आठवड्याचे समालोचन – २० मार्च २०१७ ते २४ मार्च २०१७ – गुढीपाडवा हा आला, शेअरमार्केटचे पंचांग पाहूया चला

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Gudi Padwa Share Market

Image – Redtigerxyz at English Wikipedia


सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या आणी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. या दिवशी आपण सर्वजण नवीन संकल्पना, नवे विचार, नवे संकल्प याची गुढी उभारतो. पंचांगाची पूजा करतो. पंचांग हे आकाशाचे वेळापत्रक; तिथी, वार, योग, नक्षत्र, करण अशा पांच अंगांचा त्यात समावेश असतो. त्याचप्रमाणे शेअरमार्केटच्या पंचांगात योग्य वेळ, योग्य किंमत, योग्य दिशा, गुणवत्ता, आणी संयम यांचा मेळ घालून चांगला योग जुळून आला की सुंदर प्राप्ती होते. अशीच प्राप्ती आपल्याला व्हावी ही शुभेच्छा आणी ईश्वरचरणी प्रार्थना !
या आठवड्यात मार्केट वाढण्यासाठी किंवा पडण्यासाठी कोणतेही कारण दिसत नव्हते हे मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात सांगितले होते. पण या आठवड्यात अंतरिम लाभांशाची लज्जत मार्केट मध्ये अनुभवास मिळाली. सरकारने दामाजीपंत मंगळवेढेकर बनून सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यात साठून राहिलेला पैसा अंतरिम लाभांशाच्या स्वरूपात देशाच्या उत्पनात जमा केला. सरकारी कंपन्यांच्या शेअरहोल्डिंगवर मिळणारा अंतरिम लाभांश आणी त्यावर मिळणारा DDT या दोन मार्गांनी खूपच पैसा सरकारी तिजोरीत जमा झाला. आता ‘गाड्याबरोबर नळ्याची यात्रा’ या म्हणीप्रमाणे ज्या गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांवर विश्वास दाखवला त्यांनाही या लाभाशाचा चांगला फायदा झाला. थोडक्यात काय या आठवड्यात अंतरिम लाभांशाची अशी बरसात झाली की म्हणावेसे वाटते ‘अनंत हस्ते कमलावराने देता, किती घेशील दो करांनी!’
 
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • UK  ब्रेकझीट कोणत्या टर्म्सवर होईल यासाठी वाटाघाटी २८ मार्च २०१७ पासून सुरु करू असे UK ने EUला सांगितले  आहे. या वाटाघाटी दोन वर्षात पुऱ्या करायच्या आहेत.
 • US $ निर्देशांक 100 च्या खाली आहे. क्रूडसुद्धा ४ महिन्याच्या किमान स्तरावर आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे करांमध्ये सवलती आणी सरकारी खर्चामध्य वाढ करण्यात ट्रम्पना अडचणी येत असल्यामुळे सुधारणांचा वेग मंदावला आहे. यामुळे बुधवार २२ मार्च २०१७ रोजी USA मधील बाजार मंदीत होते. उत्तर कोरियाने आम्ही मिसाईल डागू अशी USA ला धमकी दिली आहे.

सरकारी अम्मौंसमेंट

 • सरकारची डिजिटलायझेशनची मोहीम चांगलाच वेग घेत आहे. सरकारने असे जाहीर केले की आता कॅशमध्ये व्यवहार करण्याची मर्यादा Rs २ लाखांपर्यंत असेल. जर कॅशमध्ये Rs २ लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झालेला आढळला तर १००% दंड रक्कम स्वीकारणाऱ्याकडून वसूल केला जाईल.
 • सरकार PAN कार्ड काढण्याकरता आणी आयकर रिटर्न भरण्याकरता आधार कार्ड सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा HCL इन्फो या कंपनीला होईल.
 • स्टेट बँकेत महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली.
 • सरकार १० पब्लिक सेक्टर बँकांमध्ये Rs ८००० कोटी भांडवल पुरवणार आहे. देना बँकेत Rs ६०० कोटी भांडवल घालणार आहे.
 • सरकारची २८ मार्च २०१७ रोजी टायर उत्पादकांबरोबर ANTI DUMPING ड्युटी लावण्याविषयी बैठक आहे. याचा फायदा अपोलो, JK टायर , सिएट टायर्स, गुडइअर MRF  या कंपन्यांना होवू शकतो.
 • सरकारने IDBI, IOB आणी UCO या तीन बँकांना वॉच लिस्टवर ठेवले  आहे.
 • मुंबई पुणे हायवेवरील टोल सरकारने Rs १९५ वरून Rs २४० केला आहे. याचा फायदा IRB इन्फ्रा या कंपनीला होईल.
 • सरकारने आपली हेल्थ पोलिसी जाहीर केली. यामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी आणी उपचार होतील असे जाहीर केले.
 • सरकारने NELP खाली दिलेल्या ऑईल आणी GAS ब्लोक्समधून  ऑईल आणी GAS काढण्याची सीमा वाढवली. याचा फायदा मुख्यतः केर्न या कंपनीला झाला.
 • RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
 • NCLT च्या मुंबई बेंचने वेदान्ता आणी केर्न च्या मर्जरला मंजुरी दिली.
 • NSE ने जाहीर केले की F & O सेगमेंट मध्ये १५ कंपन्यांचा ३१ मार्च पासून समावेश केला जाईल. रिलायंस डिफेन्स, इंडिगो, PVR, इक्विटास होल्डिंग, MAX, कॅपिटल फर्स्ट, उज्जीवन, इंडियन बँक, इंफिबिम, पिरामल एस्कॉर्टस, दालमिया भारत, सुझलॉन, मुथुट फायनांस आणी श्री सिमेंट.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • GSPC च्या KG ब्लॉक मधील ८०% स्टेक ONGC Rs १८० कोटींना खरेदी करेल.
 • HUL ही कंपनी आपले काही ब्रांड Rs ६०० कोटींना विकणार आहे.
 • मेरिको या कंपनीने ‘BEARDO’ हा पर्सनल केअर ब्रांड खरेदी केला. मेरिकोचा कच्चा माल कोपरा (खोबरे) याच्या MSP मध्ये Rs ५५० ची वाढ झाली.
 • R कॉम या कंपनीला त्यांचा टॉवर बिझिनेस ब्रूकफिल्ड या कंपनीला विकण्यासाठी CCI (COMPETITION COMMISSION OF INDIA) ने मंजुरी दिली.
 • सुनील हायटेक या कंपनीला NHAI कडून ९८० कोटींची तर दिलीप बिल्डकॉन या कंपनीला NHAI कडून महाराष्ट्रातील कामाकरता Rs ३२६९ कोटींची ऑर्डर मिळाली. तसेच रिलायंस इंफ्राने तामिळनाडूतील रोड प्रोजेक्टची  बोली जिंकली.
 • REC ने दामोदर व्हॉली बरोबर Rs ४६५० कोटींचे MOU केले.
 • रत्नागिरी gas पॉवर मधून LNG टर्मिनलचे डीमर्जर केले जाईल. या कंपनीच्या बाकी असलेल्या Rs ८९०५ कोटी कर्जाचे restructuring करण्यास बँकेने मान्य केले आहे.   .
 • RCF आणी बालाजी अमाईन यांनी तक्रार केली होती की की पेंट आणी फार्मा कंपन्यांमध्ये जे केमिकल वापरतात त्याचे डम्पिंग चालू आहे. ही तक्रार योग्य आहे असे सरकारला आढळले.
 • आरोग्यदायी आणी पौष्टिक शक्तिवर्धक पेयांच्या मार्केटमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये नेस्लेचे ‘MILO’ आणि DANNAN चे ‘प्रोटीनेक्स’ABBOT चे ‘पिडियाशुअर’ आणी ‘इन्शुआर’ यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘हॉरलिक्स’ ची किंमत २०% ने कमी केली जाइल. याचा परिणाम GSK कंझ्युमर या कंपनीवर होईल.
 • मावाना शुगर या कंपनीने PNB बरोबर कर्जाची सेटलमेंट केली. या कंपनीवर Rs १०९ कोटी कर्ज होते ते आता Rs ७९ कोटी भरायचे ठरले. व्याजही माफ केले. हे कर्ज १५ महिन्यात भरायचे आहे.
 • डिविज LAB या कंपनीला त्यांच्या विशाखापट्टणम युनिटसाठी ‘USFDA’ ने IMPORT ALERT जारी केला.
 • DR REDDY‘ज LABच्या दुवादा युनिटसाठी ‘USFDA’ ने त्रुटी दाखवल्या
 • AXIS बँकेचे CEO आणि MD राजीनामा देणार आहेत अशी बातमी आली. ही बँक आणी कोटक महिंद्र बँक यांचे मर्जर होणार आहे अशी बातमी आहे.
 • NTPC ने आपले राजस्थानमध्ये भाद्ला येथे 20MW चा सोलर प्लांट आणी आसाममध्ये २५० MW चा थर्मल पॉवर प्लांट सुरु केले. NTPC ने ‘SJVN’या कंपनीतला सरकारचा स्टेक विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • व्होडाफोन आणी आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या मर्जरची घोषणा केली. व्होडाफोन चा हिस्सा ४५% आणी आयडीयाचा स्टेक २६% असेल. दोन्ही कंपन्यांचे मर्जरसाठी valuation अनुक्रमे व्होडाफोन Rs८२२०० कोटी आणि आयडीयाचे Rs ७२२०० कोटी असे केले आहे. या दोन्ही कंपन्यांचा मार्केट शेअर ४२% असेल. व्होडाफोन आणी आयडीया हेही दोन ब्रांड चालू राहतील.
 • HCL  टेक या कंपनीने Rs १००० प्रती शेअरला किंमतीला ‘BUY BACK’जाहीर केला. कंपनी ३.५ कोटी शेअर्स ‘BUY  BACK’ करेल. जर प्रमोटरनी या ‘BUY BACK’मध्ये भाग घेतला तर BUYBACK चे प्रमाण २.६% पडेल नाहीतर ६% होईल.
 • OIL INDIA ही कंपनी Rs ३४० प्रती शेअर याप्रमाणे शेअर BUY BACK करेल.
 • हिंदुस्थान कॉम्पोझिटस या कंपनीने शेअर स्प्लिट, बोनसवर विचार करण्यासाठी १० एप्रिल २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • हिंदुस्थान झिंक या कंपनीने Rs २७.५० प्रती शेअर तर IOC ने Rs ४.५०, BPCL ने Rs १२, आणी HPCL या कंपनीने Rs ६.४० अंतरिम लाभांश आणी भारती इन्फ्राटेलने Rs १२ लाभांश जाहीर केला.
 • कोल इंडिया या कंपनीने दुसर्या अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी २६ मार्च तोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठेक बोलावली आहे.

या आठवड्यात आलेले IPO आणी लिस्टिंग

 • या आठवड्यात शंकर बिल्डींग प्रोडक्ट्स आणी CL EDUCATE हे दोन IPO  आले त्यातील CL EDUCATE  IPO १.८८ वेळा तर शंकर बिल्डींग प्रोडक्ट्स IPO  २० वेळा सबस्क्राइब झाला.
 • या आठवड्यात D मार्ट या कंपनीचे लिस्टिंग Rs ६०० ला झाले १००% लिस्टिंग गेन झाला.

मार्केटने काय शिकवले
ज्यावेळी लाभांश जाहीर होणार अशी बातमी येते तेव्हा तो अंतरिम आहे का फायनल याचा विचार करावा. तसेच लाभांश किती मिळेल? केव्हा मिळेल? तो मिळण्यास पात्र होण्यासाठी शेअर खरेदी करण्याची EX DATE कोणती? लाभांश जाहीर होण्याआधीची किंमत आणी जाहीर होईपर्यंत त्याच्या किंमतीत झालेली वाढ याचा अंदाज घ्यावा. लाभांशाचे आताच्या शेअरच्या किमती बरोबरचे प्रमाण आणी कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घ्यावी. लाभांशासाठी शेअर खरेदी करावा का या प्रश्नाची उत्तरे कॅश आणी फ्युचर्स यांच्या किमतीत जेवढा फरक असेल त्यापेक्षा जास्त लाभांश मिळाला पाहिजे असा सर्वसाधारण अंदाज असतो.
‘लाभांशाची खिरापत, एक आफत’ असे म्हणायची वेळ येणार नाही ना? अशी एक शंकाही येते. सरकारी कंपन्या जास्त लाभांश देत आहेत प्रमाणापेक्षा जास्त लाभांश याचा अर्थ कंपन्यांच्या जवळची ‘कॅश’ तेवढ्या प्रमाणात कमी होते. कंपनीच्या प्रगतीसाठी, भावी काळातील विस्तार योजनांसाठी तेवढा पैसा कमी उपलब्ध राहतो. थोडक्यात कंपन्यांची ‘नक्त मालमत्ता’ (NET WORTH) कमी होते. याचा परिणाम कंपनीच्या भविष्यातील उत्पन्नावर आणी प्रगतीवर विपरीत होऊ शकतो. कंपनीच्या शेअर्च्या मार्केटमध्ये असलेल्या किमतीत जर लाभांशाच्या रकमेपेक्षा जास्त घट झाली तर काय उपयोग? त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच हवी.
तसा जो आठवडा कोणताही ट्रिगर नसल्यामुळे कंटाळवाणा गेला असता त्यात लाभांशाच्या बातमीमुळे नवीन चेतना मिळाली आणी आठवडा आनंददायी आणी उत्साहवर्धक झाला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २९४२१ वर आणी NSE निर्देशांक ९१०८ वर बंद झाले

One thought on “आठवड्याचे समालोचन – २० मार्च २०१७ ते २४ मार्च २०१७ – गुढीपाडवा हा आला, शेअरमार्केटचे पंचांग पाहूया चला

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – हाजीर तो वजीर – २७ मार्च ते ३१ मार्च २०१७ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.