आठवड्याचे समालोचन – २७ फेब्रुवारी २०१७ ते ३ मार्च २०१७ – D मार्ट बाळाचे पाय शेअरमार्केटच्या पाळण्यात

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
cropped-bhagyashree-phatak-1-2या आठवड्याच्या मार्केटचे वर्णन थकलेले मार्केट असे करावे लागेल. गेल्या वेळच्या ब्लॉगमध्ये मी अशाच पद्धतीचा PATTERN तयार झाला आहे असे सांगितले होते. नेमके तसेच आढळले. RALLY मधली ताकत कमी झाली. नव्या येऊ घातलेल्या D–मार्ट च्या IPO ने सर्वांचे लक्ष वेधले. कमी अवधीत थोडे पैसे मिळतील अशी आशा वाटल्याने काही लोकांनी प्रॉफीट बुकिंग करून पैशाची जमवाजमव केली असावी असे दिसते.
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनने प्रदुषणाच्या कारणासाठी अल्युमिनियम, स्टीलचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले आहे.
 • USA मध्ये बेकारीसाठी अर्जांचे प्रमाण ४४ वर्षातील किमान आहे (२,२३,०००) आणी बेकारीचे प्रमाण ४.८% आहे. फेडने मार्च महिन्याच्या बैठकीत रेट वाढवण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे.
 • USAचे अध्यक्ष ट्रम्प यांनी USA च्या कॉंग्रेसपुढे केलेले भाषण बरेचसे समतोल आणी USA या देशाच्या हिताविषयी जास्त काळजी करणारे होते.

सरकारी अन्नौंसमेंट

 • SAIL च्या झारखंडमधील तासरा प्रोजेक्टला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • सरकारने सोन्यामध्ये SPOT EXCHANGE सुरु केले आहे. या EXCHANGEवर घेतलेले सोने MCX वर किंवा जवाहिऱ्याकडून घेतलेल्या सोन्यापेक्षा स्वस्त पडेल. या EXCHANGEवर होणाऱ्या सौदयांसाठी सेवा कर आणी टर्नओव्हर कर लागेल. मात्र CTC आणी STAMP ड्युटी लागणार नाही. हे सौदे १०० ग्राम आणी १ किलो सोन्यासाठी होतील.
 • IOC(इंडिअन ऑईल कॉर्पोरेशन) ला त्यांच्या पारादीप रीफायनरीसाठी मिळणारी करातील सवलत रद्द केली. त्यामुळे IOC ला Rs २००० कोटींचा फटका बसेल.
 • सरकारने नवीन टेलिकॉम धोरण ठरवण्यासाठी कमिटी नेमली. ही कमिटी सरकारबरोबर रेव्हेन्यू शेअरिंग रद्द करण्याची शिफारस करण्याची शक्यता पडताळून पाहणार आहे. ही कमिटी 5 G लायसेन्ससाठी आराखडा तयार करील.
 • सरकारने फोम केमिकल्सवर US $ १३५.४० प्रती टन एवढी ANTI DUMPING ड्युटी लावली. याचा फायदा नोसिल कंपनीला होईल.
 • सरकार प्रथम GIC आणी न्यू इंडिया ASSURANCE यांचे IPO आणील. इतर इन्शुरन्स कंपन्यांचे IPO नंतर आणले जातील.
 • १ जुलै २०१७ पासून GST लागु करण्यासाठी सर्व राज्यसरकारांनी अनुमती दिली. GST चा कमाल दर ४०% असेल.

SEBI RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने सर्व औदयोगीक युनिट्सना इफ्लुएनट ट्रीटमेंट प्लांट तीन महिन्यात बसविण्यास सांगितले आहे. या निर्णयाचा फायदा व्हा टेक वाबाग, इऑन EXCHANGE, व्होल्टास या कंपन्यांना होईल.
 • संसदेच्या पब्लिक अकौंट कमिटीने सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या NPA अकौंटविषयी आपली चौकशी चालू केली आहे. त्यांनी आतापर्यंत IOB, इंडिअन बँक, अलाहाबाद बँक आणी UCO बँकेच्या CEO चे representation ऐकले आहे. PAC च्या सदस्यांनी सर्व NPA अकौंटचे फोरेन्सिक ऑडीट करावे अशी मागणी केली आहे.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • डीमॉनेटायझेशनचा परिणाम असूनही GDP मध्ये ७% चा वाढ झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • सूर्या रोशनी या कंपनीने हिंदुपूरमध्ये नवीन स्टील प्लांट सुरु केला.
 • मोईलने आपल्या सर्व उत्पादनाच्या किमती १५% ते २५% कमी केल्या.
 • PANACEA बायोटेकचे गुरूग्राम येथील २२४ खाटांचे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नारायणा हृदयालय Rs १८० ते १९० कोटीना विकत घेईल. PANACEA बायोटेक कंपनीला Rs ९३० कोटीचे कर्ज आहे. ही रकम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल.
 • DLF आपल्या रेंटल बिझिनेस मधील ४०% हिस्सा सिंगापोर GIC ला Rs १४००० कोटींना विकत आहेत.
 • EDELWEISS त्यांचा कमोडीटी कारभार विकणार आहेत. त्यांचा दोन प्रकारचा बिझिनेस आहे. ही कंपनी नंतर बँकिंग लायसेन्स साठी अर्ज करणार आहे.
 • मारुती त्यांच्या रिट्झ या हेच BACK गाडीची विक्री राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये बंद करणार आहे.
 • ONGC ही कंपनी HPCL ह्या OMC कंपनीला Rs ४४००० कोटींना खरेदी करणार आहे. यातील Rs २९००० सरकारी स्टेक तर Rs १५००० कोटी नॉन सरकारी स्टेक खरेदी करण्यासाठी वापरेल.
 • M & M च्या विक्रीमध्ये TRACTOR वगळता बाकीच्या उत्पादनांच्या विक्रीत घट झाली. एस्कॉर्टसच्या विक्रीत चांगली वाढ झाली.
 • आयडिया मधील ३.६३% स्टेक PROVIDENCEने विकला. १२ कोटी शेअर्सचा सौदा झाला.
 • कॅडिला हेल्थकेअर या कंपनीच्या बद्दी प्लांट च्या USFDA ने केलेल्या तपासाबीत तीन निरीक्षणे आढळली.
 • स्टेट बँक लीडर असलेल्या बँकांच्या कॅन्सोर्शियमने एस्सार स्टीलच्या Rs ४४००० कोटी कर्जाचे रिस्टक्चरिंग पुढे ढकलले.
 • टाटा टेली आणी एन टी टी डोकोमो या कंपन्यातील US$ १.१७ बिलियन (Rs ७२५० कोटीं) चा वाद मिटवण्यासाठी दोन्ही कंपन्या दिल्ली हाय कोर्टात संयुक्त अर्ज करतील. या प्रमाणे टाटा ग्रूप DOKOMO या जपानी कंपनीला त्यांच्या २६% स्टेकसाठी नुकसानभरपाई म्हणून ही रकम देईल. या रकमेचे दोन भाग करून US $ ७९ कोटी भारतात पुन्हा गुंतवणूक म्हणून यावेत अशी योजना RBI ला सदर केली जाणार आहे.
 • ENIL या करमणूक क्षेत्रातील कंपनीने आपल्या रेडियो मिरची ब्रांड साठी रेडियोच्या २१ फ्रिक्वेन्सीज खरेदी केल्या. यामुळे आता २०१८ पर्यत रेडियो मिरची ६४ शहरात उपलब्ध होईल.
 • टाटा सन्स ग्रूप कंपन्यांमधील आपला स्टेक वाढवणार आहे. यासाठी टाटा ग्रूप Rs ६००० कोटींची गुंतवणूक करेल. यामुळे ग्रूपस्ट्रक्चर मध्ये सुलभता येईल आणी ग्रूपवर असलेले कर्ज कमी होईल.
 • ऑरोबिंदो फार्मा, DR REDDY’s LAB, आलेम्बिक फार्मा या कंपन्यांच्या प्रत्येकी एक औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
 • NBCC ला Rs ११०० कोटीची ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • GAIL च्या बोनस इशुची ११ मार्च ही रेकोर्ड डेट आहे.
 • सन टी व्ही च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची १० मार्च रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी मीटिंग होणार आहे.
 • नाल्कोने प्रती शेअर Rs २.८० अंतरिम लाभांश जाहीर केला.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • म्युझिक ब्रॉडकॉस्ट (रेडियो सिटी चे मालक आणी जागरण प्रकाशनची सबसिडीअरी)आपला IPO ६ मार्च ते ८ मार्च या काळात आणीत आहेत याचा प्राईस BAND Rs ३२४ ते Rs ३३३ आहे मिनिमम लॉट ४५ शेअरचा असेल.
 • अव्हेन्यू सुपरमार्केट (D मार्ट या सुपर चेनचे मालक) आपला IPO 8 मार्च ते १० मार्च या काळात आणून Rs १८७० कोटी उभारेल. या IPO चा प्राईस BAND २९५ ते Rs २९९ आहे.  मिनिमम लॉट ५० शेअर्सचा आहे. या कंपनीची ४५ शहरात ११८ स्टोर्स आहेत. ही स्टोर्स मुख्यतः फूड आयटेम्स, होम आणी पर्सनल केअर आयटेम्स मध्ये बिझिनेस करतात. IPO च्या प्रोसीड्स मधील ५८% हिस्सा कर्ज परतफेडीसाठी तर बाकीचा स्टोर्सची संख्या वाढवण्यासाठी केला जाईल. या कंपनीने गेल्या पांच वर्षात ५५% ग्रोथ कली आहे. या कंपनीच्या IPO चा परिणाम म्हणून यासारख्या फ्युचर रिटेल, V MART, शॉपर्स स्टोप, स्पेन्सर रिटेल A B fashion रिटेल आणी ट्रेट  या कंपन्या चर्चेत राहिल्या आणी या कंपन्यांच्या शेअर्स मधील VOLUMEही वाढले.
 • हिंदाल्को इंडस्ट्रीज या कंपनीने Rs ३३०० कोटींचा QIP (QUALIFIED INSTITUTION PLACEMENT) इशू प्रती शेअर फ्लोअर प्राईस Rs १८४.५० वर आणला. या QIP ला चांगला प्रतिसाद मिळाला.
 • इंडस इंड बँक आणी भारत फायनांसियल इन्क्लुजन यांच्यात विलय होण्यासाठीची बोलणी फिसकटली. किमतीच्या संबंधात एकमत झाले नाही.

मार्केटने काय शिकवले
सध्या IPO ची धामधूम सुरु आहे. त्यामुळे IPO आणणाऱ्या कंपन्यांची माहिती वर्तमानपत्रात येत आहे टी व्ही वरच्या वाहिन्यांवरून सांगितली जात आहे. IPO म्हणजे काय हे मी माझ्या पुस्तकातून सविस्तर सांगितले आहे एक नमुना फॉर्मही दिला आहे तो कसा भरावा हेही सांगितले आहे. तुम्ही सुद्धा ट्रेडिंग आणि DEMAT अकौंट उघडला नसल्यास उघडा. IPO साठी असलेला अर्ज भरा. हल्ली सेबीच्या कृपेने व्याज बुडत नाही रकम परत मिळण्यासाठी वाट पहावी लागत नाही, जर लिस्टिंग चांगले झाले तर आठवड्यात चांगली कमाई होऊ शकते.
धावून धावून थकलेल्या मार्केटला सावरण्याचा प्रयत्न रिलायंस इंडस्ट्रीज करीत होती. त्यामुळे मार्केट मोठ्या प्रमाणावर पडले नाही. पण आता या मार्केटला मजबूत ट्रिगरची, बातमीची गरज आहे. किंवा यावेळचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले पाहिजेत. जसे तुम्हाला ५०% मार्क पडत असतील तर ६०% थोड्या प्रयत्नाने पडू शकतात. पण ९२% मार्क पडत असतील तर त्यात २% वाढ होणे कठीण जाते. तसेच आहे काहीसे हे! निफ्टीतील बरेचसे शेअर्स ५२ आठवड्याच्या कमाल स्तरावर आहेत त्यामुळेच कोणते शेअर्स योग्य किमतीला आहेत पण दुर्लक्षित आहेत त्या शेअर्समध्ये RALLY आढळते. त्यामुळे योग्य संधीची वाट पाहणेच योग्य.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८८३२ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८८९७ वर बंद झाले.
हे झालं या आठवडयाच समालोचन. मार्केटबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही माझं पुस्तक विकत घेवू शकता किंवा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असल्यास classes join करू शकता
 

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन – २७ फेब्रुवारी २०१७ ते ३ मार्च २०१७ – D मार्ट बाळाचे पाय शेअरमार्केटच्या पाळण्यात

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – ६ मार्च २०१७ ते १० मार्च २०१७ – उधळा होळीचे रंग शेअरमार्केटच्या संग | Stock Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.