आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
२६ मे रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची तीन वर्षे पुरी झाली. २६ मे २०१४ रोजी सेन्सेक्स २४७०० तर निफ्टी ७३०० होता. आज २६ मे २०१७ रोजी सेंसेक्स ३१००० आणी निफ्टी ९६०० आणी बँक निफ्टी २३३८० या स्तराला स्पर्श करून आले. टर्नओव्हर १३ लाख कोटींचा झाला. म्हणजेच सर्व गुंतवणूकदारांना तिसर्या वाढदिवसाची भेट मिळाली. गेली तीन वर्षे सरकार अतिशय कार्यक्षम, नवीन नवीन कल्पना, योजना, विविध क्षेत्रातील रोगांचे निदान आणी त्यावरील उपाय शोधण्यात तत्पर राहिले. सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी हरेक प्रयत्न मोदी सरकारने केले. ‘कोणी वंदा कोणी निंदा आमुचा देशहिताचा धंदा’ हे व्रत घेतल्याप्रमाणे सरकारचे काम चालू आहे. शेअरमार्केट हे देशाच्या आर्थिक स्थैर्याचे आणी प्रगतीचे द्योतक असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही सरकारवर विश्वास ठेवून आपली शेअर मार्केटमधली गुंतवणूक वाढवली. आणी सरकारच्या कामाला पसंती दिली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबिया आणी इज़्राइल यांचा यशस्वी दौरा केला. आर्थिक करारांबरोबरच त्यांनी इज़्राइलला शांतता राखण्याचे आवाहन केले. USA च्या वेगवेगळ्या स्टेटस्नी इंडियन IT कंपन्या जर स्थानिक लोकांना रोजगार पुरवणार असतील तर अशा कंपन्यांना वेगवेगळ्या सोयी आणी सवलती पुरवण्याचे आश्वासन दिले आहे इन्फोसिसला इंडियाना स्टेटने करात सवलत आणी वन TIME GRANT या स्वरुपात देऊ केली आहे.
ओपेकच्या बैठकीत यावेळी भारतसुद्धा सामील झाला होता. ओपेकचे उत्पादन कमी करण्याचे धोरण पुढील ९ महिन्यासाठी चालू ठेवावे. या प्रस्तावावर विचार करून ओपेकने हे धोरण मार्च २०१८ पर्यंत चालू ठेवावे असा निर्णय घेतला या निर्णयात आता व्हेनीझूएला हा देशही सामील झाला. USA आपले अलास्कामधील क्रूडचे उत्पादन वाढवणार आहे. यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांनी क्रुडऑइलच्या किमतीकडे लक्ष ठेवावे.
USA FED जून २०१७ मध्ये रेट वाढवू शकते तसेच मॉनेटरी इझिंगखालील बॉंडची खरेदी कमी करू शकते.
सरकारी अन्नौंसमेंट
- इज़्राइल एअरोस्पेस बरोबर Rs ४००० कोटींचा करार झाला. पण ही कंपनी BEL बरोबर हे काम करणार आहे
- संरक्षणासाठी लागणारी ६५% साधनसामुग्री आयात करावी लागते. पण मेक-इन–इंडियाच्या अंतर्गत संरक्षणाचे करार करावेत आणी भारतातच या साधनसामुग्रीचे उत्पादन करावे असे ठरले. परदेशी कंपन्या फक्त तंत्रज्ञान देतील का हा प्रश्न आहे ? BEL,BEML, पुंज लोंइड, वालचंदनगर, रोल्टा, लार्सेन & टुब्रो, ASTRA मायक्रोवेव्ह, टीटाघर wagan या कंपन्यांना याचा फायदा होईल.
- शिक्षण आणी आरोग्यसेवा GST मधून वगळल्यामुळे फोर्टिस हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल, नारायणा हृदयालय आणी इतर हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांचा फायदा होईल.
- केरोसीन सबसिडीचा भार ऑईल इंडिया आणी ONGC या कंपन्यांवर पडू नये अशी उपाययोजना करण्याच्या विचारात सरकार आहे.
- राष्ट्रीय टेक्स्टाईल धोरण जून मध्ये येण्याची शक्यता आहे. यामुळे अरविंद, डोनिअर, ARROW, पेज, लक्स, मॉनटे कार्लो या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
- सरकारचा सोने आणी रेल्वे यासाठी रेग्युलेटरी ऑथोरिटी नेमण्याचा विचार आहे.
- सरकारने उसाची FRP (फेअर एंड रेम्युनरेटीव प्राईस) Rs २३० वरून वाढवून Rs २५५ केली.
- सरकार इन्शुरन्स ब्रोकिंगमध्ये सध्या ४९% FDI ला परवानगी आहे ती १००% करण्याची शक्यता आहे. याचा फायदा MK ग्लोबल, एडलवाईज, मोतीलाल ओसवाल, जीओजीत, IIFL होल्डिंग या कंपन्यांना होईल.
- कॉमर्स मंत्रालयाने सांगितले की GST लागू झाल्यानंतर सोन्यावरील आयात कर कमी केला जाऊ शकतो.
- टेलिकाम सेक्टरला आधी १५% कर लागत होता तो आता १८%च्या SLAB मध्ये आला. यासाठी टेलीकाम सेक्टर GST कौन्सिलकडे आपले गाऱ्हाणे मांडणार आहे. ३ टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्याना लावलेल्या दंडाविषयी योग्य वेळी विचार केला जाईल असे टेलीकॉम मंत्रालयाने सांगितले.
RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
- सिमेंट कंपन्या सतत सिमेंटच्या किमती वाढवत आहेत. सिमेंटसाठी लागणाऱ्या कच्च्यामालाच्या किमती वाढलेल्या नसतानाही सिमेंटच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे ESMA अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
- शिल्पी केबल या कंपनीविरुद्ध इंसोलव्हन्सी प्रोसिडिंग सुरु करण्यासाठी NATIONAL LAW TRIBUNAL ने मंजुरी दिली.
- सेबीने असे जाहीर केले आहे की १ जुलै २०१७ पासून ब्रोकर्स जवळ पडलेला क्लायंटचा पैसा ब्रोकर आता इतर ट्रेडसाठी किंवा स्वतःच्या उपयोगासाठी वापरू शकणार नाहीत. सेबीने stock एक्स्चेंजना ब्रोकरकडील क्लायंटच्या पैशावर देखरेख ठेवण्यासाठी सिस्टीम तयार करायला सांगितली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ब्रोकरला त्याच्याकडे असलेल्या क्लायंटच्या पैशाविषयीची माहिती stock एक्स्चेंजला द्यावी लागेल.
- CCI(COMPETITION COMMISION OF INDIA) ने टाटा सन्स आणी त्यांच्या इतर ग्रूप कंपन्यांना टाटा टेलीसर्विसेस मधील NTT DOCOMO चा २१.५ स्टेक विकत घ्यायला मंजुरी दिली.
- GST कौन्सिल ने असे जाहीर केले की ज्या कंपन्या त्यांच्या सबसिडीअरिज, शाखा आणी जॉईनट व्हेंचर्सना गुड्स सप्लाय करतात अशा सप्लाय केलेल्या गुड्सच्या ९०% VALUE वर GST आकारला जाईल.
- सोन्यावर आणी चांदीवर कोणताही विशेष कर आकारला जाणार नाही. पण GST ५% दराने आकारला जाईल.
इकॉनॉमीच्या गोष्टी
- BSE निर्देशांक सेन्सेक्समधून १९ जून २०१७ पासून GAIL बाहेर पडेल आणी कोटक महिंद्र बँक आणी टाटा मोटर्स DVR सेन्सेक्समध्ये सामील होईल.
- शुक्रवार २६ मे २०१७ पासून HCC कजारिया, नाल्को, RBL बँक, रामको सिमेंट हे शेअर्स वायदामध्ये सामील झाले.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- ओडीसामधील आयर्न ओअर ब्लॉकची बोली भूषण स्टीलने जिंकली.
- नाटको फार्माच्या तेलंगणातील Rs ४०० कोटींच्या प्रोजेक्टला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
- व्हिडीओकोनवर Rs ४५००० कोटींचे असलेले कर्ज NPA म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या बँकांनी या कंपनीला कर्ज दिले आहे त्यांचे शेअर्स पडले.
- रेमंड या कंपनीची बीच कॅन्डीच्या जवळची जमीन कंपनीचे प्रमोटर Rs ९००० प्रती चौरस फूट या भावात विकत घेणार आहेत. या जमिनीची सध्याची मार्केट प्राईस Rs १००००० प्रती चौरस फूट आहे. त्यामुळे शेअरहोल्डर्सना आपली फसवणूक होते आहे असे वाटते आहे. हा कॉर्पोरेट गवर्ननसचा इशू होऊ शकतो.
- आज ल्युपिन चा निकाल आला. ल्युपिनच्या इंदोर युनिटच्या वर्किंगवर ६ निरीक्षणे दिली. त्याबरोबरच फार्मा सेक्टर मध्ये ‘प्राईस प्रेशर’ आहे आणी अमेझोन कंपनी फार्मा सेक्टरमध्ये प्रवेश करत असल्यामुळे आपला प्रगतीचा दर सिंगल डीजीट राहील असे ल्युपिनने सांगितले.
- MTNLया सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने आपल्या जवळ असलेल्या जमिनीचे मॉनेटायझेशन करण्यासाठी टेलीकॉम मंत्रालयाकडे परवानगी मागितली.
- L&T आपला स्विचगिअर बिझिनेस विकणार आहे. हा बिझिनेस खरेदी करण्यात मित्सुबिशी, PANASONIC, हिताची, आणी हनीवेल यांनी रस दाखवला आहे.
- जैन इरिगेशन, PC ज्युवेलर्स, BOSCH(मार्जीन वाढले) बजाज हिंदुस्थान अशोक LEYLAND, HPCL टाटा केमिकल्स, ITC यांचे निकाल चांगले आले.
- डीश टी व्ही आणी सिप्ला या कंपन्यांचा निकाल निराशाजनक होता.
- IDBI बँक आपले नॉनकोअर ASSET विकून भांडवल उभारणार आहे.
कॉर्पोरेट एक्शन
- डेक्कन सिमेंट ही कंपनी आपल्या एका शेअरचे २ शेअर्समध्ये तर जमुना ऑटो आपल्या एका शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लीट करणार आहे
- P C ज्युवेलर्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने १:१ असा बोनस जाहीर केला.
- आज सिंटेक्स या कंपनीचे डीमर्जर झाले. टेक्स्टाईल बिझिनेस आज Rs १८ ला लिस्ट होऊन नंतर Rs ३२ पर्यंत वाढला. काही दिवसांनी प्लास्टिक बिझिनेसचेही लिस्टिंग होईल.
- ITC च्या निकालात Rs ४०० कोटी इतर उत्पन्नाचा समावेश आहे.
- HPCL ने १:२ या प्रमाणात बोनस दिला. म्हणजे तुमच्याजवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला एक शेअर बोनस म्हणून मिळेल
मार्केटने काय शिकवले
या आठवड्यात सरकारने पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून जशी जबरदस्त चपराक दिली तशीच मार्केटनेसुद्धा सर्व ट्रेडर्सना चांगलेच वठणीवर आणले. मार्केट वाढते आहे बुल रन आहे कोणत्याही भावाला विकत घेतले तरी भाव वाढणार आणी फायदा होणार अशी समजूत ट्रेडर्सची असते. मार्केट या आठवड्यात ४ दिवस पडतच राहिले म्हणजेच गाफील राहू नये हा धडा मार्केटने दिला. गुरुवारी एकस्पायरीच्या दिवशी ४४८ पाईंट मार्केट वर असल्यावर जशी आकडेवारी मिळायला हवी होती तशी दिसली नाही. त्यावरून वायदा बाजाराच्या एकस्पायरीचा परिणाम होता असे जाणवले. आता जूनची एक्सपायरी ५ आठवड्यांची आहे हे लक्षात ठेवा. ट्रेडिंगसाठीही जास्त दिवस मिळतील.
मार्केटने नवा इतिहास रचला. सेन्सेक्स ३१००० आणी निफ्टी ९६०० ला पोहोचले. निफ्टी बँक २३९८० होती निफ्टी ९५०० वरून ९६०० व्हायला ६ सत्रे लागली. तर सेन्सेक्सला ३०००० ते ३१००० होण्यास ३५ सत्रे लागलीमोदींनी वेगवेगळी ध्येय धोरणे वापरून देशाचा पर्यायाने प्रत्येक नागरिकाचा विकास साध्य केला आणी त्यांच्याच ‘सबका साथ सबका विकास’ या घोष वाक्याला विशेष अर्थ प्राप्त झाला. परदेशी गुंतवणूकदाराचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. सामान्य लोकही पुन्हा शेअर मार्केटकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे तेजीच्या लाटा येऊन मार्केटने उच्चांक गाठला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३०९८५ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९५८० वर बंद झाले.