आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आठवड्याचे-समालोचन – अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने – २४ जुलै २०१७ ते २८ जुलै २०१७
सर्व वाचकांचे त्याचप्रमाणे ज्यांनी गुंतवणूक केली, ज्यांच्या संपत्तीत, उत्पन्नात निफ्टी १०००० ला पोहोचल्यामुळे वाढ झाली त्या सर्वांचे अभिनंदन. मी मागोवा शेअर मार्केटचा या सदरातील १३ मार्च ते १७ मार्च या ब्लॉग मध्ये ‘अब की बार निफ्टी १००००’ असे सांगितले होते. निफ्टी १०००० वर पोहोचेल हे भाकीत ४ महिन्यांपूर्वी केले होते हा अंदाज बरोबर आला त्यामुळे खूप आनंद झाला.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- रशिया, सौदी अरेबिया, नायजेरिया, यांनी त्यांच्या क्रूडच्या उत्पादनात घट होईल असे सांगितले.
- फेड (USA ची सेन्ट्रल बँक) ने आपले दर वाढवले नाहीत आणी आपण हळूहळू आपल्या BALANCESHEETची साईझ कमी करू असे सांगितले. फेड आपले रेट डिसेंबरमध्ये वाढवेल असा अंदाज आहे.
सरकारी अन्नौंसमेंट
- स्पेक्ट्रमसाठी जी रक्कम टेलिकॉम कंपन्यांनी द्यायची होती त्यासाठी ८ वर्षाची मुदत होती ही मुदत ८ वर्षांनी वाढवली जाणार आहे.
- या आठवड्यात साखरेचे भाव १०% वाढले सरकारने ‘ISMA’ ला यात लक्ष घालून जरुर ती उपाययोजना करायला सांगितले. ‘ISMA’ ने साखर कारखान्यांना साखरेचा पुरवठा वाढवण्यास सांगितले. तसेच साखरेचे भाव कमी करायला सांगितले.
- बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्याची मुदत आता ६० दिवसांवरून ४५ दिवसांवर आणली.
- सोडियम नायट्रेट वर ANTIDUMPING ड्युटी लावण्याची शक्यता आहे. याचा फायदा दीपक नायट्रेट या कंपनीला होईल.
- चीन, तैवान, मलेशिया या देशातून सोलर सेलचे DUMPING होत आहे असे आढळले आहे. सरकार लक्ष ठेवून आहे यात जर तथ्य आढळले तर ANTI DUMPING ड्युटी लावली जाईल याचा फायदा WEBSOL एनर्जी या कंपनीला होईल.
- सरकारने PNG आणी CNG चे दर वाढवले याचा फायदा इंद्रप्रस्थ GAS महानगर GAS यांना होईल.
- सरकारकडून भांडवल मिळण्यासाठी आवश्यक असलेला टर्नअराउंड प्लान १० सरकारी बँकांनी सादर केला. बँका या टर्नअराउंड प्लानप्रमाणे काम आणी प्रगती करतात की नाही यावर सरकार लक्ष ठेवेल.
- सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी सरकार १०% वरून २% वर आणण्याच्या विचारात आहे. याचा फायदा PC ज्युवेलर्स, थंगमाई ज्युवेलर्स, TBZ, गीतांजली जेम्स, TITAN या कंपन्यांना होईल.
RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था
- आयडिया व्होडाफोनच्या मर्जरला CCI (COMPETITION COMMISION OF INDIA) ने मुदतीआधी बिनशर्त मंजुरी दिली.
- RBI ने बँकांना सर्व NCLT ला रिफर केलेल्या किंवा लिक्विडेशनसाठी गेलेल्या सर्व अकौंटसाठी अनुक्रमे ५०% आणी १००% प्रोविजन करायला सांगितली आहे. यामुळे बँकांच्या तिमाही निकालांवर परिणाम होईल. RBI ची क्रेडीट पॉलिसी २ ऑगस्ट रोजी येईल. यावेळी सर्व परिस्थिती अनुकूल असल्यामुळे RBI रेट कट करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
- सेबी सर्व लिस्टेड कंपन्यांना जर कर्जाच्या हप्त्याच्या किंवा कर्जावरील व्याजाच्या परतफेडीत ‘DEFAULT’ झाला तर ती गोष्ट STOCK एक्स्चेंजला कळवणे सक्तीचे करण्याचा विचार करीत आहे.
- नीती आयोगाने एक व्हिजन स्टेटमेंट दिले आहे. ऑईल आणी gas सेक्टरमधील PSU चे जसे मर्जर केले जात आहे त्याच पद्धतीने PSU ट्रेडिंग कंपन्यांचे पण एकत्रीकरण करावे हा विचार आहे यामध्ये MMTC STC या कंपन्यांचा समावेश होतो.
- सेबी भारतीय कंपन्यांच्या फॉरीन फंडवर मर्यादा घालण्याच्या विचारात आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- ‘CETIRIZINE SOFTGEL’ या स्ट्राईड ससूनच्या औषधाला USFDA कडून परवानगी मिळाली.
- AMTEK ऑटो त्यांचे ASSETS लिबर्टी ग्रुपला विकत आहेत. AMTEK ग्रुपला ३२ बँकांनी कर्ज दिले आहे. या बँकांना त्याचा फायदा होईल.
- राजस्थान गुजरात रोडवर टोल वसूल करायला IRB इन्फ्राने सुरुवात केली.
- IT इन्फ्रा सोल्युशनसाठी विप्रोने HPCL बरोबर करार केला.
- भारती ग्रूप आणी सॉफट बँकेमध्ये भारती एअरटेलमध्ये स्टेक घेण्यासाठी बोलणी चालू आहेत.
- AXIS बँक, भारती एअरटेल, MRPL, DR. रेड्डीज, बायोकॉन, ONGC, यांचे तिमाही निकाल असमाधानकारक होते. ICICI बँकेचे निकाल ठीक होते. टाटा कम्युनिकेशन ही कंपनी तोट्यातून नफ्यात आली म्हणजेच टर्नअराउंड झाली. Rs २६१ कोटी तोट्याचा या तिमाहीत Rs ३५ कोटी फायदा झाला. लार्सेन अंड टुब्रो या कंपनीचे १ ल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. इन्कम आणी प्रॉफीटमध्ये वाढ झाली. मार्जिन ८.६% वर आहे.
- जम्मू आणी काश्मीर बँक, विजया बँक, L& T फायनांस, ओरीएंट सिमेंट, HCL टेक,वेदांत, फेडरल बँक, ग्लेनमार्क फार्मा, ITC, IDFC BANK, (ट्रेजरी इन्कम मध्ये वाढ), रिलायंस कॅपिटल, HDFC बँक यांचा निकाल चांगला आला.
- इंद्रप्रस्थ GAS या कंपनीचे FII लिमिट २४% वरून ३०% केले.
- CLARIS लाईफसायन्सेसने आपला इंजेकटिबल ड्रग बिझिनेस BAXTER कंपनीला Rs४१०० कोटींना विकला होता. हे डील आता USA च्या ऑथारीटीने क्लीअर केले आहे. त्यामुळे कंपनी विशेष लाभांश किंवा जास्त किमतीला शेअर ‘BUY BACK’ करेल असा शेअरहोल्डर्सचा अंदाज आहे.
- अशोक LEYLANDला कर्नाटक राज्य सडक परिवहन निगमकडून Rs ६०० कोटींची ऑर्डर मिळाली.
कॉर्पोरेट एक्शन
- JUST DIAL ने Rs ७०० ला शेअर BUY BACK जाहीर केला.
- दिशमन फार्माच्या सबसिडीअरीच्या लिस्टिंगला परवानगी मिळाली.
- बुधवार तारीख २६ जुलै २०१७ रोजी NFL (NATIONAL FERTILIZER LIMITED) ची OFS झाली. सरकारने आपला १५% स्टेक विकला. Rs ७२.८० पैसे ही फ्लोअर प्राईस होती. हा इशू गुरुवारी तारीख २७ जुलै २०१७ रोजी रिटेल गुंतवणूकदारासाठी ओपन झाला. या OFS ला चांगला प्रतिसाद मिळाला.
- सियाराम सिल्क मिल्स आपल्या एक शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लीट करणार आहे.
- टाटा ELEXI या कंपनीने १:१ बोनस दिला.
- AXIS बँकेने ‘फ्री चार्ज‘ ही डिजिटल पेमेंट कंपनी खरेदी केली.
- वेदान्ता डेक्कन गोल्ड माईन्स मधला स्टेक विकत घेणार आहे. त्यामुळे डेक्कन गोल्ड माईनच्या शेअरसाठी ओपन ऑफर येण्याची शक्यता आहे.
नजीकच्या काळात येणारे IPO
- कोचीन शिपयार्ड या जहाजबांधणीच्या आणी जहाजदुरुस्तीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा Rs १४६८ कोटींचा (यापैकी सरकार आपला स्टेक विकून Rs ४८९ कोटी उभारेल तर राहिलेल्या रकमेचे फ्रेश शेअर्स इशू होतील.) IPO १ ऑगस्टला ओपन होत आहे. या इशुचा प्राईस BAND Rs ४२४ ते Rs ४३२ असा असेल. किरकोळ गुंतवणूकदारांना Rs २१ चा डिस्काउंट दिला जाईल. या IPO च्या पैशांचा विनियोग कंपनीच्या विस्तार योजनांसाठी केला जाईल. कंपनीचा बहुतेक बिझिनेस संरक्षणाशी संबंधीत आहे.
- MSTC या कंपनीचा IPO येण्याची शक्यता आहे. या कंपनीत SAIL चा स्टेक आहे
- सिक्युरिटी एंड इंटेलिजन्स सर्विसेस (इंडिया) लिमिटेड या कंपनीचा IPO ३१ जुलै २०१७ रोजी उघडून २ ऑगस्ट २०१७ ला बंद होईल याचा प्राईस band Rs ८०५ ते Rs ८१५ असून मिनिमम लॉट १८ शेअर्सचा आहे.
मार्केटने काय शिकवले
मंगळवार २५ जुलै २०१७ रोजी PUT/CALL रेशियो १.४८ होता. हा रेशियो एक्सपायरीच्या दिवशी १.६० पर्यंत गेला. एक्सपायरीच्या आसपास लोकांनी १-२ दिवस पोझिशन घेतलेली असते. त्यामुळे ही विशेष तात्कालिक घटना समजून या रेशियोकडे तात्पुरते दुर्लक्ष करावे.
मार्केटमध्ये कोणतीही बातमी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे समजणे गरजेचे असते. विशेषतः तिमाही निकालाकडे या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे लागते. हल्ली अशा दोन घटना निदर्शनास आल्या. HDFC बँकेचे NPA थोडे वाढले आणी त्यात ६०% शेतीसंबंधीत कर्ज आहेत ही बातमी लोकांना प्रथम नकारात्मक वाटली. पण कर्जमाफीच्या निर्णयामुळे यातील बहुतांशी NPA साठी सरकारकडून कर्जमाफी धोरणाखाली वसुली येईल. त्यामुळे ही बातमी प्रथमदर्शनी वाटली तेवढी नकारात्मक नाही. IDFC बँकेचा बहुतांशी नफा हा ट्रेजरी इन्कमपासून आणी करपरताव्यामुळे आलेला आहे. त्यांचे रिटेल आणी कॉर्पोरेट कर्जावरच्या व्याजात घट झाली आहे. याचा अर्थ बँक आपल्या कोअर उद्योगापेक्षा इतर उद्योगातून नफा मिळवत आहे. पार्टीसिपेटरी नोटच्या मदतीने FII ट्रेडिंग करू शकणार नाहीत ह्या बातमीचेसुद्धा निट आकलन करता आले नाही.
औषध कंपन्यांनी संशोधन आणी नवीन औषधे शोधण्यासाठी केलेला खर्च हा पॉझीटीव्ह समजला पाहिजे. औषध कंपन्यांसाठी ही भविष्यकाळात बिझिनेस वाढवण्यासाठी केलेली गुंतवणूक समजावी. कंपन्यांचा खर्च का वाढला हे कंपनीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये/ CONCALL मध्ये ऐकले पाहिजे.
मार्केटमध्ये सगळ्या माहितीकडे, शेअर्सच्या किंमतीमध्ये होणाऱ्या फेरबदलाकडे तसेच सरकारच्या वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णयाचा,आंतरराष्ट्रीय घटनाक्रमाचा आपल्याकडे असलेल्या किंवा आपण खरेदी करत असलेल्या शेअर्सवर काय परिणाम होईल याचा एकलव्य बनून सतत व्यासंग करायचा की एकदा शेअर्समध्ये पुंजी गुंतविली की दुसऱ्या कोणी येऊन उठवेपर्यंत कुंभकर्णाप्रमाणे दुर्लक्ष करायचे हे तुमच्यावरच अवलंबून आहे.
मार्केट आता सर्वोच्च स्तरावर आहे. एरवी Rs १० ते Rs ४० किंमत असलेले शेअर्स आता Rs 100 च्या वर पोहोचले आहेत. अशावेळी आपल्याजवळ असलेले पैसे चांगले शेअर्स महाग आहेत, आपल्या ऐपतीच्या बाहेर आहेत म्हणून ज्याला PENNY शेअर्स किंवा कर्जात आकंठ बुडालेल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यात घालवू नका. कारण मार्केटमध्ये करेक्शन आले तर चांगल्या कंपन्यांच्या शेअरची किंमत कमी झाली तरी त्यांची कार्यक्षमता, प्रॉफीटेबिलीटी कमी झालेली नसते. कालपरत्वे त्यांचे भाव पुन्हा वाढतात. परंतु PENNY शेअर्सचे भाव खूप खाली येतात किंवा अडचणीत आलेल्या कंपन्यांच्या अडचणी वाढतच जातात. आणी तुमच्या पोर्टफोलीओला एक मोठे भगदाड पडते. लक्षात ठेवा PENNY शेअर्स सगळ्यात शेवटी मार्केटमध्ये करेक्शन यायच्या वेळी वाढतात. तेव्हा यात ‘चट मंगनी पट ब्याह’ असे लक्षात ठेवून मर्यादित फायदा मिळाला की बाहेर पडा.
आपण जर निफ्टीची प्रगती पहिली तर लक्षात येईल की निफ्टीने मार्च १५ २०१७ पासून ९१ सत्रात ९००० वरून १०००० पर्यंत मजल मारली. २५/०७/२०१७ मंगळवार रोजी निफ्टी १००११ वर उघडला पण टिकला नाही. २६/०७/२०१७ रोजी निफ्टी १००००च्या वर बंद झाला. २७/०७/२०१७ ला मार्केट इंट्राडे १०१००वर पोहोचले. जुलै महिन्याच्या वायद्याची एक्सपायरी निफ्टी १०००० च्यावर झाली. आणी ह्या आठवड्याचा शेवटसुद्धा १०००० च्या वर झाला.
या निफ्टीच्या प्रवासाची काही ठळक वैशिष्टे. १९९६ साली निफ्टी ची बेस VALUE १००० पकडली. १०००० निफ्टी होण्यासाठी २१ वर्षे लागली. २००१ पासून २००८ पर्यंत निफ्टी संथ गतीने का होईना वाढत होता. मार्केटने २००८ मध्ये मोठा हबका खाल्ला. मार्केट २०१३ पर्यंत साईडवेजच राहिले. २०१३ पासून मार्केट बदलत गेले. नोव्हेंबर २०१३ मध्ये पुन्हा एकदा मार्केटने २००८ची पातळी (सेन्सेक्स २१२९६ आणी निफ्टी ६३५७) गाठली. राजकीय परिस्थिती सुधारली. बहुमतातील सरकार निवडून आल्यामुळे महत्वाचे धोरणात्मक निर्णय जलदगतीने होऊ लागले. देवांनीही कृपादृष्टी ठेवली. पाउस चांगला पडला. क्रूडचा भाव कमी होत गेला. लोकांचा शेअरमार्केट वरचा विश्वास वाढला, त्यामुळे SIP (सिस्टीमटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) च्या माध्यमातून डोमेस्टिक फंडांची मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली. रुपया वधारला. जेव्हा जगातील सर्व अर्थव्यवस्था (चीनमध्ये प्रगती होत होती) प्रगती करण्यासाठी धडपडत होत्या. तेव्हा भारतात ७ % प्रगतीचा वेग होता. अर्थात मार्केटने २०१३ पासून मागे वळून पाहिले नाही, आणी निफ्टीने १०००० चा टप्पा गाठला.
प्रथम लहान मूल पलंगाला धरून उभे राहते, नंतर धरून धरून चालायला लागते आणी एक दिवस स्वतंत्र आधाराशिवाय उभे राहते. हे पहाताना त्याच्या आईवडिलांना मोजता न येण्याएवढा आनंद होतो. तसेच काहीसे या आठवड्यात घडले. निफ्टी ने १०००० आणी सेन्सेक्सने ३२००० चा टप्पा पार केला तेव्हा गुंतवणूकदारांना आणी ट्रेडर्सना तसाच आनंद झाला. भले त्यातील काही गुंतवणूकदारांना, ट्रेडर्सना मार्केटचा हा प्रवास सुखाचा झाला नसेल पण तरीही निफ्टी ने १०००० चे शिखर सर केले याचा वेगळाच आनंद सर्वांनी अनुभवला हे निःसंशय खरे आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२३०९ आणी NSE निर्देशांक निफ्टी १००१४ वर बंद झाले तर बँक निफ्टी २४८११ वर बंद झाला.