आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC – Wikipedia
दिवाळीचा आठवडा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हॉकी, क्रिकेट, कबड्डी सगळीकडे दिवाळी साजरी होत आहे. हा आठवडा एक्स्पायरीचा आहे त्याचबरोबर हा आठवडा टाटा ग्रूपमुळे गाजतो आहे. क्रूडचे भाव खाली येत आहेत. रशिया सौदी अरेबिया, इराण इराक लिबिया आणी नायजेरिया हे देश क्रूडचे उत्पादन कमी करायला तयार नाहीत. आयर्न ओअरचे भाव वाढत आहेत. असा प्रकारे कमोडिटी आणी इक्विटी दोन्हीमध्येही हालचाल दिसून आल्यामुळे शेअरमार्केटमध्ये अस्थिरता आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- फेडच्या FOMC ची मीटिंग १ नोव्हेंबर २०१६ ला आहे.
- इराण लिबिया नायजेरिया, इराक हे देश क्रूडचे उत्पादन कमी करायला तयार नाहीत.
सरकारी announcements
- ज्यूटवर ANTIDUMPING ड्युटी लावण्याची शिफारस केली आहे. याचा फायदा ज्यूट कंपन्यांना होईल. उदा :- LUDLOW
- स्टील, पॉवर, आणी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांना कर्जफेड करण्यासाठी काही सवलती देण्यावर विचार चालू आहे.
- अर्थ मंत्रालयाने असा प्रस्ताव केला आहे की NPA मध्ये कर्ज देणार्या बँकांनी कर्जाचे रुपांतर इक्विटीमध्ये करून सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला NPA कंपनीचा बिझिनेस चालवण्याकरता नियुक्त करावे.
- सरकार ऑईल आणी gas क्षेत्रातील २८ ब्लोकच्या कराराचे नुतनीकरण/विस्तार करण्यासाठी धोरण ठरवणार आहे. यांत केर्नला मिळालेला राजस्थानमधील बारमेर ब्लॉक ही येतो.
सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- TRAI ने भारती एअरटेल, आणी इतर दोन कंपन्यांवर ग्राहकांची गैरसोय झाली म्हणून Rs ३०५० कोटींचा दंड लावला.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- टाटा ग्रूपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स या कंपनीच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांना दूर केल्यामुळे औद्योजिक जगांत बरीच खळबळ माजली. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी टाटा सन्स ची सूत्रे चार महिन्यासाठी आपल्याकडे घेतली. मिस्त्री यांनी घेतलेल्या विविध निर्णयांवर पुनर्विचार केला जाईल असे सूचित केले. टाटा ग्रुपने घालून दिलेल्या धोरणाचे उल्लंघन झाले असे वाटले.
- स्टेट बँक आणी स्टेट बँकेच्या असोशीएट बँकांनी टाटा ग्रूपमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी बैठक बोलावली. या बँकांनी टाटा ग्रुपला Ra ७०००० कोटींचे कर्ज दिले आहे.
- ITC चा जे. के. पेपरबरोबर केलेला करार २० ऑक्टोबरला संपुष्टांत येत आहे. नवा करार ITC ही कंपनी BILT बरोबर करीत आहे.
- ITI (इंडिअन टेलिफोन इंडस्ट्रीज) या कंपनीने BEL ( भारत इलेक्ट्रोनिक्स लिमिटेड) साठी जॉब वर्क करावे आणी ITI ला संरक्षण उत्पादनांत कन्व्हर्ट करावे असा विचार चालू आहे.
- नेस्लेने ‘नेसकॅफे रेडी टू ड्रिंक’ तीन फ्लेवर मध्ये मार्केटमध्ये लॉनच केली.
- PROCTOR AND GAMBLE ही कंपनी FUTURE ग्रूपबरोबर टाय अप करणार आहे.
- G. E. शिपिंग ही कंपनी ‘SUPERMAX DRY BULK CARRIER’ खरेदी करणार आहे.
- जे & के बँकेने मुंबई आणी बँगलोर मध्ये कर्ज देण्यास सुरुवात केल्यापासून त्यांचे NPA वाढले.
- WANBURY लिमिटेड या कंपनीने मधुमेहावरील औषध परवानगी नसताना निर्यात केले अशी त्यांना महाराष्ट्र(ठाणे) एफ डी ए कडून नोटीस मिळाली त्यामुळे ह्या शेअरला खालचे सर्किट लागले. नंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले की आमच्याजवळ निर्यात करण्यासाठी लायसेन्स आहे.
- सनोफी. आणी इतर फार्मा कंपन्यांनी १०८ औषधांच्या किंमती ठरवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टांत अर्ज केला होता. हा अर्ज कोर्टाने खारीज केला.
- अरविंद टेक्स्टाईलस या कंपनीने ब्रान्डेड FASHION बिझिनेसमधील १०% स्टेक Rs ७४० कोटींना विकला.
एशियन पेंट्सचा निकाल ठीकठाक आला. लवकर आलेली दिवाळी आणी पडलेला पाउस याचा निकालांवर थोडा परिणाम झाला. - RPG लाईफ, के पी आर मिल्स, कालिंदी रेल, इक्विटास, V –गार्ड इंडस्ट्रीज, भगेरिया इंडस्ट्रीज, जयंत अग्रो, स्पेशालिटी केमिकल्स, भारती एअरटेल, भारत बिजली, L & T फायनांस, SYMPHONY, अडानी पोर्ट, DR रेडी’ज, डाबर इंडस्ट्रीज, डेल्टा कॉर्प, किर्लोस्कर BROS, हेकझावेअर, डेल्टा कॉर्प, हिरो मोटो,विजया बँक, MRF, TORRENT फार्म यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
- मारुती, कोलगेट,TVS मोटर्स, मोतीलाल ओसवाल, ONGC बजाज फायनांस, बजाज फिनसर्व यांचे रिझल्ट्स उल्लेखनीय आहेत. बजाज ऑटो चे निकाल सर्व साधारण म्हणता येतील. स्ट्राईडसशसून या कंपनीचे निकाल चांगले आले त्यांच्या मार्जिनमध्ये वाढ झाली. वेदांताचे निकालही (मार्जीन आणी प्रॉफीटमध्ये चांगली वाढ) चांगले आले. वेदांत केर्न मर्जर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असे कंपनीने सांगितले
- कोटक महिंद्र बँकेचे इंटरेस्ट मार्जिन, इंटरेस्ट इन्कम, आणी प्रॉफीट वाढले.
- PI इंडस्ट्रीज चा निकाल चांगला आला. पाउस व्यवस्थित पडल्यामुळे AGRI बिझिनेस वाढला.
- CROMPTON कन्झुमर चा निकाल ठीक आला. इलेक्ट्रिक पंखे आणी LED उपकरणाचा मार्केट शेअर वाढला.
AXIS बँक आणी,IDBI बँक ( प्रॉफीट कमी, NPA मध्ये वाढ) स्टेट बँक ऑफ म्हैसूर,( NPA मध्ये वाढ), M & M फायनांस, आयडिया ( प्रॉफीट ८८%ने कमी झाले.) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. - JUBILANT फूड्स ची विक्री वाढली तरी किंमती कमी केल्यामुळे आणी जाहिरात आणी विक्री वाढवण्यासाठी केलेल्या खर्चामुळे प्रॉफीट मार्जिन कमी झाले.
- विप्रो, माइंडट्री, PERSISTENT सिस्टीम्स या कंपनीच्या बाबतीत विक्रीत समाधानकारक वाढ होत नाही हा चिंतेचा विषय आहे. माइंड ट्री चे मार्जिनही कमी झाले.
- सिगारेटवर २६% GST + सेस आकारला जाईल. जादा एक्साईज ड्युटी आकारली जाणार नाही. या बातमीमुळे ITC, GOLDEN TOBACO यांचे भाव वाढले. ITC चा निकाल चांगला आला.
- सुप्रीम कोर्टाने आता दिल्ली फ्लायओव्हर साठी टोल घेता येणार नाही असा निर्णय दिला. याचा परिणाम ITNL आणी नोइडा टोल ब्रिज या कंपन्यांवर होईल.
- HUL चा फायदा आणी उत्पन्न दोन्ही वाढले, पण VOLUME मध्ये फक्त १% ग्रोथ झाली. कंपनीने Rs ७ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
- इंडिअन ह्यूम पाईप्स या कंपनीने १;१ असा बोनस दिला.
कॉर्पोरेट एक्शन
- लक्ष्मी मशीन वर्क्स या कंपनीची २६ ऑक्टोबरला शेअर्स buyback वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग झाली. व्होल्टास या कंपनीकडे या लक्ष्मी मशीन वर्क्स या कंपनीचे ६ लाख शेअर्स आहेत त्यामुळे व्होल्टासला याचा फायदा होईल. लक्ष्मी मशीन वर्क्स ही कंपनी ३११००० शेअर्स जास्तीतजास्त Rs ४४५० प्रती शेअर या भावाने खरेदी करेल,यासाठी कंपनी Rs१३८३९ कोटी खर्च करेल.
- ONGCने १:२ (तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला १ शेअर बोनस मिळेल).असा बोनस आणी Rs ४.५० पर शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
- कर्नाटक बँकेचा शेअर 24 ऑक्टोबरला एक्स राईट्स झाला.
- GTL INFRASTRUCTURE या कंपनीमध्ये कर्जदार कर्जाचे रुपांतर इक्विटीत करून ५१% स्टेक घेणार आहेत नंतर या कंपनीचा फेबृअरी २०१७ च्या आसपास लिलाव करण्यांत येईल.
- s. H. केळकर या कंपनीने गुजरात फ्लेवर्स चा बिझीनेस खरेदी केला.
- ADVANCE ENZYME या कंपनीने जे सी बायोटेक या कंपनीतील ७०& स्टेक विकत घेतला. जे सी बायोटेक ही भारतातील फार्मा ENZYME स्पेसमधील २ नंबरची कंपनी आहे.
- BALMER LAWRIE या भांडवली गुडसच्या क्षेत्रांत असलेल्या कंपनीने बोनस शेअर इशू करण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग १० नोव्हेंबरला बोलावली आहे.
- PNB हौसिंग चा IPO २५ वेळेला सबस्क्राईब झाला. INSTITUTIONAL क्वोटा ३५ वेळा तर HNI क्वोटा ७० वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोटा पूर्णपणे भरला
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
गुंतवणूकदारांनी नेहेमी स्वस्त भावांत खरेदी करावी. त्यासाठी मार्केटमध्ये मंदीची वाट बघण्याची किंवा मंदी येण्याची किंवा असण्याची गरज नाही. अनेक वेगवेगळी कारणे घडत असतात विविध घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम मार्केटवर होत असतो. सध्या जे टाटा ग्रूपमध्ये घडते आहे, पूर्वी जे अंबानी बंधूंमध्ये रिलायंस ग्रूपमध्ये झाले, आणी इस्टेटीसाठी बिर्ला ग्रूपमध्ये झाले त्यावेळी त्या त्या ग्रूपमधल्या कंपन्यांची गुणवत्ता कमी झाली नव्हती. तरीसुद्धा या ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव कमी झाला. अशावेळी योग्य ती वेळ आणी योग्य तो भाव आपण साधू शकलात तर हे मूल्यवान शेअर्स आपल्याला कमी भावांत मिळू शकतात.
दिवाळी म्हणजेच दिव्याच्या प्रकाशांत उजळून निघणे, अंधःकाराचा नाश करणे आणी अज्ञान नाहीसे करून ज्ञानाच्या उजेडांत न्हाऊन निघणे. त्याचबरोबर लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी तिचे अर्चन, पूजन करणे. येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणे. आपणही असाच निश्चय केला असेल करीत असाल किंवा करणार असाल होना ! चला तर मग शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नव्या वाटा शोधू या, नवे विचार अमलांत आणू या, नव्या वाटेने जाण्याचा मुहूर्त साधून यशाच्या दिशेने मार्गक्रमण करुया. लक्ष्मीचे स्वागत करण्यास सिद्ध होऊ या.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २७९४१ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८६३८ वर बंद झाला.