Monthly Archives: March 2017

आठवड्याचे समालोचन – २० मार्च २०१७ ते २४ मार्च २०१७ – गुढीपाडवा हा आला, शेअरमार्केटचे पंचांग पाहूया चला

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या आणी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. या दिवशी आपण सर्वजण नवीन संकल्पना, नवे विचार, नवे संकल्प याची गुढी उभारतो. पंचांगाची पूजा करतो. पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक; तिथी, वार, योग, नक्षत्र, करण अशा पांच अंगांचा त्यात समावेश असतो. त्याचप्रमाणे शेअरमार्केटच्या पंचांगात योग्य वेळ, योग्य किंमत, योग्य दिशा, गुणवत्ता, आणी संयम यांचा मेळ घालून चांगला योग जुळून आला की सुंदर प्राप्ती होते. अशीच प्राप्ती आपल्याला व्हावी ही शुभेच्छा आणी ईश्वरचरणी प्रार्थना !
या आठवड्यात मार्केट वाढण्यासाठी किंवा पडण्यासाठी कोणतेही कारण दिसत नव्हते हे मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात सांगितले होते. पण या आठवड्यात अंतरिम लाभांशाची लज्जत मार्केट मध्ये अनुभवास मिळाली. सरकारने दामाजीपंत मंगळवेढेकर बनून सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यात साठून राहिलेला पैसा अंतरिम लाभांशाच्या स्वरूपात देशाच्या उत्पनात जमा केला. सरकारी कंपन्यांच्या शेअरहोल्डिंगवर मिळणारा अंतरिम लाभांश आणी त्यावर मिळणारा DDT या दोन मार्गांनी खूपच पैसा सरकारी तिजोरीत जमा झाला. आता ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ या म्हणीप्रमाणे ज्या गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांवर विश्वास दाखवला त्यांनाही या लाभाशाचा चांगला फायदा झाला. थोडक्यात काय या आठवड्यात अंतरिम लाभांशाची अशी बरसात झाली की म्हणावेसे वाटते ‘अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील दो करांनी!’
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • UK  ब्रेकझीट कोणत्या टर्म्सवर होईल यासाठी वाटाघाटी २८ मार्च २०१७ पासून सुरु करू असे UK ने EUला सांगितले  आहे. या वाटाघाटी दोन वर्षात पुऱ्या करायच्या आहेत.
 • US $ निर्देशांक 100 च्या खाली आहे. क्रूडसुद्धा ४ महिन्याच्या किमान स्तरावर आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे करांमध्ये सवलती आणी सरकारी खर्चामध्य वाढ करण्यात ट्रम्पना अडचणी येत असल्यामुळे सुधारणांचा वेग मंदावला आहे. यामुळे बुधवार २२ मार्च २०१७ रोजी USA मधील बाजार मंदीत होते. उत्तर कोरियाने आम्ही मिसाईल डागू अशी USA ला धमकी दिली आहे.

सरकारी अम्मौंसमेंट

 • सरकारची डिजिटलायझेशनची मोहीम चांगलाच वेग घेत आहे. सरकारने असे जाहीर केले की आता कॅशमध्ये व्यवहार करण्याची मर्यादा Rs २ लाखांपर्यंत असेल. जर कॅशमध्ये Rs २ लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झालेला आढळला तर १००% दंड रक्कम स्वीकारणाऱ्याकडून वसूल केला जाईल.
 • सरकार PAN कार्ड काढण्याकरता आणी आयकर रिटर्न भरण्याकरता आधार कार्ड सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा HCL इन्फो या कंपनीला होईल.
 • स्टेट बँकेत महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली.
 • सरकार १० पब्लिक सेक्टर बँकांमध्ये Rs ८००० कोटी भांडवल पुरवणार आहे. देना बँकेत Rs ६०० कोटी भांडवल घालणार आहे.
 • सरकारची २८ मार्च २०१७ रोजी टायर उत्पादकांबरोबर ANTI DUMPING ड्युटी लावण्याविषयी बैठक आहे. याचा फायदा अपोलो, JK टायर , सिएट टायर्स, गुडइअर MRF  या कंपन्यांना होवू शकतो.
 • सरकारने IDBI, IOB आणी UCO या तीन बँकांना वॉच लिस्टवर ठेवले  आहे.
 • मुंबई पुणे हायवेवरील टोल सरकारने Rs १९५ वरून Rs २४० केला आहे. याचा फायदा IRB इन्फ्रा या कंपनीला होईल.
 • सरकारने आपली हेल्थ पोलिसी जाहीर केली. यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी आणी उपचार होतील असे जाहीर केले.
 • सरकारने NELP खाली दिलेल्या ऑईल आणी GAS ब्लोक्समधून  ऑईल आणी GAS काढण्याची सीमा वाढवली. याचा फायदा मुख्यतः केर्न या कंपनीला झाला.
 • RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
 • NCLT च्या मुंबई बेंचने वेदान्ता आणी केर्न च्या मर्जरला मंजुरी दिली.
 • NSE ने जाहीर केले की F & O सेगमेंट मध्ये १५ कंपन्यांचा ३१ मार्च पासून समावेश केला जाईल. रिलायंस डिफेन्स, इंडिगो, PVR, इक्विटास होल्डिंग, MAX, कॅपिटल फर्स्ट, उज्जीवन, इंडियन बँक, इंफिबिम, पिरामल एस्कॉर्टस, दालमिया भारत, सुझलॉन, मुथुट फायनांस आणी श्री सिमेंट.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • GSPC च्या KG ब्लॉक मधील ८०% स्टेक ONGC Rs १८० कोटींना खरेदी करेल.
 • HUL ही कंपनी आपले काही ब्रांड Rs ६०० कोटींना विकणार आहे.
 • मेरिको या कंपनीने ‘BEARDO’ हा पर्सनल केअर ब्रांड खरेदी केला. मेरिकोचा कच्चा माल कोपरा (खोबरे) याच्या MSP मध्ये Rs ५५० ची वाढ झाली.
 • R कॉम या कंपनीला त्यांचा टॉवर बिझिनेस ब्रूकफिल्ड या कंपनीला विकण्यासाठी CCI (COMPETITION COMMISSION OF INDIA) ने मंजुरी दिली.
 • सुनील हायटेक या कंपनीला NHAI कडून ९८० कोटींची तर दिलीप बिल्डकॉन या कंपनीला NHAI कडून महाराष्ट्रातील कामाकरता Rs ३२६९ कोटींची ऑर्डर मिळाली. तसेच रिलायंस इंफ्राने तामिळनाडूतील रोड प्रोजेक्टची  बोली जिंकली.
 • REC ने दामोदर व्हॉली बरोबर Rs ४६५० कोटींचे MOU केले.
 • रत्नागिरी gas पॉवर मधून LNG टर्मिनलचे डीमर्जर केले जाईल. या कंपनीच्या बाकी असलेल्या Rs ८९०५ कोटी कर्जाचे restructuring करण्यास बँकेने मान्य केले आहे.   .
 • RCF आणी बालाजी अमाईन यांनी तक्रार केली होती की की पेंट आणी फार्मा कंपन्यांमध्ये जे केमिकल वापरतात त्याचे डम्पिंग चालू आहे. ही तक्रार योग्य आहे असे सरकारला आढळले.
 • आरोग्यदायी आणी पौष्टिक शक्तिवर्धक पेयांच्या मार्केटमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये नेस्लेचे ‘MILO’ आणि DANNAN चे ‘प्रोटीनेक्स’ABBOT चे ‘पिडियाशुअर’ आणी ‘इन्शुआर’ यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘हॉरलिक्स’ ची किंमत २०% ने कमी केली जाइल. याचा परिणाम GSK कंझ्युमर या कंपनीवर होईल.
 • मावाना शुगर या कंपनीने PNB बरोबर कर्जाची सेटलमेंट केली. या कंपनीवर Rs १०९ कोटी कर्ज होते ते आता Rs ७९ कोटी भरायचे ठरले. व्याजही माफ केले. हे कर्ज १५ महिन्यात भरायचे आहे.
 • डिविज LAB या कंपनीला त्यांच्या विशाखापट्टणम युनिटसाठी ‘USFDA’ ने IMPORT ALERT जारी केला.
 • DR REDDY‘ज LABच्या दुवादा युनिटसाठी ‘USFDA’ ने त्रुटी दाखवल्या
 • AXIS बँकेचे CEO आणि MD राजीनामा देणार आहेत अशी बातमी आली. ही बँक आणी कोटक महिंद्र बँक यांचे मर्जर होणार आहे अशी बातमी आहे.
 • NTPC ने आपले राजस्थानमध्ये भाद्ला येथे 20MW चा सोलर प्लांट आणी आसाममध्ये २५० MW चा थर्मल पॉवर प्लांट सुरु केले. NTPC ने ‘SJVN’या कंपनीतला सरकारचा स्टेक विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • व्होडाफोन आणी आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या मर्जरची घोषणा केली. व्होडाफोन चा हिस्सा ४५% आणी आयडीयाचा स्टेक २६% असेल. दोन्ही कंपन्यांचे मर्जरसाठी valuation अनुक्रमे व्होडाफोन Rs८२२०० कोटी आणि आयडीयाचे Rs ७२२०० कोटी असे केले आहे. या दोन्ही कंपन्यांचा मार्केट शेअर ४२% असेल. व्होडाफोन आणी आयडीया हेही दोन ब्रांड चालू राहतील.
 • HCL  टेक या कंपनीने Rs १००० प्रती शेअरला किंमतीला ‘BUY BACK’जाहीर केला. कंपनी ३.५ कोटी शेअर्स ‘BUY  BACK’ करेल. जर प्रमोटरनी या ‘BUY BACK’मध्ये भाग घेतला तर BUYBACK चे प्रमाण २.६% पडेल नाहीतर ६% होईल.
 • OIL INDIA ही कंपनी Rs ३४० प्रती शेअर याप्रमाणे शेअर BUY BACK करेल.
 • हिंदुस्थान कॉम्पोझिटस या कंपनीने शेअर स्प्लिट, बोनसवर विचार करण्यासाठी १० एप्रिल २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • हिंदुस्थान झिंक या कंपनीने Rs २७.५० प्रती शेअर तर IOC ने Rs ४.५०, BPCL ने Rs १२, आणी HPCL या कंपनीने Rs ६.४० अंतरिम लाभांश आणी भारती इन्फ्राटेलने Rs १२ लाभांश जाहीर केला.
 • कोल इंडिया या कंपनीने दुसर्या अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी २६ मार्च तोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठेक बोलावली आहे.

या आठवड्यात आलेले IPO आणी लिस्टिंग

 • या आठवड्यात शंकर बिल्डींग प्रोडक्ट्स आणी CL EDUCATE हे दोन IPO  आले त्यातील CL EDUCATE  IPO १.८८ वेळा तर शंकर बिल्डींग प्रोडक्ट्स IPO  २० वेळा सबस्क्राइब झाला.
 • या आठवड्यात D मार्ट या कंपनीचे लिस्टिंग Rs ६०० ला झाले १००% लिस्टिंग गेन झाला.

मार्केटने काय शिकवले
ज्यावेळी लाभांश जाहीर होणार अशी बातमी येते तेव्हा तो अंतरिम आहे का फायनल याचा विचार करावा. तसेच लाभांश किती मिळेल? केव्हा मिळेल? तो मिळण्यास पात्र होण्यासाठी शेअर खरेदी करण्याची EX DATE कोणती? लाभांश जाहीर होण्याआधीची किंमत आणी जाहीर होईपर्यंत त्याच्या किंमतीत झालेली वाढ याचा अंदाज घ्यावा. लाभांशाचे आताच्या शेअरच्या किमती बरोबरचे प्रमाण आणी कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घ्यावी. लाभांशासाठी शेअर खरेदी करावा का या प्रश्नाची उत्तरे कॅश आणी फ्युचर्स यांच्या किमतीत जेवढा फरक असेल त्यापेक्षा जास्त लाभांश मिळाला पाहिजे असा सर्वसाधारण अंदाज असतो.
‘लाभांशाची खिरापत, एक आफत’ असे म्हणायची वेळ येणार नाही ना? अशी एक शंकाही येते. सरकारी कंपन्या जास्त लाभांश देत आहेत प्रमाणापेक्षा जास्त लाभांश याचा अर्थ कंपन्यांच्या जवळची ‘कॅश’ तेवढ्या प्रमाणात कमी होते. कंपनीच्या प्रगतीसाठी, भावी काळातील विस्तार योजनांसाठी तेवढा पैसा कमी उपलब्ध राहतो. थोडक्यात कंपन्यांची ‘नक्त मालमत्ता’ (NET WORTH) कमी होते. याचा परिणाम कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नावर आणी प्रगतीवर विपरीत होऊ शकतो. कंपनीच्या शेअर्च्या मार्केटमध्ये असलेल्या किमतीत जर लाभांशाच्या रकमेपेक्षा जास्त घट झाली तर काय उपयोग? त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच हवी.
तसा जो आठवडा कोणताही ट्रिगर नसल्यामुळे कंटाळवाणा गेला असता त्यात लाभांशाच्या बातमीमुळे नवीन चेतना मिळाली आणी आठवडा आनंददायी आणी उत्साहवर्धक झाला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २९४२१ वर आणी NSE निर्देशांक ९१०८ वर बंद झाले

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: mahendra shamkant bhamare
तुमचा प्रश्न : for long trem which bluechip stocks to buy
तुम्ही माझे ब्लॉग लक्षपूर्वक वाचलेत तर तुम्ही स्वतः लॉंग टर्मसाठी ब्ल्यू चीप कंपन्यांची यादी बनवू शकता.
नाव: सचिन मळेकर
तुमचा प्रश्न : F&O मार्केट बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
वेळ मिळेल तेव्हा आपल्या सूचनेचा विचार करू.
नाव: amol chavan
तुमचा प्रश्न : share market badhal mala kahich Basic mahiti nahi pn mala share market madhe investment karaychi aahe. tumhi mala kay madat karu shakta..?
मी माझ्या ब्लॉगनधून, माझ्या पुस्तकातून, मनी प्लस सारख्या मासिकातून सरळ सोप्या आणी समजण्यास सुलभ अशा भाषेतून माहिती पुरविली आहे ती वाचा.
नाव: Pravin ramchandra Ganjave
तुमचा प्रश्न : I have invest in 100000 ruppes in stock which 1 is the best for 15 years like long term
माझे ब्लॉग आणी पुस्तकाच्या आधाराने तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. फक्त एकच लक्षात ठेवा तंत्रविज्ञान फार वेगाने प्रगतीशील होत आहे. त्यामुळे दीर्घ मुदत म्हणजे ५ वर्षे ते ७ वर्षे पर्यंतच समजावी.
नाव: swaraj bhad
तुमचा प्रश्न : share market madhe kasa paisa invest karycha ani tycha fayda kasa ky hoto
तुम्ही माझे ब्लॉग वाचा, माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा उपयोग करा.
नाव: shubham khole
तुमचा प्रश्न : share market kase vaprun tyacha fayada kasa milvava ? share market madhe kasa paisa invest karycha ani tycha fayda kasa ky hoto
तुम्ही माझे ब्लॉग वाचा, माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा उपयोग करा.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : domey portfailo cha faida hou shakto ka va kasa
डमी पोर्टफ़ोलिओचा उपयोग करून आपले अंदाज बरोबर येतात का? आपला अभ्यास योग्य रीतीने होत आहे का? हे समजते. थोडक्यात सांगायचे तर परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर घड्याळ लावून पेपर सोडवणे होय. कोणत्याही कार्यक्रमाची रंगीत तालीम म्हणजेच डमी पोर्टफोलीओ मुले फायदा होतो नुकसान टळते .
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : share anlesas sathi jay websites aahet tache maitee
तुम्ही गुगल वापरून ह्या वेबसाईट शोधू शकता.
नाव: Yogesh
तुमचा प्रश्न : Hello mam….F&O baddal kahi mahiti sanga…Pls
वेळ मिळाला की F&O बद्दल नाहीती जरूर देईन. …
नाव: prashant patil
तुमचा प्रश्न : madum me 0.05 pisyane trading keli tar parwadel ka.maji invesment 100000 rs ahe .me small cap madhe trading karanyasathi intrasted ahe.maje demat account angal broking madhe ahe ,brokrage charge delivari sathi 0.128 %
गल्लीत शिरण्याआधी हमरस्त्यावर चालण्याचा सराव करा. म्हणजेच आधी आपल्याला ब्लू चीप आणी लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये ट्रेडिंग करता येते का ? ते पहा. यात धोका कमी आणी फायदा जास्त असतो. हे जमल्यावरच तुम्ही स्माल कॅप किंवा पेनी शेअर्सच्या वाट्याला जावे. यासाठी पेनी शेअर्स वरील ब्लॉग वाचा.तुम्हाला परवडेल की माही हे तुम्हाला होणार्या फायद्यावर अवलंबून राहील. या बाबतीत ब्रोकर कमीतकमी किती ब्रोकरेज आकारेल याचीही चौकशी करा.
नाव: Ramdas
तुमचा प्रश्न : Jar ekhadi company share market madhun delisted jhali ter shareholder la tyani invest keleli Amt kashi parat milavta yete.
कंपनी स्वतःच्या इच्छेने डीलीस्ट झाली तर प्रत्येक शेअरसाठी जो भाव ठरेल त्याप्रमाणे पैसे मिळतात पण सेबीने डीलीस्ट केली तर कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमच्या शेअर्सचे पैसे, कोर्टात ठरेल त्या भावाने मिळतात.मी माझ्या पुस्तकात डीलीस्टींग वर एक भाग लिहिला आहे तो वाचा.
नाव: MANOJ bonde
तुमचा प्रश्न : Mam, trading karita acount kontya financial company madhe open karne thik rahil? Best name suggest Kara mam…… Kindly reply asap
DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट कुठेही उघडा पण घराच्या जवळ किंवा ऑफिसच्या जवळ उघडा. म्हणजे पैसा आणी वेळ वाचेल.
नाव: Rushikesh Kulkarni
तुमचा प्रश्न : maja prashn asa ahe Call Put Mhnje Kay Ani call put madun kiti Profit yeu shakto Call put kadi karyla pahij
CALL आणी PUT म्हणजे अनुक्रमे तेजी आणी मंदीची स्थिती. याच्या रेशियो वरून तेजी येईल की मंदी येईल, मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे की ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे याचा अंदाज येतो.
नाव: Akshay borase
तुमचा प्रश्न : Importance of d mat account
माझे ब्लोग नंबर ३१ आणी ३९ वाचा.
नाव: Milind Shedge
तुमचा प्रश्न : Q.1) Mi sadhya market madhe mandhan industrial company che 2000 share ghetle ahet 5 month hold kele ahet sadhya mi lost madhe ahe tar mi kay karave hold ya Sell karu.???
Q.2) Kontya sector madhe invest karne best ahe…..??
Q.3) Market madhe trading karnyacha uttam kal konta asnar …..?
आपण प्रत्येक शेअर मध्ये योग्य प्रमाणात आणी कोणत्याही टिप्सना बळी न पडता आपल्या अभ्यासानुसार गुंतवणूक/ट्रेडिंग केलीत तर भविष्यात अशी वेळ येणार नाही.आपले पैसे वेगवेगळ्या कंपन्यात थोडे थोडे गुंतवलेत तर रिस्क कमी होतो. माझा ब्लोग वाचा तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील.
नाव: पवन
तुमचा प्रश्न : नमस्कार, मी नुकताच शेअर मार्केट मध्ये उतरलो आहे, मागचे ६ महिने मी तुमचे हे page, तसेच मिळेल तिथून या बद्दल अभ्यास करत होतो पण तरीही मला काही concepts समजल्या नाहीत, आपणाकडून direct प्रश्न विचारून मला त्या समजतील अशी अपेक्षा आहे. value at risk,Return on Capital Employee,How can we find current Ratio, या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे, धन्यवाद..!
तुम्ही किती भांडवल गुंतवले आणी त्यावर तुम्हाला किती वेळात आणी किती फायदा झाला याला RETURN ON कॅपिटल EMPLOYED असे म्हणतात. ‘VALUE AT RISK’ म्हणजे  तुम्ही किती धोका पत्करत आहात. करंट रेशियो म्हणजे कंपनीची करंट देणी करंट ASSET मधून फेडण्याची क्षमता. अकौंटंन्सीच्या कोठल्याही क्रमिक पुस्तकात तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळवता येईल.
नाव: Darshan Shirodkar
तुमचा प्रश्न : Mi Stock market shetrat navin ahe, Mala hya market madhe trading karay che ahe, pan kutlya hi shetrat janya adhi tyache shikshan ghene garjeche ahe, ase maze pranjal mat ahe.Mala Trading shikayche ahe, tar tumhi mala shikval ka?? Thank you in advance.
मी सध्या प्रशिक्षण वर्ग घेते. माझे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तुम्ही माझा ब्लॉग ही वाचू शकता.
नाव: yogesh gangurde
तुमचा प्रश्न : Hello madam. Maja qustion ASA aahe ki brokerage share buy kele teva ghetle jate aani jeva share sale karto teva pan ghetle jate ka?
ब्रोकरेज शेअर्स खरेदी आणी विक्री करताना दोन्ही वेळेस आकारले जाते.
नाव: SACHIN
तुमचा प्रश्न : मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे आहे. रोज खरेदी विक्री व्यवहार कसा करायचा? तसेच मी घरी बसून हे करू शकतो का ? तसेच हे करण्यासाठी कमीत कमी किती रुपयांन पासून ही सुरुवात करावी ? डीम्याट account काढून हे व्यवहार कसे करावे ?
खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी माझे पुस्तक, माझा ब्लॉग, प्रशिक्षण वर्ग याचा उपयोग करा. तुम्ही शेअर मार्केटचे काम टी व्ही आणी इंटरनेटच्या मदतीने घरच्याघरी करू शकता. कितीही रुपयापासून सुरुवात करू शकता.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : cash market paksha option madhe lok trading jast ka kartat
तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जे लोक वायदा बाजारात जास्त ट्रेडिंग करतात तेच देऊ शकतील.
नाव: Mahesh jadhav
तुमचा प्रश्न : e-dinar kasha prakare kam karte ani future mdhe ky position hoil? te pan Bitcoin sarke High price la jail ki band hoil
मी फक्त इक्विटीबद्दल शंकानिरसन करू शकेन.
नाव: karan gholape
तुमचा प्रश्न : BSE cha ipo ala ahe.tyachyababat kay mat ahe.details mahiti sanga
मी BSE IPO बद्दल BLOG मध्ये माहिती दिली आहे.
नाव: GAJANAN TUMDAM
तुमचा प्रश्न : Madam,namaskar. Madam mee ekhade warshapasun share ghene wa wikane karato.mazyakade 2 demat account aahet.1 Anand Rathi broker che,wa 2 re Axis Bank securitys che.mala suruwatil barach tota zala.nanter matra mee tumacha blog wachun kahi goshti shkalo.wa aata mala khup tota hot nahi.mee paise kamawit aaho.pan mala ek prashn ? ajun sodawata aala nahi.”STOP LOSE MANJE KAY WA TO KASA LAWAYACHA.THOD WISTARANE SANGAL KA. THANKS…! Apala snehi GAJANAN TUMDAM,DATTAWADI  NAGPUR M.S.
तोटा होणे कमी झाले हे वाचून खूप आनंद झाला. माझ्या श्रमाचे चीज झाले. तुम्ही मला कळवले याबद्दल आभारी आहे.
मी STOPLOSS या विषयावर ब्लॉग नंबर ४६ मध्ये विस्ताराने लिहिले आहे त्याचा उपयोग करा.
नाव: Girish
तुमचा प्रश्न : What is meant by Optionally convertible preferred stock?
हा एक मध्यम मार्ग आहे. ठराविक उत्पन्न मिळत राहते.काही काळाने त्याचे इक्विटी शेअर्समध्ये रुपांतर आपल्याला पाहिजे तर करू शकता. शेअरच्या वाढत्या किमतीचा फायदा मिळतो. कंपनीचे  दिवाळे वाजल्यास कॅपिटल परत मिळताना प्राथमिकता मिळते. पण बऱ्याच वेळेला या शेअर्सला वोटिंग अधिकार नसतात.
नाव: vijay
तुमचा प्रश्न : madam, mi 1 mahinya purvi trading chalu kele aahe, mala Technical Analysis sathi mahiti janun Karun ghyachi aahe aahe tari kahi tips sathi krupya margdarshan kara.
माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात टेक्निकल विश्लेषणाविषयी भरपूर माहिती आहे. किंवा आता मी ब्लॉगमधूनही माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्याचा लाभ घ्या.
नाव: VIjay
तुमचा प्रश्न : madam, tumchi ahmednagar madhe class aahe ka ? asel tar sanga please.
माझे प्रशिक्षण वर्ग ठाण्याला आहेत. तुम्हाला हवं असल्यासंअहमदनगरलं आपण काही lectures ठरवू शकतो. पण त्यासाठी एखादा छोटा group हवा.
नाव: Laxmikant Gakhare
तुमचा प्रश्न : what is IPO ?
IPO  म्हणजे ‘INITIAL PUBLIC OFFER. ज्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये खरेदीविक्रीसाठी उपलब्ध नसतात ते  उपलब्ध होण्याची प्रक्रिया होय. ब्लोग नंबर ४७ ते ५३ IPO च्या संदर्भात लिहिले आहेत. ते वाचा.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Respected mam majhyakade PC nahiye tar toparyant me android phonevar trading karnyachi suvidha aahe ka. Aani me angelbroking madhe trading uaghatoy tar tya sathi broaker ne ek cancelled aani ek angelbroking LA denyasathi few amount sign chaque magitala aahe tar me kay karu plz guide thank you
तुमच्याकडे PC नसेल तरी समस्या नाही तुम्ही मोबाईलच्या इंटरनेटवर तुम्हाला शेअर्स विषयी माहिती मिळू शकेल. ब्रोकर आकारत असलेला प्रत्येक चार्ज कशासाठी आहे ते विचारा. कोरे चेक मागत असले तर ते क्रॉस करून आणी त्यावर PAYEE म्हणून तुमच्या ब्रोकरचे नाव लिहून द्या. ते चेक तुमच्या अकौंटमध्ये बरोबर रकमेचेच पास होत आहेत याकडे लक्ष दया.
नाव: DIPAK HARISHCHANDRA PAWAR
तुमचा प्रश्न : Madam, Future market aani option market badal 1 blog liha…Because tumi explain kelela lagech samjata.
मला वेळ मिळाला की ‘वायदा बाजारावर’ मी ब्लॉग लिहीन.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : open interest vadecha trading madhe kai faida hoto , kiva kurun gava
फ्युचर किंवा आप्शंस contract मध्ये जेवढी contracts fulfill झाली बाहीत त्यांची संख्या किंवा दुसऱ्या शब्दात out standing contracts.
नाव: Mrs. Rama Mahale.
तुमचा प्रश्न : Trigger value mhanaje nakki ky ani ticha upyog kadhi v kasa karayacha?
ट्रिगर value म्हणजे जी value टच झाली तर तुमची ऑर्डर activate होते. आपल्याला होणारा तोटा  मर्यादित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
नाव: Swati
तुमचा प्रश्न : Mam mene b.tech kiya hai…par muze share market me ana hai…muze konsa course aur kahase krna hoga…taki muze uske bare me knowledge mile…aur me share market me a saku…plz mam help me
शायद आप मैने लिखे हुये ब्लॉग पढ सकती है, इतनी मराठी जानती हैI आप मेरे ब्लोग ध्यांनसे पढेI मेरी किताबभी मार्केटमे आई है I और मैने प्रशिक्षण वर्ग चालू किये है आप चाहे तो लाभ उठा सक्ती है I
नाव: Kakasaheb patil
तुमचा प्रश्न : Can you explain future call &put option call &put please.
वायदा बाजार समजावू शकते पण आता वेळ मिळत नाही वेळ मिळाल्यास जरूर विचार करेन.
नाव: Tasmira
तुमचा प्रश्न : mala stock market madhe pravesh karaycha aahe, survat kashi karu, mi tumche sarv blog vachle aahet aata mala hi as vathtay ki mi hi he karav. mala please margdarshan kara.
मला वाटती तुम्हाला धैर्य होत नाही. अशा वेळेला VIRTUAL ट्रेडिंग करून आपले निर्णय बरोबर येतात की नाही ते पाहून मगच पैसे गुंतवावेत. सुरुवातीला ज्यात धोका कमी आहे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक/ट्रेडिंग करून पाहावे.
नाव: Navnath salunke
तुमचा प्रश्न : मला शेअर बाजाराची पुर्ण माहिती हवी आहे.
माझ्या ब्लॉगवरील सर्व लेख काळजीपूर्वक वाचा. दर शनिवारी ब्लोग टाकला जातो त्यात गेल्या आठवड्यातील शेअर मार्केटशीसंबंधीत घडामोडी असतात. तो ब्लॉग तुम्ही वाचल्यास तुमचे ज्ञान अद्ययावत राहील.
नाव: Dhananjay Kulkarni
तुमचा प्रश्न : Idea cellular nifty la delist honar ase kalale. Me magachya varshi tumacha blog vachun stock market madhe invest suru keli ahe. Tevach me idea cha share long term investment sathi ghetla ahe. Karan me government employee ahe. Pan ata kay karave asa prashna padala ahe. Krupaya apan margdarshan karave.
“आयडिया” डीलीस्ट होणार म्हणून घाबरण्याचे कारण नाही. आयडिया आणी वोडाफोन या कंपन्यांचे मर्जर होणार आहे असे गाजते आहे. हे मर्जर होईल तेव्हा तुम्हाला नव्या कंपनीचे शेअर्स मिळतील. अन्यथा खरेदी करून १ वर्ष होऊन गेले असल्यास तुम्ही ती मार्केटमध्ये विकू शकता. (तुम्हाला भीती वाटत असल्यास.)
नाव: Vishal Jawle
तुमचा प्रश्न : Madam Namskar , Long term investment karun wealth creation sathi ekhada stock kasa shodhayacha ? ani ekhada stock aplyala tasa vaatlyas tyacha follow up nakki kasa thevaycha mhanje tyache quartly yenarya report madhe nakki kashavar (sales ,ebita ,eps ,roe ,roce , financial ratios etc) laksh thevave jenekarun apan yogya stock nivdala ahe v to aplyasathi 10-15 varshat multibagger tharel yaachi khatri hoil . Pls kalva.
तुम्ही ब्लॉग आणी पुस्तक वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: Lahu pandhawale
तुमचा प्रश्न : डी मॅट्रीक खाते उघडल्यावर शेअर खरेदी साठी कसा निवडावा कंपन्यांची यादी मिळते का शेअर ची माहिती जसे की- A ग्रूप चा आहे ब्ल्यू चीप चा
DEMAT अकौंट उघडल्यावर कोणतीही माहिती मिळत नाही. तुम्हाला BSE किंवा NSE च्या साईटवर जाऊन किंवा अर्थविषयक इंटरनेट साईट्सवरून, वर्तमानपत्रातून किंवा दूरदर्शन वाहिन्यांवरून ती मिळवावी लागते.
नाव: MOHAN ALVE
तुमचा प्रश्न : daily margin statement mahnje kay?
जर तुम्ही शेअर खरेदी केला आणी त्याची पूर्ण रक्कम दिली नाही तर ब्रोकर तुमचे शेअर्स त्याने गुंतवलेल्या पैशासाठी सिक्युरिटी म्हणून ठेवून घेतो. जर तुमच्या शेअर्सच्या किमतीत घट झाली तर तुम्हाला तेवढे मार्जीन वाढवावे लागते.जर ब्रोकरच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मार्जिन  भरले नाही तर ब्रोकर कमी झालेल्या किमतीला शेअर विकून त्याचे पैसे सुरक्षित करतो. सेबीच्या नियमाप्रमाणे हे स्टेटमेंट तुम्हाला ब्रोकरने दिले पाहिजे.
नाव: Aniket
तुमचा प्रश्न : Mam maza que asa ahe ki Demat account open karnyasathi aplya bank account mde kiti balance asayla hava? And Demet account chalu zalyavr tya demat account vr survatila kiti balance asava lagto?
‘DEMAT’ अकौंट ओपन करण्यासाठी बँक अकौंटमध्ये किती पैसे पाहिजेत असा कोठलाही नियम नाही. फक्त बँकेत ‘DEMAT’ अकौंट उघडायचा असल्यास बँक तुमचा बचत अकौंट तुम्ही  समाधानकारक रीत्या चालवता की नाही ते बघू शकते.’ DEMAT’अकौंटमध्ये फक्त शेअर्सच्या खरेदी विक्रीची नोंद होत असल्यामुळे BALANCE नेहेमी शेअर्सच्या संख्येमध्ये असतो.
नाव: Tushar kamble
तुमचा प्रश्न : BTST म्हणजे काय ?
“बाय टुडे सेल टूमॉरो” म्हणजे आज खरेदी करा उद्या विका. यात आपल्याला डीलीव्हरीचे ब्रोकरेज लागत असल्यामुळे त्यापेक्षा नफ्याचे प्रमाण जास्त आहे की नाही ते पहावे. जास्त माहितीसाठी माझे पुस्तक पहावे. 
नाव: दिलीप
तुमचा प्रश्न : आपण जेव्हा एखादा शेअर्स विकतो त्या मध्ये आणि प्रोफिट मार्जिंग कित असायला हवे आणि तुम्हि पोस्ट केलेली ब्रोकर रिसिट मला पुन्हा पाहायची असल्यास मला भेटेल का
शेअर मार्केट म्हणजे अपेक्षांचे मार्केट आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे अपेक्षा करतो. पण आपण गुंतवणुकीच्या इतर प्रकारावर मिळणाऱ्या नफ्याशी तुलना करून आणी आपल्याला असलेल्या पैशाच्या आणी वेळेच्या सवडीप्रमाणे प्रत्येक शेअरच्या बाबतीत हे प्रमाण ठरवावे. आपला दृष्टीकोन लवचिक ठेवावा म्हणजे मिळणारा फायदा हातातून जात नाही. मिळणारा फायदा किती वेळात आणी किती प्रमाणात मिळतो आहे त्यावरूनही तुम्ही हे प्रमाण निश्चित करू शकता. ४ महिन्यात १०% फायदा होत असल्यास तो वर्षाला ३०% झाला.
नाव: Sudam jadhav
तुमचा प्रश्न : Mam,can i open demat account with cosmos bank
तुम्हाला हवा तिथे तुमच्या सोयीनुसार DEMAT अकौंट उघडा. फक्त ही सेवा किती वेळ आणी किती सुलभतेने उपलब्ध आहे ते पहावे.
नाव: Amar mandhare
तुमचा प्रश्न : Madam,SESNSEX and NIFTY exact brief kara na mla,mhnje doni cha arth kaay??
BSE वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी ३० निवडक कंपन्यांच्या निर्देशांकाला सेन्सेक्स आणी NSE वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी ५० निवडक कंपन्यांच्या निर्देशांकाला निफ्टी असे म्हणतात. या निर्देशांकात वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सना वेगवेगळे वेटेज दिलेले आहे.
नाव: प्रतीक
तुमचा प्रश्न : IPO म्हणजे काय? चांगला IPO कसा ओळखावा? अधिक विश्लेषणात्मक माहिती हवी होती.
प्रत्येक IPO जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रातून, दूरदर्शनच्या अर्थविषयक वाहिन्यांवरून वारंवार माहिती दिली जाते. आमच्या साप्ताहिक समालोचनातून येणाऱ्या IPO विषयी माहिती देत असतो. त्यावरून IPO चांगला आहे की नाही हा निर्णय आपण घेऊ शकता.
नाव: deepak
तुमचा प्रश्न : Good morning ,कमोडिटि मध्ये खरेदि विक्रि कशि असते,
मी कमोडीटी मार्केटविषयी अजून काही सांगत नाही.
नाव: sagar dongare
तुमचा प्रश्न : Buy silver at 43800 rs march expiary now sell this silver or hold
मी कमोडीटी मार्केटविषयी अजून काही सांगत नाही.
नाव: AMIT PATHADE
तुमचा प्रश्न : Dimat अकाउन्ट उघडण्यासाठी कीती खर्च लागतो.आणि कमीत कमी कीती रक्कम गुतवणूक करावी लागती.
DEMAT अकौंट उघडण्याचा खर्च सेबीच्या नियमानुसार लागतो. तुम्हाला जेव्हा DEMAT अकौंट उघडायचा असेल तेव्हा चौकशी करा. आपण कितीही रक्कम गुंतवू शकता.
 

अब की बार निफ्टी दस हजार – १३ मार्च ते १७ मार्च २०१७ – आठवड्याचे समालोचन

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

IC – wikipedia


कोणत्याही सुधारणा करत असताना BJP ला (भारतीय जनता पार्टीला) राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे बिल पास होत नव्हते आता UP मध्ये बहुमताने निवडून आल्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढेल. कोणत्याही सुधारणांसाठी मार्ग मोकळा होईल. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सुधारणा वेग पकडतील अशी आशा आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणी मणिपूर येथे BJP ची सरकारे स्थापन झाली. राजकारणात स्थैर्य आले. त्यामुळे निफ्टी आणी सेन्सेक्सने उच्चांक प्रस्थापित केला. आता भारतात राजकीय स्थिरता आल्यामुळे परदेशातूनही गुंतवणुकीचा ओघ वाढला. निफ्टी १०००० ची पातळी गाठेल अशी गुंतवणूकदारांना आशा वाटू लागली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • फेडने आपल्या बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये ०.२५% ने वाढ केली. USA ची सुधारती अर्थव्यवस्था, वाढते ‘जॉब गेन्स’ आणी २% च्या आसपास राहणारी महागाई यामुळे फेड ने हे रेट वाढवले. एवढेच नाहीतर २०१७ ते १८ या वर्षात आणखी तीनवेळा आणी २०१८-२०१९ या वर्षात तीनदा वाढ केली जाईल असे घोषित केले. मात्र ही वाढ हळू हळू केली जाईल असे सांगितले.
 • UK च्या पंतप्रधान थेरेसा मे यांना EU शी ब्रेक्झीट साठी वाटाघाटी करायला UKच्या दोन्ही सदनानी मंजुरी दिली.
 • चीनने SUBSTANDARD स्टील उत्पादनात १० कोटी टन कपात केली. चीनची स्टीलची निर्यात १२ कोटी टनांवरून ६ कोटी टन झाली.
 • वेदांताचे अनिल अगरवाल हे UK मधील अंग्लो अमेरिकन PLC मध्ये १३% स्टेक US $ २.४ बिलियन ला खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही कंपनी PLATINUM, हिरे, इतर बेस मेटल्स आणी खनिजे यांचाही बिझिनेस करते. हिरे उद्योगाचे केंद्र DEE BEERS (हिरे शोधणे, त्यांचे मायनिंग आणी विक्री करते) याच कंपनीच्या मालकीचे आहे.

सरकारी अनौंसमेंट

 • तामिळनाडू पेट्रो आणी निरमा या कंपन्यांनी डीटरजंटमध्ये जे केमिकल वापरले जाते त्याचे डम्पिंग चालू आहे याबद्दल तक्रार केली होती. त्यामुळे या केमिकल्सवर सरकारने ANTI DUMPING ड्युटी लावली.
 • अल्युमिनियम फॉईल वर ANTI DUMPING लावण्याचा सरकार विचार करत आहे.
 • कर्नाटक सरकारने दारूवरील VAT (VALUE ADDED TAX) रद्द केला. वाईन, बियर, हार्ड लिकर वरील VAT रद्द केला. कर १२% वरून १८% वर नेला होता हा अतिरिक्त करही रद्द केला.
 • महाराष्ट्र राज्य सरकार पॉवर कंपन्यांना Rs ३००० कोटींचे कर्ज देईल.
 • सरकारने क्लीन गंगा प्रोजेक्ट साठी Rs १९०० कोटी मंजूर केले. याचा फायदा ITD सिमेंटेशन, व्हाटेक वाबाग यांना होईल.
 • VIRTUAL करन्सी (उदा. बीटकॅईन) रेग्युलेट करण्यासाठी एक कमिटी नेमली आहे. ही कमिटी यावरती अहवाल तीन महिन्यात सादर करील.
 • सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेखाली सरकारी हॉस्पिटल्समध्ये इलाज फुकट होतील असे सांगितले. सरकारने कोलबेड मिथेन GAS ची किंमत ठरवण्याचा अधिकार उत्पादकांना दिला.
 • देशभरात बायोटॉयलेट लावले जाणार आहेत. याचे तंत्रज्ञान स्टोन इंडियाकडे आहे.
 • लॉजिस्टीक्सला इंफ्राचा दर्जा दिला जाण्याची शक्यता आहे. ज्या कंपन्या वेअरहाउस, कोल्ड स्टोअरेजच्या क्षेत्रात काम करतात त्यांना फायदा होईल.
 • चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाने आपल्या कक्षेत येणारे सर्व हायवेज जिल्हा रोड म्हणून जाहीर केले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मद्यार्कासंबंधीचे निर्णय या रोडला लागू होणार नाही.
 • डीमटेरिअलाईझड शेअर्सच्या तारणावर Rs २० लाखापर्यंत कर्ज निळू शकेल.
 • ITAT(INCOME TAX APPELLATE TRIBUNAL) ने UK मधील CAIRN ENERGY PLC या कंपनीला Rs १०,००० कोटी कॅपिटल गेन्स कर भरावयास सांगितला आहे. याच प्रश्नावर कंपनी आणी भारत सरकार यात आरबीट्रेशन प्रोसीडिंग सिंगापूरमध्ये सुरु आहेत.
 • सरकार युनायटेड बँकेत Rs ४१८ कोटी गुंतवणार आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • भारताच्या निर्यातीमध्ये २७.४८% वाढ होऊन ती फेब्रुवारी २०१७ मध्ये US $ २४.५ बिलियन झाली. परंतु आयात २१%ने वाढून US $ ३३.३ बिलियन झाली. निर्यातीमध्ये इंजिनीअरिंग गुड्समध्ये तर आयातीमध्ये सोन्याच्या आयातीमध्ये लक्षणीय वाढ झाली. या उलट ट्रेड डेफिसिट US ४ ८.८ बिलियन झाली.
 • किरकोळ महागाई फेब्रुवारी २०१७ साठी (RPI) ३.६५ % झाली. (जानेवारी २०१७ मध्ये ३.१७%) घाऊक महागाई निर्देशांक (WPI)फेब्रुवारी २०१७ मध्ये वाढून ६.५५ झाला. (जानेवारी २०१७ मध्ये ५.२५% होता) अन्न धन्य फळफळावळ तसेच डाळी जानेवारी २०१७ च्या तुलनेत महाग झाल्यामुळे मुख्यतः ही महागाई झाली
 • IIP चे आकडे सुधारले. जानेवारी २०१७ मध्ये IIP २.७% झाला. कॅपिटल गुड्स आणी MANUFACTURING मध्ये वाढ झाली.
 • रुपयाचा USA $ मधील विनिमय दर १६ महिन्याच्या उच्चतम स्तरावर होता.
 • ‘सेन्सेक्स 50’ हा नवीन निर्देशांक BSE वर सुरु झाला आहे. याचे मार्केट कव्हरेज ६५% आहे. यात मोठ्या आणी लिक्विड कंपन्यांचा समावेश आहे. लॉट साईज ७५ आहे. मंगळवार १४ मार्च २०१७ पासून यात ट्रेडिंग सुरु झाले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सेंच्युरी टेक्स्टाईलचे अनेक उद्योग आहेत. त्यात कपडा, सिमेंट कागद अशा उद्योगांचा समावेश आहे. यापैकी पेपर उद्योग एखाद्या पेपर कंपनीच्या व्यवसायापेक्षा मोठा आहे. हा व्यवसाय Rs ६००० कोटींना विकण्याच्या विचारात आहे. यामुळे कंपनी DEBT FREE होईल. यालाच VALUE UNLOCKING असे म्हणतात. सेंच्युरी टेक्स्टाईलमध्ये सेंच्युरी इंकाचे मर्जर होणार आहे.
 • भारती एअरटेल ही कंपनी भारती इन्फ्राटेल या कंपनीचे ४० कोटी शेअर्स विकणार आहे.
 • उत्तर प्रदेशात आता BJP चे सरकार येणार असल्यामुळे ज्या कंपन्यांचे कामकाज उत्तर प्रदेशात आहे त्यांना फायदा होईल. उदा :- PNC इन्फ्राटेक
 • ग्लेनमार्कच्या अंकलेश्वर युनिटला USFDA ने क्लीन चीट दिली.
 • NHS स्कॉटलंड कडून विप्रोला १२ वर्षांसाठी ऑर्डर मिळाली.
 • सेन्ट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाने टाटा केमिकल्सला त्यांचा हल्दिया प्लांट बंद करायला सांगितला.
 • सन फार्माच्या मोहाली युनिटला २०१३ पासून इम्पोर्ट ALERT जारी केला होता. हा ALERT दूर केला. सन फार्माच्या मालनपुर प्लांटच्या इन्स्पेक्शननंतर USFDA ने कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • ALKEM LAB च्या बड्डी प्लांटसाठी USFDA ने इन्स्पेक्शन करून ३ त्रुटी जाहीर केल्या.
 • MYLAN ROCHE यांच्यात सेटलमेंट झाली त्याचा फायदा बायोकॉनला होईल.
 • वेगवेगळ्या कंपन्यांनी भरलेल्या ADVANCE TAXचे आकडे यायला सुरुवात झाली. यात येस बँक, स्टेट बँकेने गेल्या वेळेपेक्षा जास्त ADVANCE TAX  भरला आहे. आगाऊ भरलेल्या करावरून यावर्षीच्या कंपनीच्या नफ्याचा अंदाज बांधता येतो.
 • NBCC ला मॉरीशसकडून सुप्रीम कोर्टाची बिल्डींग बांधण्यासाठी कंत्राट मिळाले. NBCCने VIDC बरोबर Rs ६००० कोटींचा करार केला.
 • IOC लुब्रीझोल इंडियामधील २४% स्टेक लुब्रीझोल कॉर्पोरेशनला विकणार आहे. IOC च्या बरौनी प्लांटमध्ये सुधारणा (Rs १८७८ कोटींच्या) करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • हेरीटेज फूड्स लवकरच आपले पशुआहार उत्पादन युनिट आंध्रप्रदेशमध्ये चालू करीत आहे.
 • रिलायंस कॅपिटल आपला रिटेल हेल्थकेअर बिझिनेस अलग करून त्याची अलग सबसिडीअरी कंपनी बनवणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • HCL Tech या IT क्षेत्रातील कंपनीने २० मार्च २०१७ रोजी शेअर्स ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. कंपनी Rs ५३७७ कोटीचे शेअर्स ‘BUY BACK’ करू शकते.
 • स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेला २०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने वेगवेगळ्या रीतीने शेअर्स इशू करून (FPI, QIP, राईट्स इशू GDR आणी ADR) Rs १५००० कोटी उभारण्यास मान्यता दिली आहे.
 • COROMONDEL INTERNATIONAL ही मुरुगप्पा ग्रुपची कंपनी ‘नागार्जुना FERTILIZERS अंड CHEMICALS’ ही कंपनी Rs ३००० ते ३६०० कोटी ना खरेदी करण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांची उत्पादन युनिट्स काकिनाडा येथे असल्याने सिनर्जी आणी कॉस्टमध्ये बचत होईल.
 • CKP ग्रूप डायमंड पॉवर ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली कंपनी विकत घेणार आहे. नवीन प्रोमोतर या कंपनीत Rs १२०० कोटी आणतील.
 • इंडस इंड बँक IL&FS ही ब्रोकरेज कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे.
 • MARATHON NEXTGEN REALTY या कंपनीने शेअर ‘BUY BACK वर विचार करण्यासाठी १७ मार्च रोजी बैठक बोलावली आहे
 • MPHASIS ने Rs ६३५ प्रती शेअर ‘BUY BACK’ जाहीर केला.
 • महिंद्र लाईफस्पेस ह्या कंपनीने राईट्स इशूवर विचार करण्यासाठी २० मार्च २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • ‘नक्षत्र वर्ल्ड’ IPO साठी गीतान्जली जेम्स या कंपनीने DRHP दाखल केले. या IPO द्वारा कंपनी Rs ४०० कोटी उभारणार आहे.
 • म्युझिक ब्रॉडकास्टिंगचा शेअर Rs 413 वर लिस्ट झाला. मात्र नंतर Rs 375 पर्यंत खाली आला.

मार्केटने काय शिकवले
शेअर मार्केटचं प्रशिक्षण चालू केल्यापासून माझ्याकडे आजकाल शेअर मार्केट शिकायला किंवा शिकण्याची चौकशी करायला बरेच लोकं येतात. त्यापैकी बऱ्याच जणांची तक्रार किंबहुना सारखीच असते – ‘माझे शेअरमार्केटमध्ये पैसे अडकले आहेत. काय करू समजत नाही’ किंवा  ‘दैव देते पण कर्म नेते अशी अवस्था झाली. फायदा होत होता पण आणखी फायदा होईल म्हणून थांबलो त्यानंतर २ वर्ष झाली पण माझा भाव आला नाही’.
अशी वेळ तुमच्यावर यायला नको असेल तर मार्केटकडे लक्ष द्या. ज्या शेअरमध्ये तुम्हाला अपेक्षित फायदा होत असेल तर तो वसूल करा किंवा मार्केटच्या भाषेत ‘घरी घेऊन या’. आपल्या पोर्टफोलिओमधून तेजीच्या मार्केटमध्ये वाढलेले ‘WEAK’ शेअर्स विकून टाकून कॅशमध्ये बसून रहा. ज्या बेळेला मार्केट पडेल त्यावेळी याच पैशातून तुम्हाला चांगले शेअर्स खरेदी करता येतील. ह्या तेजीचा उपयोग आपल्या पोर्टफोलिओमधील झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी करा. अश्या अजून काही क्लुप्त्या मी माझ्या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पुस्तक या website वरून विकत घेवू शकता – https://pothi.com/pothi/book/bhagyashree-phatak-market-aani-me-0
आता थोडे तांत्रिक विश्लेषणाविषयी सांगायचा प्रयत्न करते. मंगळवार तारीख १४ मार्च आणी बुधवार तारीख १५ मार्च हे दोन्ही दिवस मार्केटने ‘DOJI’ PATTERN फॉर्म केला. पण गुरुवार तारीख १६ मार्च रोजी तेजीचा ‘MARUBOZU’ PATTERN फॉर्म केला. हा जपानीज कॅण्डलस्टिक PATTER आहे. यामधे पूर्ण सेशन मार्केट एकाच दिशेने जात राहते.  “झुकणार नाही, वाकणार नाही, दिशा बदलणार नाही’ असा जणू मार्केटने निर्धार केलेला असतो. या pattern मध्ये ओपनिंग लो असते आणी क्लोजिंग हायला होते. म्हणजेच जणू खरेदी करणाऱ्यांनी शेअरच्या किंमतीवर ताबा मिळवलेला असतो. याला ‘WHITE MARUBOZU’ कॅण्डल  म्हणतात. ‘BLACK MARUBOZU’ च्या वेळी ओपनिंग प्राईस हीच हाय प्राईस असते आणी कमीतकमी किंमतीला मार्केट क्लोज होते. शेअर्स विकणार्यांच्या हातात कंट्रोल असते. अपट्रेंडच्या शेवटी ‘WHITE MARUBOZU’ फॉर्म झाल्यास अपट्रेंड सुरु राहतो. पण DOWN TREND च्या शेवटी फॉर्म झाल्यास ट्रेंड बदलतो. ‘DOWN TREND’ च्या शेवटी BLACK MARUBOZU फॉर्म झाल्यास DOWN ट्रेंड सुरु राहतो आणी अपट्रेंडच्या शेवटी झाल्यास ट्रेंड बदलतो. अशा प्रकारे ट्रेंडबद्दल चे आडाखे या PATTERNवरून मिळू शकतात.
९२१८ चे निफ्टीवर फक्त दर्शन झाले. ९२०० चे शिखर सर झाले. तेथून मार्केट पुन्हा खाली आले. सध्या तरी मार्केट पडण्यासाठी किंवा वाढण्यासाठी १ एप्रिलपर्यंत कोणतेही मोठे कारण दृष्टीपथात नाही. कारण निवडणुका आणी फेडची दरवाढ या दोन्ही घटना होवून गेलेल्या आहेत. आता येऊ घातलेल्या ADVANCE TAXच्या आकड्यांकडे लक्ष द्यावे आणी वार्षिक निकाल डोळ्यासमोर ठेवून शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा निर्णय घ्यावा.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २९६४८ वर तर NSE निर्देशांक ९१६० वर बंद झाले

आठवड्याचे समालोचन – ६ मार्च २०१७ ते १० मार्च २०१७ – उधळा होळीचे रंग शेअरमार्केटच्या संग

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

© Jorge Royan / http://www.royan.com.ar


८ मार्च हा जागतिक महिला दिवस. शेअरमार्केटचा व्यवसाय म्हणजे महिलांसाठी दुग्ध-शर्करा योग म्हणावा लागेल. महिलांच्या सर्व अपेक्षा मार्केट पूर्ण करते. दूरदर्शन आणी संगणक यांच्या सहाय्याने मार्केट करता येते. फायदा आणी तोटा यांचा मेळ स्त्रिया उत्तम घालतात. कोणाचीही आबाळ न होता, कोणाकडेही दुर्लक्ष न होता ज्ञान मनोरंजन आणी पैसा या गोष्टी साध्य होऊ शकतात. कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून माहिती मिळवत असताना इंग्लिश हिंदी गुजराथी अशा भाषांची तोंडओळख होते. अर्थ, कायदा, तंत्र ज्ञान, विज्ञान या क्षेत्रातील संज्ञा तसेच कार्यपद्धती यांच्याशीही परिचय होतो. मी शेअरमार्केट करत असताना गेली अनेक वर्षे अनुभवले आहे. या स्वानुभावावरून मी तुम्हाला खात्रीलायक सांगत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
येत्या १५-१६ मार्चला होणाऱ्या फेडच्या बैठकीत फेड आपले व्याजाचे दर वाढवणार हे फेडच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांवरून स्पष्ट झाले आहे. USAचे अध्यक्ष ट्रम्प यांनी USAचे हित जपण्यासाठी विविध सुधारणांचा भडीमार चालविला आहे. H1B व्हिसासाठी असलेली ‘प्रीमियम प्रोसेसिंग’ सहा महिन्यांसाठी स्थगीत ठेवली आहे. तसेच त्यांनी सहा देशातील नागरिकांना USA मध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे ते देश असे (सुदान, सिरीया, सोमालिया, इराण,येमेन, लिबिया). फार्मा कंपन्यांसाठी नवीन सिस्टीम लागू करणार असून औषधाच्या किमती कमी करू असे जाहीर केले आहे. ओबामाकेअर ही सोशल हेल्थकेअर सिस्टीम रद्द करुन नवी सिस्टीम लागू केली जाईल असे सांगितले.  त्यांच्या या पवित्र्याला प्रतिसाद म्हणून काही आंतरराष्ट्रीय औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या औषधांच्या किमती कमी केल्या तर इतर कंपन्यांनी आपल्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले. USFDA ने WOCKHARDT च्या मॉरटन ग्रोव प्लांटच्या तपासणीनंतर ६ त्रुटी दाखवल्या.

 • भारतातून USA मध्ये निर्यात होणाऱ्या ऑफ रोड टायरवर USA नी ANTI DUMPING ड्युटी लावली आहे.
 • USA सरकार भारतातून आयात होणाऱ्या कार्बन क्वालिटी स्टील प्लेट्स आणि स्टेनलेस स्टील वायर रॉड यावर लावण्यात येणार्या ANTI DUMPING ड्युटीचा रिव्ह्यू करणार आहे.
 • लीबियाने २ बंदरात माल पाठवणे बंद केले. लीबियाने क्रूडचे उत्पादन कमी केले.
 • चीन स्टील आणी कोळसा यांचे उत्पादन कमी करणार आहे. तसेच चीन न्युट्रल मॉनेटरी पॉलिसी स्टान्स घेत आहे कां? कारण चीनने सिस्टीममधून  लिक्विडीटी withdraw करायला सुरुवात केली आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारचा ड्रेजिंग कॉर्पोरेशन मध्ये ७३% स्टेक आहे. सरकार त्यापैकी ५१% स्टेक विकण्याचा विचार करत आहे.
 • CGST आणी IGST कायद्याला GST  कौन्सिलची मंजुरी मिळाली. या कौन्सिलची पुढील बैठक १६ मार्चला आहे. अर्थ मंत्रालय GST कायदा मंजुरीसाठी २५ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल.
 • फ्री LPG कनेक्शन साठी आता आधार कार्ड असणे जरुरीचे आहे.
 • MTNL आणी BSNL च्या मर्जरची बातमी पुन्हा मार्केट मध्ये आली. काही बातम्या मार्केटमध्ये वारंवार येत असतात जशा येतात तशाच हवेतल्या हवेत विरून जातात. काही लोक या बातम्यांचा फायदा घेऊन इंट्राडे  ट्रेड करून फायदा कमावतात तर काही जणांना तोटा होतो. फक्त ज्या वेळी मार्केटमध्ये मंदी असेल तेव्हा कमी भावात हे शेअर गोळा करावेत. ज्यावेळी अशी काही बातमी येईल तेव्हां बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो.
 • सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना १०% स्टेक सेल किंवा १०% ‘BUY BACK’  करायला सांगण्याची शक्यता आहे. ऑईल इंडिया, भेल,, EIL, NBCC या कंपन्यांचा यात समावेश असण्याचा संभव आहे.
 • खाण्याच्या तेलाच्या निर्यातीवरची बंदी उठवली जाणार आहे. यात तिळाचे तेल शेंगदाणा तेल यांचा समावेश आहे. हे तेल ५ किलोच्या PACKAGE मध्ये विकावे लागत होते. आता ही बंधने काढून टाकणार आहेत. याचा रुची सोया या कंपनीला फायदा होईल.
 • ज्या पॉवर उत्पादन करणार्या कंपन्यांचा पॉवर प्लांट तयार आहे आणी पॉवर परचेस अग्रीमेंट झाले आहे पण कोल लिंकेज नाही अशा कंपन्याना कोल ऑकशनमध्ये प्राथमिकता दिली जाईल
 • राजस्थान राज्य सरकारने सिगारेटवरील VAT १५%ने वाढवला. याचा ITC आणी इतर सिगारेट उत्पादकांवर  परिणाम होईल.
 • राजस्थान सरकारने  रिजनल स्तरावर ATF वरील कर २५% वरून १% केला. गुजराथ महाराष्ट्र आणी झारखंड या राज्य सरकारांनी RCS (रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम) रूट योजनेला मान्यता दिली. याचा जेट एअरवेज, इंडिगो आणी स्पाईस जेट या प्रवासी विमानवाहतूक कंपन्याना फायदा होईल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने ३१ मार्चपर्यंत  Rs ५०० आणि Rs १०००च्या रद्द केलेल्या नोटा RBI ने कां स्वीकारू नयेत या संबंधातील याचिका दाखल करून घेतली. या केसची पुढील सुनावणी २१ मार्च रोजी  निश्चित केली आहे.
 • सेबीने कमोडीटी डेरिव्हेटीव ट्रेडिंगला परवानगी दिली. त्यामुळे आता  हेजिंग STRATEGY ठरवता येईल असे रुची सोयाने सांगितले.
 • होळीमुळे रंग लागलेली एकही नोट बँका स्वीकारणार नाहीत असा निर्णय RBI ने आपल्या ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत जाहीर केला.
 • RBI ने FIIS आणी FPI यांना कोटक महिंद्र बँकेत ४९% ते ४२% गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
मे २०१७ पासून IIP आणि WPI नवीन सिरीज चालू होईल. ह्या सिरीजसाठी बेस वर्ष २०११- २०१२ असेल.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • STANDARD लाईफ अबरदिन ASSET MANAGEMENT कंपनी मध्ये विलीन होईल. STANDARD लाईफचा नवीन कंपनीत २/३ हिस्सा असेल.
 • सिपलाने आपला दक्षिण आफ्रिकेमधील हेल्थकेअर कारभार ASCENDIS हेल्थकेअर या कंपनीला Rs १९२ कोटीला विकला.
 • श्री सिमेंट या कंपनीने आपल्या छत्तीसगडमधील सीमेंट प्लांटसाठी कोल इंडियाची ६०००० टन  कोळशाची बोली जिंकली.
 • ग्रासिम मर्जरसाठी शेअर होल्डर्स आणी बँकांची मीटिंग १० एप्रिलला होणार आहे.
 • टाटा स्टील युरोपचे पेन्शन कन्सल्टेशन संपले. नवीन पेन्शन योजना १ एप्रिल २०१७ पासून लागू करणार. टाटा स्टीलने सांगितले की त्यांची युरोपिअन बिझिनेस मर्जरसाठी THYSSENKRUPP या कंपनीबरोबर चालू असलेली बोलणी रद्द होण्याचा संभव आहे.
 • IFCI ने आपले NPA विकून Rs २०० कोटी उभारण्याचे ठरवले आहे. ते खालीलप्रमाणे SD अलुमिनीयम (Rs १४ कोटी) BS LTD (Rs १२२ कोटी,) MVL ( Rs ४४ कोटी ) आणी AT कॉम टेक (Rs २४ कोटी)
 • युनिकेम LAB या कंपनीच्या गाझियाबादयेथील प्लांटमध्ये USFDA केलेल्या निरीक्षणात २ त्रुटी  आढळल्या. या त्रुटींचा बिझिनेसवर फारसा परिणाम होणार नाही असे कंपनीने सांगितले.
 • PNB आपला PNB हौसिंगमधला ७% स्टेक विकून Rs १२०० कोटी उभारणार आहे. PNBने आपले Rs २९५ कोटींचे NPA विकण्याचे ठरवले आहे.
 • टेक महिंद्र ही IT क्षेत्रातील कंपनी CIS सोल्युशन्स या कंपनीला खरेदी करणार आहे.
 • जयप्रकाश पॉवर ४००० MV चे तीन PLANT विकण्यासाठी ब्रूक फिल्ड ASSET MANAGEMENT या कंपनीबरोबर बोलणी करीत आहे.
 • ITC या कंपनीने आपल्या सिगारेटच्या किमती वाढवल्या. या वाढीचा सिगारेटच्या खपावर फारसा परिणाम होणार नाही.
 • USFDA ने DR. रेड्डीज च्या दुआदा प्लांट चे इन्स्पेक्शन करून त्यात १३ त्रुटी दाखवल्या. फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
 • IDBI बँकेला Rs ५००० कोटीची गरज आहे. त्यातील Rs १५०० कोटी केंद्र सरकार देणार असून Rs ३५०० कोटी मात्र बँकेला आपले नॉनकोअर ASSET विकून उभारावी लागेल.
 • रेणुका शुगर STANDARD CHARTERED बँकेला १.६४ कोटी शेअर्स इशु करणार आहे.
 • जबलपूर,पाटण शहापूर हा प्रोजेक्ट दिलीप बिल्डकॉनने वेळेच्या आधी पूर्ण केला.
 • गारे पाल्मा आणी तारा कोल ब्लॉक्ससाठी JSPL ने बोली लावली होती. ही बोली खूप कमी असल्याने सरकारने रद्द केली. JSPL ने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ऑक्शन प्रक्रियेत कोणतीही मध्यस्थी करण्यास नकार दिला.
 • दक्षिण भारतात ज्या पेपर मिल्स आहेत त्यांना पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मशीन बंद करावी लागत आहेत. स्पर्धा कमी  झाल्यामुळे रुचिरा पेपर आणि JK पेपर यांना फायदा होईल.
 • सिंडीकेट बँक GVK पॉवर चे ASSETS विकणार आहे.
 • भारत फायनांसीयल इनक्ल्यूजनचा शेअर चांगलाच गाजत आहे. इंडस इंड बँक आणी कोटक महिंद्र बँक ही कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे अशी बातमी वारंवार येत आहे. कंपनीने या बातम्यांचा इन्कार केला आहे. अशावेळी तुम्ही हा शेअर खरेदी करून किंवा शॉर्ट करून डे ट्रेड करु  शकता.
 • ‘इंडिया गेट क्लीनोआ’ या ब्रांड नावाने ‘KRBL’ही कंपनी आपला तांदूळ १० मार्चला मार्केटमध्ये आणत आहे.
 • अलेम्बिक फार्माच्या बरोडा युनिटसाठी USFDA ने केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये  ‘NO OBSERVATIONS’ रिमार्क  दिला.
 • ACC, अंबुजा ,ULTRATECH यांनी दिल्ली NCR रिजनसाठी प्रती गोणी Rs १६ ते Rs २० किमत वाढवली.

कॉर्पोरेट एक्शन

 • NMDC ने Rs ४.१५ प्रती शेअर, कोल इंडियाने Rs १८.७५ प्रती शेअर, कॅडिला हेल्थकेअरने Rs ३.२० प्रती शेअर. हिरोमोटो कॉर्प या कंपनीने Rs ५५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • GAIL ९/०३/२०१७ रोजी एक्स बोनस झाला. एक्स बोनस किंमत Rs 374 झाली.
 • जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट हे शेअर वाढू लागले. कां वाढू लागले असतील अचानक ? दिल्ली राज्य सरकारने विमान इंधनावरील कर २५% वरून १% कमी केला. पण ही अर्धीच बातमी होती. ही कपात फक्त उत्तरपूर्वेला जाणार्या उड्डाणासाठीच होती. त्यासरशी या शेअर्समधील वाढ कमी होऊ लागली.
 • US $ निर्देशांक वाढतो आहे. हा निर्देशांक जेव्हा १०२ च्या जवळपास जातो तेव्हा मार्केटमध्ये मंदी येते. सेन्सेक्स आणी निफ्टी या निर्देशांकात WEAKNESS दिसत नाही. पण शेअरमध्ये WEAKNESS दिसतो. मार्केट पडेल की वाढेल याचा स्पष्ट अंदाज येत नाही. जे शेअर पडत आहेत त्यात VOLUME कमी आहे आणी जे शेअर्स वाढत आहेत त्यात VOLUME  खूप आहे. महत्वाच्या घटना पुढे येऊ घातल्या आहेत. उदा :- सहा राज्यातील निवडणुकांचे निकाल, फेडची मीटिंग…

या आठवड्यातील IPO

 • या आठवड्यात आलेल्या IPO ना गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ‘MUSIC BROADCAST’ चा IPO ४० पट ओव्हरसबस्क्राइब झाला. त्यात रिटेल कोटा ९.३९ वेळा ओव्हर सबस्क्राइब झाला. QIB कोटा ४० वेळा तर HNI कोटा ११२ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला.
 • AVENUE SUPERMARKET च्या IPO ला पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूकदारांचा विशेषतः रिटेल गुंतवणूकदारांचा छान प्रतिसाद मिळत आहे. हा IPO शेवटी  माहिती मिळाली त्याप्रमाणे ९२ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • गोदरेज अग्रोव्हेट या कंपनीचा IPO आणण्याची जोरदार तयारी सुरु आहे.

मार्केटने काय शिकवले
तुमच्यापैकी बरेचजण तांत्रिक विश्लेषणाविषयी विचारतात म्हणून मी आता जमेल तेव्हा त्याबद्दलहि माहिती देणार आहे आज आपण HAMMER PATTERN बद्दल बोलू. हा तेजीचा कॅण्डलस्टिक PATTERN आहे. मार्केट तेजीत उघडते. काही कारणाने लगेचच खूप पडते. पण मार्केटला सपोर्ट मिळतो आणी मार्केट पुन्हा हळू हळू वाढत जाते आणी उच्च स्तरावर  पोहोचते. अशावेळी ओपन हाय आणी क्लोज साधारण सारखे असतात. हाय आणी क्लोज सारखे असतील तर STRONG फॉर्मेशन  समजले जाते. हाय आणी ओपन सारखे असतील तर PATTERNमध्ये थोडी कमजोरी असते. किंवा हवी तेवढी ताकत नसते. लॉंग लोअर SHADOW याचा अर्थ मार्केटने मागणीची जागा शोधली. किमती आणखी कमी होण्यास अडथळा निर्माण झाला. ओपनिंग किमतीपेक्षा क्लोजिंग किमत जास्त असली तर खूपच बुलीश समजतात. बुधवार तारीख ५ मार्च २९१७ रोजी हा PATTERN फॉर्म झाला. तांत्रिक विश्लेषणाविषयीची अधिक माहिती आपल्याला माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकातून वाचावयास मिळेल.
मार्केटमध्ये येत असलेल्या बातम्या वेगवेगळे रंग उधळत आहेत. त्यानुसार गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचे चित्र रेखाटले जात आहे. त्यातच सहा राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल शनिवार रविवारपर्यंत जाहीर होतील.फेड आपले व्याजदरवाढीचे रंग मिसळणार आहे. या सर्व रंगोत्सवात शेअरमार्केट कसे आणी कोणत्या रंगात सामील होते ते मंगळवारीच स्पष्ट होईल. बातम्यांच्या रंगोत्सवात सामील होते की ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असे म्हणत अलिप्त राहते ते पहावे लागेल.
मार्केट काय रंग उधळेल ते उधळेल पण या होलीकोत्स्वात आपल्या आयुष्यात, संसारात आनंदाच्या उत्साहाच्या लाखो छटा उधळोत ही शुभेच्छा आणी ईश्वरचरणी प्रार्थना.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८९४६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८९३४ वर बंद झाला.
 

आठवड्याचे समालोचन – २७ फेब्रुवारी २०१७ ते ३ मार्च २०१७ – D मार्ट बाळाचे पाय शेअरमार्केटच्या पाळण्यात

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
cropped-bhagyashree-phatak-1-2या आठवड्याच्या मार्केटचे वर्णन थकलेले मार्केट असे करावे लागेल. गेल्या वेळच्या ब्लॉगमध्ये मी अशाच पद्धतीचा PATTERN तयार झाला आहे असे सांगितले होते. नेमके तसेच आढळले. RALLY मधली ताकत कमी झाली. नव्या येऊ घातलेल्या D–मार्ट च्या IPO ने सर्वांचे लक्ष वेधले. कमी अवधीत थोडे पैसे मिळतील अशी आशा वाटल्याने काही लोकांनी प्रॉफीट बुकिंग करून पैशाची जमवाजमव केली असावी असे दिसते.
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनने प्रदुषणाच्या कारणासाठी अल्युमिनियम, स्टीलचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले आहे.
 • USA मध्ये बेकारीसाठी अर्जांचे प्रमाण ४४ वर्षातील किमान आहे (२,२३,०००) आणी बेकारीचे प्रमाण ४.८% आहे. फेडने मार्च महिन्याच्या बैठकीत रेट वाढवण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे.
 • USAचे अध्यक्ष ट्रम्प यांनी USA च्या कॉंग्रेसपुढे केलेले भाषण बरेचसे समतोल आणी USA या देशाच्या हिताविषयी जास्त काळजी करणारे होते.

सरकारी अन्नौंसमेंट

 • SAIL च्या झारखंडमधील तासरा प्रोजेक्टला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • सरकारने सोन्यामध्ये SPOT EXCHANGE सुरु केले आहे. या EXCHANGEवर घेतलेले सोने MCX वर किंवा जवाहिऱ्याकडून घेतलेल्या सोन्यापेक्षा स्वस्त पडेल. या EXCHANGEवर होणाऱ्या सौदयांसाठी सेवा कर आणी टर्नओव्हर कर लागेल. मात्र CTC आणी STAMP ड्युटी लागणार नाही. हे सौदे १०० ग्राम आणी १ किलो सोन्यासाठी होतील.
 • IOC(इंडिअन ऑईल कॉर्पोरेशन) ला त्यांच्या पारादीप रीफायनरीसाठी मिळणारी करातील सवलत रद्द केली. त्यामुळे IOC ला Rs २००० कोटींचा फटका बसेल.
 • सरकारने नवीन टेलिकॉम धोरण ठरवण्यासाठी कमिटी नेमली. ही कमिटी सरकारबरोबर रेव्हेन्यू शेअरिंग रद्द करण्याची शिफारस करण्याची शक्यता पडताळून पाहणार आहे. ही कमिटी 5 G लायसेन्ससाठी आराखडा तयार करील.
 • सरकारने फोम केमिकल्सवर US $ १३५.४० प्रती टन एवढी ANTI DUMPING ड्युटी लावली. याचा फायदा नोसिल कंपनीला होईल.
 • सरकार प्रथम GIC आणी न्यू इंडिया ASSURANCE यांचे IPO आणील. इतर इन्शुरन्स कंपन्यांचे IPO नंतर आणले जातील.
 • १ जुलै २०१७ पासून GST लागु करण्यासाठी सर्व राज्यसरकारांनी अनुमती दिली. GST चा कमाल दर ४०% असेल.

SEBI RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने सर्व औदयोगीक युनिट्सना इफ्लुएनट ट्रीटमेंट प्लांट तीन महिन्यात बसविण्यास सांगितले आहे. या निर्णयाचा फायदा व्हा टेक वाबाग, इऑन EXCHANGE, व्होल्टास या कंपन्यांना होईल.
 • संसदेच्या पब्लिक अकौंट कमिटीने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या NPA अकौंटविषयी आपली चौकशी चालू केली आहे. त्यांनी आतापर्यंत IOB, इंडिअन बँक, अलाहाबाद बँक आणी UCO बँकेच्या CEO चे representation ऐकले आहे. PAC च्या सदस्यांनी सर्व NPA अकौंटचे फोरेन्सिक ऑडीट करावे अशी मागणी केली आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • डीमॉनेटायझेशनचा परिणाम असूनही GDP मध्ये ७% चा वाढ झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सूर्या रोशनी या कंपनीने हिंदुपूरमध्ये नवीन स्टील प्लांट सुरु केला.
 • मोईलने आपल्या सर्व उत्पादनाच्या किमती १५% ते २५% कमी केल्या.
 • PANACEA बायोटेकचे गुरूग्राम येथील २२४ खाटांचे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणा हृदयालय Rs १८० ते १९० कोटीना विकत घेईल. PANACEA बायोटेक कंपनीला Rs ९३० कोटीचे कर्ज आहे. ही रकम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल.
 • DLF आपल्या रेंटल बिझिनेस मधील ४०% हिस्सा सिंगापोर GIC ला Rs १४००० कोटींना विकत आहेत.
 • EDELWEISS त्यांचा कमोडीटी कारभार विकणार आहेत. त्यांचा दोन प्रकारचा बिझिनेस आहे. ही कंपनी नंतर बँकिंग लायसेन्स साठी अर्ज करणार आहे.
 • मारुती त्यांच्या रिट्झ या हेच BACK गाडीची विक्री राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये बंद करणार आहे.
 • ONGC ही कंपनी HPCL ह्या OMC कंपनीला Rs ४४००० कोटींना खरेदी करणार आहे. यातील Rs २९००० सरकारी स्टेक तर Rs १५००० कोटी नॉन सरकारी स्टेक खरेदी करण्यासाठी वापरेल.
 • M & M च्या विक्रीमध्ये TRACTOR वगळता बाकीच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली. एस्कॉर्टसच्या विक्रीत चांगली वाढ झाली.
 • आयडिया मधील ३.६३% स्टेक PROVIDENCEने विकला. १२ कोटी शेअर्सचा सौदा झाला.
 • कॅडिला हेल्थकेअर या कंपनीच्या बद्दी प्लांट च्या USFDA ने केलेल्या तपासाबीत तीन निरीक्षणे आढळली.
 • स्टेट बँक लीडर असलेल्या बँकांच्या कॅन्सोर्शियमने एस्सार स्टीलच्या Rs ४४००० कोटी कर्जाचे रिस्टक्चरिंग पुढे ढकलले.
 • टाटा टेली आणी एन टी टी डोकोमो या कंपन्यातील US$ १.१७ बिलियन (Rs ७२५० कोटीं) चा वाद मिटवण्यासाठी दोन्ही कंपन्या दिल्ली हाय कोर्टात संयुक्त अर्ज करतील. या प्रमाणे टाटा ग्रूप DOKOMO या जपानी कंपनीला त्यांच्या २६% स्टेकसाठी नुकसानभरपाई म्हणून ही रकम देईल. या रकमेचे दोन भाग करून US $ ७९ कोटी भारतात पुन्हा गुंतवणूक म्हणून यावेत अशी योजना RBI ला सदर केली जाणार आहे.
 • ENIL या करमणूक क्षेत्रातील कंपनीने आपल्या रेडियो मिरची ब्रांड साठी रेडियोच्या २१ फ्रिक्वेन्सीज खरेदी केल्या. यामुळे आता २०१८ पर्यत रेडियो मिरची ६४ शहरात उपलब्ध होईल.
 • टाटा सन्स ग्रूप कंपन्यांमधील आपला स्टेक वाढवणार आहे. यासाठी टाटा ग्रूप Rs ६००० कोटींची गुंतवणूक करेल. यामुळे ग्रूपस्ट्रक्चर मध्ये सुलभता येईल आणी ग्रूपवर असलेले कर्ज कमी होईल.
 • ऑरोबिंदो फार्मा, DR REDDY’s LAB, आलेम्बिक फार्मा या कंपन्यांच्या प्रत्येकी एक औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
 • NBCC ला Rs ११०० कोटीची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • GAIL च्या बोनस इशुची ११ मार्च ही रेकोर्ड डेट आहे.
 • सन टी व्ही च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची १० मार्च रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी मीटिंग होणार आहे.
 • नाल्कोने प्रती शेअर Rs २.८० अंतरिम लाभांश जाहीर केला.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • म्युझिक ब्रॉडकॉस्ट (रेडियो सिटी चे मालक आणी जागरण प्रकाशनची सबसिडीअरी)आपला IPO ६ मार्च ते ८ मार्च या काळात आणीत आहेत याचा प्राईस BAND Rs ३२४ ते Rs ३३३ आहे मिनिमम लॉट ४५ शेअरचा असेल.
 • अव्हेन्यू सुपरमार्केट (D मार्ट या सुपर चेनचे मालक) आपला IPO 8 मार्च ते १० मार्च या काळात आणून Rs १८७० कोटी उभारेल. या IPO चा प्राईस BAND २९५ ते Rs २९९ आहे.  मिनिमम लॉट ५० शेअर्सचा आहे. या कंपनीची ४५ शहरात ११८ स्टोर्स आहेत. ही स्टोर्स मुख्यतः फूड आयटेम्स, होम आणी पर्सनल केअर आयटेम्स मध्ये बिझिनेस करतात. IPO च्या प्रोसीड्स मधील ५८% हिस्सा कर्ज परतफेडीसाठी तर बाकीचा स्टोर्सची संख्या वाढवण्यासाठी केला जाईल. या कंपनीने गेल्या पांच वर्षात ५५% ग्रोथ कली आहे. या कंपनीच्या IPO चा परिणाम म्हणून यासारख्या फ्युचर रिटेल, V MART, शॉपर्स स्टोप, स्पेन्सर रिटेल A B fashion रिटेल आणी ट्रेट  या कंपन्या चर्चेत राहिल्या आणी या कंपन्यांच्या शेअर्स मधील VOLUMEही वाढले.
 • हिंदाल्को इंडस्ट्रीज या कंपनीने Rs ३३०० कोटींचा QIP (QUALIFIED INSTITUTION PLACEMENT) इशू प्रती शेअर फ्लोअर प्राईस Rs १८४.५० वर आणला. या QIP ला चांगला प्रतिसाद मिळाला.
 • इंडस इंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्लुजन यांच्यात विलय होण्यासाठीची बोलणी फिसकटली. किमतीच्या संबंधात एकमत झाले नाही.

मार्केटने काय शिकवले
सध्या IPO ची धामधूम सुरु आहे. त्यामुळे IPO आणणाऱ्या कंपन्यांची माहिती वर्तमानपत्रात येत आहे टी व्ही वरच्या वाहिन्यांवरून सांगितली जात आहे. IPO म्हणजे काय हे मी माझ्या पुस्तकातून सविस्तर सांगितले आहे एक नमुना फॉर्मही दिला आहे तो कसा भरावा हेही सांगितले आहे. तुम्ही सुद्धा ट्रेडिंग आणि DEMAT अकौंट उघडला नसल्यास उघडा. IPO साठी असलेला अर्ज भरा. हल्ली सेबीच्या कृपेने व्याज बुडत नाही रकम परत मिळण्यासाठी वाट पहावी लागत नाही, जर लिस्टिंग चांगले झाले तर आठवड्यात चांगली कमाई होऊ शकते.
धावून धावून थकलेल्या मार्केटला सावरण्याचा प्रयत्न रिलायंस इंडस्ट्रीज करीत होती. त्यामुळे मार्केट मोठ्या प्रमाणावर पडले नाही. पण आता या मार्केटला मजबूत ट्रिगरची, बातमीची गरज आहे. किंवा यावेळचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले पाहिजेत. जसे तुम्हाला ५०% मार्क पडत असतील तर ६०% थोड्या प्रयत्नाने पडू शकतात. पण ९२% मार्क पडत असतील तर त्यात २% वाढ होणे कठीण जाते. तसेच आहे काहीसे हे! निफ्टीतील बरेचसे शेअर्स ५२ आठवड्याच्या कमाल स्तरावर आहेत त्यामुळेच कोणते शेअर्स योग्य किमतीला आहेत पण दुर्लक्षित आहेत त्या शेअर्समध्ये RALLY आढळते. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहणेच योग्य.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८८३२ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८९७ वर बंद झाले.
हे झालं या आठवडयाच समालोचन. मार्केटबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही माझं पुस्तक विकत घेवू शकता किंवा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असल्यास classes join करू शकता