आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा एक्सपायरीचा आठवडा होता. गुरुवार २४ नोव्हेंबर २०१६ रोजी नोव्हेंबर सिरीजची एक्सपायरी होती. कधी एकदा नोव्हेंबर सिरीज संपते असे झाले होते. संपली एकदाची ! सर्वांनी सुस्कारा सोडला. चला आता शुक्रवार तारीख २५ नोव्हेंबर २०१६ पासून नव्या दमाने सुरुवात करू असे सर्वांनी ठरवले. याचे कारण काय हा विचार आला असणारच ? ही सिरीज फार ‘VOLATILE’ होती. FII नी बराच पैसा काढून घेतला. डीमॉनेटायझेशनचा परिणाम झाला. सगळ्या आघाडयांवर लढता लढता ट्रेडर्स थकून गेले. पण आशेचा किरण एकच, मार्केट ओवरसोल्ड झाले. सध्याच्या मार्केटच्या परिस्थीतीत ट्रेडर्स आणी गुंतवणूकदार यांचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. ट्रेडर्ससाठी विकणे म्हणजेच शॉर्ट करणे योग्य तर गुंतवणूकदारांनी संधी मिळेल तशी पडत जाणारया मार्केटमध्ये गुंतवणूक करणे योग्य.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- ट्रम्प निवडून आल्यापासून US $ मजबूत होतो आहे. इमर्जिंग मार्केटमधील चलन कमजोर होत आहे. त्यामुळे USA मधून परदेशांत पैसा जाणे कमी होईल. फेड २०१८ मध्ये २ वेळा आणी २०१९ मध्ये २ वेळा रेट वाढ करण्याची शक्यता आहे. फेडच्या मीटिंगमधील निर्णयांचा फंड फ्लोवर परिणाम होतो. त्यामानाने RBI च्या पॉलिसीचा परिणाम होत नाही. डिसेंबर महिन्यांत दोन्ही घटना असल्यामुळे सर्वांचे लक्ष फेडच्या मीटिंगकडे आहे.
- पुढील आठवडयांत व्हिएन्नामध्ये OPECची बैठक आहे. तेव्हा जर सदस्यांची उत्पादन कमी करण्यावर सहमती झाली तर क्रूडचे दर वाढतील. त्याचा फायदा ओईल एक्स्प्लोरेशन कंपन्यांना होईल.
सरकारी announcements
- डीमॉनेटायझेशनच्याविषयी घोषणाचा ओघ थांबत नाही. सरकारने २४ नोव्हेंबरच्या रात्रीपासून Rs १००० च्या नोटा कुठेही बिल पेमेंट करण्यासाठी चालणार नाही, त्या फक्त तुमच्या बँक खात्यांत जमा करता येतील असे जाहीर केले. Rs ५०० च्या नोटा सरकारने घोषित केलेल्या कारणांसाठी १५ डिसेंबरपर्यंत चालतील असे जाहीर केले. बँकांच्या कौंटरवर जुन्या Rs १००० आणी Rs ५००च्या नोटांच्या बदली नव्या नोटा देणे बंद केले.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयकर कायदयाच्या कलम ११५ BBE प्रमाणे खुलासा न केलेल्या उत्पन्नावर ३०% कर लावण्याची तरतूद आहे. हा कराचा रेट ६०% करण्यासाठी कायदयांत बदल केला जाणार आहे. सर्व जनधन खात्यांत ८ नोव्हेंबर २०१६ नंतर जमा केलेली रोख रक्कम आय कराच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- टोल फ्रीची मर्यादा प्रथम १४ नोव्हेंबर होती ती वाढवून ही तारीख २४ नोव्हेंबर केली. याचा फायदा लॉजिस्टिक कंपन्याना होईल. कारण टोल वाचतोच पण वेळही वाचतो. पेट्रोल, डीझेलही वाचते त्यामुळे एका फेरीच्या जागी दोन फेऱ्या करता येतात. कारण वाहतुकीच्या कोंडीमुळे होणारा त्रास कमी होतो.
- सरकारने काही राष्ट्रीय महामार्गांचे मॉनेटायझेशन केले. याचा फायदा NCC आणी HCC या कंपन्यांना होईल. टोलमध्ये दिलेल्या सवलतीचा फटका बसू नये म्हणून ऑपरेटर ट्रान्स्फर ही मेथड वापरण्यात येणार आहे.
- सरकारने काही स्टील प्रोडक्टस् वर २२ मे २०१९ पर्यंत सेफगार्ड डयुटी लावली.
- सरकारने NHAI आणी कोल खात्यांच्या सचिवांची बदली केली.
- व्हिएतनाममध्ये भारतांत बनलेल्या कोणत्याही औषधांवर बंदी घातलेली नाही. व्हिएतनाममध्ये US $ १ लाखाची औषधे विकली जातात.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- सध्या बँकेकडे रोख रक्कम सर्वत्र भरली जात असल्यामुळे ठेवींचा ओघ भरपूर आहे. हा जादा जमा झालेला पैसा बँका RBI कडे रिव्हर्स रेपो मनी म्हणून जमा करतात. हा पैसा कसा उपयोगांत आणावा यासाठी सरकारकडे योजना नाही. ह्या RBI कडे जमा केलेल्या पैशांच्या बदली RBI बॅंकांना BONDS इशू करते. RBI कडे BONDSचा तुटवडा आहे. त्यामुळे मार्केट STABILIZATION योजनेअंतर्गत BONDS इशू करावेत असे RBI ने सुचवले आहे.
- MSS (MARKET STABILIZATION SCHEME) ची लिमिट वाढवावी अशी शिफारस केली.
- ७ डिसेंबर २०१६ रोजी RBI ची बैठक आहे. यावेळी रेटकट होण्याची शक्यता आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- USFDAने सन फार्माच्या मोहाली युनिटची तपासणी केली. त्यामध्ये दोनतीन त्रुटी आढळल्या. मोहालीचे युनिट RANBAXYचे होते. या युनिटसाठी २०१३ पासून इम्पोर्ट अलर्ट जारी आहे.
- सन फार्माने BIOSINTENZ या रशियन कंपनीतील ८५.१% स्टेक US$ २४ मिलीयनला विकत घेतला. या बरोबरच सन फार्माने या रशियन कंपनीचे US $ ३५ मिलियन लोन टेकओव्हर केले. यामुळे सन फार्माचा रशियन फार्मा मार्केट मध्ये बिझिनेस वाढेल
- भारती एअरटेल या कंपनीने आपली पहिली पेमेंट बँक सुरू केली.
- LT फूड्स या कंपनीने जपानच्या KAMEDA SEIKA या कंपनी बरोबर US $ १० मिलियन ५१:४९ या प्रमाणांत गुंतवणुकीसाठी करार केला. हे जॉईट व्हेन्चर भारतांत तांदुळापासून बनवलेले पदार्थ विकेल.
- GE शिपिंग या कंपनीने सपोर्ट व्हेसल ‘ग्रेड शिप रागिणी’ विकले.
- पाउस चांगला झाला आहे. त्यामुळे NHPC, SJVN या कंपन्या चांगला लाभांश देतील. पॉवर क्षेत्रात काही सुधारणा होतील असा अंदाज आहे.
- मावाना शुगर ही कंपनी त्यांचे टीटावी युनिट ‘इंडिअन पोटाश’ या कंपनीला Rs ३५० कोटींना विकणार आहे. मावाना शुगरची मार्केट कॅप Rs १७० कोटी आहे. म्हणजे आख्या कंपनीच्या मार्केटकॅपपेक्षा जास्त पैसा एक युनिट विकून मिळतो आहे. ही बातमी मार्केटला पूर्वीपासून होती असे वाटते. कारण मार्केट पडत असून हा शेअर २०% वाढला.
- हिवाळ्यांत परदेशी पर्यटक भारतात येतात. या वर्षी नोटांच्या गोंधळामुळे परदेशी पर्यटकांची संख्या कमी आहे. याचा परीणाम शॉर्ट टर्ममध्ये होईल. हॉटेल्स, टुरिस्ट कंपन्या (उदा. THOMAS COOK, COX AND KINGS यांच्यावर तसेच पर्यटनस्थळाच्या आसपासच्या लोकांच्या उत्पन्नावर होईल. स्थानिक पर्यटक या संधीचा फायदा कसा उठवतात यावर या कंपन्यांचा फायदा आणी तोटयाचे गणित अवलंबून राहील.
- आठवड्याच्या सुरुवातीला कच्च्या रबराच्या किंमती अचानक वाढल्या. याचा परिणाम टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर होईल.
- पेट्रोनेट एल एन जी ‘एल एन जी’ च्या किमतीबाबत एकझान या कंपनीबरोबर वाटाघाटी करत आहे.
- NMDC त्यांचा नागरनाल स्टील प्लांट विकण्याची तयारी करीत आहे.. Rs २०,००० कोटींचा हा प्लांट आहे. यामुळे NMDC ची परीस्थिती सुधारेल.
- झी एन्टरटेनमेंट रिलायंस कॅपिटलचा ‘रिलायंस जनरल एन्टरटेनमेंट टी व्ही बिझिनेस’ Rs १९०० कोटींना विकत घेणार आहे.
- त्यामुळे रिलायंस कॅपिटलचे कर्ज Rs १९०० कोटींनी कमी होईल. त्याच प्रमाणे झी एन्टरटेनमेंटला हा बिझिनेस योग्य किंमतीला मिळत आहे.
- ‘बन्नारी अमान’ ही कंपनी तोटयातून फायदयांत आली. Rs ५ कोटी तोटा होतो तो Rs ५४ कोटी फायदा झाला.
- हायपर टेन्शनच्या औषधासाठी अलेम्बिक फार्मा आणी ल्युपिन या कंपन्यांना USFDA कडून परवानगी मिळाली.
- लार्सेन & टूब्रो चे दुसर्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. तसेच सियाराम सिल्क मिल्स, इंडिया सिमेंट्स, गुजराथ GAS या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
या आठवड्यातील कॉर्पोरेट एक्शन आणी लिस्टिंग
- तळवलकर’s त्यांचा जिम बिझिनेस तळवलकर’s लाईफ स्टाईलमध्ये डीमर्ज करणार आहेत.
- ऑइल इंडिया या कंपनीने बोनस शेअर इशूवर विचार करण्यासाठी २८ नोव्हेंबररोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
- स्टेट बँक सरकारला Rs २१ कोटींच्या प्रेफरन्स शेअर Rs २६९.५९ प्रती शेअर या भावाने इशू करणार आहे.
- सी एन बी सी टी व्ही १८ या वाहिनीवर सकाळी १०-१५ वाजता डाबरची बोर्डरूम ऐकली. त्यांनी त्यांत सांगितले की ह्या डीमॉनेटायझेशनच्या वातावरणांत आम्ही जाहिरातीवरील खर्च कमी करू. D-STOCKING चा IMPACT आहे. याचा परिणाम ताबडतोब झी एन्टरटेनमेंटच्या शेअर वर दिसला. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ काढून ट्रेडिंग करता येते.
- FAIR FAX ही कंपनी ‘CAMLIN FINE SCIENCE’ ह्या कंपनीतला कंट्रोलिंग स्टेक Rs १२०० कोटींना विकत घेणार आहे.
- वर्धमान टेक्स्टाईलनी ‘BUYBACK’ जाहीर केला आहे. कंपनी प्रती शेअर Rs ११७५ प्रती शेअर या भावाने Rs ७२० कोटींपर्यंत शेअर्स ‘BUYBACK’ करेल.
- इंडिया बुल्स रिअल Rs ९० प्रती शेअर या भावाने Rs ५४० कोटीचे शेअर्स ‘BUY BACK’ करेल.
- DDT (DIVIDEND DISTRIBUTION TAX) वाचावा आणी शेअर्स च्या किंमतीला स्थैर्य यावे म्हणून शेअर ‘BUY BACK’चे पेव फुटले आहे असे वाटते.
नजीकच्या काळांत येणारे IPO
- जागरण प्रकाशन ही कंपनी आपल्या ‘म्युझिक ब्रॉडकास्टिंग’ या सबसिडीअरिचा Rs ४०० कोटींचा IPO आणण्याच्या विचारांत आहे.
या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं
चलनातील नोटा रद्द होणे ही घटना प्रत्येक माणसाच्या दृष्टीने नवीनच. त्यामुळे या घटनेचा फायदा कोणाला आणी नुकसान कोणाचे आणी किती याचा चौफेर विचार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आणी आपल्या कुवतीनुसार करीत आहे. शेवटी ‘ज्याचं दुखतं त्यालाच कळते’ इतरांचे अंदाजच असतात डीमॉनेटायझेशनच्या परिणामांची चर्चा विविध क्षेत्रातील तज्ञांकडून आणी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून सुरु आहे ती ऐकावी.प्रत्येक कंपनीचे व्यवस्थापन सांगते की आम्ही फक्त चेकने व्यवहार करतो त्यामुळे आमच्या कंपनीवर डीमॉनेटायझेशनचा फारसा परिणाम होणार नाही. ‘खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे’ हे ऐकणाऱ्याला लगेच समजते.
निरीक्षणाने बर्याच गोष्टी समजतात. बुधवारी मार्केट थोडेसे तेजीत होते. तेजीत असणाऱ्या शेअर्सचे मंदीत असणाऱ्या शेअर्सशी असलेले प्रमाण ४ :१ होते. मला प्रथम वाटले गुरुवारी F&O एक्सपायरी आहे त्यामुळे वाढले असेल पण कोणते शेअर्स वाढले हे पाहिलं तेव्हा असे आढळले की जे शेअर्स डेरीव्हेटीवमध्ये नाहीत ते शेअर्स वाढले होते. यावरून खरेदी मिडकॅपमध्ये सुरु होती. वातावरण बदलले की आपण आपली विचार करण्याची दिशा बदलली पाहिजे. त्याचा शॉर्ट टर्मसाठी उपयोग होतो. सध्या रुपया कमजोर होतो आहे. रुपयाने त्याचा कमीतकमी किंमतीचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे म्हणजेच US$ १ =Rs. ६८.८६ झाला. USA चे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांची IT आणी फार्मा क्षेत्रातील कंपन्यांवर करडी नजर आहे. ही क्षेत्रे सोडून इतर अनेक कंपन्या निर्यात क्षेत्रांत आहेत त्यांना फायदा होऊ शकतो. पेमेंट बँकांना IT SOLUTIONS पुरवणार्या कंपन्यांकडे लक्ष ठेवावे.
सध्या बँकांच्या ठेवी वाढत आहेत कारण जमा केलेले पैसे काढण्यावर नियंत्रणे आहेत. पण ही नियंत्रणे उठवल्यावर या ठेवी कमी होतील असा बहुतेक बँकांचा अंदाज आहे.
एकूण मार्केट किती पडले आणी ठराविक शेअर्स किती पडले यावरून कोणते शेअर्स STRONG आहेत आणे कोणते शेअर्स WEAK आहेत ते समजते. सध्या मार्केट २०० दिवसांच्या मूव्हिंग AVERAGE जवळ गेले पण मेटल कंपन्या 20 दिवसांच्या मूव्हिंग AVERAGEच्या जवळ गेल्या म्हणजे हिंदाल्को, टाटा स्टील, मोईल, हिन्दुस्थान झिंक हे शेअर्स सध्याच्या मार्केटमध्ये STRONG आहेत.
भारताची प्रगती व्हावी, अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत व्हावी म्हणून काही उपाययोजना केल्या जातात. उद्देश चांगलाच असतो पण त्याप्रमाणे परिणाम चांगले होतील असे मात्र सांगता येत नाही. करायला गेलो एक पण घडले तिसरेच अशी अवस्थासुद्धा होऊ शकते. सध्या काय होईल हे कोणालाच निट समजत नाही. म्हणून प्रत्येकजण सावधगिरी बाळगत आहे. कोणालाही शहाणा किंवा मूर्ख ठरवण्याच्या भानगडीत न पडता योग्य आणी आपल्याला अनुकूल असा निर्णय घेणे हेच उत्तम धोरण ठरेल.
आठवडाभर मार्केट तेजी मंदीचा लपंडाव खेळत होते. “आता तर तेजीत होते पुन्हा मंदीत कसं गेलं” असे लोक म्हणत होते. शुक्रवारी मात्र मार्केटने सर्वांना चकवले आणी मंदीला थारा दिला नाही.त्यामुळे आठवड्याचा शेवट सुखद झाला आणी बुल्सचा विजय झाला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २६३१६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८११४ वर बंद झाला.