आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
२१ जून हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होतो. योगाचे असणारे महत्व सर्व जगाला पटले. योगामुळे आरोग्य चांगले राहते. आरोग्यामध्ये शारीरिक आणी मानसिक आरोग्याचा समावेश होतो. जर असे आरोग्य चांगले राहिले तर शेअरमार्केटमधील गुंतवणुकीचे आणी ट्रेडिंगचे निर्णय घेणे सहज शक्य होते. स्थैर्य येते उत्साह येतो त्यातूनच प्रयत्नाला योग्य दिशा मिळते. प्रयत्नातून यश आणी त्यातून संपत्ती असा सुंदर योगायोग साधता येतो. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करताना संयमाची गरज असते. हा संयम योगामुळे येतो. कमीतकमी किंमतीत खरेदी, जास्तीतजास्त किंमतीत विक्री, अफवांपासून स्वतःचा बचाव यासाठी संयम लागतो. म्हणूनच उत्तम योगायोग जुळून येण्यासाठी योगाची कास धरा असे सांगितले जाते
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- क्रूड उत्पादन करणाऱ्या देशांनी क्रूड उत्पादनात वाढ केल्याने क्रूडची किमत कमी होत आहे.
- MSCI निर्देशांकात चीनमधील २२२ ‘A’ शेअर्स चा MSCI इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकात समावेश केला जाईल.हे शेअर्स या इंडेक्सचा ०.७% हिस्सा असतील. यामुळे आता जागतिक गुंतवणूकदार चीन मध्ये जास्त गुंतवणूक करतील. हे शेअर्स मे २०१८ आणी ऑगस्ट २०१८ अशा दोन टप्प्यात MSCI इमर्जिंग मार्केट्स निर्देशांकात सामील केले जातील.
- USA सिनेट मध्ये ओबमाकेअर ही हेल्थकेअर स्कीम रद्द करण्याचा आणी नवीन हेल्थकेअर बिल मजूर होण्याचा चान्स आहे या बिलाप्रमाणे श्रीमंत USA च्या नागरिकांवर लावलेला ३.८% नेट इन्व्हेस्टमेंट TAX रद्द करण्याकरता तरतूद असेल. या कायद्याप्रमाणे २३ मिलियन USA नागरिक हेल्थकेअर प्लानला पारखे होतील.
सरकारी अन्नौंसमेंट
- सरकारने अखेर GST साठी ३० जून २०१७ रोजी रात्री १२ वाजता मुहूर्त ठरवला.आजी माजी पंतप्रधान आणी सर्व प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.तुम्ही आम्ही हा सोहळा दूरदर्शनवर पाहता पाहता अक्षता टाकू शकतो.
- सरकार GST साठी NAA (NATIONAL ANTI-PROFITEERING AUTHORITY) ची स्थापना करेल. ही ऑथारीटी कंपन्या GST मुळे झालेला करातील फायदा ग्राहकांना पास करतात की नाही यावर लक्ष ठेवेल आणी ज्या कंपन्या GST मुळे होणारा करातील फायदा ग्राहकांना पास ऑन करणार नाहीत त्याना दंड तसेच त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यापर्यंत कारवाई करील.
- सरकारने चीन मधून आयात होणाऱ्या दूध आणी दुग्धोत्पन्न पदार्थांवर १ वर्षाकरता बंदी घातली आहे. याचा फायदा नेस्ले, प्रभात डेअरी, पराग मिल्क प्रोडक्टस्, क्वालिटी डेअरी यांना होईल.
- ड्रेजिंग कॉर्पोरेशन मध्ये सरकारचा ७३.४६ % हिस्सा आहे. हा हिस्सा सरकार लिलाव करून विकणार आहे.
- राज्य सरकारच्या लॉटरीवर १२% तर इतर खाजगी लॉटरीसाठी २८% GST चा दर असेल.
- जर घराचे भाडे Rs २५०० ते Rs ७५०० असेल तर १८% GST आणी घराचे भाडे Rs ७५०० च्यावर असेल तर २८% GST लागेल.
- एअरइंडिया मधील आपला स्टेक विकावा असे सरकारचे म्हणणे आहे पण विमानन मंत्रालयाचा त्याला विरोध आहे.
- दिल्लीला धीतोरनी येथे २४६ एकर जागेत स्मार्ट सिटी तयार करण्याचे काम NBCC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मिळाले.
- कर्नाटक राज्य सरकारने Rs ५०००० पर्यंतचे कर्ज माफ केले.
- AIF (आल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट फंड) यांना कमोडीटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. याचा फायदा MCX ला होईल.
- शिपिंग कंपन्यांना ५% GST लावला याचा फायदा OIL कंपन्यांना होईल.
- ज्या बँकेकडे, पोस्ट ऑफिसकडे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे अजून रद्द केलेल्या Rs५०० आणी Rs १००० च्या जुन्या नोटा असतील त्यांना जुलै २०पर्यंत (३० दिवसांच्य मुदतीत) RBI च्या कोणत्याही ऑफिसात जमा करण्याची परवानगी दिली आहे.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- RBI ने PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) खाली बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेवर कारवाई केली.
- सेबीने RESTRUCTURING SCHEME अंतर्गत अडचणीत असलेल्या कंपनीत २५% पेक्षा जास्त स्टेक घेणार्या इन्व्हेस्टरला अल्पसंख्य शेअरहोल्डर्ससाठी ओपन ऑफर आणण्याच्या नियमातून सुट दिली आहे. परंतु यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी लागेल. या स्कीमअंतर्गत आलेल्या नवीन इन्व्हेस्टर्सनी घेतलेल्या शेअर्सना ३ वर्षाचा लॉक इन पिरीयड असेल.
- तसेच सेबीने PE नोटसाठी नियम अजून कडक केले तर FPI साठी असलेल्या काही नियमात सवलती देण्याचा आपण विचार करत आहोत असे जाहीर केले.
- सरकारने असा निर्णय घेतला आहे की ‘ऑर्गनिक फूड’ म्हणून विकल्या जाणाऱ्या PACKAGED फूड साठी FSSAI (FOOD SAFETY AND STANDARDS AUTHORITY OF INDIA) चे CERTIFICATION लागेल
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- DR रेडीजच्या श्रीकाकुलम प्लांटची USFDAने तपासणी केली. त्यात १ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ दिला.
- इप्का LABला USFDA दाखवलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी जो वेळ लागत आहे तो चिंताजनक आहे.
- टाटा स्टीलमध्ये जो टाटा मोटर्सचा स्टेक आहे तो टाटा SONS खरेदी करणार आहे. म्हणजेच टाटा स्टीलला पैसे मिळतील त्यांचे कर्ज कमी होईल आणी टाटा मोटर्समधील टाटा संस चा स्टेक वाढेल.
- ABB आणी L&T यांच्यात L&T ची इलेक्ट्रिकल आणी ऑटोमेशन डिविजन खरेदी करण्यासाठी बोलणी चालू आहेत. या डिविजनचे VALUATION Rs १४००० कोटी ते Rs१८००० कोटी होईल. ABB या डिविजन मध्ये ५१% ते १००% च्या दरम्यान स्टेक खरेदी करेल.
- स्पाईस जेट या प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात असलेल्या कंपनीने US$१.७ बिलियन किमतीची ५० BOMBARDIER Q४०० विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे त्यामुळे ही कंपनी भारतातील सर्वात मोठी TURBOPROP एअरक्राफ्ट ऑपरेटर बनेल.
- महिंद्र एअरोस्पेस ही कंपनी लवकरच आपले AIRVAN नावाची १० सीटर विमान सेवा प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी लौंच करेल.
- कॅनरा बँकेने त्यांचा ‘CARE’ मधील ९% स्टेक Rs ३९३ कोटींना विकला.
- स्टेट बँक ऑफ इंडिया इस्सार स्टील, भूषण स्टील, आणी इलेक्ट्रोस्टील स्टील्स या कंपन्यांविषयी INSOLVENCY अंड BANKRUPTCY कोर्टात अर्ज करेल. या कंपन्यांकडे बँकांचे एकूण Rs १००००० कोटी कर्ज बाकी आहे.
- कर्ज देणाऱ्या बँका आणी मॉनेट इस्पात यांच्यात कंपनीचे IBC (INSOLVENCY एंड BANKRUPTCY CODE) खाली रीऑर्गनायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे, या कंपनीत कर्जदार बँकांचा ५१% स्टेक असल्यामुळे या रीऑर्गनायझेशनला जास्त अडचण येणार नाही असे वाटते.
- टाटा मोटर्स लंडन आणी अमेरिकन STOCK एक्स्चेंज वर JLR चे लिस्टिंग करणार आहे.
- वेदान्ता ही कंपनी झारखंडमध्ये नवीन प्लांट सुरु करणार आहे
- पेट्रोनेट LNG ही मुंद्रा LNG टर्मिनल विकत घेण्यासाठी बोलणी करीत आहे.
- १२ जून २०१७ ते १६ जून २०१७ या दरम्यान ल्युपिन कंपनीच्या पिठमपूर युनिट ३ ची तपासणी केली. 483 फॉर्म इशु केला आणी ५ त्रुटी नोंदवल्या.
- IDFC मध्ये FII ची लिमिट ४८% असते. ती पूर्ण झाल्यामुळे FIIना या शेअरमध्ये गुंतवणूक करायला परवानगी नव्हती. पण सध्या ही गुंतवणूक ४८% पेक्षा कमी असल्याने पुन्हा FII ना गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. .
- GST लागू होण्यापूर्वी आपली इंव्हेनटरी कमी करण्याची शर्यत लागली आहे. पण हा सेल खूप मोठी सूट देऊन केला जात आहे. त्यामुळे विक्रीचे आकडे सुधारतील पण ऑपरेटींग मार्जीन कमी होईल. आणी पुढे मालाला २-३ महिने मागणी कमी येईल. त्यामुळे FMCG, ऑटो सेक्टरचे दुसऱ्या आणी तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येणार नाहीत.
- ग्रासिम आणी AB NUVO यांच्या मर्जरची तारीख ६ जुलै २०१७ ही ठरली.
- टाटा पॉवर, अडानी पॉवर, आणी एस्सार पॉवर या कंपन्यांनी त्यांचा आयात केलेल्या कोळशावर चालणाऱ्या पॉवर प्लांट मध्यील मेजॉरीटी स्टेक गुजरात राज्यसरकारला Rs १ किमतीला विकण्याची तयारी दर्शवली आहे. इंडोनेशिया मधील कायदा बदलल्यामुळे तेथून आयात होणार्या कोळशाच्या किमती वाढल्यामुळे कोणत्याही प्रकारची भरपाई देण्यास सुप्रीम कोर्टाने या कंपन्यांना नकार दिला आहे. या कंपन्यांनी या बाबतीत केंद्र सरकारला मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
- WOCKHARDTने लंडनमधील कोर्टात २.३० कोटी GBP भरून टेसला बरोबरचा आपला तंटा मिटवला.
- २२ कर्जदारांनी एस्सार ओईलला ROJNEFTशी करार करण्यासाठी NOC दिले.
- बोरोसील ग्लास आपल्या Rs १० दर्शनी किमत असलेल्या १ शेअर्सचे Rs १ दर्शनी किमतीच्या १० शेअरमध्ये विभाजन करणार आहे. म्हणजेच एका शेअरला १० शेअर मिळतील. शेअर्स स्प्लीट विषयी माहिती माझ्या पुस्तकात सविस्तर दिली आहे.
- RCOM च्या REHABILITATION PACKAGEला कर्जदारांनी मंजुरी दिली. यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदत दिली. या मुदतीपर्यंत IBC खाली कारवाई करणार नाही असे जाहीर केले.
- कॅनफिना होम्स या कंपनीने ५ शेअरला १ राईट्स शेअरला मंजुरी दिली. कंपनी राईट्स इशू द्वारे Rs १००० कोटी उभारेल. राईट्स इशू विषयी माझ्या पुस्तकात स्वतंत्र CHAPTER आहे.
या आठवड्यात आणी नजीकच्या काळात येणारे IPO
- इंडियन एनर्जी एक्स्चेंज ने IPO साठी सेबीकडे अर्ज केला आहे. टाटा पॉवर त्यांचा हिस्सा विकणार आहेत.
- IRCTC ने IPO साठी प्रक्रिया वेगात सुरु केली.
- एरिस लाईफसायन्सेसचा IPO ३.३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला. QIB कोटा ४.७ वेळा आणी रिटेल कोटा ३.३ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
- CDSL या डीपॉझीटरी क्षेत्रात काम करणार्या कंपनीचा IPO एकूण विक्रमी १७० वेळा तर या मधील HNI कोटा ५६३ वेळा तर रिटेल कोटा २३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
- २८जुन २०१७ पासून ते ३०जुन २०१७ पर्यंत AU SMALL FINANCE बँकेचा IPO ओपन राहील. याचा प्राईस BAND Rs ३५५ ते Rs ३५८ असेल मिनिमम लॉट ४१ शेअर्स आहे.या बँकेच्या ३०० शाखा असून गुजरात राजस्थान NCR छत्तीसगड या राज्यात मुख्यतः यांच्या शाखा आहेत. ही बँक मुख्यतः PRODUCT BASED कर्ज देते. या बँकेचे NPA २% च्या आसपास असतात. ही बँक लहान वाहने, लहान हौसिंग आणी बिझिनेस लोन देते.
तांत्रिक विश्लेषण
- मन्नापुरम फायनान्स या शेअरचा गुरुवारचा चार्ट बघितल्यास रिव्हर्स हेड एंड शोल्डर चा PATTERN दिसला. या PATTERNचा प्राईस VOLUME ब्रेकऑऊट झाला.
- रिलायंस डिफेन्सचा चार्ट बघितल्यास लहानसा TRIANGLE PATTERN दिसला. या PATTERNचा ब्रेकऑऊट झाल्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये शेअरची किंमत वाढली.
मार्केटने काय शिकवले
गेल्या वर्षी GST बिल पास होण्याच्या वेळेपासून लॉजिस्टिकचे शेअर्स वाढले. मध्यंतरी काही काळ पडले आणी आता पुन्हा आता १ जुलै २०१७ पासून GST लागू होणार म्हणल्यावर ह्या शेअरमध्ये हालचाल दिसू लागली. म्हणजेच लोक पैसा अडकवून ठेवत नाहीत. काही महिने हे शेअर्स वाढण्याची शक्यता नसेल तर ते शेअर विकून तोच पैसा ज्या शेअरमध्ये हालचाल असेल त्या शेअर मध्ये गुंतवतात. पैसा जेवढा खेळता राहील तेवढा नफा जास्त पण योग्य वेळ साधता आली पाहिजे.
या आठवड्यात मार्केटने जाहीर केले – ‘आता मी थकलो काही काल विश्रांतीची गरज आहे.’ थोड्या थोड्या प्रमाणात मार्केटने माघार घेतली. पण ज्या गुंतवणूकदारांनी किंवा ट्रेडर्सनी गुंतवणुकीची किंवा ट्रेडिंगची शिस्त पाळली असेल, STOP LOSSचा उपयोग केला असेल, आणी वेळेवर प्रॉफीट बुकिंग केले असेल त्याना या वेळेचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी करता येईल. पुढील ३ दिवस मजेत घालवता येतील. आणी नवीन संधीचा विचार करता येईल
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१११८ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९५७३ वर बंद झाले.