राहणार नाही. याचा परिणाम TDR वर होणार नाही. याचा फायदा GVK INFRASTRUCTURE या कंपनीलाही होईल
 • ज्युबिलीयंट फूडमधून अजय कौल आणी CFO बाहेर पडल्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाली. त्याचप्रमाणे माइंड ट्री मधून दोन महत्वाच्या व्यक्तींनी राजीनामा दिल्यामुळे तो ही शेअर पडला.
 • IRB INFRASTRUCTURE या कंपनीला Rs ११००० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • आयनॉक्स लेजर मध्ये विदेशी निवेशकांची स्टेक २३% आहे. पूर्वी ह्या हिस्सेदारीची मर्यादा २६% होती. आता त्याची मर्यादा ४९% केली आहे. पण हा शेअर जेव्हा वाढतो तेव्हा त्याच्यांत तेवढ्या प्रमाणांत VOLUME नसतो.
 • पिरामल आणी फायझर डीलला CCI ने परवानगी दिली. पिरामल फायझरचे ४ ब्रांड विकत घेणार आहे.
 • ESSEL PROPACK या कंपनीने आपल्या जर्मन पार्टनरचा आपल्या EDG या सबसिडीअरीमधील स्टेक खरेदी केला.. यामुळे EDG ही एस्सेल PROPACKची १००% सबसिडीअरी झाली. यामुळे कंपनीला त्यांच्या युरोपिअन मार्केटमध्ये फायदा होईल.
 • BPCL या कंपनीला महारत्न हा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे कंपनी स्वतंत्रपणे Rs ५००० कोटी पर्यंतचे निर्णय स्वतः घेऊ शकेल.
 • मोरेपन LAB त्यांचा OTC बिझिनेस पिरामल ग्रूपला विकणार आहे. OTC बिझिनेसमध्ये BURNOL, लेमोलेट आणी सत इसबगोल या ब्रान्डचा समावेश आहे.
 • वोडाफोन या कंपनीने भारतामधील बिझिनेसमध्ये Rs ४७००० कोटी परदेशी गुंतवणूक केली. यामुळे कंपनीचे कर्ज कमी झाले आणी स्पेक्ट्रम लिलावासाठी आणी टेलिकॉम क्षेत्रातला आपला मार्केटशेअर वाढविण्यासाठी तयारी केली.
 • GTL INFRASTRUCTURE या कंपनीच्या कर्जदारांनी त्यांच्या कर्जाचे इक्विटीमध्ये रुपांतर करण्यासाठी संमती दिली. या कंपनीला असलेल्या Rs ८२०० कोटी कर्जापैकी कंपनीने Rs ३३०० कोटी कर्जाचे इक्विटीत रुपांतर करण्याची कर्जदारांना विनंती केली होती.
 • बायर या कंपनीने MONSANTO या कंपनीच्या २६% शेअर्ससाठी Rs २४८१.६ प्रती शेअर या दराने ओपन ऑफर केली आहे.

नजीकच्या काळांत येणारे IPO

 • ICICI प्रूडेनशिअल लाईफ या कंपनीचा IPO एकूण १०.४ वेळा सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा १.३५ वेळा सबस्क्राईब झाला.
 • HPL इलेक्ट्रिक & पॉवर लिमिटेड (HEPL) या कंपनीचा IPO २२ सप्टेंबर २०१६ रोजी ओपन होऊन २६ सप्टेंबर रोजी बंद होईल. याचा प्राईस BAND Rs १७५ ते Rs २०२ आहे. मिनिमम लोट ७० शेअर्सचा आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक मीटर्स आणी स्वीचगिअर्स बनविण्याच्या उद्योगांत आहे. कंपनी IPO चे प्रोसीड्स कर्ज फेडण्यासाठी तसेच खेळत्या भांडवलासाठी वापरेल.
 • L & T टेक चे २३ सप्टेंबर रोजी लिस्टिंग झाले. या कंपनीचे शेअर्स Rs ८६० ला IPO मध्ये दिले होते. या शेअरमध्ये माफक लिस्टिंग गेन झाला.

कॉर्पोरेट एक्शन

 • करुर वैश्य बँक आपल्या एका शेअरचे ५ शेअरमध्ये विभाजन करणार आहे.
 • कॅनरा बँकेने २६ सप्टेंबरला राईट्स इशु वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • वर्धमान टेक्स्टाईलची २६ सप्टेंबरला BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.

या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
ज्या कंपनीत प्रमोटर्सनी आपला स्टेक वाढवला हे चांगले आणी प्रमोटर्सनी आपला स्टेक विकला ते धोक्याचे लक्षण समजावे.
‘VIX’ (VOLATILITY इंडेक्स) महत्वाचा ठरतो.करेक्शन चालू असताना मध्येच एखादे दिवशी मार्केट वाढले पण त्यादिवशी VIX स्थिर असेल तर करेक्शन संपण्याच्या मार्गावर आहे असे गृहीत धरता येते. जर मार्केट वाढते आहे आणी VIX इंडेक्स अस्थिर आहे तर मार्केटचा ट्रेंड बदलतो आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८६६८ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८३१ वर बंद झाला.
 

One thought on “आठवड्याचे समालोचन – १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०१६ – दे दान सुटे गिराण (ग्रहण)

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६- सर्जिकल स्ट्राईक्स ऑपरेशन ! | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.