आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काही नवीन घटना घडतात. अपेक्षेपेक्षा विपरीत परिणाम होतात. त्यामुळे नवे नवे शब्द जन्मास येतात. सध्या आपण ८ नोव्हेंबरपासून ज्याचे परिणाम भोगत आहोत, अनुभवत आहोत किंवा दूरदर्शनवरील वाहिन्यांवर जे कार्यक्रम होतात त्यातून प्रत्येक कंपनीच्या माणसाला विचारणा केली जाते की तुमच्या कंपनीवर डीमॉनेटायझेशनचा काय परीणाम झाला ? ट्रेडर्सनी नवीन घडामोडीमुळे नवे शेअर्स शोधले, या घटनेचे वर्णन निश्चलनीकरण असे मराठीत केले गेले. रीमॉनेटायझेशनचे वर्णन विमुद्रीकरण या शब्दाने केले गेले. ‘दोघांचे भांडण आणी तिसऱ्याचे मरण’ ही नवी म्हण प्रचारात आली. सरकार आणी त्यांच्या काळ्या पैशाबरोबरच्या भांडणामुळे सामान्य माणूस मात्र स्वतःचा कष्टाने कमावलेला पैसा खर्च करताना जेरीस आला.
सध्या मार्केट एका पातळीवर काम करते आहे. डीमॉनेटायझेशनमध्ये रद्द केलेल्या चलनापैकी किती पैसा परत येणार आहे. किती नोटा छापल्या जाणार आहेत. डीमॉनेटायझेशनचा परिणाम कमी होईल का आणी किती वेळात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला किती पाठींबा मिळेल?यामुळे मार्केटमध्ये किती फंड फ्लो येईल हे समजत नाही. GSTचे भिजत घोंगडे किती वेळपर्यंत चालू राहील हे समजत नाही.
आंतररराष्ट्रीय घडामोडी :-
बँक ऑफ जपानने आपल्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
सरकारी अन्नौंसमेंट ;-
- मायक्रो फायनान्स उद्योगाची SIT (SPECIAL INVESTIGATION TEAM) मार्फत चौकशी करणार आहेत असे समजते.
- सरकारने पेमेंट ऑफ वेजेस कायद्यामध्ये बदल करण्यासाठी वटहुकुम पास केला. पगार थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
- सरकार सोन्यावरील आयात ड्युटी १०% वरून ६% करणार आहे.
- सरकारने फेज III केबल टी व्ही डिजिटलायझेशनची सीमा ३१ जानेवारी २०१७ पर्यंत वाढवली. तसेच फेज IV केबल टी व्ही डीजीटलायझेशन सीमा ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढवली आहे.
- सरकारने योग्य पार्किंग प्रमाणपत्र असल्याखेरीज नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन करू नये असा नियम केला आहे.
- क्रूडची वाढती किंमत आणी क्रेडीट कार्ड्सवर दिली जाणारी सूट यांचा विचार करून साधारणपणे प्रती लिटर Rs २ पेट्रोल आणी डीझेलच्या किमतीत वाढ केली.
- अंदाजपत्रकात INFRASTRUCTURE सेक्टरवर जोर असेल त्यामुळे बिल्डींग मटेरीअल बनवणार्या कंपन्यांना फायदा होईल उदा :- मुरुडेश्वर सेरामिक्स, NITKO, NCL, कजारिया
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था :-
- RBI ने ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येक माणसाच्या खात्यात फक्त एकदाच Rs ५००० पेक्षा जास्त रक्कम बंदी घातलेल्या Rs ५०० आणी Rs १००० च्या नोटांच्या स्वरूपात जमा करता येतील. दोन बँक अधिकाऱ्यांनी चौकशी करून जर OK केले तरच जमा केलेली रक्कम खात्यात जमा होईल. असे जाहीर केले. NON-KYC कॉम्प्लायंट खात्यात एकावेळीच आणी जास्तीतजास्त Rs ५०००० जमा करता येतील. या RBI च्या घोषणेनंतर बर्याच लोकांनी प्रक्षोभ व्यक्त केल्यानंतर सरकारने मध्ये पडून KYC कॉम्प्लायंट खात्यामध्ये कोठलीही चौकशी करण्याची जरूर नाही असे जाहीर केले.
- रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर कमी होत आहे. हा दर १ US $ =Rs ६८ पर्यंत खाली आला.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-
- ‘CEAT’ ही कंपनी टायर उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी Rs २८०० कोटीची गुंतवणूक करणार आहे.
- अबन ऑफशोअर ही कंपनी अबन ड्रीलिंग या कंपनीत ४०% स्टेक खरेदी करणार आहे.
- झी लर्न आणी ट्री हाउस यांच्या मर्जर मध्ये झी लर्न फसते आहे असे गुंतवणूकदारांचे मत झाले होते. झी लर्न ने हा करार रद्द केला.
- एक्सीस बँकेने आपल्या काही शाखांत झालेल्या घोटाळ्यांचा मागोवा घेण्यासाठी KPMGला ऑडीटर म्हणून नेमले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्थितीचा आढावा घेतला.
- हिंदुस्थान झिंक ‘BUY BACK’ करेल किंवा खास लाभांश देईल असा अंदाज असल्यामुळे शेअरची किंमत वाढली.
- विप्रोने SEC (SECURITIES AND EXCHANGE COMMISSION) बरोबर करार केला. Rs ५ लाख पेनल्टी भरायचे मान्य केले. ही ६ वर्षांची जुनी केस होती.
- अल्केम LABच्या दमन युनिटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली.
- रिलायंस होम फायनांसच्या NCD (NON CONVERTIBLE DEBENTURES) इशुला चांगला प्रतिसाद मिळाला. Rs १००० कोटींच्या इशुला Rs ४००० कोटींची मागणी आली.
- ‘DELOITTE’ ह्या ऑडीट फर्मने NSE चे ऑडीट सुरु केले असल्याने NSE चा IPO हे ऑडीट पुरे होईपर्यंत पुढे ढकलला आहे.
- ‘CIPLA’ या कंपनीला UK कडून जनरिक औषधे LAUNCH करण्याची परवानगी मिळाली.
- रबराच्या किमती १ डिसेंबर पासून ७ % वाढल्या. स्वस्त चीनी टायर्सचे ‘DUMPING’ चालूच आहे.
- डिविज LAB च्या विझाग प्लांटच्या USFDA ने केलेल्या निरीक्षणात असे आढळून आले की कॉम्प्युटर सिस्टीमवर योग्य असे कंट्रोल नाही. फॉर्म नंबर ४८३ मध्ये ५ त्रुटी दाखवल्या गेल्या आहेत. त्यामुळे शेअरची किंमत खूप कमी झाली.
- टाटा ग्रूपमधील युद्ध आता ग्रूपच्या सीमा ओलांडून REGISTRAR ऑफ कंपनीज पर्यंत पोहोचले. यातील कटुता वाढतच आहे. त्याचबरोबर हे युद्ध पुष्कळ कालपर्यंत चालू राहील असे वाटते. मिस्त्रीनी टाटा ग्रुपला टाटा करून लढाई कोर्टात नेली. आतातरी टाटाग्रुपच्या शेअरमधील पडझड थांबेल अशी आशा करायला हरकत नाही.
कॉर्पोरेट एक्शन :-
- वेलस्पन एन्टरप्रायझेस ने Rs ६२ प्रती शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला. कंपनी या ‘BUY BACK’ वर Rs २६९ कोटी खर्च करेल.
- साऊथ इंडिअन बँकेने Rs १४ प्रती शेअर या भावाने आणी १:३ (तुमच्या जवळ ३ शेअर्स असल्यास एक राईट्स शेअर मिळेल) या प्रमाणात राईट्स शेअर्सचा इशू जाहीर केला.
- गोदरेज कन्झ्युमर या कंपनीने आपला ‘चार्म इंडस्ट्रीज’ मधील स्टेक ५०% वरून १००% पर्यंत वाढवला.
- ‘LAURAS LABS” या कंपनीची डिविज LAB शी तुलना केली जाते. या कंपनीच्या शेअर्सचे Rs ४९० ला लिस्टिंग झाले.
- S CHAND & CO. या प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने Rs ३०० कोटींच्या IPO साठी DRHP दाखल केले.
मार्केटने काय शिकवले :-
सध्या सर्व खाजगी बँकांची नावे बेनामी खात्यांच्या संदर्भात पुढे येत आहेत. पूर्वी आपण सरकारी बँकांना वाईट म्हणत होतो. अशावेळी आपण काय करायचे तर शेअर स्वस्त वाटला तर छोटया प्रमाणात घेऊन थोडासा फायदा घेऊन विकायचा हेच खरे.
डिसेंबरमध्ये नेहमीच ही स्थिती असते. परदेशात सर्वत्र नाताळच्या सणामुळे मार्केटला सुट्या असतात. युरोप, USA सणासुदीच्या मूडमध्ये असतात. मार्केटमध्ये VOLUME कमी असतो. सर्वजण १० जानेवारीनंतर नाताळची सुट्टी साजरी करून आल्यानंतर उत्साहाने ट्रेडिंग सुरु होईल. यावेळी अंदाजपत्रक १ फेब्रुवारी २०१७ ला सादर होईल त्यामुळे १० जानेवारीच्या आसपास त्याबाबतही अंदाज व्यक्त व्हायला लागतील.
सरकारचा डिजिटलायझेशनवरील जोर बघता आणी भारतीय अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याचा त्यांचा दृढनिश्चय बघता SOFTWARE विकसित करणाऱ्या तसेच सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात काम करणार्या कंपन्याच्या शेअर्सवर लक्ष ठेवणे फायदेशीर ठरेल.
तस्रच डीमॉनेटायझेशन आणी नंतर डिजिटलायझेशनमुळे ट्रेनिंगची जरुरत भासल्यामुळे संगणकाचे ट्रेनिंग देणाऱ्या तसेच STAFF भरती करणाऱ्य कंपन्यांकडे लक्ष ठेवावे. उदा :- NIIT, क्वेस कॉर्प, टीम लीज
‘काळा पैसा’ शोधण्यासाठी ‘डीमॉनेटायझेशन’चे अस्त्र बाहेर काढले खरे पण याचे काही दृश्य तर काही अदृश्य परिणाम झाले काही समजले काही अजूनही समजले नाहीत. चोर शोधण्याच्या प्रयत्नात संन्याशांना फाशी होते अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण एका धोरणाच्या विरोधात करोडो लोकांची बुद्धी कार्य करीत असते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्व भानगडी चालू असतात, कोणतीही स्थिती तशीच राहात नाही योग्य संधीची वाट पहा शिकार टप्प्यात येताच फासा टाका. आणि आपला फायदा मिळविण्याचा उद्देश साध्य करा
BSE निर्देशांक सेन्सेक्स २६०४० वर तर NSE निर्देशांक निफ्टी ७९८५ वर बंद झाला.