आठवड्याचे समालोचन – ६ मार्च २०१७ ते १० मार्च २०१७ – उधळा होळीचे रंग शेअरमार्केटच्या संग

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

© Jorge Royan / http://www.royan.com.ar


८ मार्च हा जागतिक महिला दिवस. शेअरमार्केटचा व्यवसाय म्हणजे महिलांसाठी दुग्ध-शर्करा योग म्हणावा लागेल. महिलांच्या सर्व अपेक्षा मार्केट पूर्ण करते. दूरदर्शन आणी संगणक यांच्या सहाय्याने मार्केट करता येते. फायदा आणी तोटा यांचा मेळ स्त्रिया उत्तम घालतात. कोणाचीही आबाळ न होता, कोणाकडेही दुर्लक्ष न होता ज्ञान मनोरंजन आणी पैसा या गोष्टी साध्य होऊ शकतात. कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही. दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून माहिती मिळवत असताना इंग्लिश हिंदी गुजराथी अशा भाषांची तोंडओळख होते. अर्थ, कायदा, तंत्र ज्ञान, विज्ञान या क्षेत्रातील संज्ञा तसेच कार्यपद्धती यांच्याशीही परिचय होतो. मी शेअरमार्केट करत असताना गेली अनेक वर्षे अनुभवले आहे. या स्वानुभावावरून मी तुम्हाला खात्रीलायक सांगत आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
येत्या १५-१६ मार्चला होणाऱ्या फेडच्या बैठकीत फेड आपले व्याजाचे दर वाढवणार हे फेडच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांवरून स्पष्ट झाले आहे. USAचे अध्यक्ष ट्रम्प यांनी USAचे हित जपण्यासाठी विविध सुधारणांचा भडीमार चालविला आहे. H1B व्हिसासाठी असलेली ‘प्रीमियम प्रोसेसिंग’ सहा महिन्यांसाठी स्थगीत ठेवली आहे. तसेच त्यांनी सहा देशातील नागरिकांना USA मध्ये प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे ते देश असे (सुदान, सिरीया, सोमालिया, इराण,येमेन, लिबिया). फार्मा कंपन्यांसाठी नवीन सिस्टीम लागू करणार असून औषधाच्या किमती कमी करू असे जाहीर केले आहे. ओबामाकेअर ही सोशल हेल्थकेअर सिस्टीम रद्द करुन नवी सिस्टीम लागू केली जाईल असे सांगितले.  त्यांच्या या पवित्र्याला प्रतिसाद म्हणून काही आंतरराष्ट्रीय औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या औषधांच्या किमती कमी केल्या तर इतर कंपन्यांनी आपल्या किमती ठरवण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले. USFDA ने WOCKHARDT च्या मॉरटन ग्रोव प्लांटच्या तपासणीनंतर ६ त्रुटी दाखवल्या.

 • भारतातून USA मध्ये निर्यात होणाऱ्या ऑफ रोड टायरवर USA नी ANTI DUMPING ड्युटी लावली आहे.
 • USA सरकार भारतातून आयात होणाऱ्या कार्बन क्वालिटी स्टील प्लेट्स आणि स्टेनलेस स्टील वायर रॉड यावर लावण्यात येणार्या ANTI DUMPING ड्युटीचा रिव्ह्यू करणार आहे.
 • लीबियाने २ बंदरात माल पाठवणे बंद केले. लीबियाने क्रूडचे उत्पादन कमी केले.
 • चीन स्टील आणी कोळसा यांचे उत्पादन कमी करणार आहे. तसेच चीन न्युट्रल मॉनेटरी पॉलिसी स्टान्स घेत आहे कां? कारण चीनने सिस्टीममधून  लिक्विडीटी withdraw करायला सुरुवात केली आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकारचा ड्रेजिंग कॉर्पोरेशन मध्ये ७३% स्टेक आहे. सरकार त्यापैकी ५१% स्टेक विकण्याचा विचार करत आहे.
 • CGST आणी IGST कायद्याला GST  कौन्सिलची मंजुरी मिळाली. या कौन्सिलची पुढील बैठक १६ मार्चला आहे. अर्थ मंत्रालय GST कायदा मंजुरीसाठी २५ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल.
 • फ्री LPG कनेक्शन साठी आता आधार कार्ड असणे जरुरीचे आहे.
 • MTNL आणी BSNL च्या मर्जरची बातमी पुन्हा मार्केट मध्ये आली. काही बातम्या मार्केटमध्ये वारंवार येत असतात जशा येतात तशाच हवेतल्या हवेत विरून जातात. काही लोक या बातम्यांचा फायदा घेऊन इंट्राडे  ट्रेड करून फायदा कमावतात तर काही जणांना तोटा होतो. फक्त ज्या वेळी मार्केटमध्ये मंदी असेल तेव्हा कमी भावात हे शेअर गोळा करावेत. ज्यावेळी अशी काही बातमी येईल तेव्हां बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो.
 • सरकार लवकरच सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांना १०% स्टेक सेल किंवा १०% ‘BUY BACK’  करायला सांगण्याची शक्यता आहे. ऑईल इंडिया, भेल,, EIL, NBCC या कंपन्यांचा यात समावेश असण्याचा संभव आहे.
 • खाण्याच्या तेलाच्या निर्यातीवरची बंदी उठवली जाणार आहे. यात तिळाचे तेल शेंगदाणा तेल यांचा समावेश आहे. हे तेल ५ किलोच्या PACKAGE मध्ये विकावे लागत होते. आता ही बंधने काढून टाकणार आहेत. याचा रुची सोया या कंपनीला फायदा होईल.
 • ज्या पॉवर उत्पादन करणार्या कंपन्यांचा पॉवर प्लांट तयार आहे आणी पॉवर परचेस अग्रीमेंट झाले आहे पण कोल लिंकेज नाही अशा कंपन्याना कोल ऑकशनमध्ये प्राथमिकता दिली जाईल
 • राजस्थान राज्य सरकारने सिगारेटवरील VAT १५%ने वाढवला. याचा ITC आणी इतर सिगारेट उत्पादकांवर  परिणाम होईल.
 • राजस्थान सरकारने  रिजनल स्तरावर ATF वरील कर २५% वरून १% केला. गुजराथ महाराष्ट्र आणी झारखंड या राज्य सरकारांनी RCS (रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम) रूट योजनेला मान्यता दिली. याचा जेट एअरवेज, इंडिगो आणी स्पाईस जेट या प्रवासी विमानवाहतूक कंपन्याना फायदा होईल

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने ३१ मार्चपर्यंत  Rs ५०० आणि Rs १०००च्या रद्द केलेल्या नोटा RBI ने कां स्वीकारू नयेत या संबंधातील याचिका दाखल करून घेतली. या केसची पुढील सुनावणी २१ मार्च रोजी  निश्चित केली आहे.
 • सेबीने कमोडीटी डेरिव्हेटीव ट्रेडिंगला परवानगी दिली. त्यामुळे आता  हेजिंग STRATEGY ठरवता येईल असे रुची सोयाने सांगितले.
 • होळीमुळे रंग लागलेली एकही नोट बँका स्वीकारणार नाहीत असा निर्णय RBI ने आपल्या ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत जाहीर केला.
 • RBI ने FIIS आणी FPI यांना कोटक महिंद्र बँकेत ४९% ते ४२% गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
मे २०१७ पासून IIP आणि WPI नवीन सिरीज चालू होईल. ह्या सिरीजसाठी बेस वर्ष २०११- २०१२ असेल.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • STANDARD लाईफ अबरदिन ASSET MANAGEMENT कंपनी मध्ये विलीन होईल. STANDARD लाईफचा नवीन कंपनीत २/३ हिस्सा असेल.
 • सिपलाने आपला दक्षिण आफ्रिकेमधील हेल्थकेअर कारभार ASCENDIS हेल्थकेअर या कंपनीला Rs १९२ कोटीला विकला.
 • श्री सिमेंट या कंपनीने आपल्या छत्तीसगडमधील सीमेंट प्लांटसाठी कोल इंडियाची ६०००० टन  कोळशाची बोली जिंकली.
 • ग्रासिम मर्जरसाठी शेअर होल्डर्स आणी बँकांची मीटिंग १० एप्रिलला होणार आहे.
 • टाटा स्टील युरोपचे पेन्शन कन्सल्टेशन संपले. नवीन पेन्शन योजना १ एप्रिल २०१७ पासून लागू करणार. टाटा स्टीलने सांगितले की त्यांची युरोपिअन बिझिनेस मर्जरसाठी THYSSENKRUPP या कंपनीबरोबर चालू असलेली बोलणी रद्द होण्याचा संभव आहे.
 • IFCI ने आपले NPA विकून Rs २०० कोटी उभारण्याचे ठरवले आहे. ते खालीलप्रमाणे SD अलुमिनीयम (Rs १४ कोटी) BS LTD (Rs १२२ कोटी,) MVL ( Rs ४४ कोटी ) आणी AT कॉम टेक (Rs २४ कोटी)
 • युनिकेम LAB या कंपनीच्या गाझियाबादयेथील प्लांटमध्ये USFDA केलेल्या निरीक्षणात २ त्रुटी  आढळल्या. या त्रुटींचा बिझिनेसवर फारसा परिणाम होणार नाही असे कंपनीने सांगितले.
 • PNB आपला PNB हौसिंगमधला ७% स्टेक विकून Rs १२०० कोटी उभारणार आहे. PNBने आपले Rs २९५ कोटींचे NPA विकण्याचे ठरवले आहे.
 • टेक महिंद्र ही IT क्षेत्रातील कंपनी CIS सोल्युशन्स या कंपनीला खरेदी करणार आहे.
 • जयप्रकाश पॉवर ४००० MV चे तीन PLANT विकण्यासाठी ब्रूक फिल्ड ASSET MANAGEMENT या कंपनीबरोबर बोलणी करीत आहे.
 • ITC या कंपनीने आपल्या सिगारेटच्या किमती वाढवल्या. या वाढीचा सिगारेटच्या खपावर फारसा परिणाम होणार नाही.
 • USFDA ने DR. रेड्डीज च्या दुआदा प्लांट चे इन्स्पेक्शन करून त्यात १३ त्रुटी दाखवल्या. फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
 • IDBI बँकेला Rs ५००० कोटीची गरज आहे. त्यातील Rs १५०० कोटी केंद्र सरकार देणार असून Rs ३५०० कोटी मात्र बँकेला आपले नॉनकोअर ASSET विकून उभारावी लागेल.
 • रेणुका शुगर STANDARD CHARTERED बँकेला १.६४ कोटी शेअर्स इशु करणार आहे.
 • जबलपूर,पाटण शहापूर हा प्रोजेक्ट दिलीप बिल्डकॉनने वेळेच्या आधी पूर्ण केला.
 • गारे पाल्मा आणी तारा कोल ब्लॉक्ससाठी JSPL ने बोली लावली होती. ही बोली खूप कमी असल्याने सरकारने रद्द केली. JSPL ने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ऑक्शन प्रक्रियेत कोणतीही मध्यस्थी करण्यास नकार दिला.
 • दक्षिण भारतात ज्या पेपर मिल्स आहेत त्यांना पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मशीन बंद करावी लागत आहेत. स्पर्धा कमी  झाल्यामुळे रुचिरा पेपर आणि JK पेपर यांना फायदा होईल.
 • सिंडीकेट बँक GVK पॉवर चे ASSETS विकणार आहे.
 • भारत फायनांसीयल इनक्ल्यूजनचा शेअर चांगलाच गाजत आहे. इंडस इंड बँक आणी कोटक महिंद्र बँक ही कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे अशी बातमी वारंवार येत आहे. कंपनीने या बातम्यांचा इन्कार केला आहे. अशावेळी तुम्ही हा शेअर खरेदी करून किंवा शॉर्ट करून डे ट्रेड करु  शकता.
 • ‘इंडिया गेट क्लीनोआ’ या ब्रांड नावाने ‘KRBL’ही कंपनी आपला तांदूळ १० मार्चला मार्केटमध्ये आणत आहे.
 • अलेम्बिक फार्माच्या बरोडा युनिटसाठी USFDA ने केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये  ‘NO OBSERVATIONS’ रिमार्क  दिला.
 • ACC, अंबुजा ,ULTRATECH यांनी दिल्ली NCR रिजनसाठी प्रती गोणी Rs १६ ते Rs २० किमत वाढवली.

कॉर्पोरेट एक्शन

 • NMDC ने Rs ४.१५ प्रती शेअर, कोल इंडियाने Rs १८.७५ प्रती शेअर, कॅडिला हेल्थकेअरने Rs ३.२० प्रती शेअर. हिरोमोटो कॉर्प या कंपनीने Rs ५५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • GAIL ९/०३/२०१७ रोजी एक्स बोनस झाला. एक्स बोनस किंमत Rs 374 झाली.
 • जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट हे शेअर वाढू लागले. कां वाढू लागले असतील अचानक ? दिल्ली राज्य सरकारने विमान इंधनावरील कर २५% वरून १% कमी केला. पण ही अर्धीच बातमी होती. ही कपात फक्त उत्तरपूर्वेला जाणार्या उड्डाणासाठीच होती. त्यासरशी या शेअर्समधील वाढ कमी होऊ लागली.
 • US $ निर्देशांक वाढतो आहे. हा निर्देशांक जेव्हा १०२ च्या जवळपास जातो तेव्हा मार्केटमध्ये मंदी येते. सेन्सेक्स आणी निफ्टी या निर्देशांकात WEAKNESS दिसत नाही. पण शेअरमध्ये WEAKNESS दिसतो. मार्केट पडेल की वाढेल याचा स्पष्ट अंदाज येत नाही. जे शेअर पडत आहेत त्यात VOLUME कमी आहे आणी जे शेअर्स वाढत आहेत त्यात VOLUME  खूप आहे. महत्वाच्या घटना पुढे येऊ घातल्या आहेत. उदा :- सहा राज्यातील निवडणुकांचे निकाल, फेडची मीटिंग…

या आठवड्यातील IPO

 • या आठवड्यात आलेल्या IPO ना गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ‘MUSIC BROADCAST’ चा IPO ४० पट ओव्हरसबस्क्राइब झाला. त्यात रिटेल कोटा ९.३९ वेळा ओव्हर सबस्क्राइब झाला. QIB कोटा ४० वेळा तर HNI कोटा ११२ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला.
 • AVENUE SUPERMARKET च्या IPO ला पहिल्या दिवसापासूनच गुंतवणूकदारांचा विशेषतः रिटेल गुंतवणूकदारांचा छान प्रतिसाद मिळत आहे. हा IPO शेवटी  माहिती मिळाली त्याप्रमाणे ९२ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
 • गोदरेज अग्रोव्हेट या कंपनीचा IPO आणण्याची जोरदार तयारी सुरु आहे.

मार्केटने काय शिकवले
तुमच्यापैकी बरेचजण तांत्रिक विश्लेषणाविषयी विचारतात म्हणून मी आता जमेल तेव्हा त्याबद्दलहि माहिती देणार आहे आज आपण HAMMER PATTERN बद्दल बोलू. हा तेजीचा कॅण्डलस्टिक PATTERN आहे. मार्केट तेजीत उघडते. काही कारणाने लगेचच खूप पडते. पण मार्केटला सपोर्ट मिळतो आणी मार्केट पुन्हा हळू हळू वाढत जाते आणी उच्च स्तरावर  पोहोचते. अशावेळी ओपन हाय आणी क्लोज साधारण सारखे असतात. हाय आणी क्लोज सारखे असतील तर STRONG फॉर्मेशन  समजले जाते. हाय आणी ओपन सारखे असतील तर PATTERNमध्ये थोडी कमजोरी असते. किंवा हवी तेवढी ताकत नसते. लॉंग लोअर SHADOW याचा अर्थ मार्केटने मागणीची जागा शोधली. किमती आणखी कमी होण्यास अडथळा निर्माण झाला. ओपनिंग किमतीपेक्षा क्लोजिंग किमत जास्त असली तर खूपच बुलीश समजतात. बुधवार तारीख ५ मार्च २९१७ रोजी हा PATTERN फॉर्म झाला. तांत्रिक विश्लेषणाविषयीची अधिक माहिती आपल्याला माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकातून वाचावयास मिळेल.
मार्केटमध्ये येत असलेल्या बातम्या वेगवेगळे रंग उधळत आहेत. त्यानुसार गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचे चित्र रेखाटले जात आहे. त्यातच सहा राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल शनिवार रविवारपर्यंत जाहीर होतील.फेड आपले व्याजदरवाढीचे रंग मिसळणार आहे. या सर्व रंगोत्सवात शेअरमार्केट कसे आणी कोणत्या रंगात सामील होते ते मंगळवारीच स्पष्ट होईल. बातम्यांच्या रंगोत्सवात सामील होते की ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असे म्हणत अलिप्त राहते ते पहावे लागेल.
मार्केट काय रंग उधळेल ते उधळेल पण या होलीकोत्स्वात आपल्या आयुष्यात, संसारात आनंदाच्या उत्साहाच्या लाखो छटा उधळोत ही शुभेच्छा आणी ईश्वरचरणी प्रार्थना.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८९४६ आणी NSE निर्देशांक निफ्टी ८९३४ वर बंद झाला.
 

2 thoughts on “आठवड्याचे समालोचन – ६ मार्च २०१७ ते १० मार्च २०१७ – उधळा होळीचे रंग शेअरमार्केटच्या संग

 1. Kathar Satish Sudhakar Post author

  Me aaple 61 blog vachle. Khup chan vatle. Share market mhanje kay… he changlye ritine samajle. Share marketchi bhiti nighun geli. Ani vichar karto aahe ki aapan dekhil demat account ughdave ani share market madhe pravesh karava….. aapnas Gudhipadvyachya hardik shubhcha……
  Thank you.

  Reply
 2. Pingback: अब की बार निफ्टी दस हजार – १३ मार्च ते १७ मार्च २०१७ – आठवड्याचे समालोचन | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.