Guru Purnima 2014

आठवड्याचे-समालोचन – मार्केट हाच गुरु – ०४ सप्टेंबर २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मार्केट हाच गुरु – ०४ सप्टेंबर २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७
घटनांचा सुकाळ पण मार्केटमध्ये दुष्काळ असे या आठवद्याचे वर्णन करतां येइल. मार्केट वाढते आहे की पडते आहे हे समजत नव्हते. पण “ बाळ तुला समजत नाही कां ? मी समजावतो हं ! रोज माझे निरीक्षण कर. प्रत्येक गोष्टीचा उलगडा होईल.” असे मार्केट मला सांगत आहे असे वाटले. त्यामुळे ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षकदिनाच्या दिवशी माझा आदर्श शिक्षक म्हणून मी मार्केटचेच मनापासून आभार मानले.
शेअर मार्केट थिअरी आणी प्रात्यक्षिक यांचा मेळ बरोबर घालते. जे मोठेमोठ्या तज्ञानाही जमत नाही. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे ज्या कंपन्यांचे  कामकाज चांगले आहे ते शेअर मजबूत असतात. पण VOLUME म्हणजेच देवघेवीची पण गरज असते. ज्या शेअरमध्ये देवघेव किंवा व्यवहार वाढतात त्या शेअरच्या किंमतीतही जोरदार हालचाल दिसते. चांगली बातमी की वाईट बातमी याचा न्यायनिवाडा ताबडतोब केला जातो त्यात पक्षपात नाही त्यामुळे मार्केट हाच गुरु.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA चे अध्यक्ष ट्रम्प आणी USA मधील उद्योगजगत यामध्ये एक फार चित्तवेधक लढाई सुरु आहे. USA च्या नागरिकांच्या हितासाठी USA मधील प्रवेशावर किंवा वास्तव्यावर ट्रम्प जे निर्बंध आणत आहेत त्याला USA मधील उद्योग जगत प्रखर विरोध करत आहे. मग तो H1B व्हिसाचा प्रश्न असो किंवा विशिष्ट देशातून येणार्या लोकांवर बंदी घालण्याचा प्रश्न असो किंवा आताचा DACA (DEFERED ACTION FOR CHILDREN ARRIVAL) रद्द करण्याचा निर्णय असो. जी लहान मुले बेकायदेशीररीत्या USA मध्ये आली किंवा आणली गेली आणी मोठी झाली त्यांना USA मधील वास्तव्यासाठी या कायद्यात प्रावधान आहे. USA च्या उद्योग जगताचे असे म्हणणे आहे की या लोकांनी USA मधील उद्योगांच्या प्रगतीला आणी त्याद्वारे USA च्या प्रगतीला हातभार लावला आहे. आता त्यांना अचानक देशाबाहेर जा असे सांगणे क्रूरपणा होईल. हा कायदा रद्द केल्यामुळे २०००० भारतीयांना  भारतात परत पाठवले जाऊ शकते. कोणतेही दरवाजे उघडणे सोपे असते पण त्रास व्हायला लागल्यावर बंद करणे फार अवघड जाते. आपला देश यावरून आपली अर्थव्यवस्था खुली करताना धडे घेऊ शकतो.
उत्तर कोरियाने जास्त ताकदीच्या हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण केले.  त्यामुळे USAचे अध्यक्ष ट्रम्प भडकले. त्यानी उत्तर कोरियावर सर्व जगाने आर्थिक निर्बंध घालावेत आणी उत्तर कोरियाबरोबरचा व्यापार थांबवावा असे आवाहन केले. चीनचा बर्याच नोठ्या प्रमाणावर उत्तर कोरियाबरोबर व्यापार चालतो. याचा चीनच्या चलनावर कसा परिणाम होतो हे पाहिले पाहिजे. USA वर निसर्गाचा कोप होतो आहे हार्वे पाठोपाठ ‘इर्मा’ नावाचे वादळ USA च्या किनार्यावर धडकेल.
सोमवारी USA ची मार्केट्स लेबर डेची सुट्टी असल्यामुळे बंद होती. हे मार्केटच्या दृष्टीने चांगले असते म्हणा ! जेव्हा  मांजरे नसतात तेव्हा उंदीर चांगले खेळतात तशी भारतीय बाजाराची गत आहे.
युरोपिअन सेन्ट्रल बँकेने आपला अर्थव्यवस्थेला STIMULAS देणारा कार्यक्रम सुरु ठेवणार अशी घोषणा केली.  ECB ने व्याजाचे दर कायम ठेवून ६० बिलियन युरो प्रती महिना याप्रमाणे डिसेंबर २०१७पर्यंत ASSET(बॉंड)   विकत घेउ असे सांगितले. जर अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गरज भासली तर यातील रकमेमध्ये किंवा मुदती मध्ये वाढ करण्यात येईल असे सांगितले.
MEXICO मध्ये ८ रिक्टर स्केलचा भूकंप झाला याचे परिणाम म्हणून ८ देशांना सुनामीची सुचना दिली.
सरकारी अन्नौनमेंट

 • भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाले. पियुष गोयल रेल्वे मंत्री, सुरेश प्रभू वाणिज्य मंत्री, आणी निर्मला सीथारामन या संरक्षण मंत्री झाल्या. रेल्वे, वाणिज्य, आणी संरक्षण मंत्रालयाच्या बाबतीत उद्योगजगताला अगत्य आहे कारण या तीनही खात्यात खाजगी उद्योगांना मोठमोठी कामे मिळण्याची शक्यता आहे.
 • एअर इंडिया ही सरकारी विमान वाहतूक कंपनी विकण्याची सरकारने योजना बनवली आहे. एअर इंडियाला असलेले Rs ३१००० कोटींचे कर्ज आणी एअर इंडियाच्या ५ सबसिडीअरी आणी १ जॉइंट व्हेन्चर आणी इतर संपत्ती एक SPV (स्पेशल पर्पज व्हेहिकल) बनवून तिच्याकडे सुपूर्द केले जाईल ही SPV हे सर्व विकून जितके कर्ज फेडता येईल तेवढे फेडेल. जर काही कर्ज बाकी उरले तर ते फेडण्याची सरकार व्यवस्था करेल. यासाठी सरकार करमुक्त रोखे वापरू शकते. एअरक्राफ्ट विकत घेताना त्या एअरक्राफ्टसाठी घेतलेले कर्ज एअरक्राफ्ट विकत घेणाऱ्याच्या नावाने ट्रान्स्फर होईल.
 • गुजरात राज्य सरकारने आपले टेक्स्टाईल धोरण एक वर्षाकरता वाढवले. या धोरणात स्वस्त कर्ज आणी स्वस्त वीज याची तरतूद आहे.
 • सरकारने दक्षिण भारतातील साखर कारखान्यांना साखरेची आयात करण्याची परवानगी दिली आहे. सरकार एकूण ३ लाख टन साखरेची आयात करेल.
 • पुणे, पाटणा, चेन्नई येथे नवीन एअर पोर्ट होतील तसेच इतर ठिकाणी २५० एअरपोर्ट बांधणार आहे.
 • सरकारने गोल्ड लोनवरच्या व्याजाच्या रेटमध्ये कपात करावी आणी सोने लीजवर आयात करण्यास परवानगी द्यावी अशी अर्थमंत्रालयास PMOने शिफारस केली आहे.
 • सरकारने NBCC या कंपनीला विदेशात काम मिळण्याची संभावना बघायला सांगितली आहे.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था

 • सुप्रीम कोर्टाने जे पी इन्फ्राच्या बाबतीत IBC खाली INSOLVENCY ची प्रक्रिया सुरु करण्याच्या NCLT च्या निर्णयास स्थगिती दिली.
 • सिप्लाच्या गोव्यामधील ४ युनीट्सना जर्मन ड्रग एजन्सीने पुन्हा परवानगी दिली.
 • SEBI ने असे जाहीर केले की जे डायरेक्टर्स शेल कंपन्यांमध्ये डायरेक्टर होते ते दुसऱ्या कंपन्यांत डायरेक्टर्स असू शकणार नाहीत.
 • STOCK एक्स्चेंजचा ट्रेडिंग टाईम वाढवावा आणी शनिवारी ट्रेडिंग चालू करावे काय यावर विचार करण्यासाठी SEBI ने बैठक बोलावली आहे. याचा फायदा STOCK एक्स्चेंज आणी ब्रोकरना होईल. उदा EDELWEISS, JM फायनान्स, मोतीलाल ओस्वाल, रेलीगेरे, आणी CDSL आणी NSDL या डीपॉझीटरीजना होईल.
 • सेबीने दोन प्रस्तावावर चर्चा करायला सुरुवात केली आहे. (१) सुमारे ७५००० पब्लिक लिमिटेड आणी १ मिलियन प्रायव्हेट अनलिस्टेड कंपन्याच्या शेअर्सचे डीमटेरीअलायझेशन करायचे (२) STOCK डेरिव्हेटीव CONTRACT मध्ये फिझीकल सेटलमेंट करणे. म्हणजे शेअर्सची प्रत्यक्ष डिलिव्हरी देणे किंवा घेणे. आता ही CONTRACTS कॅशमध्ये सेटल होतात.
 • आता ज्याप्रमाणे बँकनिफ्टी मध्ये वायदेबाजारामध्ये आठवड्याचे सौदे होतात त्याप्रमाणे निफ्टी 50 मध्ये वायदे बाजारात साप्ताहिक सौदे होतील
 • ब्युरो ऑफ एनर्जी एफिसियन्सी ने LED इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी काही नवीन नियम केले.आता BEE रेटिंग शिवाय ही उपकरणे विकली जाउ शकणार नाहीत. याचा फायदा सूर्या रोशनी,बजाज इलेक्ट्रिकल, HAVELLS या कंपन्यांना होईल. या उपायांमुळे चीनमधून होणार्या स्वस्त मालाच्या आयातीला आळा बसेल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • USA मधील मेरीगोल्ड कॅपिटल ही कंपनी हॉटेल लीलाची चेन्नई येथील मालमत्ता खरेदी करणार आहे.
 • हिंदुस्थान झिंक झिंकबरोबर चांदीचे उत्पादन करत असल्यामुळे वाढलेल्या चांदीच्या भावामुळे (Rs ४५०००) या कंपनीला फायदा होईल.
 • इंद्रप्रस्थ GAS या कंपनीला कर्नाल सिटीमध्ये GAS वितरणासाठी अडाणी ग्रूपबरोबर लायसेस मिळाले.
 • एल आय सीने बँक ऑफ बरोडाच्या शेअर्स मधील आपला स्टेक कमी केला.
 • रिलायंस इथेन आयात करतात आणी याचा उपयोग नाफ्ताएवजी केला जातो. त्यामुळे रिलायंसचे मार्जिन वाढेल.
 • कोरोमोंन्डेल फरटीलायझरला Rs १७५० कोटी मिळणे बाकी आहे. २०१८ सालापासून DBT चालू होणार असल्यामुळे कंपनी सहा महिन्यात कर्जमुक्त होऊ शकेल.
 • मंगळवार तारीख ६ सप्टेंबर २०१७ रोजीच्या रिलायंस कॅपिटलच्या किंमतीत (Rs ६८८) रिलायंस होम फायनान्सची किंमत नव्हती. त्यामुळे रिलायंस होम फायनांसचा भाव Rs १३७ झाला.
 • भारत-म्यानमार-थायलंड हा हायवे बनवण्याचे काम पुंज लॉईड या कंपनीला मिळाले.
 • USA मध्ये क्लास 8 ट्रकची विक्री वाढली याचा फायदा भारत फोर्जला होईल.
 • पेट्रोनेट एल एन जी ही कंपनी सिंगापूरमध्ये एल एन जी टर्मिनल लावणार आहे. हे जॉइंट वेंचर जपान आणी श्री लंकेच्या कंपनीबरोबर पेट्रोनेट एल एन जी करेल.
 • टाटा मोटर्सच्या जमशेदपूर प्लांट मध्ये संप चालू आहे.
 • MCX वर दसऱ्यानंतर सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेड सुरु करणार आहे.
 • आयचर मोटर्स ही कंपनी VOLKSWAGEN या कंपनीची मोटरबाईक बनविणारी DUCATI ही कंपनी विकत घेण्यासाठी बीड टाकणार आहे.
 • बँक ऑफ बरोडाने त्यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सुमारे Rs ४०० कोटी किंमतीच्या २७५ विविध मालमत्ता विकायला काढल्या आहेत
 • युनायटेड बँक आपले ४८ NPA अकौंट Rs ८६२ कोटींना विकणार आहे.
 • IDBI आपला SIDBI मधील १३.७ स्टेक विकणार आहे त्यासाठी बोली मागवल्या आहेत.
 • कॅडिला हेल्थकेअरच्या मोरेय्या प्लांटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली.
 • गुंतवणूकदारांना बरोबर माहिती दिली नाही म्हणून USA मधील ३ LAW फर्म्सनी DR रेड्डीज या कंपनीविरुद्ध क्लास एक्शन SUIT दाखल केली जर्मन रेग्युलेटरने. DR रेड्डीजच्या दुवाडा प्लांटच्या केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये ६ त्रुटी दाखवल्या
 • ONGCच्या झारखंडमधील दोन कोळशाच्या खाणींमध्ये जानेवारी मार्च पासून उत्पादन सुरु झाले.जोपर्यंत क्रूड 65 च्या खाली आहे तोपर्यंत ONGC वर सबसिडीचा ताण असणार नाही.
 • STAR INDIA ला IPL चे ५ वर्षांसाठी टी व्ही डिजिटल राईट्स Rs १६३४७ कोटीना मिळाले.
 • आंध्र प्रदेश आणी तेलंगणामध्ये सिमेंटचा भाव ५० किलोच्या गोणीमागे Rs १० ने वाढवला.
 • मध्यप्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे सोयाबीनच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • JENBURKT फार्मा या कंपनीने ९ सप्टेंबर २०१७ रोजी शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • NLC मधील १५% हिस्सेदारी सरकार विकून आपली हिस्सेदारी ८९% वरून ७४% वर आणणार आहे.
 • मर्क ग्लोबल आपला हेल्थकेअर कारभार विकणार आहेत.
 • रेड्डीज या कंपनीने २०१० मध्ये GSK कडून पेनिसिलीनचा कारभार खरेदी केला होता. तो आता DR रेड्डीज USA मध्ये विकणार आहेत.
 • रिलायंस इंडस्ट्रीज LTD चे शेअर्स गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर पासून एक्स-बोनस झाले.

या आठवड्यातले आणी नजीकच्या भविष्यकाळातील IPO

 • या आठवड्यात भारत रोड नेटवर्क चा IPO ६ सप्टेंबर २०१७ ला ओपन होऊन ८ सप्टेंबर २०१७ ला बंद झाला. प्राईस BAND Rs १९५ ते Rs २०५ असून मिनिमम लॉट ७३ शेअर्स चा होता. या कंपनीचा मुख्य व्यवसाय सरकारी कामानुसार रोड बांधून त्याच्या टोलमधून उत्पन्न मिळविणे हा आहे. या IPO ला गुंतवणूकदारांनी थंडा प्रतिसाद दिला.
 • दुसरा IPO DIXON TECHNOLOGIS (INDIA) या कंपनीचा आला. प्राईस BAND Rs १७६० ते Rs १७६६ होता. मिनिमम लॉट ८ शेअर्सचा होता. ही कंपनी इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी व्हाईट गुड्स (मोबाईल्स, वाशिंग मशीन्स, इत्यादीचे उत्पादन करते. ह्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला.
 • रिलायंस जनरल इन्शुअरंस च्या IPO ला IRDA ने मंजुरी दिली आहे. हा IPO नोव्हेंबर २०१७ पर्यंत येईल. या IPO द्वारा रिलायंस कॅपिटल आपला २५% स्टेक विकेल.
 • ICICI लोम्बार्डचा IPO १५ सप्टेंबरला ओपन होऊन १९ सप्टेंबरला बंद होईल. या IPOचा प्राईस BAND Rs ६५१ ते Rs ६६१ असून मिनिमम लॉट २२ शेअर्सचा आहे. ही कंपनी ICICI बँक आणी FAIRFAX यांचे जॉइंट व्हेन्चर असून या IPO द्वारा त्यांचा प्रत्येकी १९% स्टेक विकणार आहेत. ह्या इशू द्वारे कंपनी Rs ५७०० कोटी उभारेल. ही कंपनी खाजगी जनरल इन्शुरन्सच्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा मार्केट शेअर ८.४ % असून कंपनीने FY २०१७ साठी Rs ६२२ कोटींचा नफा मिळवला आहे. MAX FANANCIAL आणी ICICI प्रू या कंपन्या स्पर्धक आहेत.
 • SBI लाईफ इन्शुरन्स या कंपनीचा IPO २० सप्टेंबरला उघडेल. या IPO द्वारा Rs ८५०० कोटी गोळा होतील.
 • चेन्नई स्थित विवाह जुळविणारी संस्था COM या कंपनीचा IPO सप्टेंबर ११ २०१७ ला ओपन होऊन १३ सप्टेंबर २०१७ ला बंद होईल. हा IPO Rs ५०० कोटींचा असून प्राईस BAND Rs ९८३ ते Rs ९८५ आहे. रिटेल गुंतवणूकदारांना Rs ९८ डिस्काऊंट आहे मिनिमम लॉट १५ शेअर्सचा आहे. ही कंपनी आपल्या भारत, कम्युनिटी, आणी एलाईट MATRIMONY.COM या तीन ब्रांडतर्फे ऑनलाईन विवाह जुळविण्याचे काम करते. या कंपनीला २०१६ पर्यंत तोटा होत होता, या कंपनीचे प्रमुख उत्पन्न नोंदविलेल्या सभासदांची वर्गणी असल्यामुळे अनिश्चित असते. हा IPO महाग किंमतीला आणला आहे. या कंपनीचा INFO EDGE (शादी.com) हा स्पर्धक आहे.

या आठवड्यातले लिस्टिंग

 • APEX फ्रोझन फूड्सचे सोमवारी Rs १९९.९० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १७५ लाडीला होता. शेअर लिस्टिंग नंतर वाढला.

मार्केटने काय शिकवले
सर्व मार्केट विश्लेषक तज्ञ आपापल्या कुवतीनुसार आणी अनुभवानुसार जे मार्केटमध्ये घडते किंवा घडणार आहे त्यावर आपापली मते व्यक्त करत असतात. त्यांचीही मते काही वेळा, काही विशिष्ट परीस्थितीत चुकीची ठरू शकतात. आपल्याला लोकांची, तज्ञाची, विश्लेषकांची मते, आपण अभ्यासाअंती बनवलेली मते आणी मार्केटमध्ये प्रत्यक्षात निर्देशांकात आणी वेगवेगळ्या शेअर्सच्या किंमतीत होणारे बदल यांची सांगड घालणे जरुरीचे असते. मार्केट काही वेळेला काही गोष्टींना प्रमाणाबाहेर तीव्र आणी आकस्मिक प्रतीक्रिया देते. अशावेळी आपल्या मनाचा तोल न जाऊ देता आपल्या अभ्यासाधिष्ठीत मताचा फेरविचार करावा आणी शांत राहून रिस्क रिवार्ड रेटचा विचार करून निर्णय घ्यावा. आपल्या अशाच वेळच्या भूतकाळातील असा अनुभव आणी त्यावेळी आपण केलेली कृती आणी त्याचे परिणाम आठवावे आणी सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी मार्केट समान परिस्थितीमध्ये एकाच तऱ्हेच्या घटनेला वेगवेगळी प्रतिक्रिया देते. ‘ऐकावे विश्लेषकांचे, तज्ञांचे पण करावे आपल्या अभ्यासानुसार आणी अनुभवानुसार’ हा मंत्र सतत जपावा. कारण जर नुकसान झाले तर आपलेच होणार असते.
दोन नवीन लिस्टिंग झालेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव विरुद्ध दिशेने जात आहेत. AB कॅपिटलला रोज लोअर सर्किट लागत आहेत तर अपेक्स फ्रोझन फूड्स ला रोज वरचे सर्किट लागत आहे.
आता सणासुदीचा हंगाम चालू झाला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातातही पिकाचे पैसे या दोन महिन्यात येतील. सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भत्त्यांची थकबाकी मिळेल. त्यामुळे ऑटो, FMCG, क्षेत्रातील कंपन्यांची विक्री आणी नफा वाढेल GST चे चित्रही साफ होत जाईल त्यामुळे तिसरया तिमाहीचे या क्षेत्रातील कार्यरत कंपन्यांचे निकाल चांगले येतील अशी अपेक्षा आहे.
GST च्या परिणामाविषयी अनिश्चितता असल्यामुळे सर्व कंपन्यांनी आपल्या जाहिरात खर्चाला तात्पुरता आळा घातला होता. आता GST विषयी चित्र स्पष्ट झाल्यामुळे पूर्वीप्रमाणे जाहिरात खर्च कंपन्या करायला लागल्यामुळे मिडीया क्षेत्रातल्या कंपन्यांना चांगले दिवस येतील. म्युजिक ब्रॉडकास्ट, HT मेडीया, राज टीव्ही, सन टी व्ही, टी व्ही 18, एनडीटीव्ही, मुक्ता आर्ट्स, ADLABS, हिंदुजा व्हेंचर्स, डेन नेटवर्क, टीव्ही टुडेया कंपन्या मीडीया क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘मी तब्येतीने ठणठणीत आहे’ असे मार्केट सांगते आहे असे वाटते, कितीही वादळे आली तरी निफ्टीने ९९०० चा किल्ला गेले दोन आठवडे लढवला आहे. शेअर मार्केटने अनेकाना ज्ञानी केले आहे. रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पैसा मिळवण्याची संधी दिली आहे. आईप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. शेअरमार्केटचे संस्कार लावले आहेत. त्यामुळे मी शेअरमार्केट्ची ऋणी आहे
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१६८७ आणी NSE निर्देशांक निफ्टी ९९३४ आणी बँक निफ्टी २४३७० वर बंद झाले.
 
 
 

3 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – मार्केट हाच गुरु – ०४ सप्टेंबर २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७

 1. shashikant khadkikar Post author

  छान माहिती. ती ATC COIN please माहिती सांगा.

  सांगा

  Reply
 2. Ganesh Nitin Kale Post author

  Hi Bhagyashree… I read your 38 blogs but i couldnt read after that as the click next link takes me to different page which is not the continuation of the blog, can you pls help me with your 39th blogs and so on.
  you can send me the link on ganeshk2788@gmail.com or 9619699889.

  Reply
 3. Pingback: Anonymous

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.