आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC – WIKIPEDIA
बुधवारचा दिवस रीलायन्सच्या नावाने कोरला गेला. रीलायंसने खूप वर्षानंतर फार सुंदर RALLY दिली. २००९ सालानंतर प्रथमच रिलायंसचा शेअर एवढ्या उंचीवर गेला. चांगले शतक ठोकले. निफ्टीमध्ये रिलायंसचे वेटेज चांगले असल्याने ८९०० च्या वर मार्केट टिकून राहिले. आता नक्की ९००० ची पातळी दिसू लागेल असी वाटू लागले आहे. रिलायंस जीओमुळे ही पातळी गाठली. जेव्हा एका कंपनीचा मार्केट शेअर वाढतो तेव्हा कुणाचा तरी कमी होतो. याचा परिणाम भारती, आरकॉम, आयडीया या शेअर्सवर नकारार्थी परिणाम होणार हे उघड आहे त्यामुळे जिने दो असे होईल असे वाटत नाही.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- फेडने सांगितले की ते मार्च २०१७ मध्ये रेट वाढवू शकतात.
सरकारी अन्नौंसमेंट
- १ एप्रिल पासून दोन लाखाचे जडजवाहीर खरेदी केल्यास ‘TAX AT SOURCE’ भरावा लागेल.
- न्यूज, करंट AFFAIRS, प्रिंट मेडिया यामध्ये ४९% FDI, सिंगल ब्रांड रिटेल मध्ये मंजुरीशिवाय ४९% FDI आणि फूड रिटेलमध्ये FDI साठी फूड बरोबरच होमकेअर प्रोडक्ट विकण्यासाठी मंजुरी देण्याचा सरकार विचार करत आहे.
- सरकार कन्व्हर्टिबल डिबेंचर्स मध्येही FDI साठी मंजुरी देण्याचा विचार करत आहे. FDI साठी असलेल्या FIPB या सरकारी संस्थेचे विसर्जन झाल्यावर आता सरकारने FDI ज्या क्षेत्रात येणार असेल त्या क्षेत्राशी संबंधीत सरकारी खात्याची FDI साठी मंजुरी लागेल असे सांगीतले.
- HPCL या कंपनीच्या हल्दिया येथील LPG बॉटलिंग प्लांटसाठी पर्यावरण मंजुरी मिळाली.
- कोल इंडियाच्या तीन सबसिडीअरीजच्या विस्तारासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली.
- तमिळनाडू राज्य सरकारने सरकारने दिलेले दारूचे ५०० ठेके रद्द केले.
- चीनमधून आयात होणाऱ्या पाईपवर ANTIDUMPING ड्युटी ५ वर्षासाठी लावली. याचा फायदा महाराष्ट्रा सीमलेस, जिंदाल SAW, ISMT, मान इंडस्ट्रीज या कंपन्यांना होईल.
- सरकारने सोलार पॉवर प्लांट्सला सबसिडी जाहीर केली. पूर्वी २०००० MW साठी सबसिडी मिळत होती. आता ४०००० MW साठी सबसिडी मिळेल. याचा फायदा उजास एनर्जी, इंडोसोलर या कंपन्यांना मिळेल.
RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
- सेबीने हौसिंग फायनांस कंपन्याविषयीचे म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीसाठीचे नियम शिथिल केले. आता १५% रक्कम हौसिंग फायनान्ससाठी वापरता येईल.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- दिलीप बिल्डकॉन या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून हायवे बांधण्यासाठी Rs ९११ कोटीची ऑर्डर मिळाली.
- भारती एअरटेल या कंपनीने टेलेनॉर या कंपनीकडून ७ सर्कल मधील स्पेक्ट्रम खरेदी केला. यामुळे भारती एअर टेलचा स्पेक्ट्रम वाढेल.
- ICICI बँकेचा जे पी पॉवर या कंपनीतील स्टेक या कंपनीच्या डिबेंचर्सचे शेअर्समध्ये रुपांतर केल्यामुळे १३.५०% झाला.
- कॅफे कॉफी डे या कंपनीतील ४०.५०% स्टेक आल्फा ग्रुप होल्डिंगने विकला.
- हिरो मोटो कॉर्प आपली हिरो फिनकॉर्प मधील ४०% स्टेक विकून Rs १००० कोटी उभारण्याची शक्यता आहे.
- GSK फार्माच्या दम्यावरील औषधासाठी USFDA ची मंजुरी मिळाली
- गुरुवारी मैकलॉयड रसेल वायदा मार्केटमधून बाहेर पडेल.
- N चंद्रशेखरन यांनी टाटा सन्स या टाटा ग्रुपच्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाची आणी त्यामार्फत टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या चेअरमनपदाची सूत्रे २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सांभाळली
कॉर्पोरेट एक्शन
- टी सी एस ने Rs २८५० प्रती शेअर या भावाने ‘शेअर BUY BACK’ जाहीर केला. पण याचा ACCEPTANCE रेशियो मात्र २.९०% आहे. म्हणजे तुमच्याकडे १०० शेअर्स असतील तर कंपनी तुमच्याकडील २.९० (३) शेअर्स खरेदी करेल असा होतो. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी निराशा व्यक्त केली. हे शेअर्स टेंडर पद्धतीने BUY BACK केले जातील.
- जे पी पॉवर कंपनीने SDR योजनेअंतर्गत आपल्या कर्ज देणाऱ्या बँकांना ३०५.८० कोटी शेअर्स दिले. या योजनेप्रमाणे शेअर्स दिल्यामुळे जे पी पॉवर ही जे पी असोसिएटची सबसिडीअरी राहिली नाही.
- BEL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी फेब्रुवारी २२ आणी २३ रोजी ऑफर फोर सेल आणली.यात किरकोळ गुंतवणूकदारांना CUT OFF प्राईसवर ५% सूट दिली होती. या OFS ला किरकोळ आणी इतर गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
- IRB इन्फ्रा INVLT च्या IPO मधून ४३०० कोटी उभे करणार आहे.
- GMR इन्फ्रा ही कंपनी आपला एअरपोर्टचा कारभार वेगळा करणार आहे.
- इन्फोसिसने आपल्या आरटीकल्स ऑफ असोसिएशन मध्ये ‘शेअर BUY BACK’ ची तरतूद करण्याची सुधारणा करण्यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी मागितली आहे. नजीकच्या भविष्यकाळात इन्फोसिसही शेअर BUY BACK जाहीर करण्याची शक्यता आहे.
मार्केटने काय शिकवले
‘कशात काय आणि फाटक्यात पाय’ अशी स्थिती सोमवारच्या मार्केटमध्ये पहायला मिळाली. DCB,कर्नाटक बँक, फेडरल बँक, कोणी अक्वायर करणार; ONGC ‘BUY BACK’ करण्याचा विचार करत आहे, अशा अफवा आल्या. बँका दिवसअखेरपर्यंत वाढत राहिल्या. पण ONGC ने ‘BUY BACK’ करण्याचा विचार नाही असे जाहीर केले. शेवटी ‘डोळ्यांनी पहावे, कानांनी ऐकावे मगच विश्वास ठेवावा’ हेच काय ते खरं. खात्री करून घेवूनच कृती करावी ह्याचा प्रत्यय येतो.
आज आपण technical analysis बद्दल थोडं बोलूया. या मध्ये वेगवेगळे पॅटर्न वापरून ट्रेंड बद्दल अंदाज वर्तवले जातात. DOJI PATTERN हा असाच एक PATTERN. हा शेअरच्या किमतीच्या उच्च बिंदुला किंवा बॉटमला तयार होतो. आणी थोड्याच काळात ट्रेंड बदलेल असे सुचवतो. हा कॅण्डेलस्टिक PATTERN आहे. बुधवारी रिलायंसचा शेअर वाढत होता. मार्केट ALL TIME हाय ला पोहोचेल असे वाटत असतानाच अचानक गळती सुरु झाली. कोणत्याही ट्रेंडमधली ताकत कमी झाली किंवा जोर कमी झाला म्हणजेच खात्रीलायकरीत्या आता तेजी करता येणार नाही असे दर्शवते. आता जोखीम वाढली आहे हे जणू मार्केट सांगते. ट्रेंड लाईन सपोर्ट निफ्टीवर ८८०० आहे. हा सपोर्ट तुटेपर्यंत मार्केट तेजीत राहील. अपसाइड लिमिटेड आहे. करेक्शन ड्यू आहे. टेक्निकल इंडिकेटर्स निगेटिव्ह डायवर्जंस दाखवत आहेत. ओव्हरबॉट झोन आहे. सालोचनात हे सगळं नीट समजावणं कठीण आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही माझ्या पुस्तकातला ‘technical analysis’ वरील धडा वाचू शकता. तुम्ही माझं पुस्तक या वेबसाइट वरून विकत घेऊ शकता – https://pothi.com/pothi/book/bhagyashree-phatak-market-aani-me-0
ज्याचा शेवट गोड ते सारे गोड. रोज नवी नवी शिखरे पार करत निफ्टी नव्या उंचीवर पोहोचला. ७ सप्टेंबर २०१६ रोजी ज्या उंचीवर होतो त्या उंचीवर पुन्हा एकदा आलो. ओव्हरबॉट झोन आहे. आता खरेदी करण्यासाठी योजना बदलावी लागेल काही शेअर्स उंचीवर पोहोचले आणी काही शेअर्स पोहोचले नाहीत असे शेअर्स शोधावेत. ज्या शेअर्ससाठी रिस्क रिवार्ड रेशियो चांगला असेल असे शेअर्स खरेदी करा. वेळेवर प्रॉफीटबुकिंग करा. बऱ्याच वेळेला आपल्या मानसिकतेमुळे ‘तेलही गेले तूपही गेले अशी अवस्था होते. आणि मग मार्केटच्या नावाने खडे फोडले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि .मार्केटच्या तेजीची मजा चाखा.आहेत…
आठवड्याचे समालोचन लिहायला सुरुवात करून २ वर्षे पूर्ण झाली. मी नवनवीन गोष्टी सांगितल्या पण एका गोष्टीची खंत वाटली. “MADAM तुम्ही जे लिहिलेले असते ते घडून गेलेले असते मग त्याचा काय उपयोग ?’असे संवाद ऐकले. मला एक सांगावेसे वाटते की कंपन्यांचे व्यवहार, घडणाऱ्या घटना, त्याचा शेअर्सच्या किमतीवर होणारा परिणाम, गुंतवणूकदारांची मानसिकता, आणी त्यातून करायची कमाई म्हणजेच शेअरमार्केट होय. कोणतीही घटना घडली की त्याचा कोणत्या शेअरवर काय आणी किती परिणाम होतो हे समजून घेतल्यानंतर भविष्यात तशी घटना घडल्यास तसा ट्रेड करून फायदा मिळवता येतो. आठवड्याच्या समालोचनातून मी थिअरी आणी PRACTICE यात समन्वय साधून आपण आपले प्रॉफीट कमवायचे ध्येय कसे गाठावे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८८९२ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ८९४० वर बंद झाला.