आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेअर मार्केटमध्ये सतत सागराप्रमाणेच लाटा उठत असतात भोवरे तयार होत असतात, ज्याप्रमाणे समुद्राची लाट किनार्यावर काय आणून टाकेल हे माहित नसते त्याप्रमाणे मार्केट मध्ये चालू असलेले मंथन कोणती नवरत्ने बाहेर टाकेल ह्याचीही निश्चिती नसते. ह्यावेळी ब्रेक्झीट, USA ची अध्यक्षीय निवडणुक, फेड, ECB च्या मुळे सतत मंथन चालू होते. त्यात डीमॉनेटायझेशन च्या रवीने आख्खे मार्केट ढवळून निघाले. आता भारतीय उद्योग निराशाजनक निकालांचे हलाहल देतो की चांगल्या निकालांचे अमृत देतो याची मार्केट वाट पाहत होते. आनंदाची गोष्ट अशी की मार्केटने सर्व प्रकारचे मंथन पचवून अमृतासारखी RALLY त्याच्या गुंतवणूकदारांना दिली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिकन वापरा, अमेरिकेत बनवा’ ही घोषणा केली. त्यांनी व्हिसाबद्दल तसेच आपल्या परराष्ट्र धोरणानुसार निर्णय घ्यावयास सुरुवात केली. दुःखात सुख एवढेच की त्यांनी असे सांगितले की भारताबरोबरीच्या संबंधात सौहार्द राहील.
UK च्या सुप्रीम कोर्टाने UK च्या पंतप्रधान थेरेसा मे ह्यांना ब्रेक्झीट साठी वाटाघाटी चालू करण्याआधी UK च्या संसदेची मंजुरी घ्यायला सांगितली. त्यामुळे आता ब्रेक्झीटच्या अटी कोणत्या असतील ह्यासाठी वाटाघाटी करणे लांबणीवर पडले.
शुक्रवारी तारीख २७ जानेवारी २०१७ NSE निर्देशांक निफ्टी ८६५० झाला. १ नोव्हेंबरनंतर हा आकडा पाहावयास मिळाला म्हणजेच डीमॉनेटायझेशन चा अडथळा मार्केटने पार केला. आतापर्यंत लागलेले कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले लागले. मार्केटला गती मिळाली सर्वांनी या RALLYला ‘PRE – BUDGET’ RALLY असे नाव दिले.
‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ या म्हणीप्रमाणे USA आणि चीन यांच्या भांडणात US $ वीक होत आहे. US # निर्देशांक १०० च्या पेक्षा कमी झाला आहे. पूर्वी चीनने जसे युआनचे अवमूल्यन केले तसे US $ चे अवमूल्यन झाले तर मेटल शेअर्सना फायदा होईल.
अंदाजपत्रकात गोल्ड पॉलिसी आणण्याचा विचार आहे. आयात कर जर जास्त असेल तर तर स्मगलिंग वाढते, चोरटी आयात वाढते. म्हणून आयात कर कमी करण्याचा विचार आहे. आयात ड्युटी १०% वरून ८% वर येण्याची शक्यता आहे. स्पेशल पार्क बनवणार. या अंदाजपत्रकात कमीतकमी करपात्र उत्पन्नाची मर्यादा Rs ४ लाख होण्याची शक्यता आहे.
सरकारी अन्नौंसमेंट
सरकारने MOIL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचे १,३४ कोटी शेअर्ससाठी Rs ३६५ फ्लोअर प्राईस वर ओपन ऑफर ही ओपन ऑफर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५ जानेवारीला ओपन होऊन त्याच दिवशी बंद झाली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २०% शेअर्स राखीव होते आणी त्यांना कटऑफ प्राईसवर ५% डीसकौंट होता. या ऑफर फोर सेलला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.
मायक्रो ATM , फिंगरप्रिंट रीडर, पॉइंट ऑफ सेल, बायोमेट्रीक रीडर बनवण्यासाठी जर काही पार्ट्स आयात करणे जरुरीचे असेल तर या पार्ट्सच्या आयातीवरील करात सुट मिळण्याची शक्यता आहे
ISMT या सरकारी संस्थेने साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सरकारने सांगितले आहे की वाढत्या साखरेच्या किमतीवर उपाय योजण्यासाठी सरकार विचार करीत आहे.
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी BEML मधील २६% स्टेक विकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी आवश्यक ते इन्व्हेस्टमेंट बँकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत.
अंदाजपत्रकात सेवा कर १२% आणि १८% अशा दोन स्तरावर आकारला जाईल. सध्या आकारल्या जाणार्या सेवा करात ०.५ ते १ % वाढ होऊ शकते प्राथमिक गरजा पुरवणाऱ्या सेवांवर कमी दराने सेवा कर आकारला जाईल असा अंदाज आहे.
सरकार E –KYC ला मंजुरी मिळाल्यानंतर आधारकार्डचा नंबरच DEMAT अकौंटचा नंबर असेल असा नियम करण्याच्या विचारात आहे.
‘GAAR’ नियम २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षासाठी ( A. Y. २०१८ ते २०१९) लागू होतील. यामध्ये व्यापाराच्या उद्देशाला महत्वाचे स्थान दिले आहे. कर बुडवणे हा उद्देश असता कामा नये.
SEBI RBI आणी इतर प्रशासनिक संस्था
सेबीने विजय मल्ल्या यांस शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यास तसेच कोणत्याही लिस्टेड कंपनीच्या डायरेक्टर पदावर राहण्यास मनाई केली आहे. तसेच DIEGO आणी मल्ल्या यांच्यात झालेल्या कराराची पुन्हा तपासणी केली जाईल असे सांगितले.
NPPA(NATIONAL PHARMACEUTICAL PRICING AUTHORITY) या प्रशासनिक संस्थेने ११ औषधे प्राईस कंट्रोलमध्ये आणली तर २२ औषधाच्या किंमती कमी केल्या.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
भारतातील आर्थिक सुधारणांचा (फिस्कल कन्सोलीडेशन) वेग सरकारने वाढवला पाहिजे असे S & P या आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने सांगितले. भारताचा DEBT TO GDP रेशियो ६०% पेक्षा कमी झाला तर भारतीय अर्थव्यवस्थेला अपग्रेड करता येईल असे सांगितले.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
यावेळी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल मार्केटच्या अपेक्षेपेक्षा चांगले आले. डीमॉनेटायझेशनच्या परिणामांवर कंपन्यांच्या कार्यक्षमतेने मात केली असे चित्र दिसले.
HCL-TECH या कंपनीचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला. या कंपनीने २०१७ साठी १२% ते १४% रेव्हेन्यू गायडंस दिला कॉन्स्टनट करन्सी मध्ये गायडंस कमी केला नाही. Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
CROMPTON च्या डस्ट फ्री पंख्याच्या रेंजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
टाटा मोटर्स नी हायब्रीड आणी इलेक्ट्रिक बस चालू केल्या. या बसची किंमत Rs १.६० कोटी ते २.०० कोटी असेल.
नाटको फार्मा या कंपनीच्या हैदराबाद उत्पादन युनिटमध्ये केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने ६ त्रुटी दाखवल्या. कंपनीने सांगितले की या त्रुटी गंभीर स्वरूपाच्या नसून दुरुस्त करण्यासारख्या आहेत.
चेन्नई पेट्रो, KPR मिल्स, EXIDE, मारुती, सुप्रीम इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक,ब्लू स्टार, बायोकॉन, चोलामंगलम इन्वेस्टमेंट, CROMPTON कन्झुमर, HAVELLS, HDFC BANK, YES बँक, एशियन पेंट्स, कोलगेट यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
करुर वैश्य बँक, ओबेराय रिअल्टी, IDFC BANK, कर्नाटक बँक आलेम्बील फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर , सागर सिमेंट्स अशोक LEYLAND, SPARC यांचे निकाल असमाधानकारक होते.
बायोकॉन या कंपनीला मालेशियातून इन्सुलिन साठी Rs ४६० कोटींची ऑर्डर मिळाली.
दिलीप बिल्डकॉन या कंपनीला महाराष्ट्रातून Rs ४६८ कोटींची ऑर्डर मिळाली.
साउथ कोरिअन कंपनी REDDY’s ने तयार केलेली औषधे USA मध्ये विकत होती. त्यामुळे औषधे स्वीकारली नाहीत त्यामुळे साउथ कोरिअन कंपनीने DR रेड्डीज वर दावा दाखल केला आहे.
प्रकाश इंडस्ट्रीज ला स्पॉंज आयर्नसाठी दीर्घ मुदतीसाठी COAL LINKAGES मिळाली
ITC ह्या FMCG क्षेत्रातील कंपनीचे तिमाही निकाल समाधानकारक आले. यामुळे डीमॉनेटायझेशनचा परिणाम भारतीय उद्योगाने पचवले असेच म्हणावे लागेल. तसेच ITC चा सिगारेटपासून मिळणाऱ्या उत्पानावरचा भाग कमी झाला. संजीव पुरी हे ITC चे CEO म्हणून ५ फेबृआरी पासून सूत्र स्वीकारतील. सघ्याचे CEO Y.C .देवेश्वर हे पुढील ३ वर्ष ‘MENTOR’ म्हणून राहतील.
कॉर्पोरेट एक्शन
GAIL या सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी कंपनीने १:३ असा बोनस जाहीर केला आहे म्हणजे तुंमच्याजवळ ३ शेअर असतील तर तुम्हाला १ बोनस शेअर मिळेल. तसेच Rs ८.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
MPHASIS BFL या कंपनीने शेअर ‘BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ३१ जानेवारी २०१७ ला बोलावली आहे
NLC (नेईवेली लिग्नाईट) या कंपनीने शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ३१ जानेवारी २०१७ ला बोलावली आहे
IPO
BSE च्या IPOला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला, HNI क्वोटा १५१ वेळा तर QIB क्वोटा ३२ वेळेला आणी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी असलेला क्वोता ६.२२ वेळेला ओव्हर सबस्क्राईब झाला.
D MARTचा IPO नजीकच्या काळात येणार आहे त्यामुळे TRENT, SHOPPER’S STOP अशा कंपन्यांच्या शेअर्स कडे लक्ष ठेवावे
मार्केटने काय शिकवले
बुधवारी तारीख २६ जानेवारी २०१७ रोजी PUT CALL रेशियो १.३४ होया म्हणजेच ओव्हरबॉट झोन होता अशावेळी प्रॉफीट बुकिंग करणे योग्य ठरते. पण बुधवारी वायदा एक्सपायरी आणी २ ते ३ ट्रेडिंग सेशननंतर अंदाजपत्रक सादर होणार असल्यामुळे लोकांनी खरेदी केली. PUT CALL रेशियो १.५९ झाला.
बुधवारच्या वायदा बाजाराच्या आकड्यांचे निरीक्षण केल्यास. निफ्टी ८००० ते ९००० या रेंजमध्ये राहील असे वाटले. IT आणि फार्मा सेक्टर पासून दूर रहाणार. मार्केट अंदाजपत्रक सादर होण्याच्या दिवशी म्हणजे १ फेबृआरी २०१७ रोजी सेन्सेक्स ६०० पोइंट व्होलटाईल राहील.
मार्केटमध्ये ‘लेफ्ट ऑउट फिलिंग’ जाणवले जे शेअर चांगले पण ‘BAD PATCH’ मध्ये असल्यामुळे योग्य भावाला उपलब्ध होते ते शेअर वाढले उदा :- भेल, PNB, AXIS बँक. ICICI बँक भारती एअरटेल त्यामुळे मला ही ‘CATCH UP RALLY’ आहे असे वाटले. काहीही म्हणा काहीही नाव द्या मार्केट वाढले की खुशीची लहर पसरते हेच खरे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २७८८२ आणि NSE निर्देशांक निफ्टी ८६४१ वर बंद झाले.
Monthly Archives: January 2017
आठवड्याचे समालोचन – १६ जानेवारी २०१७ ते २३ जानेवारी २०१७ – नांदा सौख्यभरे!
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC – Dori via wikipedia
‘यंदा लग्नकर्तव्य आहे’ असे सांगून सूचक मंडळात नाव घालतात निवड होते बैठक, साखरपुडा, लग्न, लक्ष्मीपूजन, मधुचंद्र असे सर्व सोपस्कार पार पडतात. पण घरातील माणसांच्या मनात एकाच धागधुग असते येणारी सून वागेल कशी? सगळ्यांना सांभाळून घेईल का? ‘खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे’असे झाल्यास काय करावे अशी एक प्रकारची काळजी किंवा अनाकलनीय भीती सगळ्यांच्या मनात असते. सध्या तसेच काहीसे वातावरण मार्केटमध्ये आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीला उभे राहिले, प्रचार झाला, निवडून आले. प्रेसिडेंट इलेक्ट जानेवारी २० २०१७ पासून पदभार सांभाळणार आणी अध्यक्ष होणार. त्यांची वागणूक, एकंदरच धोरणे विकसनशील देशांच्या आणी पर्यायाने इमर्जिंग मार्केट्सच्या दृष्टीने कशी असतील, त्या धोरणांचा कोणत्या क्षेत्रांवर, त्यातील कोणत्या भारतीय कंपन्यांवर किती आणी कोणत्या प्रकारचा परिणाम होईल या विचारातच हा आठवडा संपला.
आंतरराष्ट्रीय घटना
USA मध्ये डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी २०१७ पासून अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतील. त्यामुळे USA चा परदेशी कंपन्या तसेच परदेशी लोकांना नोकऱ्या देण्याच्या धोरणात फरक पडण्याचा संभव आहे. याचा परिणाम IT, फार्मा या क्षेत्रातील कंपन्यांवर आणी ज्यांचा बिझिनेस USA बरोबर जास्त आहे अशा आयातनिर्यात क्षेत्रातील कंपन्यांवर होईल. US $ मजबूत होईल आणी रुपयाचा विनिमय दर कमी होईल
सौदी अरेबिया या तेलउत्पादक देशाने आपले उत्पादन कमी केल्यामुळे क्रूडची किंमत वाढावयास सुरुवात झाली. चीनचे युआन हे चलन US $ च्या तुलनेत खूपच कमजोर आहे. त्यामुळे USA मधील उद्योग चीनी उद्योगांबरोबर स्पर्धा करू शकत नाही. USA $ कमजोर होणे जरुरीचे आहे. चीनच्या सेन्ट्रल बँकेने १९००० कोटी युआन सिस्टीममध्ये घातले.
सरकारी अन्नौंसमेंट
- लो कॉस्ट हौसिंगला उत्तेजन देण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ चा दर्जा द्यावा या विचारात सरकार आहे. याचा फायदा गणेश हौसिंग, अन्सल हौसिंग, पेनिनसुला land यांना होईल.
- सरकार राजीव गांधी इक्विटी सेविंग स्कीम नव्या रुपात आणी नव्या नावाने आणू शकते. या योजनेत Rs १२ लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्याना Rs ७५००० ते Rs १००००० पर्यंत गुंतवणूक करता येईल. ह्यावर आय करामध्ये सवलत मिळू शकेल. शक्यता आहे की पहिल्यावेळी गुंतवणूक करणार्यांबरोबर जुन्या गुंतवणूकदारांनाही ही सवलत दिली जाईल.
- सायबर सिक्युरिटीसाठी सरकार लवकरच ऑपरेशन सेंटर चालू करणार आहे.
- सरकारने एकूण Rs ११८७ कोटींचे ६ FDI प्रस्ताव मंजूर केले यात हॉलंडची कंपनी रेसीफार्मच्या Rs ९५० कोटींचा प्रस्ताव सामील आहे.
- CCI (COMPETITTION COMMISION ऑफ इंडिया) ने ७ सिमेंट कंपन्यांवर Rs २०६ कोटी दंड लावला. हा दंड कार्टलायझेशन (सर्व कंपन्यांनी एकमेकांच्या सहाय्याने आणी संमतीने किंमत आणी इतर धोरणात्मक निर्णय घेणे)साठी लावला आहे.
- आलोक वर्मा यांची CBI चे नवीन प्रमुख म्हणून नेमणूक केली. ही नेमणूक दोन वर्षांसाठी आहे.
- सरकारने सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे लिस्टिंग करायचे ठरवले आहे. यात युनायटेड इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, ओरीएंटल जनरल इन्शुरन्स, NATIONAL इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा समावेश आहे. या कंपन्यातील सरकारची हिस्सेदारी १००% वरून ७५% वर आणली जाईल.
- सरकारने इलेक्ट्रोनिक आयटेम्सचे उत्पादन करणाया कंपन्यांना करात सवलत मिळण्यासाठी सातत्याने ३ वर्ष व्यापारी तत्वावर उत्पादन करावे लागेल असे सांगितले आहे.
- CBDT सर्क्युलर प्रमाणे इंडिया डेडिकेटेड फंड्सना भारतीय करप्रणालीप्रमाणे कर भरावा लागत होता. जर एखादा गुंतवणूकदार ५% पेक्षा जास्त गुंतवणूक करेल तर त्याला जास्त कर भरावा लागे. तसेच हा फंड ज्या देशातील असेल त्या देशाच्या करप्रणालीप्रमाणे कर भरावा लागेल. ही ट्रिपल TAX पॉलिसी या फंडांना मान्य नव्हती. हे CBDT चे सर्क्युलर सरकारने जवळ जवळ मागे घेतल्यासारखेच आहे. मुख्य म्हणजे एखाद्या धोरणाच्या विरोधात काही मत मांडले तर सरकार ऐकून घेते हे जाणवले.
- सरकारने CPSC (सेन्ट्रल पब्लिक सेक्टर कंपनीज) ETF ची घोषणा केली. हा इशू १८ जानेवारीला सुरु होऊन २० जानेवारीला बंद होईल.
- या फंडात कमीतकमी Rs ५००० गुंतवणूक करावी लागेल.
- गुंतवणूक करण्यासाठी ‘ DEMAT’ अकौंट असणे जरुरीचे आहे.
- या फंडाच्या युनिट्स ची खरेदी ब्रोकरमार्फत केली जाईल.
- एक वर्षानंतर विकल्यास लॉंग टर्म कॅपिटल गेन्स कर लागणार नाही. हा फंड सरकारी कम्पन्यातच गुंतवणूक करेल या कंपन्या नवरत्न आणी महारत्न या प्रकारातील असतील.
- हा फंड राजीव गांधी इक्विटी सेविंग योजनें अंतर्गत आहे. पहिल्या वेळी गुंतवणूक करणार्याला ५००००पर्यंत TAX बेनिफिट आहे.
- सरकारने हिंदुस्थान झिंक या कंपनीकडून लाभांशाच्या स्वरूपात Rs १५००० कोटी अपेक्षित आहेत असे सांगितले आहे.
- सरकारने भारत डिजिटल या उद्देशाने खेडोपाडी डेटा फ्री मिळावा हा उद्देश ठेवल्यास Rs ४००० कोटी खर्च येईल.
- GSTचे घोडे गंगेत न्हाले. दुहेरी नियंत्रणाचा प्रश्न केंद्र सरकार आणी राज्य सरकारांनी एक्मताने सोडविला.आता GST १ जुलै २०१७ पासून लागू केला जाईल असा अंदाज आहे.
- पेट्रोलियम मंत्रालयाने युरो III नियमानुसार बनवण्यात आलेल्या वाहनाना १ एप्रिल २०१७ पासून बंदी येईल असे सांगितले सरकार युरो IV नियमानुसार वाहने बनवण्यासाठी Rs ३०००० कोटी गुंतवणूक करेल.
- प्रिंट मेडिया सुचना आणी प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करते. प्रिंट मेडियाची १३ वर्षात समीक्षा झाली नव्हती. आता सरकारने प्रिंट मेडियामध्ये FDI ची मर्यादा २६ % वरून ४९% केली आहे. याचा फायदा HT मेडिया, जागरण प्रकाशन, DB कॉर्प या कंपन्यांना होईल.
- सरकार फरटीलायझर कंपन्यांना स्पेशल बँकिंग अरेंजमेंट नुसार Rs १०००० कोटी देणार आहे.
- सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना Rs २५००० कोटी भांडवल देईल. यामध्ये स्टेट बँक आणी PNB यांना इतर बँकापेक्षा जास्त रक्कम मिळेल.
- अल्युमिनियमची भारतात ५० % आयात होते त्यामुळे MIP लावावी अशी मागणी होत आहे. याचा फायदा NALCO, हिन्दाल्को, तसेच वेदांता ग्रूपला होईल.
- पर्यटन क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांच्या बिलाच्या ६०% रकमेवर २२ जानेवारी पासून सेवा कर आकारला जाईल.
- सरकारने चीनमधून आयात होणार्या स्टीलवर ANTI DUMPING ड्युटी लावली.
- बिहार राज्य सरकारने १ एप्रिल २०१७ पासून मद्यार्क बनविण्यासाठी परवाने दिले जाणार नाहीत असे जाहीर केले. तसेच सध्या दिलेल्या परवान्यांचे २०१८ नंतर नुतनीकरण केले जाणार नाही असेही जाहीर केले. हा मद्यार्क उत्पादन करणार्या कंपन्यांसाठी मोठा धक्का आहे.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
- WPI आकड्यांमध्ये यावेळी वाढ झाली. WPI यावेळी ३.१५% वरून ३.३९% झाला. जरी अन्नधान्य आणी प्राथमिक गरजांच्या वस्तूंमध्ये घट दिसली तरी इंधन, MFG WPI मध्ये वाढ झाली.
- डिसेंबर २०१६ या महिन्यासाठी ट्रेड डेटा (आयात निर्यातिचे आकडे) चांगले आले निर्यात सतत चौथ्या महीन्यात वाढली. निर्यात US $ २३८०० बिलियन तर आयात US $ ३४.२५ बिलियन झाली आणी अशा तर्हेने US $ १०.४ बिलियन ट्रेड GAP राहिली.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
RBI ने ATM मधून दर दिवशी पैसे काढण्याची मर्यादा Rs ४५०० वरून Rs१०००० पायांत वाढविली. तसेच चालू (CURRENT) खात्यातून दरदिवशी पैसे काढण्याची मुदत Rs १००००० पर्यंत वाढवली. परंतु आठवड्यातून पैसे काढण्याची मर्यादा बचत खात्यांसाठी रस २४००० कायम ठेवली.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- SDR 4A योजनेअंतर्गत मॉनेट इस्पात एनर्जी आणी उत्तम गालवा स्टील या कंपन्या विकल्या जातील.
- कॅडिला हेल्थकेअरला कॅन्सर साठीच्या आणी ऑरोबिंदो फार्माला HIV साठीच्या औषधासाठी USFDA कडून परवानगी मिळाली.
- टाटा ग्लोबल बिव्हरेजीस आणी स्टार बक्स ‘टीवाना टी बार’या नावाने चेन सुरु करणार.
- फेडरल बँक, लक्ष्मी विलास बँक, डेव्हलपमेंट कोओपरेटीव बँक,येस बँक, MCX, DHFL. LIC हौसिंग रिलायंस इंडस्ट्रीज यांचे तिमाही निकाल चांगले आले तर AXIS बँकेचे तसेच कॅनरा बँकेचे निकाल खूपच असमाधानकारक आले.
- इस्टर इंडस्ट्रीज या कंपनीने स्पेसीअलिटी पॉलीएस्टर धाग्यांच्या उत्पादनासाठी पेटंटसाठी अर्ज दाखल केला. कंपनी गुरु ग्राममध्ये Rs ५० कोटी गुंतवणूक करून R & D युनिट चालू करेल.
- कोल इंडियाने कोकिंग कोलची कींमत २०%ने वाढवली. कोल इंडिया परदेशात ‘कोकिंग कोल रिझर्व’ खरेदी करण्याचा प्रयत्न करेल असे जाहीर केले.
- सुझलानने १०००० MW विंड CAPACITYचे उद्दिष्ट पुरे केले.
- अशोक LEYLAND या कंपनीने गुरु आणी पार्टनर या नावाने २ प्रकारचे ट्रक बाजारात आणले.
- टाटा मोटर्सने नवीन SUV गाडी ‘HEXAA’ या नावाने बाजारात आणली. याची किंमत Rs १२.०० लाख ते १६ लाख आहे.
- बजाज ऑटोने 2KTMLR रेंजची बाईक Rs १.७५ लाख ते २.०० लाख किंमतीला बाजारात आणली.
नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO
- BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) या भारतातील सर्वात जुन्या आणी मोठ्या STOCK EXCHANGE चा IPO पुढील आठवड्यात २३ जानेवारी २०१७ ला उघडून २५ जानेवारी २०१७ रोजी बंद होईल. या IPOचा PRICE BAND Rs ८०५ ते Rs ८०६ आहे. मिनिमम लॉट १८ शेअर्सचा आहे.
- GAIL या कंपनीने बोनस आणी भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी २५ जानेवारी २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग बोलावली आहे.
या आठवड्यात मार्केटने काय शिकवले
२० जानेवारी २०१७ रोजी मदरसन सुमी आणी कॅडिला हेल्थकेअर या दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे अक्विझिशन केले. ज्यावेळी कमी किमतीत चांगली कंपनी अक्वायर केली जाते तेव्हा ती कॉर्पोरेट एक्शन योग्य समजली जाते. मदरसन सुमी या कंपनीने मोठे अक्विझिशन महागात केले पण फारसे कर्ज नसलेली, फायद्यात चालणारी कंपनी त्यांनी घेतली. त्यामानाने कॅडिलाने केलेले अक्विझिशन लहानसे असले तरी पाय रोवण्यासाठी योग्य होय. असा विचार केल्यास शेअर्सच्या किमतीवर चांगला किंवा वाईट परिणाम होइल हे समजते.
या आठवड्यात विमा व्यवसायासंबंधी केलेली घोषणा फलदायी ठरेल असे दिसते. सर्व सरकारी विमा कंपन्यांचे वेगवेगळे लिस्टिंग केले जाईल याचा फायदा ICICI प्रुडेन्शियल आणी MAX लाईफ यांना होईल. ज्या लोकांचे ICICI प्रुडेन्शियल च्या IPO मध्ये अडकले होते त्यांना काहीसे हायसे वाटले असावे. मार्केटच्या मंदीच्या गर्मीमध्ये ही गार वाऱ्याची झुळूक म्हणावी लागेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २७०३५ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८३५० वर बंद झाले.
आठवड्याचे समालोचन – 9 Jan ते 15 Jan – दशा ठरवते दिशा
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा आठवडा आनंदाचा. बरोडा बँकेने सांगितले की ज्यांचे क्रेडीट पॉइंट चांगले आहेत त्याना कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळेल. हे चांगल्या वागणूकीसाठी मिळालेले बक्षीसच होय. नाहीतर जे लोक कर्ज फेडत नाहीत त्यांची कर्जे माफ होतात. हे कळल्यावर लोकांची कर्ज फेडण्याची वृत्तीच नाहीशी होते. जर सरकारने कर्ज माफ केले नाही तर चीड येते. कर्ज बुडवण्याच्या वृत्तीला वेसण घालून कर्ज फेडण्याच्या वृत्तीचे वेगळ्या प्रकारे कौतुकच !
त्याचबरोबर टी सी एस चे प्रमुख चंद्रशेखरन याची टाटा सन्सच्या चेअरमनपदी झालेली नेमणूक हे ही एक चांगल्या कार्यक्षमतेला आणी चांगुलपणाला मिळालेले प्रशस्तीपत्रकच होय. सोमवार दिनांक ९ जानेवारी २०१७ रोजी PUT CALL रेशियो १.११ होता. खताचे शेअर्स वेंल्थ DISTROYERS आहेत असेच म्हणावे लागेल. २००७ साली चंबळ फरटीलायझर या कंपनीचा शेअर Rs ८५ होता तो आजही २०१७ मध्येही Rs८५ च आहे. १० वर्षानी ०% फायदा झाला. मार्केट्ची गुणवत्ता खराब होते आहे असे वाटते. GVK, GVR,JP असे शेअर्स वाढू लागले आणी चांगले शेअर्स पडू लागले की वेगळीच शंका येते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी :-
- USA च्या मावळत्या अध्यक्षांचे श्री बराक ओबामा याचे निरोपाचे भाषण म्हणजे कृतकृत्य झालेल्याची पावती होती आपल्या ‘WE CAN DO IT’ या घोषणेचा संदर्भ घेऊन त्यांनी सांगितले की USA च्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ‘WE HAVE DONE IT’ असे ते म्हणाले. ट्रम्प हे अध्यक्षपदाची सूत्रे २० जानेवारीपासून सांभाळतील. त्यांचा भार स्थानीय लोकांना काम मिळवून देण्यावर आहे. त्यांची कडी नजर विदेशी फार्मा कंपन्यांवर असेल. भारतीय फार्मा कंपन्यांची बरीच विक्री USA मध्ये होत असल्याने फार्मा कंपन्यांना USA सरकारच्या निर्णयाची झळ पोहोचण्याची शक्यता आहे. H1 B विसाचे नियम कडक करणार असल्यामुळे IT सेक्टरमधील कंपन्यांवर ज्यांचा बहुतांशी बिझिनेस USA मध्ये आहे त्यांनाही ही झळ लागण्याची शक्यता आहे.
- चीनने काही ठराविक प्रकारच्या स्टील प्रोडक्ट्सचे उत्पादन करण्यावर बंदी घातल्यामुळे भारतीय स्टील कंपन्यांचे शेअर्स वधारले उदा :- टाटा स्टील्स
सरकारी अनौंसमेंट :-
- सरकार पवन हंस मधील ५१% स्टेक विकणार आहे या कंपनीत ONGC चा ४९% स्टेक आहे. या कंपनीचे व्यवस्थापन सुद्धा सरकार दुसऱ्या कंपनीस देण्यास तयार आहे.
- UP मधील निवडणुकांच्या मुहूर्तावर सरकार लेदर उद्योगाला Rs ४००० कोटीचे package देण्याचा विचार करत आहे. याचा फायदा लिबर्टी शूज, मिर्झा, रीलाक्सो, बाटा यांना होईल.
- मध्य प्रदेश राज्य सरकारने POS (पॉइंट ऑफ सेल) मशीन करमुक्त केली. तसेच मध्य प्रदेशचे राज्य सरकार दारूबंदी आणण्याचा विचार करत आहे.
- सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्व सरकारी कंपन्याना जास्तीत जास्त लाभांश देण्याची सुचना केली आहे. BPCL कडून Rs १७०० कोटी तर HPCL कडून Rs १५०० कोटी तर ONGC कडून Rs २००० कोटी आणी IOC कडून Rs ५००० कोटी लाभाशांची सरकारला अपेक्षा आहे.
- सरकारने MDR ( MERCHANT DISCOUNT RATE) हा चार्ज आता ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी द्यावा असे सांगितले. क्रेडीट कार्ड इशू करणाऱ्या बँका, पेट्रोल पंपांचे मालक आणी पेट्रोल भरणारे ग्राहक आणी OMC यापैकी कोणी कोणी हे चार्जेस भरावेत याविषयी वाद होता.
- BEML मधील २६% स्टेक विकण्यासाठी सरकारला CCEA ने मंजुरी दिली.
- सरकार कुकिंग कोल वरची ड्युटी २.५% आणी निकेलवरची ड्युटी ५% कमी करण्याची शक्यता आहे याचा फायदा आशापुरा माईनकेम, विसा स्टील, भूषण स्टील, मॉनेट इस्पात या कंपन्यांना होईल.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी :-
- नोव्हेंबर २०१६ या महिन्यासाठी IIP ५.७ % झाले. ही गेल्या १३ महिन्यातील उच्चतम आहे तसेच CPI महागाई डिसेंबर महिन्यासाठी ३.४१% झाली हा महागाईचा आकडा २५ महिन्यातील कमीतकमी आकडा आहे
- सरकारने अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग ७.६% वरून ७.१ पर्यंत कमी केला तर काही रेटिंग एजन्सीजने हा दर ७% पर्यंत कमी केला आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-
- GRANULS या कंपनीच्या तेलंगाणा राज्यातील गागीलापूर येथील उत्पादन युनिटवर पोर्तुगालच्या INFRAMED या रेग्युलेटरी संस्थेने इन्स्पेक्शन करून ११ त्रुटी दाखवल्या. यामुळे कंपनीचा शेअर कोसळला.
- ऑरोबिंदो फार्माने ‘GENERICS’ही पोर्तुगीज कंपनी खरेदी केली. ऑरोबिंदो फार्माला मिरगीच्या औषधासाठी परवानगी मिळाली.
- IDBI बँकेने पंजाब अल्कलीजच्या कर्जाचे शेअर्स मध्ये रुपांतर करण्यासाठी ४७ लाख शेअर्स घेतले.
- पॉवर ग्रिड या सरकारी कंपनीला Rs ४३५० कोटींची ऑर्डर मिळाली.
- MAX वेंचर मध्ये ‘NEWYORK LIFE’ ने आपला स्टेक वाढवला.
- शिवा सिमेंटचे प्रमोटर्स JSW सिमेंट या कंपनीला १९.५ कोटी शेअर्स Rs १४ प्रती शेअर या भावाने विकणार आहेत. शिवा सिमेंटमध्ये प्रमोटर्सचा स्टेक ३६% आहे. ही बातमी मार्केटला होती कारण या कंपनीच्या शेअरची किंमत गेले काही दिवस वाढत होती. या कंपनीच्या शेअर्ससाठी ओपन ऑफर येण्याची शक्यता आहे.
- भारती एअरटेल १२ जानेवारी पासून पेमेंट बँक सुरु करत आहे. कंपनी पेमेंट बँकेत Rs ३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
- HOCL ही कंपनी आपल्याकडे असलेली अतिरिक्त जमीन BPCL ला विकण्याच्या विचारात आहे.
- S H केळकर आणि कंपनी ही कंपनी GFCL हा नवीन फ्लेवर सुरु करणार आहेत.त्यांची सबसिडीअरी ‘केवा फ्लेवर्स’ मार्फत खरेदी केला.
- आठवडा संपता संपता टी सी एस आणी इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे तसेच इंडस इंद बँकेचे आणी साउथ इंडिअन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
- टी सी एस चा रेव्हेन्यू Rs २९७३५ कोटी तर नफा Rs ६७७८ कोटी आणी US $ रेव्हेन्यू US $ ४३८ कोटी झाला. BFSI, MFG, तसेच रिटेल मध्ये चांगली वाढ झाली. ATTRITION रेटही कमी झाला. हे निकाल मार्केटच्या अपेक्षेपेक्षा थोडे चांगलेच आहेत.
- इन्फोसिसचा रेव्हेन्यू Rs १७२७३ कोटी तर नफा ३७०८ कोटी आणी US $ रेव्हेन्यू US$255 कोटी झाला. परंतु कंपनीने आपला २०१७ च्या वित्तीय वर्षासाठीचा गायडंस कमी केला.इन्फोसिसचा निकाल मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे आला.
- इंडस इंद बँकेचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले. डीमॉनेटायझेशनचे वादळ या बँकेने तरी यशस्वीरीत्या थोपवले.
कॉर्पोरेट एक्शन :-
- NHPC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने Rs १.७० प्रती शेअर अंतरिम लाभांश दिला.
- हिंद रेक्टीफायर ह्या कंपनीने राईट्स इशू आणण्यावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक १५ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.
- BEL (भारत इलेक्ट्रोनिक लिमीटेड) या कंपनीने शेअर्सच्या विभाजनावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग २७ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.
- VIVIMED या कंपनीला आपल्या ४ सबसिडीअरिज कंपनीत मर्ज करण्यासाठी हायकोर्टाने मंजुरी दिली.
- BSE या भारतातील सर्वात जुन्या आणी मोठ्या STOCK EXCHANGE चा IPO २३ जानेवारी २०१७ ला ओपन होऊन २५ जानेवारी २०१७ ला बंद होईल.
मार्केटने काय शिकवले :-
ज्या कंपन्या किंवा जे उदयोग तोट्यात चालत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न सरकार करीत असे. पण सरकारही आता कंटाळले. कितीही मदत केली तरी सुधारणा दिसत नाही हे पाहिल्यावर त्या कंपन्या बंद कराव्यात, त्यातील मालमत्ता विकावी किंवा या कंपन्या व्यवस्थापनासकट चालवावयास द्याव्या हा विचार पुढे आला आहे. म्हणजेच उद्योगाची दशाच ही त्या उदयोगाच्या बाबतीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाच्या दिशेचे कारण असते.
मार्केट काही गोष्टी डोक्यावर घेते व काही गोष्टीकडे दुर्लक्ष करते, ट्रम्पच्या भाषणाकडे मार्केटने फारसे लक्ष दिले नाही असे जाणवले. मार्केटने डीमॉनेटायझेशनलाही मागे टाकले आहे. हे IIP व इन्फ्लेशन च्या आकड्यांनी दाखवले. त्यामुळे मार्केट वाढत राहिले व आनंदाची लहर जाणवली
आज मकर संक्रांत, तीळा तीळाने का होईना शेअरमार्केट विषयीच्या ज्ञानात भर पडून कमाईच्या गुळाची गोडी चाखता यावी म्हणून ‘तिळगुळ घ्या आणी गोड बोला’ गोड बोलून शेअर मार्केटचे ज्ञान तीळा तीळाने दुसर्यास देऊन लोकांचेही ज्ञान आणी कमाई वाढवा. तीळ सांडू नका आणी मार्केटशी भांडू नका. आपण जर जमा केलेले ज्ञान नीट वापरले तर तोटा होऊन मार्केटशी भांडण्याचा प्रसंगच येणार नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २७२३८ वर NSE चा निर्देशांक निफ्टी ८४०० वर बंद झाला.
आठवड्याचे समालोचन – २ जानेवारी २०१७ ते ६ जानेवारी २०१७- एकाच नाण्याच्या दोन बाजू : फायदा आणी नुकसान
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन वर्षाचा पहिला आठवडा बरा गेला. बँकांच्या कर्जावरील रेट कटचे कोंबडे उशिराने का होईना पण आरवले त्यासाठी नोटबंदीसारखा जालीम उपाय करावा लागला. यात सुद्धा काही बँकांनी जुन्या कर्जदारांना रेट कटचा फायदा घ्यायचा असेल तर Rs १०००० पर्यंत सेवा चार्जेस भरायला सांगितले आहेत. ‘शिंक्याचे तुटले आणी बोक्याचे फावले’ तसा नोटबंदीमुळे बँकांची कर्जवसुली झाली आयत्या ठेवी मिळाल्या. परिस्थिती अशी आहे की क्रेडीट ग्रोथ ठप्प झाली आहे, ठेवींवर व्याज तर द्यावे लागेल आणी कर्जावरील व्याजाचा दरही कमी करावा लागल्यामुळे बँकांचे मर्जीन कमी झाले आणी त्याचा विपरीत परिणाम तिमाही निकालांवर आणी बँकांच्या शेअर्सच्या किमतीवर होण्याचा संभव आहे. सरकारच्या आटोकाट प्रयत्नानंतरही उत्पादनात, निर्यातीत वाढ झाली नाही.
यासर्व गोष्टी लक्षात ठेवूनही मार्केटने नव्या वर्षाचे स्वागत तेजीने केले. ज्यांनी निफ्टी ७९०० असताना खरेदी केली असेल त्याना निफ्टी ८२५० च्या आसपास हे शेअर्स फायदा घेऊन विकता आले. सामान्य माणसांच्या गरजांकडे लक्ष द्या असेच मार्केटलाही सुचवावेसे वाटले का ? हे कळले नाही. साखर चहा तांदूळ ताग कॉफी रबर निर्यात या उद्योगातील कंपन्यांचे शेअर्स या ना त्या कारणानी वाढले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी :-
डोनाल्ड ट्रम्प USA च्या अध्यक्ष पदाची सूत्रे २० जानेवारी २०१७ रोजी सांभाळतील. लवकरच H1 B व्हिसा विधेयक USA च्या संसदेमध्ये सादर केले जाईल. यातील दोन तरतुदी म्हणजे हा व्हिसा मिळण्यासाठी कमीतकमी USA $ १ लाख पगार आणे मास्टर्सची डिग्री आवश्यक केली जाणार आहे. हे बिल मंजूर होण्यासाठी १ वर्षाचा काळ लागेल.पण हे बिल पास झाल्यावर स्थानीक कर्मचारी कामावर ठेवणे फायदयाचे होईल. ट्रम्प यांच्याच पक्षाला संसदेत बहुमत असल्यामुळे त्यांना आपली धोरणे राबविणे सोपे जाईल. USA च्या संसदेने ‘न्यूनतम वेतन बिल’स्वीकार केले. याचा तडाखा IT क्षेत्राटेल कंपन्यांना बसेल.
ओपेक आणी नॉन ओपेक देशांमध्ये जे करार झाले त्याची अंमलबजावणी चालू झाल्यामुळे क्रूड ऑईलच्या किमतीत सतत सुधारणा होत आहे. याचा फायदा ऑईल एक्सप्लोरेशन कंपन्यांना होईल. इराण जास्तीतजास्त तांदूळ भारतातून मागवणार आहे. पूर्वी पेक्षा जास्त आयात परवाने देणार आहे. चीनने सुद्धा तांदळाचे नमुने मागवले आहेत. याचा फायदा KRBL,कोहिनूर फूड्स, LT फूड्स या कंपन्यांना होईल.
सरकारी अनौंसमेंट :-
- सरकारने ब्रांडेड नॉन ज्युवेलरी सोन्यावरची ‘COUNTERVEILING आयात’ ड्युटी ६% वरून १२.५ % केली याचा परिणाम TBZ, टायटन, PC ज्युवेलर्स, गीतांजली जेम्स या कंपन्यांवर होईल.
- सरकारने बांगलादेश आणी नेपाल यांच्याकडून आयात होणाऱ्या तागावर ANTI DUMPING ड्युटी ५ वर्षासाठी लावली.
- सरकारने जाहीर केले की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे भत्ता STRUCTURE तयार केले जाईल.
‘LNG’ वरची आयात ड्युटी सरकार काढून टाकण्याच्या विचारात आहे. - निर्यातीसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजामध्ये ३%सूट (इंटरव्हेंशन) होती ती २०१७ च्या वर्षात चालू ठेवणार आहे. या योजनेमध्ये ४१६ उत्पादने सामील केली जातील.
- पंतप्रधानांनी रिअल्टी सेक्टरसाठी मागणी वाढावी यासाठी व्याज दारात काही सवलती जाहीर केल्या. घरासाठी घेतलेल्या कर्जासाठी Rs ९००००० कर्जापर्यंत ४% ते Rs १२ लाख कर्जापर्यंत ३% सूट जाहीर केली. तसेच पंतप्रधानांनी जेष्ठ नागरिकांसाठी १० वर्षासाठी Rs ७५०००० पर्यंत मुदत ठेव योजना जाहीर केली. या मुदत ठेवीवर ८% व्याज मिळेल हे व्याज दर महिन्याला दिले जाईल; पण ही ठेव १० वर्षांपर्यंत काढता येणार नाही. बँकांना हा व्याजाचा दर देण्यासाठी सबसिडी दिली जाईल.
- निवडणूक आयोगाने पंजाब, UP, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्याच्या मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. ह्या तारखा १ फेबृआरीला अंदाजपत्रक सादर केल्यानंतरच्या आहेत. त्यामुळे मतदानावर अंदाजपत्रकातील तरतुदींचा परिणाम होईल त्यामुळे एकतर अंदाजपत्रक मतदानाची शेवटची फेरी झाल्यावर सादर करा किंवा मतदानाच्या तारखांत बदल करा अशी विरोधी पक्षांनी मागणी केली. याची परिणाम बजेट RALLY वर होऊ शकतो.
- शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जावरचे ६० दिवसांसाठीचे व्याज केंद्र सरकार भरेल असेही जाहीर केले.
- सरकारने पेट्रोल डीझेल तसेच ATF च्या किंमती वाढवल्या. याचा विपरीत परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर होईल.
- सरकारने ITDC ची तीन हॉटेल्स, अनुक्रमे भुवनेश्वरचे हॉटेल कलिंग दिल्लीचे अशोक हॉटेल आणी हॉटेल जनपथ राज्य सरकारांकडे किंवा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा निर्णय घेतला आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी:-
- ऑटो विक्रीच्या आकड्यांमध्ये M&M ची विक्री ४% कमी तर त्यांच्या TRACTOR विक्री ९% ने वाढली , आयशर मोटर्सची विक्री वाढली तर मारुतीची देशांतर्गत विक्री कमी झाली पण निर्यात वाढली. फोर्से मोटर्सची विक्रीही कमी झाली. अशोक LEYLAND ची विक्री १२% ने कमी झाली. जरी विक्री १२% ने कमी झाली तरी या कंपनीच्या शेअरची किंमत वाढू लागली कारण मार्केटच्या अपेक्षेपेक्षा ही विक्रीत झालेली घट कमी होती. या कंपनीने आपल्या उत्पादनांच्या किंमती Rs ६०००० ते Rs १ लाखापर्यंत वाढवल्या.
- FERRO CROME प्रोडक्टस् च्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा IMFA, बालासोर ALLOYS या कंपन्यांना होईल.
- बॉम्बे डाईंग या कंपनीने त्यांची पुण्याची जमीन आणी मशिनरी Rs १८५ कोटींपर्यंत विकणार असे जाहीर केले.
- सिमेन्स या कंपनीने वरळीची जमीन Rs ६२० कोटींना विकली.
- ONGC ने AMGURI ऑईल फिल्ड आसाम कंपनीला HANDOVAR केले.
- व्हिडीओकॉन त्यांचा ‘केनस्टार’ नधला स्टेक Rs १२०० कोटी ते Rs १५०० कोटींना विकणार आहे. हा स्टेक खरेदी करण्यात बजाज इलेक्ट्रिकल, HAVELLS, आणी सिम्फनी या कंपन्याना रस आहे. या पेशाचा उपयोग व्हिडीओकॉन कर्ज फेडण्यासाठी करेल.
- फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीचा हॉस्पिटलचेन मधील स्टेक विकण्यासाठी KKR बरोबर बोलणी चालू आहेत.
स्टेट बँकेने सुरक्षिततेचे कारण सांगून मोबाईल WALLET (ओंन लाईन युसेज WALLET) ब्लॉक केले. - वोखार्तच्या अंकलेश्वर युनिटला USFDA ने पाच त्रुटी दाखवल्या परंतु जर्मनीने क्लीन चीट दिली
झारखंडमधील लाइमस्टोनच्या खाणीसाठी ACCला पर्यावरण मंजुरी मिळाली. या खाणीची क्षमता २.११ मिलियन टन एवढी आहे. याचा फायदा ACC ला होईल. - झारखंडमधील लालमटीया खाण लवकरच सुरु होईल याचा फायदा कोल इंडियाला होईल.
- येन डॉलर याच्या विनिमय दराचा फायदा मारुतीला होईल. हा रेट १०३ येन वरून ११५ येन पर्यंत गेला.
- रेलिगेअर त्यांचा सेरेसट्रा अडवायझर आणी TRANSACTION यातला स्टेक विकणार आहेत. हा व्यवहार फेबृआरी २०१७ पर्यंत पुरा होईल.
- पिरामल एन्टरप्रायझेसने हौसिंग फायनांस कंपनी सुरु करण्यासाठी NATIONAL हौसिंग बँकेकडे अर्ज दिला आहे.
जागतिक मार्केटमध्ये चहाच्या किंमती वाढत आहेत. याचा फायदा , हर्रीसन मलायलम (चहा, कॉफी, रबर), जयश्री टी, टाटा ग्लोबल बिव्हरीजेस या कंपन्यांना होईल. - टी व्ही एस मोटर्सने आपल्या २ व्हीलर्सच्या किंमती वाढवल्या.
- महाराष्ट्र आणी कर्नाटक येथे उसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेची किंमत वाढत आहे. याचा फायदा उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना होईल उदा :- बलरामपुर चीनी धामपूर शुगर
कॉर्पोरेट एक्शन :-
- NBCCने १:२ असा बोनस जाहीर केला. तुमच्याकडे २ शेअर्स असतील तर १ बोनस शेअर मिळेल.
- जागरण प्रकाशन ने Rs १९५ प्रती शेअर या किंमतीला ‘BUYBACK’ जाहीर केला. कंपनी Rs ३०२ कोटी ‘BUY BACK’ साठी वापरेल.
- ‘BSE’ ला Rs १०००० कोटींचा IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली.
- HUDCO( हौसिंग अंड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ने IPO साठी DRHP दाखल केले.
- लक्ष्मी विलास बँकेने Rs १४० प्रती शेअरने QIP केला.
- AB NOVHOच्या प्रमोटर्स नी कंपनीतील आपला स्टेक वाढवला. यासाठी त्यांनी Rs १३६६ प्रती शेअर या भावाने शेअर्स खरेदी केले.
- अपार इंडस्ट्रीज Rs ६६० प्रती शेअर ‘BUY BACK’ .करण्यावर Rs २९.०७ कोटी खर्च करणार आहे.
मार्केटने या आठवड्यात काय शिकवले :-
नुकसान आणी फायदा ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थात आपण त्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. उद्योगामध्ये किंवा कोणत्याही धोरणामध्ये एका उद्योगाचा, समाजाच्या एका घटकाचा फायदा होतो तर दुसर्या उद्योगाचे नुकसान होते किंवा फायदा कमी होतो. ज्या उद्योगाचा फायदा होत असेल त्या उद्योगात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावेत आणी ज्या उद्योगाचे नुकसान होत असेल त्या उद्योगात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स शॉर्ट करावेत किंवा आपल्याजवळचे शेअर्स फायद्यात असतील तर विकावेत.
एकाचे अन्न ते दुसर्याचे विष असते असे आपण म्हणतो. नोटबंदीचा थोडाफार विपरीत परिणाम सर्व क्षेत्रांवर होत असताना बँकांना मात्र कर्ज वसुलीत वाढ आणी ठेवीमध्ये अमाप वाढ असा झाला. त्यामुळे कर्जावरील व्याजाचे दर कमी करणे बँकांसाठी अपरीहार्य झाले. याचा परिणाम बँकांच्या मार्जिनवर दिसून येईल कर्जावरील कमी केलेल्या दरांचा फायदा सर्व कर्जदारांना होईल. USA च्या नागरिकांना जास्ती रोजगार मिळावा यासाठी इमिग्रेशन बिल आणत आहेत पण याचा विपरीत परिणाम भारतीय IT क्षेत्रातील कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. साखर, विजेची बिल आपला खिसा खाली करत आहेत तसेच बिस्कीट, दारू, शीत पेय यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. पण त्यामुळे पॉवर कंपन्या आणी साखर कंपन्यांची परिस्थिती सुधारत आहे
BSE निर्देशांक सेन्सेक्स २६७६० तर NSE निर्देशांक निफ्टी ८२४४ वर बंद झाला.
तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Sept – Dec 2016
आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image courtesy – wikipedia
नाव: अंबादास
तुमचा प्रश्न : नमस्कार, मला ना Real Estate मधे गुंतवणुक करायची आहे. आणि मी ह्या क्षेत्रात खुपच नविन आहे. तर मला सुरवात कमीत कमी ने सुरवात करायची आहे. क्रुपया : तर मला माझा उत्तर इमेल द्वारे केला तर खुपच उत्तम ठरेल.
तुम्हाला रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची आहे की रिअल estate क्षत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे याचा अर्थबोध तुमच्या प्रश्नातून होत नाही. जर रिअल इस्टेट
क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही Rs १००० पासूनही सुरुवात करू शकता.
नाव: kishor salunkhe
तुमचा प्रश्न : मॅडम, fundamental analysis कस करावं यावर एक लेख लिहा , हि विनंती .
fundamental analysis मध्ये कंपनीची कोणकोणत्या गोष्टी पाहाव्यात आणि हि कंपनी इन्व्हेस्टमेंट साठी योग्य आहे कि नाही कसे ठरवावे ?एखादा कोइ स्टडी किंवा दोन कंपन्यांमधील comparison करून सांगावे
तुम्ही सर्व ब्लोग वाचाल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
नाव: malhari salunkhe
तुमचा प्रश्न : PE RATIO & EPS काय आहे कृपया एखाद उदाहरण देऊन सांगाल का plz … त्यावरून काय इंडिकेट होत?
P म्हणजे करंट मार्केट किंमत आणी E म्हणजे अर्निंग पर शेअर, या दोन्हींचे गुणोत्तर म्हणजे PE रेशियो = करंट मार्केट किंमत /अर्निंग पर शेअर . यावरून शेअरची करंट किंमत स्वस्त आहे की महाग आहे हे कळते. कंपनीचा शेअर EPS च्या किती पटीत चालला आहे हे समजते.
नाव: उमेश लक्ष्मण अजेटराव
तुमचा प्रश्न : मी शे अर मार्केट मध्ये नवीन असून, मला ह्याचा काहीच अनुभव नाही आणि मी रकम रुपये ५०००/- गुंतवणुकीसाठी लाऊ शकतो . कृपा करून मला योग्य ते मार्गदर्शन करावे
सर्व ब्लॉग वाचा.नंतरच निर्णय घ्या. वहीतल्या वहीत ट्रेड करून आपले किती निर्णय बरोबर येतात हे बघा. Rs ५००० पैकी प्रथम Rs २००० वापरा. आणी वहीतल्या वहीत लिहून ट्रेड करा.
नाव: ajit bhambid
तुमचा प्रश्न : Namaskar, Q1. Mazha income rs 25000 aahe swatacha ghar nahi rs 7000 rent pay karto ani balance 2000 paryant rahato, tar kay mi stock marketmadhye investment karu shakato.
Q2. tar kay mi stock market madhye start kuthun karayach.
दर महिन्याला शेअरमार्केटमध्ये गुंतवण्यासाठी Rs ५०० बाजूला काढून ठेवा. वर्षभर मार्केटचे निरीक्षण करून अभ्यास करा. आत्मविश्वास आणि मार्केटचे चित्र स्पष्ट झाल्यावर प्रत्यक्ष गुंतवणूक करा.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : Mala issue type baddal sanga ani tyacha company kashaprakare company use karte yamadhe share ghenarani kuthlya type che issue ghyavet
इशुचे प्रकार चार IPO (INITIAL PUBLIC OFFER), FPO ( FOLLOW ON PUBLIC OFFER), OFS ( OFFER FOR SALE), RIGHTS ISSUE
आपण कंपनीचा अभ्यास करून चांगल्या कंपनीच्या IPO किंवा OFS मध्ये शेअर्ससाठी अर्ज करू शकतो.
नाव: PRAMOD JADHAV
तुमचा प्रश्न : 1) BID PRICE आणि OFFER PRICE यामधील फरक काय ?
2) आपण एखाद्या कंपनीचा शेयर खरेदी करतो तेव्हा EXACT कोणती खरेदी PRICE आपल्याला लागू होते. BID PRICE, OFFER PRICE कि CURRENT SHARE PRICE जि चालू आहे ?
बीड प्राईस म्हणजेच मागणी किंमत ही शेअर्स खरेदी करणारा ठरवतो. ऑफर प्राईस ही किंमत शेअर्स विक्री करणारा ठरवतो. आपण जेव्हा ऑन लाईन खरेदी करतो त्यावेळी ज्या किमतीला विकण्यासाठी विकणारा तयार असेल त्या किमतीला आपले शेअर खरेदी होतात
नाव: Datta Jadhav
तुमचा प्रश्न : Me 2 IPO ghetale ahet *RBL Bank ani ICICI Prudential Life ins. co pan sadhya doghet pan down madhe ahet Ipru che IPO ter open 1% down madhe jale hya doni IPO che future kase asnar please kahi idea deu saktat ka?
RBL चा IPO छान झाला. शेअरची कींमत Rs ४०० पर्यंत गेली होती. सध्या मार्केट पडते आहे त्याला RBL आणी ICICI PRU अपवाद कसे असतील.
नाव: Sachin Gundewadi
तुमचा प्रश्न : mala demat account open karyacha ahe bank madhun kela tar trading account pan bank kadun deta ka, Kay tyacha sathi dusrikad account open karav lagat, ani tumala mahiti asel tar ek account koti kadu te saga.
‘DEMAT” अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट दोन्ही एकत्र एकाच बँकेत ओपन करता येतात
नाव: Samir Gholap
तुमचा प्रश्न : 1) What is the difference between future and option ?
फ्युचर मध्ये फायदा किंवा तोटा अमर्याद होऊ शकतो. ऑप्शन मध्ये तुम्ही ठरवाल आणी रिस्क घ्याल तेवढाच होतो.
नाव: पवन nirne
तुमचा प्रश्न : मी आपले आजपर्यंत १ ते ६१ सर्व लेख वाचले आहेत. सर्वप्रथम त्यातून खूप अशी माहिती भेटली त्यासाठी आपले खूप आभार, मी माझे महाविद्यालीन शिक्षण पूर्ण केले आहे आणि मार्केट मध्ये मला खूप आवड आहे तर मी माझाभ्यास कुठून आणि कसा सुरु करावा ते सजेस्ट कराल का?आणि शेअर च्या किमती पाहण्या साठी किवा equidity पाहण्या साठी कोणती web site आहे का कि मी ती पाहून अभ्यास करू शकेन?
दूरदर्शन वर सी एन बी सी टीव्ही १८, झी बिझिनेस, सी एन बी सी आवाज, ET NOW इत्यादी शेअर मार्केटवर लाइव कवरेज करणार्या वाहिन्यांचे लाइव कवरेज ऐका.
नाव: patil prafull
तुमचा प्रश्न : processure of invest the mony in share marke
माझ्या ब्लोग मध्ये ही माहिती सविस्तर दिली आहे. माझा ब्लोग आपण संपूर्ण वाचा
नाव: sharad
तुमचा प्रश्न : hello madam, mala marketchi mahiti jyast nahi. mi tumache sarva block vachalet. maza asa prashan ahe ki- ‘Intraday trading sathi Account madhe amount asayala havicha ka?’
होय, जी रक्कम अकौंटमध्ये ठेवाल त्यात फायदा जमा होतो आणि तोटा त्यातून वजा होतो. जोखमीसाठी ती रक्कम ब्रोकरकडे ठेवावी लागते.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Respected mam Majha prashna aasa aahe ki intarday trading made stoploss or target kiti mahtwache aahe? Tasech intraday trading baddal mahiti havi aahe plz?
Thank u
मार्केटमध्ये जोखीम असते त्यामुळे STOPLOSS आणी टार्गेट हवे. माझ्या ब्लॉग वरील ३२, ३३, ३४, ३५, ३६, हे भाग वाचा.
नाव: sandip
तुमचा प्रश्न : first time kiti paise invest karave
तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता.
नाव: Geeta
तुमचा प्रश्न : Hello Mam, I am working woman and I want to invest in share market. I want to know that what is the difference in brokerage charges in Broker and banks. I heard that banks are charging high percentage.
तुम्ही जर बँकेच्या ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंटवर ऑन लाईन ट्रेडिंग करत असाल तर जास्त चार्ज पडतात. पण चार्जेसमधील फरक जास्त नसतो.
नाव: Swapnil Gangurde
तुमचा प्रश्न : Namskar ma’am,
Aapan share market baddal khup chan mahiti sangitli aahe aani sangat aahat aaplylala bhetayche hote shakya aahe kaa???
तुम्ही भेटू शकता आधी फोन करून येऊ शकता.
नाव: sanket tamhane
तुमचा प्रश्न : put call ratio mhanje kay?
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये PUT आणी CALL हे शब्द वापरतात. मंदी करणारे पुट घेतात आणी तेजी करणारे पूट विकतात /WRITE करतात. तेजी करणारे CALL विकत घेतात आणी मंदी करणारे CALL विकतात.
जर CALL जास्त असतील तर लोक तेजी करायला तयार असतात. जर PUT जास्त असतील तर लोक मंदी करायला तयार असतात.
नाव: megharaj tamhane
तुमचा प्रश्न : balance sheet kshi samjun gheu kinva kshi vachavi
BALANCE SHEET म्हणजे उद्योगाची एका विशिष्ट तारखेला असलेली मालमता आणि कंपनीला असलेले देणे याचा ताळेबंद. या BALANCESHEETचा अभ्यास आपण त्या उद्योगातील मानदंड आणी इतर कंपन्यांच्या बरोबर तुलना करून करू शकता. याबरोबर येणारे नफा तोटा पत्रक म्हणजे कंपनीला होणार्या सर्व प्रकारचे इन्कम आणी ते इन्कम मिळवण्यासाठी कंपनीला किती खर्च आला याचे प्रतिबिंब असते. तसेच यावरून आपल्याला कंपनीचा उद्योग किती प्रमाणात फायदेशीर आहे हे कळते.
नाव: Ketan
तुमचा प्रश्न : BSE SOVEREIGN GOLD BOND हा नक्की काय प्रकारआहे ? त्याने मला काय आणि कसा फायदा मिळू शकतो? आणि याचा सरकार ला काय फायदा ?
इंटरनेटचा वापर करून माहिती मिळवा. माझा तरुण भारतला एक लेख आला होता तोही वाचा
नाव: Swapnil
तुमचा प्रश्न : मॅडम तुमचा ब्लॉग सुंदर आहे. तुम्ही कलाससेस सुरु केले आहेत. पण ते ठाण्याला असल्यानें अटेंड करता येत नाही. तुम्ही कलाससेसचे lecture रेकॉर्ड करून site वर ठेवू शकाल का? मराठी भाषिकां साठी हे सर्वोवतं ब्लॉग आहे.
आपली सुचना स्वागतार्ह आहे. मी मला शक्य आहे ते सर्व करते आहे. सध्या तरी हे शक्य होईल असे वाटत नाही.
नाव: Anant Ulhas Awasare
तुमचा प्रश्न : Namaskar Madam, Mi Tumche Blog Vachato Tya pasun Mala Khup Mahiti Milali Ahe. Mi 30 octomberla Pahil khahi Shears Bye Kele. 44 Blog Madhe Tumhi Sangitlya Pramane Atta Pan Jar Shears Sell Karaiche Astil Tar “INSTRUCTION SLEEP” Banket Bharavi Lagate Ka? ?
तुमचा ‘DEMAT’ अकौंट जर बँकेत असेल तर शेअर विकल्यावर दुसर्या दिवशी बँकेत नेऊन द्यावी लागते. जर तुमचा DEMAT अकौंट ब्रोकरकडे असेल आणी तुम्ही ब्रोकरला PO ( पॉवर ऑफ ATTORNEY) दिली नसेल तर ब्रोकरकडे दुसऱ्या दिवशीपर्यंत नेऊन द्यावी लागते. शक्यतो ब्रोकरला PO देऊ नका. PO दिली असेल तर मात्र INSTRUCTION SLIP द्यावी लागत नाही.
नाव: RAHUL GAIKWAD
तुमचा प्रश्न : Hi Madam,
where we getting any company latest shareholder pattern (BSE or NSE) because I checked many webside ,shareholding pattern not updated
गुगल सर्च वर शेअरहोल्डिंग PATTERN ऑफ ( येथे ज्या कंपनीचा शेअरहोल्डिंग PATTERN आपल्याला हवा असेल त्या कंपनीचे नाव टाकावे.) असा सर्च केल्यास जरूर ती माहिती मिळेल.
नाव: anil shete
तुमचा प्रश्न : Sir, Aamchya grup la navin insurance company chalu karaychi ahe tya vishai mahiti milu shakel ka aamhala thodi
विमा कंपनी कशी चालू करायची हे तुम्हाला विमा क्षेत्रातील तज्ञ समजावून सांगू शकेल.
नाव: Sandeep Dombale
तुमचा प्रश्न : tumche blog me nehami vachat asto te motya pramanat guide kartat tya badal tumche me manapausun abhari ahe.aseche blog lihat java Marathi mansana guide karat ja. mala demat account v trading account madhe je broker brokarge rate kami rate madhe trade charges lavatat tynchi mahiti dyvi manje mala manyache ahe ki saglyat changel trading account, demat account v saving bank account kute open karave manje charges kami hotil.karan prathek broker che trading charges vegle ahet. ani broker hi viswasatala manus tumala milala tasa broker sanga krupaya apla ek vachak.
ब्रोकरेज जास्तीत जास्त किती चार्ज करावे याची कमाल मर्यादा सेबीने घालून दिली आहे. या मर्यादेत प्रत्येक ब्रोकर तुमच्या ट्रेडिंग अकौंटमधील VOLUME वरून तुमच्या अकौंटला लागू होणारे ब्रोकरेजचे दर ठरवतो. यात मी काही मदत करू शकत नाही.
नाव: deepak mali
तुमचा प्रश्न : नमस्कार मेडम, मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करायचे आहे. मला काय कराव लागेल? मला सविस्तर माहिती मिळेल का ?
माझा ब्लॉग पूर्ण वाचा. इकॉनॉमिक टाईम्स, फायनांसियल EXPRESS या सारखी उद्योग जगतातील घडामोडींची चर्चा करणारी वृत्तपत्रे आणी शेअर मार्केटचे लाइव कव्हरेज करणाऱ्या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा. या माहितीचा आपल्याला कसा उपयोग होईल तसा करून घ्या.
नाव: Jagriti behere
तुमचा प्रश्न : ट्रेडिंग cha किरकोळ बाजारात कसा परिणाम होतो?
ट्रेडिंगमुळे त्या कंपनीच्या शेअरचा VOLUME वाढतो आणी त्याचा कंपनीच्या शेअरच्या किमतीवर परिणाम होतो. तसेच कंपनीच्या वर्तमान तसेच कंपनीकडून भावी काळांत असलेल्या गुंतवणूकदार आणी ट्रेडर्सच्या अपेक्षा कळतात.
नाव: prakash dhaygude
तुमचा प्रश्न : share marketing kade aaplyala business mhanun career karta yeilka
करीअर म्हणून पाहता येईल. पण कडी मेह्नत आणी प्रदीर्घ अभ्यास आणि व्यासंग पाहिजे.
नाव: नितिन महादेव साखरे
तुमचा प्रश्न : सध्या मी SIP मधे INVESTMENT केली आहे ( 1)SBI BLUE CHIP 2) SBI MANGNUM 3) BALANCE FUND AND 4) FRANKLIN SMALL SCALE FUND (Rs.1000 EACH) पण आता डीमॉनेटायझेशन मुऴे MARKET घस्रत आहे. तर मी मघार घेउ की, FUTURE चा विचार करुन INVEST करत राहू
सध्या माघार घेऊन तोटाच होईल. कारण सर्व म्यूच्युअल फंडाचे NAV कमी झाले असणार.थोडी वाट बघा आपल्या खरेदीच्या किमतीच्या आसपास NAV आले म्हणजे आपण थोडे प्रॉफीट घेऊन आपली गुंतवणूक सोडवून घेऊ शकता.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : Madam tumhi long term investment sathi share buy kartana kuthalya goshtinchi kalji gheta mhanje tricks sanga
शेअर स्वस्त हवा, ब्लू चीप कंपनीचा हवा तसेच A ग्रूपचा असावा. कंपनी नफ्यात असून प्रगतीपथावर असावी.
नाव: Hemant pawar
तुमचा प्रश्न : Magchya warshi jase deewali nantar share market continuesly down hot hote tase ata chi paristithi baghun ky watatay.?
डिसेंबरमध्ये परदेशातली मार्केट नाताळच्या सुटीमुळे बंद असतात. १० जानेवारी २०१७ पासून बजेट RALLY सुरु झाल्यामुळे मार्केट सुधारेल. १ फेबृआरीला अंदाजपत्रक सादर झाल्यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.
नाव: anil gholap
तुमचा प्रश्न : how to play in share market and frist step
शेअरमार्केट हा तुम्ही एक खेळ समजता यातच सर्व आले. तरीसुद्धा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे किंवा गुंतवणूक करणे हा माझ्या मते एक अभ्यास, व्यासंग, कला, आहे. पैशाशी खेळ करणे धोकादायक आहे.
नाव: Prathamesh Ratnaparkhi
तुमचा प्रश्न : स्टेक म्हणजे काय?
कुठल्याही कंपनीत मोठ्या प्रमाणावर शेअर विकत घेणे याला त्या कंपनीत स्टेक घेणे म्हणतात. या शेअर्स खरेदीमुळे खरेदी करणारा भागभांडवलाचा तसेच जबाबदारीचा हिस्सा उचलतो.
नाव: Tushar Kamble
तुमचा प्रश्न : Multi begged share chi mahit haviy
शेअरची किंमत खरेदी केलेल्या किंमतीच्या काही पटीत वाढणे याला शेअर MULTIBAGGER झाला असे म्हणतात. उदा :- TCS, इन्फोसिस
नाव: Prakash chandrakant kale
तुमचा प्रश्न : Mala tumcha purn blog vachayacha ahe pustak milu shakel ka
जानेवारी २०१७पर्यंत पुस्तक मिळू शकेल.
नाव: Pravin ramchandra Ganjave
तुमचा प्रश्न : Mala penny stock buy karaychet tar taya babat tumhi mala Konti company such as?
‘मूर्ती लहान कीर्ती महान’ हा माझ्या ब्लॉगवरचा ५९ वा लेख वाचा. हा PENNY STOCKS वरच लिहिलेला लेख आहे.
नाव: CHETAN SHEVKARI
तुमचा प्रश्न : thanks madam , tumchya blog khup info news milti . ek prshn asa hota ki mi kahi shares watch kartoy tyat la ek kushal trade ha continue up jatoy asa konta ch kadhi mi tari pahilela nahi. ya badal pz sanga
शेअरमार्केट मागणी पुरवठा या तत्त्वावर चालते. त्यामुळे कोणताच शेअर सतत वर किंवा सतत खाली राहू शकत नाही.

आठवड्याचे समालोचन – २६ डिसेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ – सांगता २०१६ ची आणी शुभारंभ २०१७ चा
आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा या वर्षाचा शेवटचा आठवडा त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या F&O ची एकस्पायरी, डीमॉनेटायझेशन मध्ये जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची एक्सपायरी, तोटयात चालणार्या सरकारी कंपन्यांची एक्सपायरी, यामुळे गोंधळाचा आणी माननीय पंतप्रधान आणी अर्थमंत्री यांच्या उलटसुलट विधानामुळे गाजलेला आठवडा म्हणावा लागेल.
२०१६ मध्ये शेअर मार्केट मध्ये जी तेजी आली होती ती डीमॉनेटायझेशन नंतरच्या काळात नाहिशी झाली. ब्रेकझीटच्या वेळचा लो मार्केटने पार केला. ५०, १००, २००, डे मूव्हिंग सरासरीपेक्षा मार्केट खाली गेले.
सरकारी अन्नौंसमेंट :-
पंतप्रधानांनी सांगितले की शेअरमार्केट मध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात शेअरमार्केटमधील लोक कमी प्रमाणात कर भारतात. सेबीने लक्ष देऊन करापासून मिळणारे उत्पन्न वाढेल याकडे लक्ष द्यावे. लगेच अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले की लॉंग टर्म कॅपिटल गेन्स कर लावण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणाकडे लक्ष द्यावे हाच प्रश्न आहे.
GST च्या बाबतीत दुहेरी नियंत्रण (राज्य आणी केंद्र सरकारचे) वगळता बाकीच्या सर्व बाबतीत एकमत झाले. १ एप्रिल २०१७ पासून GST कार्यान्वित व्हावा म्हणून सरकार प्रयत्नशील राहील. पण १ जुलै २०१७ पासून GST नकीच कार्यान्वित केला जाईल अशी आशा आहे.
सरकारने डीमॉनेटायझेशनच्या परिणामांवर आणी अन्दाजपत्रकासंदर्भात अर्थशास्त्रज्ञ आणी तज्ञांची बैठक बोलावली होती. त्यांना या बैठकीत सुचना आणी काही उपाय सुचविण्यास सांगितले. या बैठकीत पर्यटन आणी शेती आणि शेतीसंबंधीत उद्योगांवर लक्ष द्यावे असे सुचविण्यात आले.
ज्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्या तोटयात चालत आहेत त्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार टायर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कंपनी लिस्टेड नाही.
विरल आचार्य या प्रसिद्ध अर्थतज्ञाची RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली.यांच्या अनुभवाचा आणी ज्ञानाचा उपयोग सरकार आणी RBI डीमॉनेटायझेशननंतर अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकेल.
सरकारने एक अध्यादेश काढून रद्द केलेल्या नोटांवरील RBI ची जबाबदारी काढून टाकली आणी चलन रद्द करण्याच्या आपल्या निर्णयाचे शिकामोर्तब केले. आता ३१ डिसेंबर ते ३१ मार्च या काळात लोकांना RBI ने ठरवून दिलेल्या शाखांमध्ये बंदी घातलेल्या नोटा जमा करता येतील. सरकारने बंदी घातलेल्या Rs ५०० आणी Rs १००० च्या १० नोटांपेक्षा जास्त नोटा ठेवण्यावर बंदी घातली आहे. जर आपल्याजवळ १० पेक्षा जास्त नोटा आढळल्या तर Rs १०००० किंवा जेवढी रक्कम असेल त्याच्या ५ पट दंड लावण्यात ( यापैकी कमीतकमी रक्कम असेल) येईल. जर आपण ३१ डिसेंबर ते ३१ मार्चपर्यंत जुन्या बंदी घातलेल्या नोटा जमा करताना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली तर आपल्याला Rs५००० किंवा जमा केलेल्या रकमेच्या पाच पट दंड होऊ शकतो.
३१ डिसेंबरला पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार होते. या भाषणावर २०१७ हे वर्ष मार्केटला कसे जाईल हे बरेच अवलंबून असेल. उत्तर प्रदेशात निवडणुका असल्यामुळे BJP च्या सभेमध्ये पंतप्रधान काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता होती.
सरकारने त्यांच्या ४ फार्मा कंपन्यांना त्यांच्या मालकीची असलेली जमीन विकण्यास परवानगी दिली. ITI आणी MTNL या कंपन्यांच्या मालकीची पुष्कळ जमीन आहे ती विकण्यास परवानगी मिळेल असे सर्वांना वाटले.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था :-
सेबीने ‘ट्री हाउस’ या कंपनीच्या फायनान्सियल व्यवहाराचे ऑडीट करण्यास सांगितले आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी :-
खाजगी क्षेत्रातील एक बँक भारत फायनांसियल इन्क्लूजन ही कंपनी विकत घेण्याच्या विचारात आहे अशी बातमी आल्याने हा शेअर खूपच वाढला.
सुनील हायटेक या कंपनीला Rs ३४० कोटींची ऑर्डर मिळाली.
JMC प्रोजेक्ट या कंपनीला Rs १४७६ कोटींची ऑर्डर मिळाली.
IRB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला NHAI कडून Rs १५३० कोटींची ऑर्डर मिळाली.
सुप्रीम इंडस्ट्रीज या कंपनीने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले.
डिविज LAB ह्या कंपनीचा शेअर त्याच्या VIZAG प्लांटवर USFDA ने दाखवलेल्या त्रुटीमुळे पडला.डिविज LAB जी औषधे तयार करत होती त्या औषधासाठी मिळालेल्या ऑर्डर्स रद्द केल्या तर त्याचा फायदा DR REDDY’S LAB, STRIDES SHASUN या कंपन्यांना होईल.
PANACEA BIOTECH ने TETRAVALENT VACCINE ‘EASY FOUR TT” मार्केटमध्ये आणले.
RAMCO SYSTEMS ला वेस्टर्न international या ‘UAE’ बेज कंपनीकडून पेरोल सोल्युशन साठी ऑर्डर मिळाली.
TRETROIN ORAL CAPSULES या औषधासाठी ग्लेनमार्कच्या जनरिक आर्मला USFDA कडून परवानगी मिळाली.
ONGC ने के जी बेसिन ब्लॉक 4 GSPL मध्ये ८०% स्टेक घेतला.
रिलायंस म्युच्युअल फंडाने दीपक नायट्रेट या कंपनीत गुंतवणूक केली. एकतर हा शेअर आपल्या हाय पेक्षा ४०% ने कमी आहे आणी त्यांची स्पेशालिटी केमिकल डिविजन चांगले काम करीत आहे.
टाटा स्टील या कंपनीने ‘PELLET’ बनवणारी BRPL (BRAHMANI RIVER PELLET) ही कंपनी Rs ९०० कोटींना खरेदी केली.
ZYDUS कॅडीला या कंपनीने ‘MERK’ या कंपनीकडून ६ ब्रांड विकत घेतले.
कॉर्पोरेट एक्शन :-
अपार इंडस्ट्री या कंपनीने शेअर ‘BUYBACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ६ जानेवारी २०१७ रोजी बोलावली आहे.
‘BALMER LAWRIE’ हा शेअर सोमवार २६ डिसेंबर रोजी एक्सबोनस झाला.
सासकेन कम्युनिकेशन्स या कंपनीने आपल्या शेअर ‘BUY BACK’ किंमत Rs ४१० ठरवली.
जागरण प्रकाशन या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
इशान डाइज या कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
EIL ही कंपनी शुक्रवारी ३० डिसेंबर २०१६ रोजी एक्स बोनस झाला.
LT FOODS ही कंपनी आपल्या एका शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लीत करणार आहे.
नजीकच्या काळांत येणारे IPO आणी लिस्टिंग :-
NSE ( NATIONAL STOCK EXCHANGE) ने Rs १०००० कोटींच्या IPO साठी DRHP दाखल केले. STOCK होल्डिंग कॉर्पोरेशन, IDBI, IFCI ह्या कंपन्या आपला स्टेक IPO मध्ये ऑफर करण्याची शक्यता आहे.
CDSL (CENTRAL DEPOSITORIES SERVICES (INDIA) LIMITED) ने सेबीकडे ३.५२ कोटी शेअर्ससाठी DRHP दाखल केले. BSE, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, आणी कोलकाता STOCK EXCHANGE आपला काही स्टेक विकणार आहेत.
मार्केटने काय शिकवले :-
यावर्षी मार्केट २ वेळा निफ्टी ७९२५ च्या लेव्हलला आले पण पुन्हा मार्केट सावरले. कोणतीही स्थिती तशीच रहात नाही. तुम्ही जर तुमची उत्तम शेअर्सची यादी तयार ठेवून चांगले शेअर्स स्वस्तात पदरात पाडून घेतले असतील तर जास्त भावाला विकून फायदा मिळाला असेल. त्यामुळे मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवावा.
सध्या हे मार्केट सेक्टर स्पेसिफिक नसून STOCK स्पेसिफिक आहे. तुम्ही खरेदी करायला योग्य अशा शेअर्सची यादी बनवा. शेअर्स पडण्याची वाट पहा त्यानंतर छोटया छोटया लॉट मध्ये खरेदी करा. कारण सध्यातरी खरेदीसाठी ‘DEMAT’ चार्ज पडत नाही. विकताना प्रथम गुंतवलेले भांडवल+१०% नफा मिळेल एवढे शेअर्स विका म्हणजे उरलेले शेअर्स फ्री ऑफ कॉस्ट होईल. जेव्हा तुम्हाला पैशाची गरज असेल तेव्हा हे शेअर विकून तूमची गरज तुम्ही भागवू शकता पण गरज लागेल तेव्हाच विकेन असे उलट गणित मात्र घालू नका कारण गरज लागेल तेव्हा शेअरला चांगला भाव मिळेलच असे नाही हे ध्यानात ठेवा.
पुढील वर्ष शेअर मार्केटला, त्यात ट्रेडिंग करणाऱ्या ट्रेडर्सना आणी गुंतवणूकदारांना तसेच माझ्या वाचकांना सुखाचे समृद्धीचे आणी समाधानाचे जावो. ‘अनंत हस्ते कमलावरांनी देता किती घेशील दो करांनी’ अशीच सर्वांवर कृपा करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २६६२४ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८१७४ वर बंद झाला.