Monthly Archives: August 2017

आठवड्याचे-समालोचन – ज्ञानाचा श्री गणेशा फायदेशीर गुंतवणूक – २१ ऑगस्ट २०१७ ते २४ ऑगस्ट २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ज्ञानाचा श्री गणेशा फायदेशीर गुंतवणूक – २१ ऑगस्ट २०१७ ते २४ ऑगस्ट २०१७
गेल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी इन्फोसिसचे CEO विशाल सिक्काच्या राजीनाम्यामुळे जे वादळ आले त्या वादळानंतरच्या भयाण शांततेत सोमवार उगवला. शनिवारच्या इन्फोसिसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअर ‘BUY BACK’चा जो निर्णय झाला तो गुंतवणूकदारांना फारसा पटला नाही. तसेच २०० कंपन्या डीलिस्ट करण्यासाठी सेबीने काढलेली ऑर्डर, त्यातून हा आठवडा लहान, गणेशचतुर्थीची सुट्टी त्यामुळे लॉन्ग WEEK एंड मिळाला, बाप्पाचे स्वागत करण्यात सगळे व्यस्त त्यामुळे संमिश्र वातावरणात आठवडा संपला.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • शुक्रवारी सर्व सेन्ट्रल बँकांची JACKSON HOLE येथे परिषद आहे. त्याकडे सर्व गुंतवणूकदार आणी ट्रेडर्सचे लक्ष लागले आहे. या परिषदेत ‘क्वांटीटेटीव इझिंग’ कमी करण्यावर विचार होईल.
 • USA मध्ये ‘बिझिनेस फ्रेंडली’ TAX रीफार्म्स लवकर येतील यावर तेजीने काम चालू आहे असे USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले त्यामुळे USA मधील शेअरमार्केटमध्ये तेजी आली.
 • केनयात चहाच्या पिकाचे जबर नुकसान झाल्यामुळे भारतीय चहाच्या निर्यातीत वाढ होण्याची आणी किंमत सुधारण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • मंत्रिमंडळाने बँक मर्जरला तत्वतः मान्यता दिली. वेगवेगळ्या बँकांचे मर्जर ग्रूप ऑफ मिनिस्टर मंजूर करतील. एकाच कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बँकांचे मर्जर होईल. हा कायदा स्टेट बँक ऑफ इंडिया आणी IDBI यांना सोडून सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना लागू होईल. या मर्जरसाठी ASSET ची गुणवत्ता, कॅपिटल ADEQUACY, आणी प्रॉफीटेबिलीटी हे निकष लावले जातील. या मर्जरसाठी बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी लागेल.
 • मंत्रिमंडळात आणी विविध मंत्रालयांच्या कार्यक्षेत्रात बदल केले जातील. रेल्वे मंत्रालय आणी एअरपोर्ट मंत्रालय एकत्र केले जाईल. जसे शिपिंग आणी रोड विभाग एकाच मंत्रालयाचा भाग केले आहेत. या शक्यतेमुळे रेल्वेचे शेअर्स चालत आहेत.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • श्रीराम ईपीसी या कंपनीच्या संबंधात NCLTने INSOLVENCY ला मंजुरी दिली.
 • जे पी इंफ्राच्या INSOLVENCY संबंधात FLAT ग्राहकांचे अपील सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतले.
 • सुप्रीम कोर्टाने एकमताने निर्णय दिला की निजता (PRIVACY) हा घटनेच्या कलम नंबर २१ च्या अंतर्गत महत्वाचा मुलभूत अधिकार आहे. कोणावरही त्याची वैयक्तिक माहिती देण्यासाठी सक्ती होऊ शकत नाही, पण जर एखादा स्वेच्छेने आपली वैयक्तिक माहिती देण्यास तयार असेल तर तो ही माहिती दुसऱ्याला देऊ शकतो. पण सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणी दुर्मिळ राष्ट्रीय संपत्ती अन्नधान्य आणी इतर अत्यावश्यक गोष्टीसाठी वैयक्तिक माहिती मागवू शकते. याचा परिणाम आधार कार्ड, वेगवेगळ्या अर्जात विचारली जाणारी वैयक्तिक माहिती याच्यावर होऊ शकतो.
 • BSE ने निर्देशांक आणी STOCK ऑप्शन CONTRACTसाठी काही ‘IN THE MONEY’CONTRACTS वर एकस्पायरीच्या दिवशी ‘DO NOT EXERCISE’ म्हणून FACILITY दिली आहे. ही FACILITY संध्याकाळी 4-30 ते 5 या वेळेत वापरायची आहे. वर्तमान परिस्थितीत IN THE MONEY CONTRACTS मधील सर्व ओपन लॉंग पोझिशन AUTOMATICALLY EXERCISE होतात आणी त्याची कॅश सेटलमेंट होते. यात जर फायदा कमी असेल तर त्यामुळे एकूण व्यवहारात नुकसान होते.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • पाउस ६% कमी पडल्यामुळे याचा परिणाम तांदूळ कापूस आणी डाळींच्या पिकावर होईल. आणी पर्यायाने या क्षेत्रात बिझिनेस करणाऱ्या कंपन्यांवर होईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • पारादीप रीफायनरीसाठी सरकारकडून दरवर्षी IOC ( INDIAN OIL CORPORATION) ला Rs ७०० कोटी (VGF) मिळतील. ओडिशा सरकार १५ वर्षापर्यंत व्याज न देता कर्ज देणार आहे. याशिवाय काही करातही सवलती देणार आहे.
 • विक्रम बक्षीबरोबरचे सर्व संबंध MACDONALD USA ने तोडले आहेत. क्विक सर्व्हिस RESTARAUNT या नावाने इस्ट आणी नॉर्थ मध्ये ही सेवा पुरवत होते. MACDONALD ही सेवा आता वेस्टलाईफ इन्व्हेस्टमेंटकडून घेईल. त्यामुळे वेस्ट लाईफ या कंपनीला फायदा होईल वेस्ट लाईफ हा शेअर रिव्हर्स मर्जर झाल्यानंतर BSE वर लिस्ट झाला. हा शेअर पाहिजे तेवढा लिक्विड नाही.
 • SBI त्याच्या गोल्डलोनसाठीच्या प्रोसेसिंग चार्जेसमध्ये ५०% सुट देणार आहे.
 • ल्यूपिनच्या औरंगाबाद युनिटसाठी USFDA कडून क्लीन चीट मिळाली.
 • HCL इन्फो ही कंपनी भारतात APPLEची प्रोडक्ट्स विकेल.
 • ”विलमार शुगर’ या कंपनीने रेणुका शुगर ही कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली.
 • टाटा पॉवर या कंपनीने पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु केले.
 • बजाज ऑटोने सिटी १०० चे इलेक्ट्रिक व्हेरीयंट मार्केटमध्ये Rs ३९००० ला आणले.
 • अलेम्बिक फार्माने आपले हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे असलेले युनिट विकले.
 • आजपर्यंत कसिनो पाण्यावर चालत होते. ते जमिनीवर चालवावेत असा प्रस्ताव आहे. सिक्कीमला एअरपोर्ट झाला की कसिनोच्या व्यवसायाला गती मिळेल. यामुळे डेल्टाकॉर्पच्या शेअरला गती मिळाली.
 • ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल, डीझेल मध्ये मिसळण्यासाठी Rs ३९ प्रती लिटर या भावाने इथनॉल खरेदी करतात. इथनॉलच्या किंमतीत Rs २ ची वाढ करण्याची मागणी होत आहे. यामुळे राजश्री शुगर उगार शुगर आणी प्राज इंडस्ट्रीज यांचा विचार करावा.
 • PFIZER या कंपनीने न्युमोनियावर औषध तयार केले. ह्या औषधाला भारतात मंजुरी मिळाली. सन २०२६ पर्यंत दुसरी कोणतीही कंपनी हे औषध बनवू शकणार नाही.
 • एरिस लाईफसायन्सेसची FII मर्यादा २४% वरून ४९% केली.
 • नोव्हारटीसने हिवतापावर औषध तयार केले आहे. या बाबतीत फक्त १% काम बाकी आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • इन्फोसिस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या ३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शेअर्स ‘BUY BACK’ ची घोषणा केली. इन्फोसिस या ‘BUY BACK’ वर प्रती शेअर Rs ११५० याप्रमाणे १३००० कोटी खर्च करेल. ही ‘BUY BACK’ ची किंमत मार्केटमधील शेअरच्या शुक्रवार १८ ऑगस्ट २०१७ क्लोजिंग किमतीवर २४.५ % आहे. गुंतवणूकदाराना मात्र हे मान्य नाही. कारण कंपनीच्या CEO विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यामुळे शेअर ९% पडला. या पडलेल्या किमतीवर हा २४.५% प्रीमियम आहे. अन्यथा इन्फोसिसची किंमत Rs १००० च्या जवळपास होती. टी सी एस ने १४%, विप्रोने २४% तर HCL TECH ने १६ % प्रीमियमवर शेअर्स ‘BUY BACK’ केले. या कंपन्यांनी दिलेला प्रीमियम हा मार्केट मध्ये या कंपन्यांच्या शेअर्सची नियमित खरेदीविक्रीच्या किमतीवर आधारीत आहे. म्हणजे इफेक्टिव प्रीमियम सुमारे १५% झाला.USA मध्ये इन्फोसिसवर ३ क्लास एक्शन सूट दाखल करण्यात आल्या आहेत. इन्फोसिसचे प्रमोटर संस्थापक आणी २००२ ते २००७ या कालावधीत CEO म्हणून यशस्वी झालेले नंदन निलेकणी पुन्हा इन्फोसिसमध्ये येणार या बातमीमुळे शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार, ट्रेडर्स यांच्यात आशेचे वातावरण निर्माण झाले आणी ते शेअर्सच्या वाढलेल्या किमतीत परावर्तीत झाले. तसेच दोन महिला डायरेक्टर्स सोडून बाकी सर्व डायरेक्टर्सनी राजीनामे देऊ केले आहेत. याचा अर्थ नंदन निलेकणींच्या वापसीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. रिटेल इन्व्हेस्टर्सचे ६० % शेअर्स ‘BUY BACK’ मध्ये स्वीकारले जातील असा अंदाज आहे. एल आय सी कडे इन्फोसिसचे ७.३% शेअर्स आहेत यापैकी किती शेअर्स ‘BUY BACK’ मध्ये द्यावेत या बाबतीत त्यांनी IRDA आणी नंतर अर्थमंत्रालयाशी चर्चा केली.
 • इंडियन हॉटेल्स राईट्स इशूद्वारे Rs १००० कोटी उभारणार आहे.
 • IDEA आणी व्होडाफोन यांच्या मर्जरसाठी DOT ला अर्ज दिला. या कंपन्यांकडे असलेले १६ सर्कलमधील अतिरिक्त स्पेक्ट्रम त्यांना एक वर्षाच्या आत DOT ला परत करावे लागेल.
 • कॅडिला हेल्थकेअरमध्ये टॉरट फार्माचे मर्जर होण्याची शक्यता आहे.
 • ONGCच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी HPCL मधील सरकारचा ५१.११ हिस्सा विकत घ्यायला तत्वतः मंजुरी दिली.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • रिलायंस कॅपिटल AMC बिझिनेस साठी IPO आणणार आहे.
 • HDFC लाईफने IPO साठी IRDA कडे परवानगीसाठी अर्ज केला आहे तसेच सेबीकडे DRHP दाखल केले आहे.
 • APPEX FROZAN फूड्स या कंपनीचा IPO २१ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१७ पर्यंत ओपन होता. याचा प्राईस BAND Rs १७१ ते Rs १७५ असून मिनिमम लोट ८० शेअर्सचा होता. ही कंपनी ‘झिंगा’ मच्छीचे उत्पादन आणी प्रोसेसिंग करून USA आणी UK ला निर्यात करते. ह्या कंपनीचा IPO ६ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • SREI इन्फ्रा ही कंपनी आपली सबसिडीअरी भारत रोड नेटवर्कचा IPO ६ सप्टेंबर २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७ या काळात आणत आहे.
 • SANCO इंडस्ट्री’च्या शेअर्समध्ये NSE वर पुन्हा ट्रेडिंग सुरु झाले.
 • MTNL आपली मुंबई आणी दिल्ली येथील मालमत्ता विकणार आहे.
 • DHFL ही हौसिंग फायनान्स क्षेत्रातील कंपनी आपली BKC मधील मालमत्ता Rs ७०० ते Rs ७५० कोटींना विकणार आहे.
 • दिलीप बिल्डकॉन ही कंपनी श्री इन्फ्रा आणी AION कॅपिटल यांचे ASSETS खरेदी करणार आहे.

मार्केटने काय शिकवले
इन्फोसिसचे काय करावे? हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. ज्यांनी अहुनाही शेअर्स विकत घेतलेले नाहीत त्यांनी घ्यावेत. कारण रिटेल (ज्यांची गुंतवणूक Rs २,००,००० पेक्षा कमी आहे) गुंतवणूकदारांसाठी ACCEPTANCE रेशियो ६०% च्या आसपास पडेल. सध्याचा भाव Rs ८७० ते Rs ९१० या रेंज मध्ये आहे. साधारण Rs २५० ते Rs ३०० फायदा मिळू शकतो. जर ‘BUY BACK’ मध्ये शेअर्स दिले तर ६०% म्हणजे १०० शेअर्सपैकी ६० शेअर्स ‘BUY BACK’ प्रती शेअर Rs ११५० या भावाने घेतील. ४० शेअर्स उरतील. हे शेअर्स सुमारे Rs २५० ते Rs ३०० स्वस्त पडले असे समजावे. राजीनाम्यामुळे उठलेले वादळ शमले की शेअर पुन्हा वाढेल. गेल्या दोन दिवसात शेअर Rs ८७० वरून ९१४ पर्यंत पोहोचला. जवळचे शेअर्स घाबरून जाऊन विकून टाकू नका. ‘BUY BACK’ मध्ये अवश्य द्या. गुरुवार २४/०८/ २०१७ रोजी नंदन निलेकणी यांनी नॉन एक्झिक्युटिव्ह, नॉनइंडिपेंडंट चेअरमन म्हणून इन्फोसिसचा चार्ज घेतला. शेषशायी आणी दोन युरोपिअन डायरेक्टर्सनी राजीनामा दिला. अशाप्रकारे सर्व गुंतवणूकदार, ट्रेडर्स यांनी बांधलेली अटकळ पुरी झाली. सुरक्षित आणी यशस्वी हातात इन्फोसिसची सूत्रे गेली शेअर मार्केटमधील सर्व घटक कंपनीच्या भावी कामगिरीविषयी आश्वस्त झाले. त्यामुळे आता इन्फोसिसचा शेअर पडणे थांबायला हरकत नाही.
काही काही वेळेला एखाद्या मोठ्या आणी प्रसिद्ध गुंतवणूकदाराने एखाद्या कंपनीत गुंतवणूक केली, किंवा ठराविक डायरेक्टर्सचे नाव बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये पाहून कंपनी चांगली आहे असा तर्क करून किरकोळ गुंतवणूकदार शेअर्स खरेदी करतात. नेहेमी लोक जवळच्या, सोप्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. पण हा रस्ता निसरडा किंवा धोक्यांनी भरलेला आहे का? ते पहावे.
IDBI आपले नॉन कोअर ASSET विकणार आहे. SIDBI आणी CCIL मधील आपला स्टेक विकणार आहे.अशा बातमीकडे बघण्याचा दृष्टीकोन २ प्रकारचा असू शकतो. (१) ज्या वेळी तुमचा मुख्य व्यवसाय जोरात चालू आहे आणी तुम्हाला बाकीच्या छोट्या उद्योगांकडे लक्ष द्यावयास वेळ मिळत नाही. (२) जेव्हा मुख्य व्यवसायाची परिस्थिती इतकी बिकट झाली की कितीही ठिगळे लावून उपयोगी नाही नाईलाजाने हे asset विकावे लागत आहेत. IDBI चा मुख्य व्यवसाय अडचणीत आहे. म्हणून IDBI आपले नॉनकोअर ASSET विकत आहेत.  याविरुद्ध CG पॉवर चा मुख्य बिझिनेस चांगला चालू आहे. ते आपले नॉनकोअर बिझिनेस विकून कर्ज कमी करत आहेत. जे व्यवसाय तोट्यात चालू आहेत ते विकत आहेत आणी जे व्यवसाय तोट्यातून फायद्यात येत आहेत ते व्यवसाय न विकता त्यात सुधारणा करत आहेत. हा दृष्टीकोण चांगला आहे. काही काही डील अशी असतात ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही पण अशी डील उलगडून पहावी लागतात.
ROS NEFT आणी एस्सार ओईल यांच्यात जे डील झाले त्याचा अभ्यास करावा. एस्सार ऑईलने त्यांचे वाडीनार पोर्ट ROSNEFT या रशियन कंपनीला US $ १२९० कोटीना विकले. या रशियन कंपनीची ही भारतातील सर्वात मोठी FDI असेल. एस्सार ओईल भारतीय बँकांचे Rs ४००० कोटींचे कर्ज फेडेल. यात १८ बँकांच्या कर्जाची परतफेड होईल यात प्रामुख्याने ICICI बँक, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणी IDBI यांचा समावेश आहे.एस्सार ओईल आपल्या शेअर होल्डर्स ना Rs ७५.४८ प्रती शेअर जास्त रक्कम देणार आहे.एस्सार ग्रुपचे कर्ज 50% ने कमी होईल.
प्रत्येक माणूस आपल्या चुकांमधून शिकतो. हेच सरकारी प्रशासनिक संस्थांच्या बाबतीत लागू होते. SEBI च्या शेल कंपन्यांच्या बाबतीत काढलेल्या ऑर्डरमुळे बराच गोंधळ झाला. तेव्हा या यादीतील कंपन्यांची अशी तक्रार होती की त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. तसेच या कम्पन्यातील शेअरहोल्डर्सना तसेच गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स विकण्याची संधी मिळाली नाही. यावेळी SEBI ने २०० कंपन्या डीलीस्ट केल्या जातील अशी ऑर्डर काढली. पण आधी या कंपन्यांचे ऑडीट केले जाईल, त्यांची VALUE काढली जाईल आणी किरकोळ गुंतवणूकदारांचे शेअर्स कंपन्यांनी विकत घेतले पाहिजेत असे सांगितले जाईल. या यादीतील ११७ कंपन्यांच्या प्रमोटर्सना १० वर्षांकरता ‘BAN’ केले आहे. म्हणावे लागेल ‘देर आहे  दुरुस्त आहे’ असे सेबीच्या बाबतीत म्हणावे लागेल.
सध्या सरळसोट तेजी किंवा मंदी होत नाही. दोन्ही बाजूला ट्रेड करता येणे शक्य आहे. पण थोडक्यात ट्रेड करून मिळेल तेवढा फायदा घेवून बाहेर पडावे. यालाच तांत्रिक भाषेत ‘ SMALL BODIED CANDLE’ म्हणतात. बुल्स किंवा बेअर्स यापैकी कोणीही मार्केटवरची पकड सोडायला तयार नाहीत. त्यामुळे गुरुवारी मार्केट निर्देशांक निफ्टी अवघ्या ३३ पाईंटच्या रेंज मध्ये फिरत होते. कोणालाही अनावश्यक धोका पत्करायचा नव्हता. FED ची चेअरमन JENET येलेनच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असेल. बघू या काय वाढून ठेवले आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१५९६ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ९८५७ वर बंद झाले
 

आठवड्याचे-समालोचन – मार्केटचा एकच मंत्र, टिपांपासून स्वातंत्र्य – १४ ऑगस्ट २०१७ ते १८ ऑगस्ट २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मार्केटचा एकच मंत्र, टिपांपासून स्वातंत्र्य – १४ ऑगस्ट २०१७ ते १८ ऑगस्ट २०१७
१५ ऑगस्ट २०१७ हा भारताचा ७१ वा स्वातंत्रदिन. पण हा स्वातंत्र्यदिन म्हणजे काय तर आपल्यावर राज्य करत असणार्या परकीय लोकांना घालवून देऊन आपली सत्ता आली तो दिवस. शेअरमार्केटचा विचार केल्यास मला असे आढळते की ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार अजूनही परावलंबी आहेत. त्यांच्या निर्णयावर दुसऱ्यांची सत्ता आहे. ‘डोळे असून आंधळे बुद्धी असून मतीमंद’ अशी अवस्था आहे.गुंतवणूकदार अजूनही टिपावर अवलंबून आहेत.  ‘तुम्ही टिपा देता का ? कोणते शेअर्स घेऊ ते सांगता का ?’ अशी विचारणा अजूनही होते. या सर्वापासून काही अजूनही स्वातंत्र्य मिळवले नाही. सेबीच्या ही हे लक्षात आल्यामुळे आता त्यांनी शेअरमार्केट मधील गुंतवणुकीविषयी कोण टिप्स देऊ शकेल यावर कडक बंधने आणली आहेत. या स्वातंत्र्यदिनापासून आपण टिपांपासून स्वातंत्र्य मिळवू या. शेअरमार्केटविषयीचे अज्ञान दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवून ती अखंड तेवत ठेवू या.  या ज्ञानाचा प्रकाश महाराष्ट्रभर कसा पसरेल यासाठी प्रयत्न करु या.
सरकारी अन्नौंसमेंट

 • युरियाच्या संबंधात नवीन धोरण जाहीर होणार आहे. युरिया एका गोणीत पूर्वी ५० किलो असे. आता युरिया एका गोणीत ४५ किलो असेल. त्यामुळे कमी युरिया वापरला जाईल. या ठिकाणी शेतकऱ्यांची मानसिकता विचारात घेतली आहे का सबसिडीचे राजकारण अधिक आहे कळत नाही. एका एकरला इतका गोणी युरिया असा शेतकर्याचा हिशेब असतो. एका गोणीत किती युरिया आहे याकडे त्याचे लक्ष नसते असे सरकारला वाटले.यामुळे शेतकरी युरियाचा वापर कमी करतील असे सरकारला वाटते. पूर्वी युरियाच्या ५० किलोच्या गोणीला Rs २६८ द्यावे लागत होते. आता ४५ किलोच्या गोणीला Rs २४२ पडतील. सरकारला सबसिडी कमी द्यावी लागेल असे वाटते.ही बातमी गाजली गाजली आणी हवेतच विरली
 • सरकार दक्षिण कोरियातून होणार्या सोन्याच्या आयातीवर ड्युटी लावण्याच्या विचारात आहे.
 • सरकार हिमाचल प्रदेशमध्ये २० पॉवर स्टेशन लावणार आहे.
 • सरकारने मेट्रो पॉलिसी मंजूर केली.
 • हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या प्रदेशातील काही पहाडी भागांमध्ये युनियन एक्साईजमध्ये १० वर्षापर्यंत सवलत मिळत होती.पण आता या भागात GST लागू झाला आहे. GST च्या सनसेट कलमाप्रमाणे DBT योजनेखाली GST रीएम्बर्स करण्याची तरतूद आहे. सरकारने हे कलम आता ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवले आहे. सरकार या भागातील कंपन्यांना या कलमांतर्गत GST रीइंबर्स करेल
 • JP INFRASTRUCTURE आणी आम्रपाली या प्रोजेक्टमधील FLAT ग्राहकांना सरकार मदत करणार आहे. या कंपन्यांचे ASSET विकून आलेल्या पैशात या प्रोजेक्ट्स पुर्या करून ग्राहकांच्या ताब्यात दिल्या जातील. याबाबत सरकार MCA ( MINISTRY OF CORPORET AFFAIRS) बरोबरही चर्चा करेल.सरकारने सांगितल्याप्रमाणे JP इन्फ्राटेक या काम्पान्च्या प्रोजेक्ट NBCC टेक ओव्हर करूनं पूर्ण करेल.
 • कोटिंग करण्यासाठी जे चीनी केमिकल लागते त्यावरची antidumping ड्युटीची मुदत ५ वर्षासाठी वाढवली. याचा फायदा गुजराथ फ्लोरो आणी हॉकिन्स यांना होईल.
 • सरकारने पूर्वी ‘stent’ च्या किमती कमी केल्या. आता गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी कमाल चार्जेसची मर्यादा घातली. याचा परिणाम अपोलो हॉस्पिटल्स, फोर्टिस हेल्थकेअर, या कंपन्यांवर होईल.
 • जयललीता यांच्या निधनाची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे असे फर्मान सरकारने काढले. याचा परिणाम अपोलो हॉस्पिटल्सवर होईल.
 • सरकारच्या आर्थिक सल्लागारांनी असे सांगितले की रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्या सबसिडीच्या आधारावर चालू आहेत आणी कोलबेस्ड पॉवर प्रोजेक्ट खराब स्थितीत आहेत. याचा परिणाम कोल इंडियावर होत आहे. यामुळे कोल इंडियाच्या शेअरची किंमत वाढली तर रिन्यूएबल एनर्जीच्या कंपन्यांचे शेअर्स आपटले.
 • सरकारने राज्य सरकारांना उत्पादनात उपयोगी येणाऱ्या वस्तू तसेच पेट्रोलियम प्रोडक्टवर VAT कमी करायला सांगितला आहे.
 • सरकारने ANTI SMOKING कायद्याचा भंग केल्याबद्दल ITC आणी फिलीप मॉरीस या कंपन्याना दंड लावला.
 • सरकारने २२ कॅरेट किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या किंवा इतर प्रोडक्टच्या निर्यातीवर बंदी घातली.

RBI, SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • SAT ने पार्श्वनाथ डेव्हलपर्स, पिनकॉन स्पिरीट, सिग्नेट इंडस्ट्रीज, कवित इंडस्ट्रीज, Kalpana इंडस्ट्रीज आणी SQS इंडिया BFSL या कंपन्याना RESTRICTIVE ट्रेडिंग लिस्ट मधून बाहेर काढले. परंतु SEBI आणी STOCK EXCHANGE यांनी सुरु केली कारवाई सुरूच राहील असे सांगितले.
 • SEBI ने ब्रोकर्सना त्यांच्याकडे लिस्ट असलेल्या १०७ अनलिस्टेड कंपन्यांविषयी माहिती मागवली आहे.
 • सुप्रीम कोर्टाने सरकारचा अर्ज रद्द केल्यामुळे DIAL(DELHI INTERNATIONAL AIRPORT LTD) ने केस जिंकली. या निर्णयामुळे DIAL आता दिल्ली विमानतळाच्या जमिनीचा काही भाग कमर्शियल वापरासाठी देऊ शकेल. GMR इंफ्राचा DIAL मध्ये ५४% स्टेक आहे. त्यामुळे य़ा शेअरची किंमत वाढली.
 • ब्रूक्स LAB या कंपनीच्या IPO मध्ये ‘MONEY SIPHONING’ केल्याबद्दल २२ कंपन्यांवर Rs १७.६ कोटींचा दंड लावला.
 • सुप्राजीत आणी फिनिक्स LAMP यांच्या मर्जरला NCLT ने मंजुरी दिली.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • WPI (WHOLESALE PRICE INDEX) जुलै महिन्यात वाढून ०.९०% वरून १.८८% झाले. मुख्यतः अन्नधान्य आणी इतर जरुरीच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ही वाढ झाली
 • CPI (CONSUMER PRICE INDEX) जुलै महिन्यात २.३६ % ( जूनमध्ये १.४६%) झाले या वाढलेल्या महागाईमुळे RBI नजीकच्या काळात रेट कट करील ही आशा मावळली
 • जुलै २०१७ या महिन्यासाठी भारताची निर्यात ३.९४% ने वाढून US$ २२,५ बिलियन झाली. निर्यात वाढीचा वेग मात्र ८ महिन्यांच्या किमान स्तरावर होता. सतत मजबूत होणारा रुपया  आणी GST लागू करणे ही कारणे  यापाठीमागे असू शकतील. भारताची आयात १५.४% ने वाढून US $ ३३.९ बिलियन झाली. यामुळे भारताची ट्रेड GAP US $ ११.४ बिलीयन झाली सोन्याची आयात जून मध्ये US $ २.१ बिलियन झाली.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • कॉर्पोरेट जगतात इन्फोसिसचे MD आणी CEO Mr विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ माजली. गुरुवारी सावरलेले मार्केट पुन्हा शुक्रवारी कोसळले .त्यानी त्यांच्या पत्रात प्रमोटर्स बरोबरचे मतभेद, व्यवस्थापनाबरोबर मतभेद, त्यांच्यावर केलेले निराधार आणी खोटे ठरलेले आरोप, त्यांच्या चांगल्या कामाची दखल न घेतली जाणे इत्यादी कारणे दिली तसेच त्यांच्या ३ वर्षाच्या कालखंडात किती प्रगती झाली याचा आढावा दिला. इन्फोसिसचे अंतरींम CEO आणी MD म्हणून UB प्रवीण राव याचे नाव जाहीर केले. विशाल सिक्का VICE चेअरमन म्हणून मार्च २०१८ पर्यंत कंपनीत राहतील. याचा परिणाम इन्फोसिसच्या शेअरवर होऊन शेअर १२% पडला. यावेळी पानिपतच्या युद्धाची आठवण होते. पुण्यात सदरेवर बसणाऱ्यांनी सेनापतीवर किती आणी कशी टीका करावी आणी त्यांना युद्ध कसे करायचे हे किती मर्यादेपर्यंत जाऊन शिकवावे याचे भान ठेवले पाहिजे हेच खरे.
 • साखर उद्योगाचा विचार केल्यास रेणुका शुगरचा तिमाही निकाल असमाधानकारक होता. UPमध्ये असलेल्या साखर कारखान्यांचे तिमाही निकाल चांगले आले.त्यांची inventory खूप आहे. अवध शुगर आणी अपर ganjees या साखर कारखान्याचे तिमाही निकाल restructuring झाल्यानंतरचे होते. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी साखरेच्या भावात सणासुदीच्या दिवसात फारसा फरक पडेल असे वाटत नाही.
 • टाटा ग्लोबल बिव्हरेजीस हिमालयन MINERAL WATER साठी USA मध्ये मार्केटिंग आणी डीस्ट्रीब्युशनसाठी करार करणार आहे.
 • ग्रन्युअल्स इंडिया च्या आंध्र प्रदेशातील गागील्लापुर प्लांट साठी USFDA कडून EIR मिळाला. इन्स्पेक्शनमध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.
 • RCOM आणी एअरसेल यांच्या मर्जरविषयीची याचिका NCLT ने दाखल करून घेतली. तसेच RCOM चा टॉवर बिझिनेसमधील स्टेक BROOKLYN ला विकण्यासाठीचा अर्ज दाखल करून घेतला. भारती इन्फ्राटेल, GTL, यांनी घेतलेल्या हरकती रद्द ठरवल्या. RCOM ला त्यांच्या कर्ज देणार्या बँकांनी डिसेंबर २०१७ पर्यंत RESTRUCTURING प्लानसाठी वेळ दिला आहे. RCOM वर असलेल्या Rs ४५००० कोटी कर्जापैकी या व्यवहारातून Rs २५००० कोटी कर्ज फेडता येईल.
 • IFCI टूरीजम फायनान्स मधील आपला स्टेक एकाच लॉटमध्ये विकून Rs ३०० कोटी उभारणार आहे.
 • टाटा स्टील्सने आपला UK बिझिनेस पेन्शन स्कीममधून वेगळा काढला आहे. टाटा स्टील्सने आपल्या UKतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्लान वेगळा तयार केला आहे. यामुळे टाटा स्टील्सचा UK  बिझीनेस विकण्याला किंवा दुसऱ्या कंपनीत मर्ज करण्याच्या प्रयत्नाला वेग येईल.
 • ग्रासिम, महाराष्ट्र सीमलेस पाईप्स, नौसील या कंपन्यांचे निकाल चांगले आले.
 • SBI, बँक ऑफ बरोडा, कोल इंडिया, IDBI, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन बँक, अपोलो हॉस्पिटल्स,सन फार्मा या कंपन्यांचे तिमाही निकाल असमाधानकारक  होते.
 • DLF आपल्या DLF सायबर सिटी डेव्हलपर्स मधील ४०% स्टेक सिंगापूरच्या GIC या वेल्थ फंडाला Rs १३००० कोटीना विकेल
 • सिंटेक्सचे RESTRUCTURING नंतर दोन विभाग झाले. पहिला टेक्स्टाईल आणी दुसरा प्लास्टीक. सिंटेक्स टेक्स्टाईल ह्या कंपनीचा पॉलीमर टेक्स्टाईलचा बिझिनेस आहे. त्यांनी जी मशीनरी लावली आहे. त्याचे लाईफ १० वर्षे आहे. ती नवीन आहे. त्यामुळे कॅपेक्सची गरज नाही. त्यामुळे सिंटेक्स टेक्स्टाईल हा विभाग चांगला चालतो आहे.
 • L &T आपला कटिंग टूल्सचा बिझिनेस Rs १७३ कोटींना विकणार आहे. L & T च्या दृष्टीकोनातून हा सौदा लहान असला तरी L & T चे मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण दिसून येते.
 • IDBI आपल्या मुंबईतील ६ मालमत्ता विकणार आहे.
 • AXIS आपल्या शुभ गृह योजनेखाली Rs ३० लाखापेक्षा कमी पण २० वर्षापेक्षा जास्त परतफेडीची मुदत असलेल्या गृह कर्जांवर १२ EMI माफ केले जातील असे सांगितले. बॅंका मोठ्या प्रमाणावर हौसिंग फायनान्स क्षेत्रात प्रवेश करीत आहेत. तसेच वेगवेगळ्या सवलतीच्या योजना जाहीर करत आहेत..याचा परिणाम हौसिंग फायनान्स कंपन्यांच्या बिझिनेस वर होईल. कारण या कंपन्या पब्लिककडून डीपॉझीट घेऊ शकत नाहीत आणी त्यांना पैशासाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागते.
 • UBHLच्या शेअर्समध्ये ८ सप्टेंबर २०१७ पासून ट्रेडिंग बंद होईल. प्रमोटर शेअर्स विकू शकणार नाहीत. याचा परिणाम युनायटेड ब्र्युअरीजवर होईल.
 • १५ किलोच्यावर सामान न्यायचे असेल तर एअरइंडियाने Rs ४०० तर स्पाईसजेटने तसेच विस्तारा इंडस्ट्रीजने Rs ३०० चार्ज करायचे ठरवले आहे. पूर्वी हे चार्ज Rs १५० होते.
 • चंबळ फरटीलायजरने गहाण ठेवलेले शेअर्स सोडवले.
 • बिहारमध्ये पूर आल्यामुळे तांदुळाच्या पिकाचे नुकसान झाले. पण त्याबरोबरच तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांचा तांदुळाचे भाव वाढल्यामुळे फायदा झाला.
 • इंडिगोच्या ८४ फ्लाईट इंजिनात बिघाड असल्यामुळे रद्द कराव्या लागल्या.

कॉर्पोरेट एक्शन

 • AAREY ड्रग्ज या कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअर्समध्ये विभाजन केले.
 • मर्केटर लाईन आपल्या बिझिनेसमधून ड्रेजिंग बिझिनेस वेगळा काढणार आहे.
 • १९ ऑगस्ट २०१७ रोजी इन्फोसिस या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • SREI INFRASTRUCTURE ही कंपनी SREI इक्विपमेंटचा IPO  आणून आपला २५% स्टेक विकणार आहे.
 • जिंदाल स्टील आणी पॉवर या कंपनीला दिलेल्या Rs ५५५ कोटींच्या कर्जाची मुदत कर्ज देणाऱ्या बँकांनी ५ वर्षे वाढवली.

नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO

 • रिलायंस जनरल इन्शुरन्स Rs १५०० ते Rs २००० कोटीचा IPO ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१७ मध्ये आणण्याची तयारी करत आहे.

मार्केटने काय शिकवले
पुट/कॉल रेशियो १.०९ वरून १.०६ झाला. ज्या गतीने मार्केटमध्ये मंदी आली त्या गतीने पुट/कॉल रेशियो कमी झालेला आढळला नाही कारण ज्या लोकांनी पुट सेल केले होते म्हणजे तेजी केली होती ते लोक पोझिशन कमी करत आहेत. नवीन शॉर्टस त्या प्रमाणात बनताना दिसत नाहीत. त्यामुळे पुट/कॉल रेशियो त्या प्रमाणात पडताना दिसत नाही. पुट/कॉल रेशियो ०,७ किंवा ०,८, VIX १६/१७ अशी पोझिशन आल्यावर मार्केटमध्ये पैसा घालण्यास सुरुवात करणे योग्य होय. जेव्हा आपण मंदीतून तेजीत प्रवेश करणार असतो. त्यावेळी काहीजणांना वाटते मार्केट अजून पडेल तर काहीजणांना वाटते मार्केट आता पुष्कळ पडले आहे आणि आता फारशी मंदी होणार नाही. त्यामुळे मार्केट खूप VOLATILE होते.
ज्यावेळी ‘TRUNCATED WEEK’असतो तेव्हा (अर्थातच मंदीचे मार्केट सुरु असताना) लोक पोझिशन ठेवत नाहीत. कारण सुट्टीवरून आल्यावर काय परिस्थिती असेल हे माहीत नसते.
इन्फोसिसच्या M D नी राजीनामा दिल्याच्या घटनेचा विचार केला तर पेअर ट्रेड कसा करावा याची कल्पना येते. लोक इन्फोसिसचे शेअर्स विकून दुसर्या कुठल्या कंपनीत गुंतवणूक करतील याचा विचार करून HCL टेक, टी सी एस मध्ये खरेदी करून इन्फोसिसचे शेअर्स शॉर्ट केल्यास इंट्राडे ट्रेड होऊ शकतो.
इन्फोसिसच्या घटनेबद्दल माझ्या मनात काय विचार आले ते सांगू ? विशाल सिक्का यांनी राजीनामा शनिवारच्या बोर्ड मीटिंगमध्ये दिला असता किंवा मार्केट बंद झाल्यावर दिला असता तर काय बिघडलं असतं ? निदान पूर्ण मार्केटवर परिणाम झाला नसता. शनिवार रविवार लोकांना विचार करायला वेळ मिळाला असता आणी शेअर विकावा का खरेदी करावा हे शांतपणे ठरवता आले असते. या सर्व भांडणात शेअरहोल्डर्स, ट्रेडर्स, गुंतवणूकदार यांचा काय दोष ? की आपल्या राजीनाम्याचा कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर आणी पर्यायाने क्रेडीटवर किती परिणाम होतो हे दाखवायचे होते. कुणास ठाऊक ? पण शेवटी नुकसान होते गुंतवणूकदारांचे नेहेमी आपण म्हणतो दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ पण इथे दोघांच्या भांडणात असंख्य लोकांचे नुकसान झाले आणी कंपनीची नाचक्की झाली ती वेगळीच. मार्केटला मात्र पडण्यासाठी आयते कोलीत मिळाले .असो गुंतवणूकदार टाटांची घटना आणी मिस्त्रीला विसरले. टाटा ग्रुपचे सगळे शेअर्स त्यानंतर वाढले. तसेच हि घटना मार्केट विसरेल आणी इन्फोसिसच्या शेअरचा भाव वाढेल अशी आशा करुया.
 
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१५२४ वर तर NSE निर्देशांक निफ्टी ९८३७ वर आणी बँक निफ्टी २४०७४ वर बंद झाले

आठवड्याचे-समालोचन – अती परिचयात अवज्ञा – ७ ऑगस्ट २०१७ ते ११ ऑगस्ट २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अती परिचयात अवज्ञा – ७ ऑगस्ट २०१७ ते ११ ऑगस्ट २०१७
भरती ओहोटी, तेजी मंदी, जय पराजय, गरिबी श्रीमंती, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक होतो तेव्हा आपोआपच त्याच्या विरुद्ध दिशेने मार्गक्रमण सुरु होते. फुगा खूप फुगला की अगदी टाचणीनेही फुटून जातो. मार्केट उच्चतम स्तराला आले होते ही सुचना मी तुम्हाला ब्लॉग मधून देतच होते. प्रॉफीट बुकिंग करायला सांगत होते. सेबीची ३३१ कंपन्याना शेल कंपन्या म्हणून जाहीर करणारी ऑर्डर, भारत चीन सीमेवरचा तणाव, USA आणी उत्तर कोरियामधील तणाव, पहिल्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा कमकुवत निकाल या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन मार्केट पडायला लागले. कोणत्या कारणाचा किती सहभाग आहे ह्याचा काथ्याकूट शेअर मार्केटमधील तज्ञ करत असतात पण आपण सावध राहिले पाहिजे. सतत आपल्या पोर्टफोलिओमधील शेअर्सचा मागोवा घेत राहिले पाहिजे. म्हणजे तोटा होणे अनिवार्य असले तर कमीतकमी तोटा आणी फायदा होत असेल तर  जास्तीजास्त फायदा होतो.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • चीनमध्ये एल्युमिनियमचे उत्पादन जगातील उत्पादनाच्या ५०% होते. हे उत्पादन ३२ लाख टन कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे एल्युमिनियमची टंचाई निर्माण होईल. याचा फायदा हिंदाल्को, नाल्को यांना होईल.
 • USA आणी उत्तर कोरिया मधील तणाव दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. गाम येथील USA च्या मिलिटरीच्या तळावर आपण क्षेपणास्त्राने हल्ला करू असे उत्तर कोरियाने जाहीर केले आहे.
 • अबुधाबीला क्रुडऑइलच्या उत्पादकांची बैठक चालू आहे. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत क्रूडचे भाव US$ ५५ ते ५८ असे राहण्याची शक्यता आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकार खाद्य तेलावर इम्पोर्ट ड्युटी बसवण्याच्या विचारात आहे याला कॅबिनेट सचिवांची मंजुरी मिळाली आहे. लवकरच DGFT(डायरेक्टर जनरल ऑफ फॉरीन ट्रेड) याची घोषणा करतील.
 • काही दिवसांनी तुम्हाला पेट्रोल आणी डीझेलची होम डिलिव्हरी मिळू लागेल. कमीतकमी ५ लिटरचा pack असेल. देशभरात २२००० पेट्रोल पंप सुरु केले जातील. स्पर्धा वाढेल आणी ग्राहकांचा वेळ वाचेल. वाहतुकीची कोंडी कमी होईल.
 • सरकार २५% इम्पोर्ट ड्युटी लावून ५ लाख टन साखर आयात करणार आहे. त्यामुळे पुरवठा वाढेल आणी साखरेचे भाव कमी होतील. याचा परिणाम साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर निगेटिव्ह होईल.
 • रूफटॉप सोलार एनर्जी संबंधीत गाईडलाईन्समध्ये बदल केला. आता रेटिंग नसतानासुद्धा तुम्ही पार्टनर बनू शकता. बिझिनेस मध्ये अनुभव नसला आणी रेटिंग एजन्सीला देण्यासाठी पैसे नसतील असेही लोक आता या व्यवसायात येऊ शकतील. या पार्टनरला सबसिडीचाही लाभ मिळेल. ही सूट ‘EASE OF DOING BUSINES’ खाली दिली गेली.
 • सरकारी बँकांच्या मर्जरची प्रक्रिया १५ ऑगस्टनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांची प्रगती बघून एकूण Rs १०००० कोटी भांडवल घालणार आहे.
 • सरकार लवकरच बायो डीझेल पोलिसी जाहीर करेल.
 • सरकारने नमामी गंगे च्या १० प्रोजेक्टसाठी Rs २००० कोटीची तरतूद केली

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • TRACTORच्या Parts वरील GST २८% वरून १८% पर्यंत कमी केला. याचा फायदा TIL आणी BOSCH या कंपन्याना होईल.
 • टेक्स्टाईलवरचाही GST कमी केला.
 • GST कौन्सिलने SUV आणी हायब्रीड ऑटोजवर GST १८% वरून २८% पर्यंत वाढवला. तसेच सेस १५% वरून २५% पर्यंत वाढवला. त्यामुळे आता या प्रकारच्या ऑटोजवर २८% GST +२५% सेस या प्रमाणे ५३% कर लागेल.
 • सेबीने आयडीया व्होडाफोन मर्जरला सशर्त मंजुरी दिली. आता या कंपन्या NCLT कडे मंजुरीसाठी अर्ज करतील.
 • प्लायवूड आणी प्लायवूडसंबंधीत गोष्टींवर GST २८% वरून १८% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. याचा फायदा युनिप्लाय, आर्चिडप्लाय, सेंच्युरी प्लायवूड, ग्रीनप्लाय या कंपन्यांना होईल
 • NCLT ने JP इन्फ्राटेक या कंपनीविरुद्ध IBC खाली INSOLVENCY प्रक्रिया सुरु करायला मंजुरी दिली. आता ९ महिन्यांच्या मुदतीत जर कंपनी आपल्या कर्जाची परतफेड करू शकली नाही तर कंपनीच्या ASSETS चा लिलाव करून कर्जफेड केली जाईल. दिल्ली आणी नोइडा या एरियात कंपनीने ३२००० FLAT अर्धवट बांधून ठेवले आहेत. आतातरी या लोकांच्या भरलेल्या पैशांचे काय होणार हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.
 • आता तुम्हाला मोबाईलवर येणाऱ्या शेअर्समधील गुंतवणुकीविषयीचे SMS सेबी आणी TRAI यांनी नियंत्रित करण्यासाठी नियम केला आहे की सेबीकडे रजिस्टर केलेले लोकच असे मेसेज पाठवू शकतील. या मेसेजना फिल्टर केले जाईल.
 • सेबीने STOCK EXCHANGE वर लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्याना जर त्यांनी बॅंका किंवा वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या किंवा कर्जाच्या परतफेडीमध्ये ‘DEFAULT’ केला असला तर १ दिवसाच्या आत ही माहिती STOCK EXCHANGEला देणे अनिवार्य केले आहे. सेबीने ३३१ कंपन्यांना शेल कंपन्या म्हणून घोषित केले ह्यामुळे जे नाटक रंगले त्या विषयी ‘अनुभव हाच गुरु’ ह्या सदराखाली ‘रंगले नाट्य असे ३३१ चे’ या नावाने वेगळा ब्लोग टाकला आहे तो पहावा.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • क्लारीस लाईफसायन्सेस या कंपनीच्या अहमदाबाद युनिटची USFDA ने २७ जुलै २०१७ ते ४ ऑगस्ट २०१७ या दरम्यान तपासणी केली. या तपासणी दरम्यान १८ त्रुटी आढळल्या. फॉर्म नंबर ४८३ इशू केला. या त्रुटी युनिट डॉक्युमेंट आणी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधीत आहेत.
 • इरॉस INTERNATIONAL ही कंपनी AAPLE बरोबर डिजिटल कंटेंट विकण्यासाठी करार करणार आहे.
 • ग्राफाईट इंडिया, ब्रिटानिया, व्हरलपूल, GNFC, लाल पाथ LAB, कॅपलीन पाईंट, नाटको फार्मा, अमर राजा BATTERY, सिटी युनियन बँक, टाटा स्टील, आशियाना हौसिंग, सेंच्युरी, फ्युचर रिटेल, बँक ऑफ इंडिया, मेघमणी ऑर्गनिक्स, मुंजाल शोवा, सोम डीस्टीलरिज, NMDC, भारत फोर्ज, पेज इंडस्ट्रीज, फिलीप कार्बन, MOIL यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • टाटा स्टील ८ जुलै २०११ नंतर ६ वर्षांनी Rs ६०० च्या वर गेला. टाटा स्टीलच्या फायद्यात Rs २०९ कोटीवरून Rs ९३३ कोटीपर्यंत वाढ झाली. मार्जीन १२.६ % वरून १६.१ % पर्यंत वाढले. युरोपमध्येही चांगली वाढ झाली.
 • स्टेट बँकेचा तिमाही निकाल असमाधानकारक आला. NPA वाढले.
 • MCX वर सोन्यामध्ये ऑप्शनला मंजुरी मिळाली.
 • ICEX वर सर्टिफाईड डायमंडमध्ये वायदा सुरु झाला. हा वायदा ३ लॉटचा, १ महिना मुदतीचा आणी १ कॅरेट, ५० सेंट्स आणी ३० सेंट्स च्या डायमंड्समध्ये सुरु झाला यात इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरीची सुविधा असेल.
 • HCC या कंपनीला इंदिरा गांधी सेंटर फॉर ATOMIC रिसर्च कडून Rs ७६४ कोटीची ऑर्डर मिळाली. तसेच जम्मू काश्मीर सरकारकडून Rs ८१० कोटीची ऑर्डर मिळाली.
 • ITC आपला सनफिस्ट बिस्किटांचा पोर्टफोलीओ पूर्णपणे बदलून Rs ५००० कोटी पर्यंत वाढवणार आहे.
 • DR लाल पाथ LAB ही कंपनी ‘DLPLB बांगला देश’ चे अक्विझिशन करणार आहे.
 • बजाज ऑटोने UK तील ‘TRIUMPH मोटरसायकल’ या कंपनीबरोबर मिड सेगमेंट मोटरसायकल बनवण्यासाठी नॉनइक्विटी करार केला.
 • उगार शुगर या कंपनीला कर्नाटकात युनिट सुरु करायला पर्यावरणासंबंधीत परवानगी मिळाली.
 • उजास एनर्जीला झारखंड राज्यसरकारकडून ८.५ MW च्या दोन ऑर्डर मिळाल्या
 • भारती एअरटेलला भारती इन्फ्राटेल मधील ३.७% स्टेक विकून Rs २५७० कोटी मिळाले.
 • PVR आपले नॉनकोअर असेट विकणार आहे. ‘SMAASH’ या कंपनीला विकून Rs ८६ कोटी मिळतील.
 • QUESS कॉर्प आणी रामकृष्ण फोर्जीग या कम्पन्यांमधील FII लिमिट वाढवली.
 • ‘TARO’ या कंपनीचे निकाल असमाधानकारक आले याचा परिणाम सन फार्मावर होईल.
 • फोर्टिस हेल्थकेअर मधील आपला स्टेक विकला म्हणून ‘DAIICHHI’ने सिंग बंधूविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
 • अडानी एन्टरप्राईझेसने आपले तामिळनाडू पॉवर बोर्डाबरोबरचा पॉवर परचेस करार ऑगस्ट २०१९ पर्यंत वाढवला. पण बोर्डाने २५% कमी TARIF चार्ज मंजूर केला. त्यामुळे शेअर पडला. असाच करार JSPL ने केला.
 • ICICI प्रू या कंपनीने सेन्ट्रम कॅपिटलचे २१ लाख शेअर्स खरेदी केले
 • रबराच्या किमती, इम्पोर्ट ड्युटी, सणावाराचा सिझन, ANTI DUMPING ड्युटी यामुळे टायर कंपन्यांचा फायदा होईल. जशी अर्थव्यवस्था सुधारत जाईल तशी ऑटोची विक्री वाढत जाईल.
 • DR रेड्डीज या कंपनीच्या बच्चुपल्ली युनिटचे लायसन्स रिन्यू केले गेले नाही. जर्मन रेग्युलेटरने हरकत घेतल्यामुळे आता कंपनीची औषधे युरोपमध्ये निर्यात होऊ शकणार नाहीत.
 • CAGने PFC आणी REC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांनी कर्ज देताना योग्य तो ड्यू डीलीजन्स केला नाही असे निरीक्षण केले.

कॉर्पोरेट एक्शन

 • टालब्रॉस इंजिनीरिंग या कंपनीने बोनस शेअर्स इशू करण्यासंबंधात विचार करण्यासाठी १७ ऑगस्ट २०१७ ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ठेवली आहे.
 • प्रकाश इंडस्ट्रीज आपला स्टील आणी पाईप बिझिनेस वेगळे करणार आहेत.
 • ATLAS सायकल ही कंपनी आपल्या शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट करणार आहे.
 • भारत फोर्ज, MOIL, यांनी १:१ असा बोनस जाहीर केला.
 • BEL या कंपनीने १०:१ बोनस जाहीर केला म्हणजे तुमच्याजवळ १० शेअर्स असतील तर तुम्हाला १ बोनस शेअर जाहीर केला. BHEL ने २:१ असा बोनस जाहीर केला. म्हणजे तुमच्या जवळ २ शेअर्स असतील तर तुम्हाला १ बोनस शेअर मिळेल. PFC या कंपनीने काही कारणास्तव आपण बोनस देऊ शकत नाही असे जाहीर केले. मनपसंद बेव्हरेजीस या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
 • गणेश बेन्झोप्लास्ट या कंपनीने आपले केमिकल आणी इन्फ्रा बिझिनेस वेगळे करण्यावर विचार करण्यासाठी १८ ऑगस्ट २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • कॅनरा बँक, देना बँक, सिंडीकेट बँक आणी विजया बँक यांच्या बाबतीत मर्जरचा कोठलाही प्लान नाही.

नजीकच्या काळात येणारे IPO

 • GIC (जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन) या कंपनीला IPO साठी परवानगी मिळाली. OFSच्या माध्यमातून विक्री होईल. IPO मार्फत १.७२ कोटी शेअर्स विक्री होईल. हा IPO एकंदर Rs १२.४७ कोटींचा असेल.
 • न्यू इंडिया इन्शुअरन्स १२ कोटी शेअर्ससाठी IPO आणत आहे.
 • कोचीन शिपयार्डचा शेअर Rs ४४० ला लिस्ट झाला.
 • SIS या कंपनीचा शेअर Rs ८५५ या भावाला लिस्ट झाले.
 • सिंटेक्स प्लास्टिक या कंपनीचे शेअर्स Rs १३६.५० ला लिस्ट झाले.

तांत्रिक विश्लेषण

 • सोमवारपासून लोअर टॉप आणी लोअर बॉटम सुरु झाला. त्यामुळे ‘BUY ON DIPS’ ऐवजी ‘सेल ओंन राईझ’ धोरण ठेवायला लागेल.
 • बुधवारी निफ्टीच्या दैनिक चार्टमध्ये हेड अंड शोल्डर PATTERN फॉर्म झाला. निगेटिव्ह क्रॉसओव्हर झाला.
 • गुरुवारपासून निफ्टीने एक एक सपोर्ट लेव्हल तोडायला सुरुवात केली.
 • ओपन इंटरेस्ट कमी झाला आणी ऑप्शन प्रीमियम वाढला याचा अर्थ शॉर्ट कव्हरिंग आहे.

मार्केटने काय शिकवले
सिंटेक्सचे डीमर्जर झाले. ‘सिंटेक्स प्लास्टिक’ आणी ‘सिंटेक्स टेक्सटाइल’ असे दोन भाग झाले. सध्या मार्केटमध्ये आहे ते सिंटेक्स टेक्स्टाईल. सिंटेक्स प्लास्टिकचे मंगळवारी Rs १३६.५० ला लिस्टिंग झाले. अशावेळी नीलकमल, सुप्रीम इंडस्ट्रीज WIMPLAST अशा ज्या कंपन्या प्लास्टिकमध्ये व्यवसाय करतात त्या कंपन्यांकडे लक्ष द्यावे.
रुपया इतर करन्सीच्या तुलनेत मजबूत होणे हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण असले तरी त्याचा विपरीत परिणाम निर्यातीवर होतो. नॉन बासमती तांदुळाच्या निर्यातीमध्ये ३.३% घट झाली आहे. रुपया ६.६% मजबूत झाला आहे त्यामुळे भारतातील तांदूळ खरेदी करण्याऐवजी लोक थायलंड, इंडोनेशिया, बांगला देश,आफ्रिका येथून तांदूळ खरेदी करीत आहेत.
ग्लास अर्धा भरलेला म्हणत आनंद मानायचा की अर्धा रिकामा म्हणून दुखः करायचे हा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे. मार्केट खूप वाढले होते. शेअर्स खूप वाढले होते लोक करेक्शनची वाट पाहत होते. परंतु एवढे जोरदार करेक्शन येईल असे वाटले नव्हते. ज्यांनी चढ्या भावाला खरेदी केली आणी stop loss लावला नाही ते फसले, ज्यांनी शॉर्ट केले  त्यांनी दिवाळी साजरी केली आणी ज्यांनी करेक्शन आले तर स्वस्तात खरेदी करू म्हणून DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडले त्यांना शेअर्स स्वस्तात विकत घेण्याची संधी चालून आली. आपण स्थितप्रज्ञ राहून मार्केटचे निरीक्षण केले तर आपण चढत्या आणी पडत्या मार्केटमध्ये आपला फायदा कसा करून घ्यायचा हे अनुभवाने हळू हळू कळायला लागते. आणी मग ‘पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलावे वैसा’ प्रमाणे आपण आपला रंग अलग ठेवून मार्केटच्या रंगात रंगून जाऊ शकतो.
 
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१२२६ NSE चा निर्देशांक निफ्टी ९७१२ वर तर बँक निफ्टी २३९९१ वर बंद झाले.

अनुभव हाची गुरु – रंगले नाट्य असे ३३१ चे – १० August २०१७

रंगले नाट्य असे ३३१ चे

 • नाट्यगृह   –      शेअरमार्केट
 • नाटकाचा विषय   –    शेल कंपन्या
 • नाटकातील पात्रे –      SEBI (SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA), शेल कंपन्या. यांची संख्या ३३१, SAT(SECURITIES APPELLATE TRIBUNAL)
 • नाटकाचे प्रेक्षक –      शेअरमार्केटमधील असंख्य गुंतवणूकदार आणी ट्रेडर्स
 • समीक्षक  –      बिझिनेस आणी शेअरमार्केटशी संबंधीत दूरदर्शनवरील वाहिन्या, शेअरमार्केटमधील तज्ञ
 • नाटकाचे प्रयोग –      सोमवार पासून रोज

शेअर मार्केटच्या रंगमंचावर सकाळी ९ वाजता हे नाटक सुरु होऊन उत्तरोत्तर रंगत जाणार होते. नाटकाचा पडदा उघडला आणी घोषणा झाली की सेबीने ३३१ कंपन्यांची यादी शेल कंपन्या म्हणून घोषित केली. आणी या कंपन्यांना कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने शेल कंपन्या म्हणून ठरवल्या आहेत असे सागितले.   या कंपन्यांना ‘STAGE 4 OF THE GRADED SURVEILLANCE MEASURES’ मध्ये ताबडतोब टाकले. याचा परिणाम म्हणजे या कंपन्यांच्या शेअर्समधील ट्रेडिंगवर पुष्कळ बंधने आली या कंपन्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी ट्रेडिंग होऊ शकेल आणी ते ही T टू T म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग बंदच. सक्तीने डिलिव्हरी घ्यावी लागेल. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी २०० % मर्जीन ठेवावे लागेल. सर्व सौदे शेवटच्या क्लोजिंग भावापेक्षा जास्त भावात होतील. जर STOCK EXCHANGEला आवश्यक वाटले तर या कंपन्यांच्या विश्वासार्हतेविषयी चौकशी करून या कंपन्यांचे फोरेन्सिक ऑडीट करावे. जर या सर्वानंतर ती शेल कंपनी आहे असे ठरले तर या कंपन्यांना EXCHANGE वरून डीलिस्ट केले जाईल.
या यादीत असलेल्या बहुतेक कंपन्यांनी सांगितले की आम्ही या सेबीच्या ऑर्डरविरुद्ध SAT कडे अपील करू. झालं ! वातावरण क्षणात बदललं टाचणीने टोचल्यावर फुगा फुटावा तसेच झाले. मार्केट नाही तरी उच्चतम पातळीवर होते निमित्ताची वाटच पाहत होते. आयते कोलीत मिळाले. मार्केट पडू लागले.
या यादीत असलेल्या ३३१ कंपन्यांच्या पोटात गोळा उठला. काही कंपन्यांनी मिडीयाकडे जाऊन स्पष्टीकरण दिले आणी SAT कडे अपील करण्याची तयारी केली. या यादीत काही प्रतिष्ठीत कंपन्या होत्या उदा जयकुमार इन्फ्रा, प्रकाश इंडस्ट्रीज, पार्श्वनाथ बिल्डर्स, आसाम कंपनी, पिंकॉन स्पिरीट.
पण या ठिकाणी गुंतवणूकदारांचा विचार झालाच नाही. त्यांनी घाबरून जाऊन शेअर्स विकायला सुरुवात केली. या प्रश्नावर मिडीयामध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या. शेल कंपन्यांवर वर्तमानपत्रात लेख येऊ लागले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा कर चुकवण्यासाठी शेल कंपन्यांचा वापर करतात अशी सर्वांच्या ज्ञानात भर पडली.
कंपन्या तक्रार करू लागल्या आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. सेबी म्हणू लागले की ADMINISTRATIVE ऑर्डर विरुद्ध या कंपन्या SAT कडे अपील करू शकत नाही. सेबीने या एकाएकी केलेल्या उपाययोजनेमुळे अल्पसंख्य शेअरहोल्डर्सना या कंपन्यांमधील आपली गुंतवणूकीविषयी विचार करायला वेळ मिळाला नाही तसेच कंपन्यांना त्यांची बाजू मांडायला संधी न दिल्यामुळे ‘NATURAL JUSTICE’ या तत्वाचाही अनादर झाल्यासारखे झाले. गुंतवणूकदारांचा वाली कोणीच नाही. काही जण अवाक झाले. किती दिवस आपले पैसे अडकून पडणार बुवा अशा विचारात गढले. बहुतेक गुंतवणूकदारांचे STOP LOSS ट्रिगर झाले.सोमवार मंगळवार बुधवार मार्केट पडतच राहिले. सगळीकडे सन्नाटा पसरला. अशा प्रकारे पहिला अंक संपला.
दुसरा अंक सुरु झाला. गुरुवारी चित्र थोडे आशादायी झाले. मार्केटने संकट पचवले. थोडे थोडे मार्केट सावरुही लागले. पण प्रश्नचिन्ह होतेच. मोठमोठ्या गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवला, वर्तमानपत्रात तज्ञाचे मत वाचले, दूरदर्शन वाहिन्यांवरील चर्चा ऐकली. फंडामेंटल विवरण तसेच तांत्रिक विवरण समजून घेण्याचा प्रयत्न केला. एवढे सव्यापसव्य करून पैसे गुंतवले. मग माशी शिंकली कुठे ? एका रात्रीत ३३१ कंपन्या शेल कंपन्या झाल्या कशा? की मुळातच शेल कंपन्या होत्या पण तसे जाहीर झाले नव्हते. अंदरकी बात राम जाने!
अशावेळी इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडातून नुकसानभरपाई दिली पाहिजे अशी चर्चा सुरु झाली. कारण यात गुंतवणूकदारांची काय चूक ? जर तुम्हाला माहित होते या शेल कंपन्या आहेत तर या कंपन्यांच्या हेअर्समध्ये ट्रेडिंगला परवानगी कशी दिली अशा अनेक प्रश्नांनी गुंतवणूकदारांच्या मनात घर केले.
तर अधिक स्पष्टवक्त्या तज्ञांनी सांगितले की असे होणे हा एक प्रकारचा रिस्क आहे आणी इक्विटीमध्ये गुंतवणूक रिस्की असल्यामुळे असे प्रकार घडणारच..
दोन कंपन्यांनी SAT कडे सेबीच्या ऑर्डर विरुद्ध अपील केल्यामुळे गुरुवारी SAT या नवीन पात्राचा रंगमंचावर प्रवेश झाला. सेबीने असा फतवा काढला की SAT ला या बाबतीत ज्युरीसडीकशन नाही. कोणत्याही ADMINISTRATIVE ऑर्डर विरुद्ध तुम्ही HIGHER AUTHORITY कडे अपील करू शकत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे.
ही बातमी येताच मार्केटचे उरलेसुरले अवसानही गळाले आणी मार्केट जोरदार वेगाने पडू लागले. निफ्टी ९८०० ची पातळी तोडून खाली गेले. पण तेवढ्यात जणू काही जादूभरी बातमी आली की SATने जयकुमार इन्फ्रा आणी प्रकाश इंडस्ट्रीज या कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सेबीची ३३१ कंपन्या शेल कंपन्या ठरवण्याची  ऑर्डर ADMINISTRATIVE ऑर्डर नाही. तसेच सेबीने आपले ‘माइंड अप्लाय’ केले नाही तसेच कंपन्यांना त्यांचे म्हणणे मांडायला वेळ द्यायला पाहिजे होता.तो दिला नाही. ही ऑर्डर एकाएकी आणी वेळ न देताच काढल्यामुळे अल्पसंख्य शेअरहोल्डर्सना कंपन्यातील आपल्या गुंतवणुकीविषयी विचार करायला आवश्यक तेवढा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे SATने या दोन कंपन्यांचे अपील दाखल करून घेवून या दोन कंपन्यांची नावे RESTRICTIVE ट्रेडिंग लिस्ट मधून बाहेर काढावी असा निर्णय दिला.
शुक्रवार पासून या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये नियमित ट्रेडिंग सुरु होईल अशी आशा आहे. या दोन कंपन्या हिरो ठरल्या त्यांनी राहिलेल्या ३२९ कंपन्यांसाठी SAT मध्ये अपील करण्याचा मार्ग मोकळा केला. या राहिलेल्या ३२९ कंपन्या आणी त्यातील गुंतवणूकदारांचे भवितव्य काय कुणास ठाऊक असा विचार मनात आला. माझ्या बाबतीत असे इकडचे जग तिकडे झाले असते कां ? तर नकीच नाही. मी तुम्हाला TCS च्या ‘BUY BACK’ चा अनुभव दिला आहे. तब्बल १० दिवस हुज्जत घालावी लागली होती.
ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड असे म्हणतात. मार्केटचा मूड सुधारला शेवटच्या अर्ध्या तासात निफ्टीने ९८५० ची पातळी गाठली. मार्केटने सुटकेचा निश्वास टाकला. पण यात ज्यांनी धैर्य सोडून पडत्या भावाला आपल्याजवळचे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकून टाकले त्यांचे तर भारी नुकसान झाले. या प्रसंगातून शेअरमार्केट किती प्रगल्भ आहे आणी कोणत्याही गोष्टीला प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे ताबडतोब योग्य तो प्रतिसाद देते हे लक्षात घेण्यासारखे आहे.
या दोन कंपन्यांप्रमाणेच आणखी काही कंपन्यांना लागलेले ग्रहण सुटेल अशी आशा निर्माण झाली. साडेतीन वाजले शेवटची घंटा झाली. आणी एक अविस्मरणीय नाटक माझ्या मनात जन्मभरासाठी घर करून गेले.

आठवड्याचे-समालोचन – सुसंगती सदा घडो – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सुसंगती सदा घडो – ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०१७
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेन्डशिप साठी साजरा होतो. मार्केटमध्येसुद्धा तुम्हाला चांगले मित्र मिळवले पाहिजेत. चांगल्या शेअर्सही मैत्री करा. अर्ध्या रात्री सुद्धा तुम्ही तुमच्या मित्राला हाक मारू शकता अशा शेअर्सशी मैत्री ठेवा संकटकाळी तुमच्या मदतीला या शेअर्सचे पैसे मिळतील. कृष्ण सुदाम्याची दोस्ती श्रेष्ठ की दुर्योधनकर्णाची मैत्री श्रेष्ठ याचा विचार करा. इन्व्हेस्टर फ्रेंडली असणार्या आणी आपल्या यशात आणी समृद्धीत सहभागी करून घेणार्या तसेच पारदर्शिता आणी कॉर्पोरेट गव्हरनन्स पाळणार्या कंपन्यांशी दोस्ती करा. त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. म्हणूनच म्हणतात ‘सुसंगती सदा घडो’
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA नागरिकांना उत्तर कोरियामध्ये जाण्यावर १ सप्टेंबर २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे.
 • USA मध्ये आता उच्च शिक्षित आणी हायली स्किल्ड परदेशी नागरिकांना व्हिसा दिला जाईल. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना गुण दिले जातील. उदा. शिक्षण, ते कोठे घेतले, वय इत्यादी.
 • USA मध्ये जनरिक औषधांच्या व्यवसायाचे प्रमाण कमी होत आहे. DR रेड्डीज ची सबसिडीअरी असलेल्या ‘तेवा’ या कंपनीचे निकाल खूपच खराब आले. याचा परिणाम DR रेड्डीजच्या शेअरवर तसेच जनरिक फार्मा सेक्टरवर झाला – ल्युपिन, TORRENT फार्मा

सरकारी अन्नौंसमेंट 

 • दर महिन्याला Rs ४ ने LPG चे रेट वाढवले जातील. सरकार Rs ८७ सबसिडी मार्च २०१८ पर्यंत बंद करण्याच्या विचारात आहे. याचा फायदा BPCL, IOC यांना होईल.
 • सरकार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणी ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील आपला पूर्ण स्टेक विकणार आहे.
 • किचनवेअर बनवण्यासाठी जे केमिकल वापरले जाते त्या केमिकल्स् वर सरकारने ANTI DUMPING ड्युटी बसवली. याचा फायदा गुजरात फ्लोरोला होईल.
 • उर्जा मंत्रालयाने असे जाहीर केले की NTPC आता कोणत्याही STRESS उद्योगांची जबाबदारी घेणार नाही.
 • हिंदुस्थान कॉपरमधील ४% हिस्सेदारी कमी करण्यासाठी सरकारने OFS आणला हा OFS बुधवार ३ ऑगस्ट २९१७ रोजी नॉनरिटेलसाठी आणी ४ ऑगस्ट २०१७ रोजी रिटेल इन्व्हेस्टरसाठी ओपन होता. फ्लोअर प्राईस Rs ६४.७५ होती. पण प्रत्यक्षात ६.८३% हिस्सेदारी सरकारने विकली
 • केरोसीनची किंमत आता दर १५ दिवसांनी एकदा Rs ०.२५ ने वाढविली जाईल हळू हळू केरोसीनला देण्यात येणारी सबसिडी बंद होईल. याचा फायदा IOC, HPCL, BPCL यांना होईल.
 • सरकार रेडीयल टायरवर US $ २४५ ते ४५३ ANTI DUMPING ड्युटी लावण्याचा विचार करीत आहे. याचा फायदा टायर बनवणाऱ्या कंपन्यांना होईल. आणी टायरची विक्री वाढली की आपोआप टायर उत्पादनात लागणाऱ्या केमिकल बनवणाऱ्या (नोसिल) आणी कार्बन बनवणाऱ्या (फिलिप्स कार्बन, गोवा कार्बन) तसेच रबर बनवणाऱ्या कंपन्यांना (HARRISONS MALAYALAM) यांना होतो.
 • तसेच सरकार विंड एनर्जी आणी सोलर एनर्जीच्या संबंधात चीनमधून येणार्या निरनिराळ्या उपकरणांवर ANTI DUMPING बसवण्याचा विचार करत आहे.
 • सरकारने PNG चे भाव Rs ०.१९ ने आणी CNG चे भाव ०.32 वाढवले याचा फायदा महानगर GAS आणी IGLला होईल.
 • सरकारने DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) योजना लवकरच कार्यान्वित करेल या बातमीमुळे खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या. या योजनेअंतर्गत खताच्या किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना विकलेल्या खताच्या रकमेवर १००% सबसिडी कंपनीला मिळेल.
 • सरकार NLC मधील १५% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार आहे.
 • सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने ४ कंपन्यांच्या IPO ची तयारी सुरु केली आहे त्या या प्रमाणे MDL ( माझगाव डॉक लिमिटेड), GRSE (गार्डन रीच शिपबिल्डर्स अंड इंजिनीअर्स), MIDHANI (मिश्र धातू निगम लिमिटेड) आणी BDL( (भारत डायनामिक्स लिमिटेड)
 • PSU कंपन्यांचा ETF जाहीर होण्याची शक्यता आहे यामध्ये बँक ऑफ बरोडा, PNB, SBI यांचा समावेश असेल. नंतर आणखी दोन ETF आणले जातील. २२ कंपन्यांचे शेअर्स असतील जास्तीतजास्त १५% शेअर्स एका कंपनीचे असू शकतील. यात ७ सेक्टर सामील होतील. प्रत्येक सेक्टर साठी २०% ची सेक्टोरल कॅप असेल. या विनिवेशाचे उद्दिष्ट्य Rs १६५०० कोटी असेल.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था      

 • RBIने आपल्या २ ऑगस्टच्या वित्तीय पॉलिसी मध्ये रेपो रेट ०.२५% कमी केला. यामुळे खाजगी बँका आणी सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका आपले कर्जावरील व्याजाचे दर कमी करतील असा अंदाज आहे. RBIने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळे होणार्या फिस्कल घाट्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच कमी झालेली महागाई तात्पुरती आहे कां कायम स्वरूपाची आहे हा प्रश्न उपस्थित केला. तसेच सरकारी नोकरांना दिली जाणारी थकबाकी आणी GST लागू केल्यामुळे महागाईत वाढ होण्याची भीती व्यक्त केली. रिझर्व बँकेने बँका हा रेट कट आपल्या कर्जदारांना पास ऑन करत नसल्याबद्दल काळजी आणी नाराजी व्यक्त केली. ‘करायला गेलो आणी झाले एक’ असे RBI चे झाले आहे. कर्जावरील व्याजाचे दर कमी करावेत यासाठी RBI रेट कट करत असते पण बँका मात्र प्रतिक्रिया म्हणून ठेवींवरील व्याजाचे दर याआधीच कमी करतात. खेदाने म्हणावे लागते की RBIचे याकडे लक्ष नाही किंवा त्यांना इकडे लक्ष द्यायचे नाही. RBI ने आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज ७.३ % वर ठेवला तर महागाईचा अंदाज ४% च्या आसपास ठेवला. MCLR ला पर्याय शोधण्यासाठी एक समिती नेमली.
 • NCLT ने एस्सार स्टीलच्या बाबतीत BANKRUPTCY प्रोसिडिंग मंजूर केले. आणी IBC खालील प्रोविजनप्रमाणे BANKRUPTCY व्यावसायिक नेमला.
 • CAG (COMPTROLLER AND AUDITOR GENERAL OF INDIA) ने १२ सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या संबंधातील रिपोर्ट संसदेत ठेवला. या बँकांनी NPA कमी दाखवले, प्रोव्हीजनिंग कमी केले. त्यामुळे सरकारकडून त्याना जास्त पैसे (भांडवल) मिळाले. CAG ने MRPL च्या कार्य पद्धतीतल्या काही त्रुटी दाखवल्या. पण मार्केटमध्ये मात्र या कंपनीला ONGC विकत घेणार आहे या बातमीचाच परिणाम होता.
 • बिहारमध्ये जो मद्यार्काचा साठा होता तो दुसरीकडे ट्रान्स्फर करण्याची जुलै ३० २०१७ ही शेवटची तारीख होती. ही मुदत कोर्टाने वाढवली नाही.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • १ ऑक्टोबर २०१७ पासून UPL, बजाज फायनान्स निर्देशांकात सामील होतील तर ACC बाहेर होईल.
 • रुपयाचा US $ बरोबरचा विनिमय दर गेल्या दोन वर्षातील कमाल स्तरावर होता. १US $ =Rs ६३.७० होता. याचाच अर्थ रुपया वधारला, अर्थव्यवस्था सुधारली

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी  

 • अशोक LEYLAND ची विक्री वाढली. टाटा मोटर्स, मारुती, अतुल ऑटो या कंपन्यांची डोमेस्टिक विक्री वाढली पण टाटा मोटर्सची निर्यात कमी झाली. हिरो मोटो ची विक्री १७% ने वाढली. मारुतीने आपल्या गाड्यांवर देण्यात येणारा डीस्काउंट वाढवला.
 • ल्युपिनला त्यांच्या पिठमपूर प्लांटसाठी USFDA कडून क्लीन चीट मिळाली.
 • आसाममध्ये आलेला पूर, गुरखा मुक्तीमोर्चाचे आंदोलन, संप यामुळे चहाच्या लिलावासाठी आलेला कमी माल यामुळे चहाच्या किमती १२% ने वाढल्या याचा फायदा जयश्री टी, गुडरिक, MACLEOD RUSSEL यांना होईल.
 • ILFS ट्रान्सपोर्ट या कंपनीला जोझीला टनेलची Rs ५००० कोटीची ऑर्डर मिळाली.
 • इंडियन ह्यूम पाईपला रायपुर नगरपालिकेकडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • मेरीकोनी आफ्रीकेमधला एक लोकप्रिय ब्रांड खरेदी केला. मेरिकोचे तिमाही रिझल्ट अपेक्षेपेक्षा कमी आले.
 • ल्युपिन फार्माच्या कॉलेस्टेरालच्या औषधासाठी USFDA ची मंजुरी मिळाली तसेच जर्मन रेग्युलेटरनी त्यांच्या पिठमपूर प्लांटमधून निर्यातीला मान्यता दिली.
 • ग्लेनमार्क फार्माच्या झोविरा ऑइंटमेंट’ला USFDA ची मंजुरी मिळाली.
 • लार्सेन एंड टुब्रो या कंपनीला मॉरीशसमधून मेट्रोसाठी Rs ३३७५ कोटीची ऑर्डर मिळाली.
 • क्लारीस लाईफसायन्सेसच्या इंजेकटीबल बिझिनेसचे डील होऊ घातलेले असतानाच USFDA ने ऑडीट आणी इन्स्पेक्शन चालू केले.
 • ICICI प्रुडेन्शियल सहारा लाईफचा बिझिनेस खरेदी करणार आहे.
 • टेक महिंद्र, हेक्झावेअर, TRENT, इंडिगो, BEL,PNB(ग्रॉस NPA आणी नेट NPA मध्ये वाढ), कोलगेट, हिमाद्री केमिकल्स, TITAN,बाटा यांचे तिमाही निकाल चांगले आले.
 • सिएट टायर्स,उज्जीवन फायनान्स, MRF चे निकाल असमाधानकारक होते.
 • SBI ने Rs १ कोटीपेक्षा कमी ठेव असलेल्या बचत खात्यावरील व्याजात अर्धा टक्क्याची कपात करून व्याजाचा दर ३.५% केला. जर बचत खात्यात Rs १ कोटीपेक्षा जास्त ठेव असेल तर त्यावर ४% व्याज मिळेल. अशा अकौंटला TIER 2 असे नाव दिले. ICICI बँक, कोटक महिंद्र बँक यांनी SBI चे अनुकरण केले.
 • बायोकॉनच्या बँगलोर युनिटची USFDA ने २५ मे ते ३ जून या कालावधीत तपासणी केली. त्यांनी या तपासणीत १० त्रुटी दाखवून फॉर्म ४८३ दिला. बहुतांश त्रुटी सिस्टीममधील आहेत. एक त्रुटी TRAINED स्टाफ नाही असे दर्शवते. या त्रुटी सुधारायला वेळ लागेल.
 • GSPC चा मुन्द्रा LNG पोर्ट आहे त्यातील २५% हिस्सेदारी IOC, २५% पेट्रोनेट LNG खरेदी करणार आहे.
 • ‘जब HARRY मेट सेजल’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. याचा फायदा PVR या कंपनीला होईल.
 • पुंज लॉईड यांना मलेशियाच्या EPCC पाईपलाईन प्रोजेक्टसाठी अंतिम मंजुरी मिळाली.
 • मारुती गुजरातमध्ये बेचराजीच्याजवळ शंखलपूर येथे काम सुरु करणार आहे याचे उद्घाटन जपानचे पंतप्रधान करतील.

कॉर्पोरेट एक्शन

 • SNAPDEAL आणी FLIPCART यांचे मर्जर होणार नाही.
 • शोभा डेव्हलपर्स शेअर Rs ४२५ प्रती शेअर या भावाने ‘BUY BACK’ चा विचार करत आहे.
 • HDFC लाईफ आणी MAX इन्शुरन्स मर्जर रद्द झाले.
 • MTNL आणी BSNL याचे मर्जर रद्द झाले.
 • ‘JUST DIAL’Rs ७०० प्रती शेअर या भावाने Rs ८३.९१ कोटी रकमेचे शेअर्स BUY BACK करणार आहे.
 • PFC या उर्जा क्षेत्रातील सरकारी कंपनीने बोनस इशुवर विचार करण्यासाठी 10 ऑगस्ट २०१७ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • महिंद्र आणी महिंद्र त्यांचा महिंद्र लॉजिस्टिक्स मधील १५% स्टेक ओपन ऑफर द्वारा IPO आणून विकणार आहेत.
 • मरकेटर ही जहाज वाहतुकीच्या क्षेत्रात असणारी कंपनी ड्रेजिंग कॉर्पोरेशन मधील स्टेक विकत घेणार आहे.

या आठवड्यातील IPO

 • SIS (SECURITY AND INTELLIGENCE SERVICES) या कंपनीचा IPO ६ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • कोचीन शिपयार्डचा IPO एकूण ७६ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला. HNI कोटा २८८ वेळा तर रिटेल कोटा ८.३ वेळेला ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • DIXON टेक्नोलॉजीज ला IPO साठी सेबीची परवानगी मिळाली.

तांत्रिक विश्लेषण

 • मंगळवारी ‘HANGING MAN PATTERN’ फॉर्म झाला.
 • बुधवार तारीख २ ऑगस्ट २०१७ आणी गुरुवार ३ ऑगस्ट २०१७ रोजी ‘बेअरीश बेल्ट होल्ड PATTERN’ तयार झाला होता. या PATTERN मध्ये ओपनिंग प्राईस हीच दिवसाची हाय प्राईस असते त्यामुळे अपर SHADOW नाही दिवसभर मार्केट पडत असते त्यामुळे लार्ज बॉडी आणी स्माल लोअर SHADOW असते’ अशीच स्थिती बुधवार आणी गुरुवारी होती
 • बँक शेअर्सची साप्ताहिक आणी मासिक एक्सपायरीचा डेटा वेगवेगळे संकेत देत आहे.

मार्केटने काय शिकवले

 • स्टेट बँकेच्या शेअरची किमत Rs ३०९ आहे अशावेळी जास्तीतजास्त Rs ३२० चा CALL घ्यावा. पण Rs ३६० चा दूरचा CALL Rs ०.८५ पैशाने मिळत असला तरी फायदा होत नाही. ज्या वेगानी शेअर पडत असतो त्या प्रमाणात ओपन इंटरेस्ट वाढला पाहिजे. पण असे आढळले नाही तर CONTRA CALL घ्यावा.
 • मंगळवारी PUT /CALL रेशियो १.२२ वरून १.२८ झाला. पण VIX वाढला. बुधवारी हा रेशियो १.२८ वरून १.३१ झाला. तर गुरुवारी १.३१ वरून १.२७ झाला.
 • स्पॉट मार्केट मध्ये शेअरची किमत Rs ३ वरती आणी वायद्यामध्ये Rs १५ खाली आहे याचा अर्थ म्हणजे वायद्यामध्ये शॉर्ट पोझिशन घेतली जात आहे. असा संकेत मिळतो.
 • बातम्यांचा परिणाम कोणत्या कम्पनीवर आणी किती होईल हे समजण्यासाठी कंपनी कोणत्या क्षेत्रात आणी काय उत्पादन करते हे माहीत असावे लागते. ‘ग्रीव्ज कॉटन’ ही कंपनी तिच्या नावावरून टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल असे वाटते. पण दिसते तसे नसते. ही कंपनी कार्ससाठी इंजिन तयार करते ऑटो सेक्टर चांगला चालला तर या कंपनीचा फायदा होतो.
 • ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन बदलते. तेव्हा आपण नवीन व्यवस्थापनात कोण कोण आहेत ह्याच्या कडे लक्ष द्यावे. ज्युबिलंट फूड्समध्ये पेप्सी मध्ये जी टीम होती ती आली. त्यांनी पेप्सीमध्ये असताना पुष्कळ चांगले बदल केले होते आता ज्युबिलंटमध्ये आल्यानंतरही त्यांनी बऱ्याच नवीन योजना सुरु केल्या आहेत.
 • US $ कमजोर झाला की त्या प्रमाणात धातू क्षेत्रातील शेअर्सच्या किमती वाढतात.
 • नेहेमी वायदा बाजारातील एक्सपायरी झाल्यावर FII ची आकडेवारी खरेदीच्या बाजूची असते पण यावेळी विक्रीच्या बाजूने जास्त आकडे होते त्यामुळे छोटे करेक्शन अपेक्षित होते. बरोबर तसेच घडले.

या आठवड्याची सुरुवात जरा डळमळीतच म्हणजे दोलायमान अवस्थेत झाली. मार्केट वरच्या पातळीवर तर समोर उभी ठाकलेली RBIची मॉनेटरी पॉलिसी अशा परिस्थितीत ट्रेडर्सनी आपली पोझिशन हलकी करण्याचा विचार केला नाही तरच नवल. RBI ०.२५% रेट कट करणार हे मार्केटने गृहीतच धरले होते.याचा परिणाम शेअर्सच्या किमतीत समाविष्ट झाला होता. मार्केटला ०.५०% रेट कट हवा होता. त्यामुळे मार्केट रुसले, रागावले परिणामी २ दिवस मार्केट मध्ये मंदी आली. आता RBI च्या पॉलिसी प्रमाणे मार्केटचे लक्ष GST कौन्सिलच्या बैठकीकडे लागले आहे. गेल्या वेळच्या बैठकी मध्ये ITC आणी इतर सिगारेट उत्पादकांवर वीज कोसळली होती यावेळेला काय होते ते पहायचे.
BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३२३२५ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १००७० वर बंद झाले. बँक निफ्टी २४८३६ वर बंद झाले.