आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शेअरमार्केट म्हणजे क्रिकेटसारखा खेळच. मार्केटमध्ये असणारी अनिश्चितता, मिळणारा पैसा, वैभव, प्रसिद्धी, लोकांना मार्केटचे असणारे आकर्षण, अनेक प्रकारचे किस्से, आकडेवारी या सगळ्यांची तुलना क्रिकेट या खेळाशी करावीशी वाटते. जसे क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट, वन डे, २०-२०, आणी IPL असे प्रकार असतात तसेच मार्केटमध्ये लॉन्ग टर्म, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, इंट्राडे असे प्रकार असतात. IPL मध्ये जसे आपणाला नवनवीन खेळाडू (ज्यांनी कधी भारताचे प्रतिनिधित्व केलेले नसते) मैदान गाजवताना दिसतात. त्याच पद्धतीने ट्रेडर्स सध्या दुर्लक्षित पण चांगले शेअर शोधत आहेत त्यामुळे रोज जुन्याच शेअर्सची नव्याने ओळख होत आहे. नवे शेअर्स लोकांच्या दृष्टीपथात येत आहेत. यातील कित्येक शेअर्स IPL मधील खेळाडूंच्या विक्रमासारखे रोज ऑल टाईम हाय किमती नोंदवत आहेत. सेन्सेक्सने ३०००० तर निफ्टीने ९३०० पार केले. US $ चा प्रचंड ओघ FDI स्वरूपात येत आहे. त्यामुळे रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर आज दोन वर्षाच्या हायवर आहे. RBI ला हा विनिमय दर कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा लागत आहे. सर्वत्र BJP ला बहुमत मिळत असल्यामुळे भारतातील राजकीय स्थैर्य वाढत आहे, सरकार आता पुन्हा नव्या जोमाने आणी नवे नवे रीफोर्म्स आणण्याचा प्रयत्न करेल असे वाटते. प्रगतीच्या मार्गातले सर्व अडथळे दूर झालेले दिसतात.
जणू काही वर वर जाणारे मार्केट हे स्वप्नवत आहे असे भासत आहे. पण तुम्ही मात्र स्वप्नातून वेळेवर जागे व्हा. वास्तवातच रहा आणी या स्वप्नाची वास्तवात राहून मजा चाखा, फायदा घ्या, संपन्न आणी समृद्ध व्हा.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी USA च्या विविध करांच्या दरात कपात जाहीर केली. यात कॉर्पोरेटस, छोटे बिझिनेस आणी पार्टनरशिप यांना लागू होणारा आयकर ३५% वरून १५% वर आणला जाईल असे घोषित केले. तसेच USA तील कंपन्यांनी परदेशात मिळवलेले उत्पन USA मध्ये करपात्र असणार नाही. व्यक्तीगत उत्पन्नाच्या बाबतीत असलेले आयकराच्या ७ वेगवेगळ्या दरांचे ३ दरात रुपांतर केले, कमाल कराचा दर ३९.६% वरून ३५% वर आणला. तसेच एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असले तर INVESTMENT INCOME TAX तसेच ESTATE TAX काढून टाकला. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा USA मधील सर्व प्रकारच्या उद्योगांवर परिणाम होईल. या प्रकारे ट्रम्प यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेले एक आश्वासन पुरे करण्याचा प्रयत्न केला.
किया मोटर्स ही आंध्र प्रदेशात Rs १२८०० कोटी गुंतवून आपले उत्पादन युनिट सुरु करणार आहे. या युनिटमध्ये २०१९ च्या मध्यापासून ३ लाख कार्सचे उत्पादन केले जाईल.
सरकारी अनौंसमेंट
GST ची सपोर्ट सिस्टीम तयार करण्याचे संपूर्ण काम ITI या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मिळाले.
स्वच्छ भारत सेस, इन्फ्रा सेस, कृषी कल्याण सेस GST मध्ये सामील केले जातील. लक्झरी कर, एन्टरटेनमेंट कर वेगळे लागणार नाहीत. ५ पेट्रोलियम प्रोडक्टस् वर GST १ वर्षापर्यंत लागू होणार नाही. याबाबतीत ५ वर्षानंतर रिव्ह्यू केला जाईल.
सरकारने असे जाहीर केले की सर्व डॉक्टर्सनी जनरिक औषधे आपल्या रुग्णांना घ्यावयास सांगावी. एकाच प्रकारच्या औषधाला निरनिराळ्या कंपन्या त्यांच्या ब्रांड VALUE साठी निरनिराळ्या किमती आकारत आहेत असे आढळले. त्याला प्रतिबंध बसेल. औषधे स्वस्त होतील असा सरकारचा होरा आहे.
RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
- सेबीने कमोडीटी मार्केटमध्ये ऑप्शन contractसाठी मंजुरी दिली.
- Rs १०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा IPO कंपनी आणत असेल तर IPO द्वारा उभारण्यात आलेल्या रकमेचा उपयोग कसा केला जातो यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मॉनिटरिंग एजन्सी नेमावी लागेल असे सेबीने सांगितले.
- अनिवासी भारतीय आणी त्यांच्या मालकीच्या संस्थांना पार्टीसिपेटरी नोतेस विकत घेण्यास सेबीने प्रतिबंध केला आहे.
- ब्रोकरच्या इक्विटी आणी कमोडीटी असलेल्या दोन्ही विभागांना एकत्र करण्याची परवानगी दिली.
- E WALLETS द्वारा म्युच्युअल फंडामध्ये प्रतिदिवशी Rs ५०००० पर्यंत गुंतवणूक करण्यास सेबीने परवानगी दिली.
- सेबीने कमोडीटी मार्केटमधील ५ ब्रोकर्सना गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली.
- NPPA (NATIONAL PHARMACEUTICAL PRICING AUTHORITY) ने ABBOT आणी मेड्ट्रोनिक्स या कंपन्यांना आपले ‘STENTS’ बाजारातून काढून घ्यावयास परवानगी नाकारली. त्या ऐवजी किमतीत काही बदल करता येतो का हे पाहण्याची सुचना केली.
- जुबिलींयंट लाईफच्या गाजरौला येथील आणी अन्य १३ प्लांटमध्ये काम बंद करायला NGT( NATIONAL GREEN TRIBUNAL) ने सांगितले. या प्लांट्समध्ये फूड प्रोडक्ट्स तयार केली जात होती.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- ADVANCE ENZYME या कंपनीने मलेशियातील पाम ऑईल क्षेत्रातील आणी भारतातील डिझेल क्षेत्रातील कंपनी घेतली.
- बायोकॉन आणी मायलॉन या दोन्ही कंपन्या रक्ताच्या कर्करोगावर औषध बनवत आहेत हे कळताच ROCHE या कंपनीने हरकत घेतली होती. परंतु याचा निकाल बायोकॉनच्या बाजूने लागला.
- टाटा मोटर्स या कंपनीला भारतीय सेनेकडून ३१९२ सफारी गाड्यांची ऑर्डर मिळाली.
- IGL (इंद्रप्रस्थ GAS) या कंपनीने FPI ची सीमा २४% वरून ३०% केली.
- प्रिझम सिमेंट या कंपनीला लाईमस्टोन मायनिंगची ५० वर्षांसाठी लीज दिली.
- सन टी व्ही ने मलयालम टी व्ही वाहिनी ‘सूर्या कॉमेडी’ सुरु केली.
- बाहुबली २ हा सिनेमा ७००० स्क्रीनवर रिलीज होणार आहे.याचा फायदा UFO मूव्हीज, मुक्ता आर्ट्स, PVR, INOX लीजर या कंपन्याना होईल.
- मार्कसंस फार्मा या कंपनीच्या गोवा प्लांटच्या निरीक्षणात USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.
- स्ट्राईड शसून या कंपनीच्या कुददालोर प्लांट च्या निरीक्षणात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.
- भेल या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला बांगलादेशकडून १३२० MW थर्मल पॉवर स्टेशनचे Rs १०००० कोटींचे काम मिळाले.
- ल्युपिनला गोवा प्लांटसाठी VAI ( VOLUNTARY ACTION INDICATER) मिळाला म्हणजे प्युपिंनने सुधारणा केली आहे आता USFDA रेग्युलेटरी कारवाई करणार नाही.
- सरकार ३ स्टेपमध्ये बँकात भांडवल घालणार आहे. पहिल्या चरणात Rs २५०० कोटी, नोव्हेंबर आणी फेब्रुवारीत Rs ५००० कोटी घालणार आहे.
- टाटा डोकोमो यांच्यातील वाद मिटवण्यासाठी केलेल्या कराराला सरकारने मान्यता दिली. RBI ने घेतलेल्या हरकती नामंजूर केल्या.
- फेडरल बँक, इंडियन बँक, HDFC BANK, येस BANK, लक्ष्मी विलास बँक, कोटक महिंद्र बँक, कॅनफिना होम्स, विप्रो, M M. फायनांसियल, LIC हौसिंग, इंडिया बुल्स हौसिंग, GIC हौसिंग, IDFC बँक, हाटसन अग्रो यांचे निकाल चांगले आले.
- रिलायंस इंडस्ट्रीज, हेक्झावेअर, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, मोतीलाल ओसवाल, बंधन बँक यांचेही निकाल चांगले आले.
कॉर्पोरेट एक्शन
- बायोकॉन या कंपनीने २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले. तुमच्याजवळ १ शेअर असेल तर तुम्हाला २ बोनस शेअर्स मिळतील. तसेच Rs ३ लाभांश जाहीर केला.
- रिलायंस कॅपिटलमधून रिलायंस होमचे डीमर्जर होणार आहे. रिलायंस कॅपिटलचा १ शेअर असेल तर रिलायंस होम चा १ शेअर मिळेल. रिलायंस होमचे वेगळे लिस्टिंग होईल.
- केर्न इंडिया आणी वेदांताचे मर्जर या आठवड्यात पूर्ण झाले. त्यामुळे आता केर्न इंडिया मध्ये ट्रेडिंग होणार नाही.
- न्युक्लीअस सॉफटवेअर ही कंपनी Rs ३५० प्रती शेअर या दराने शेअर BUY BACK करणार आहे. यासाठी कंपनी Rs ११७.७९ कोटी खर्च करणार आहे.
- पोकर्ण या कंपनीची STOCK SPLIT वर विचार करण्यासाठी ८ मे रोजी बैठक आहे.
- विप्रो या कंपनीने १:१ बोनस शेअरची घोषणा केली.
- इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स ने Rs ३६ प्रती शेअर तर CEAT या कंपनीने Rs ११.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
नजीकच्या काळात येणारे IPO
- या आठवड्यात S चांद या कंपनीचा IPO २८ एप्रिल रोजी बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
- हुडको या सार्वजनिक क्षेत्रातील घरबांधणी क्षेत्रात असलेल्या सरकारी कंपनीचा IPO ८ मे २०१७ ते ११ मे २०१७ या काळात येईल या IPO ची साईझ Rs २० कोटी असून प्राईस BAND Rs ५६ ते Rs ६० असेल.
- IRB इन्फ्रा या कंपनीने InVit चा इशू ३ मे २०१७ पासून ५ मे २०१७ पर्यंत उघडेल असं सांगितलं. प्राईस band Rs १०० ते Rs १०२ राहील.
मार्केटने काय शिकवले
सध्या जागतिक पातळीवर ताणतणावाचे वातावरण आहे. मार्केट सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे STOCK स्पेसिफिक राहावे. जर शेअर स्वस्तात खरेदी केले असतील तर भांडवल आणी थोडा फायदा मिळेल एवढे शेअर्स विकावेत आणी बाकीच्या शेअर्ससाठी TRAILING STOPLOSS लावावा आणी त्याचे पालन करावे. मार्केट पडू लागताच पूर्ण गुंतवणूक काढून घ्यावी.
शुक्रवारच्या मार्केटचे निरीक्षण केले असता असे आढळले की खाजगी बँकांचे शेअर्स पडत होते पण राष्ट्रीयकृत सरकारी बँकांचे शेअर मात्र वाढत होते. असे का बरे? सरकार सतत या बँकामध्ये कोट्यावधी रुपयांचे भांडवल घालत आहे, NPA अकौंटचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदे करण्यापासून ते निरनिराळ्या कायद्यात सुधारणा करण्यापासून, ते थेट NPA झालेल्या कंपन्या दुसऱ्या चांगल्या कंपन्यांमध्ये मर्ज करण्यापासून ते आजारी बँकांचे दुसर्या चांगल्या बँकात मर्जर करण्यापर्यंत सर्व पातळीवर सर्वंकष प्रयत्न करत आहे. हे सर्व प्रयत्न फलदायी ठरतील असे गुंतवणूकदारांना वाटते आहे. जर इंडियन बँकेच्या निकालांसारखे चांगले निकाल आले तर हे प्रयत्न फलदायी होत आहेत असा निष्कर्ष काढता येईल का? जर असा निष्कर्ष बरोबर असला तर महाग असलेले खाजगी बँकांचे शेअर विकून स्वस्त असलेले राष्ट्रीयीकृत सरकारी बँकाचे शेअर घ्यावेत का? अशी निरीक्षणाची दिशा ठेवली पाहिजे. मार्केटचे निरीक्षण करणे म्हणजेच काय घडत आहे ? का घडत आहे आणी किती वेगाने घडत आहे? याची कारणे शोधणे होय.
मार्केट पडणे किंवा वाढणे नैसर्गिक आहे. जसे क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू कधी खेळेल आणी सामन्याचा रंग बदलेल ते सांगता येत नाही. किंवा एखाद्या खेळाडूचा ‘BAD PATCH’ सुरु असतो खेळाडू चांगला असला तरी काही काळ चांगला खेळ करू शकत नाही. असे ‘BAD PATCH’असलेले चांगले शेअर शोधण्याचे काम करावे लागेल असाच रागरंग आहे. तुम्हाला असे काही जमते का ते पहा! निरीक्षणाने शक्य होईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स २९९१८ वर आणि NSE निर्देशांक निफ्टी ९३०४ वर बंद झाला.