आठवड्याचे-समालोचन – नव्या विचारांची घटस्थापना, जुन्या विचारांचे सीमोल्लंघन – 18 सप्टेंबर २०१७ ते २२ सप्टेंबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी भारत विरुद्ध ऑस्टेलिया हा एक दिवशीय सामना भारताने जिंकला. PV सिंधूने कोरिया ओपन badminton स्पर्धा जिंकली. त्यामुळे क्रीडा रसिकांना मेजवानी मिळाली त्यामुळे week-end आनंदात गेला. नव्या आठवड्याची सुरुवात उत्साहांत झाली. या आठवड्यात डिक्सन टेक्नोलॉजीचे झालेले दणदणीत लिस्टिंग, नव्या IPO ची गर्दी आणी रेकॉर्ड स्तरावर सोमवारी निफ्टीनी केलेली सुरुवात आणी शेवट ही या आठवड्याची वैशिष्ट्ये म्हणता येतील.या आठवड्याचा शेवट मात्र गोड झाला नाही. US $ मध्ये आलेली मजबुती पर्यायाने रुपयाचे कमी झालेले विनिमय मूल्य CAD मध्ये झालेली वाढ या कारणांमुळे मार्केट ढासळले.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA आणी उत्तर कोरियामध्ये तणातणी चालूच आहे. उत्तर कोरिया प्रशांत महासागरामध्ये परमाणु परीक्षण करणार आहे. USA अध्यक्षांनी असे जाहीर केले की USA किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांना जर बचाव करण्याची वेळ आली तर आम्ही उत्तर कोरियाचा विध्वंस करू. USA ने ज्या USA मधील कंपन्या उत्तर कोरियाशी व्यवहार करतील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत.
 • फेड या USA च्या सेन्ट्रल बँकेने दरामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. ऑक्टोबर २०१७ पासून फेड आपली BALANCE SHEET कमी करायला सुरुवात करेल. म्हणजे मार्केटमध्ये बॉंड खरेदी करणे थांबवेल. यावर्षी २०१७ मध्ये १ दर वाढ तर २०१८ मध्ये तीनदा दर वाढ केली जाईल. असे घोषित केले.
 • S & P या रेटिंग एजन्सीने चीनच्या वाढत्या कर्जामुळे चीनचे सॉवरीन क्रेडीट रेटिंग AA- वरून एक स्टेप कमी करून A + असे केले. १९९९ पासून हे चीन अर्थव्यस्थेचे पहिलेच डाउन ग्रेडिंग आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकार ३ ते ४ PSU बांधकाम कंपन्यांचे NBCC मध्ये मर्जर करेल.
 • एनर्जी एफिसियंट सर्विसेस या कंपनीने स्मार्ट ग्रीड प्रोजेक्टच्या अंतर्गत ५० लाख स्मार्ट मीटर्ससाठी उत्पादन करण्याचे CONTRACT मिळवण्यात 50 टॉप भारतीय आणी परदेशी कंपन्यांनी रस दाखवला आहे. या स्मार्ट मीटरमुळे टेलिकॉम कंपन्यांचा फायदा होईल.
 • CDSCO ( THE CENTRAL DRUGS STANDARD CONTROL ORGANISATION) ही ड्रग रेग्युलेटीग ऑथोरिटी लवकरच प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध असलेल्या औषधांची यादी ‘ओव्हर द काऊनटर ड्रग्स’ या नावाने प्रसिद्ध करील.
 • ‘हर घर बिजली’ या योजनेअंतर्गत ४ कोटी घरात वीज देण्याची योजना आहे.
 • मुंबई ट्रान्सहार्बर लिंकसाठी निविदा मागवल्या होत्या. आलेल्या १७ निविदांपैकी १० निविदांची निवड केली.
 • सरकारने रेडीयल, बस टायर, चीनमधून आयात होणाऱ्या टायर्सवर ANTI DUMPING ड्युटी लावली. ‘नैसर्गिक रबरा’च्या किंमती कमी होत आहेत. याचा फायदा टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना विशेषतः JK टायर्स (रिप्लेसमेंट टायर मार्केटमध्ये ३४% मार्केटशेअर) या कंपनीला होईल.
 • ट्रान्सफॉर्मर, मीटर्स, तारा यांच्या उत्पादनासाठी सबसिडी देणार. महाराष्ट्रात राज्य सरकार ४ शहरात फ्रान्चाईजी देणार.
 • केंद्र सरकारने कोल इंडिया आणी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७० दिवसाचा पगार बोनस म्हणून जाहीर केला.
 • सरकार गोल्ड मॉनेटायझेशन योजनेत काही बदल करणार आहे. सुरुवातीला फॉर्म भरतानाच तुम्हाला सांगावे लागेल की परतावा सोन्याच्या स्वरूपात हवा ही रोख पेशात हवा. ड्यू डेटच्या आधी तीन महिने पुन्हा आपल्याला विचारले जाईल. जर सोन्याच्या स्वरूपात परतावा हवा असेल ते ४५ दिवस आधी कळवावे लागेल.

RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
सेबीने REIT(रिअल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) आणी InvIT (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) यांना कर्ज रोख्यांच्या  द्वारे पैसा उभा करण्यास परवानगी दिली आहे. आता पर्यंत त्यांना फक्त बँकांकडून कर्ज घेण्याची परवानगी होती. सेबीने REITना संबंधीत होल्डिंग कंपनीला किंवा ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ला कर्ज देण्यास परवानगी दिली.
TRAIने IUC( INTERCONNECT USAGE CHARGE) मध्ये ५७% कपात केली IUC Rs ०.१४ प्रती मिनिट वरून Rs ०.०६ प्रती मिनिट एवढा कमी केला. आणी सांगितले की २०२०पर्यंत हा IUC हळू हळू कमी करत जाऊन १ जानेवारी २०२० पासून रद्द केला जाईल. TRAI च्या या निर्णायाचा रिलायंस जीओ, RCOM आणी एअरसेल यांना फायदा होईल तर भारती एअरटेल, वोडाफोन, आणी आयडीया सेलुलर याना नुकसान होईल. TRAIच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे ग्राहकाच्या मोबाईल बिलात कपात झाल्यामुळे ग्राहकाला फायदा होईल. बहुतेक टेलिकॉम कंपन्या TRAI च्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याच्या मनःस्थितीत आहेत.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
भारताची निर्यात ऑगस्ट २०१७ महिन्यासाठी १०.३% ने वाढून US$ २३.८ बिलियन झाली, भारताची आयात २१% वाढून US$ ३५.४६ बिलियन झाली. त्यामुळे भारताची ट्रेड डेफिसिट US$.११.६ बिलियन झाली.
भारताचे परदेशी विनिमय रिझर्व ८ सप्टेंबर रोजी US$ ४००.७३ बिलियन होते. यात प्रामुख्याने वाटा FDI (US $ ७.२ बिलियन), FPI( FOREIGN PORTFOLIO INVESTORS)US$ १२.५ बिलियन)यांचा होता. हा रिझर्व वाढल्यामुळे जागतिक अर्थकारणात जे फेर बदल होतात त्यांना भारतिय अर्थव्यवस्था अधिक चांगल्या रीतीने सहन करू शकेल. जून तिमाही मध्ये CAD (CURRENT ACCOUNT DIFICIT) GDP च्या २.४% झाली.
OECD (ORGANISATION FOR ECONOMIC COOPERATION DEVELOPEMENT) ने भारताच्या सन २०१८ मधील प्रगतीचे अनुमान ७.३% वरून ६.७% एवढे कमी केले आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा सन्स, टाटा ग्रूपची होल्डिंग कंपनी ही आता पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ह्या कंपनीचे रुपांतर प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये करण्याची टाटा ग्रुपची योजना आहे. त्यामुळे बहुसंख्य महत्वाचे निर्णय हे कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स घेऊ शकेल. यामुळे वारंवार शेअरहोल्डर्सच्या मंजुरीची जरुरी राहणार नाही. टाटा सन्सच्या शेअरहोल्डर्सनी कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतर करण्यास मंजुरी दिली. त्याबरोबरच कॉर्पोरेट गव्हरनन्स सुधारण्यासाठी बदल केले. आता कोणत्याही शेअरहोल्डर्सना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परवानगी घेतल्याशिवाय आपला स्टेक विकता येणार नाही. टाटा सन्सच्या या कॉर्पोरेट एक्शनविरुद्ध NCLATने NCLT ला सायरस मिस्त्री यांचे अपील दाखल करून घेवून तीन महिन्याच्या आत यावर सुनावणी करायला सांगितली आहे.
 • गुगलने ७ भाषांमध्ये पेमेंट APP ‘तेज’ जारी केले. यासाठी ICICI, HDFC, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांबरोबर करार केला.
 • सिएटने अशोक LEYLAND साठी ‘दोस्त प्लस’ या नावाने नवीन टायर बाजारात आणले.
 • TVS मोटर्स इलेक्ट्रिक बाईकचे उत्पादन करणार आहे.
 • USA ने USA मध्ये आयात होणाऱ्या ‘झिंगे’ या माशांच्या प्रकारावरील ANTI DUMPING द्युटी कमी केली. याचा फायदा अवंती फीड्स, आणी अपेक्स फ्रोझन फूड्स या कंपन्यांना होईल
 • टाटा मोटर्सने आपली कंपनी नफ्यात आणण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी कॉस्ट कमी करण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेनुसार ४५० लोकांनी ऐच्छिक निवृत्ती घ्यायचे ठरवले आहे. टाटा सन्स हे (टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी) टाटा मोटर्समधील १.७ % स्टेक Rs ४२३ प्रती शेअर या भावाने Rs २००० कोटींना खरेदी करणार आहेत
 • कोल इंडियाची सबसिडीअरी महानदी कोलफिल्ड्स या कंपनीला नियमापेक्षा जास्त कोळश्याचे उत्पादन केल्यामुळे ओडिशा राज्य सरकार Rs २०००० कोटी दंड करण्याची शक्यता आहे.
 • बायोकॉनच्या विशाखापट्टणम युनिटची USFDA ने तपासणी केली. या तपासणीमध्ये कोणत्याही त्रुटी दाखवल्या नाहीत.
 • अंदमान प्रोजेक्टसाठी पेट्रोनेट एलएनजी ने NTPC बरोबर करार केला.
 • एक्साईड ही इलेक्ट्रिक कारसाठी BATTERY बनवण्याचा कारखाना १ नोव्हेंबर २०१७ पासून सुरु करणार आहे. तसेच या कंपनीच्या १००% सबसिडीअरीचा इन्शुरन्स बिझिनेस आहे या सबसिडीरीचा IPO येण्याची शक्यता आहे.
 • AB FASHION या कंपनीने SIMON CARTER या कंपनीबरोबर करार केला.
 • DR रेड्डीज च्या श्रीकाकुलम आणी हैदराबाद प्लांटला USFDA ने कलीन चीट दिली.
 • ऑरचीड फार्माच्या केरळमधील अलाथूर येथील API युनिटला USFDA कडून क्लीन चीट मिळाली.
 • वेदान्ता या कंपनीच्या ३ खाणी परत सुरु करायला ओडिशा सरकारने परवानगी दिली
 • IFCI क्लिअरिंग कॉर्पोरेशन मधील आपला संपूर्ण स्टेक विकणार आहे.
 • ONGCला बॉम्बे हाय मध्ये नवीन ब्लॉकमध्ये २ कोटी टन ऑईल आणी gas चा साठा मिळाला. हा नवीन तेलसाठा WO २४-३ म्हणून ओळखला जाईल. यातून लवकरच कमरशीयल उत्पादन सुरु होईल.
 • डीव्हीज LABSने USFDAने दाखवलेल्या आपल्या विशाखापट्टणम येथील उत्पादन युनिटमधील सर्व त्रुटी दूर केल्या. पुन्हा केलेल्या तपासणीमध्ये ६ किरकोळ त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. पण USFDA ने लावलेला IMPORT ALERT अजून रद्द केलेला नाही.
 • GIPCL या कंपनीला गुजरात सरकारकडून ७५ MV सोलर युनिटची ऑर्डर मिळाली.
 • कर्नाटक बँकेला २०२४ मध्ये 100 वर्षे पूर्ण होतील. यावेळी बँकेच्या कारभारात कालानुरूप बदल करण्यासाठी शिफारस करण्यासाठी बँकेने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २४ सप्टेंबरला बोलावली आहे.
 • ITI ला ASCON प्रोजेक्टसाठी Rs ७००० कोटींची ऑर्डर संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली.

कॉर्पोरेट एक्शन

 • १९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात शोभाच्या ‘BUY BACK’ साठी फॉर्म भरायचे आहेत.
 • FOSUN ही चीनमधील कंपनी हैदराबाद येथील GLAND फार्मा या कंपनीतील ७४% स्टेक US $ १.१ बिलियनला विकत घेणार आहे
 • टाटा स्टीलने आपला युरोपिअन बिझिनेस THYSSENKRUPP या जर्मन कंपनीबरोबर मर्ज केला.या दोघांच्या युरोपिअन बिझिनेससाठी एक नवीन कंपनी THYSSENHRUPP टाटा स्टील या नावाने स्थापन केली जाईल. या कंपनीचा EURO १५.९६ बिलियनचा बिझिनेस असेल आणी या मर्जरमुळे EURO ४०० ते ६०० मिलियन कॉस्ट कटिंग होईल. यामुळे टाटा स्टीलच्या युरोप बिझिनेस मध्ये होणारा लॉस कमी होईल.
 • ऑईल क्षेत्रातील सर्व कंपन्या मिळून अबुधाबी national ऑईल कंपनीमध्ये २०% स्टेक विकत घेणार आहेत. त्यात ऑईल इंडिया चा हिस्सा ५% ते ६% असेल.

या आठवड्यातील IPO

 • ICICI लोम्बार्ड या जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील कंपनीचा इशू एकूण २.९८ वेळा भरला. रिटेल गुंतवणूकदारासाठी असलेला कोटा १.२ वेळेला ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • या आठवड्यात SBI लाईफचा IPO २० सप्टेंबरला तर ‘PRATAAP SNACKS’या कंपनीचा IPO २२ सप्टेंबरला ओपन होईल.
 • सुनील हायटेक या कंपनीची सबसिडीअरी ‘SEAM इंडस्ट्री’ चा IPO येणार आहे.
 • प्रिन्स पाईप्स अंड फिटिंग्ज ही PVC पाईप उत्पादनात तिसरा नंबर असलेली कंपनी आपला Rs ८०० कोटींचा IPO आणत आहे. ह्या कंपनीची ५ उत्पादन युनिट असून एकूण उत्पादन क्षमता १,५०,००० टन आहे. कंपनीची विक्री २०१६ मध्ये Rs १००९ कोटी होती.

कॉर्पोरेट एक्शन

 • नोवहारटीसने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्ससजी बैठक बोलावली आहे.
 • येस बँकेने आपल्या एका शेअरचे ५ शेअरमध्ये स्प्लीट केले.
 • महिंद्रा आणी महिंद्र ही कंपनी तुर्कस्थानमधील TRACTOR उत्पादन करणारी ERKUNT TRAKTOR SANAYALY ही कंपनी तिच्या एका असोसीएट कंपनीसह US $ ११७ मिलियन (Rs ७३५ कोटींना) विकत घेणार आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • २२ सप्टेंबर २०१७ ला रिलायंस होमचे Rs १०७.२० वर लिस्टिंग झाले.
 • डिक्सन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर्सचे Rs २७२५ ( इशू प्राईस Rs १७६६) वर लिस्टिंग झाले. त्यामुळे या IPO त शेअर लागलेल्या अर्जदारांना खूपच चांगला लिस्टिंग गेन झाला.
 • भारत रोड नेटवर्क या कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग Rs २०५ म्हणजेच इशू प्राईसवरच झाले त्यामुळे गुंतवणूकदारांना लिस्टिंग गेन झाला नाही.
 • COM या कंपनीचे Rs ९८५ वर लिस्टिंग झाले. नंतर ह्या शेअरची प्राईस पडली लिस्टिंग गेन झाला नाही.
 • डिशमन कार्बोजेन एमिक्स या कंपनीचे लिस्टिंग दिनांक २१ सप्टेंबरला झाले. १० दिवस हा शेअर T TO T मध्ये राहील. म्हणजे यात डेट्रेड होऊ शकणार नाही.
 • ओमकार स्पेशियालिटीज च्या शेअरहोल्डर्सना लासा जनरीक्सचा एक शेअर मिळाला. ही कंपनी प्राण्यांसाठी औषधे बनवते. या कंपनीच्या शेअरचे Rs १३७ वर लिस्टिंग झाले.

थोडासा मुलभूत अभ्यास
अलिकडील काळात आयुर्विमा आणी जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्यांचे इशू येत आहेत. आपण दोन विमा क्षेत्रातील  कंपन्यांची तुलना कशी करावी ते बघू.

 • प्रथम NEW बिझिनेस प्रीमियम

कंपनीने किती नवीन पोलिसी उतरवल्या आणी त्यावर कंपनीला किती प्रीमियम मिळाला या वरून कंपनीची प्रगती किती होत आहे. कंपनी काही नवीन पॉलीसीज डिझाईन करते आहे की जुनेच प्लान पुढे रेटते आहे हे यावरून कळते.

 • PERSISTENCY रेशियो

हा रेशियो १ वर्षानंतर आणी ५ वर्षानंतर काढला जातो. एकदा विमा काढल्यावर जर विमाधारक कंपनीच्या सेवेवर समाधानी असेल तर तो आपल्या पॉलिसीचे हफ्ते तर पूर्णपणे भरतोच पण इतरांनाही या कंपनीच्या पॉलिसीज घ्यायला सांगतो. यालाच हाय PERSISTENCY रेशियो म्हणतात. याचाच अर्थे नवीन आलेल्या किती पॉलिसीज एक वर्षाअखेर आणी पांच वर्षाअखेर कंपनी आपल्याकडेच राखू शकली.
कंपनीच्या बिझिनेसनाध्ये युलिप आणी नॉनयुलिपचे किती प्रमाण आहे हे समजून घ्यावे. कारण युलिप पॉलिसीमध्ये कंपनीला जास्त फायदा होतो.

 • मिससेलिंग रेशियो

कंपनी ग्राहकाच्या गरजा लक्षात घेवून तसेच त्याला फायदेशीर असा विमा उतरवते कां ? जर ग्राहकाला असे आढळून आले की कंपनीने त्याला त्याच्या गरजेपेक्षा वेगळी पॉलिसी दिली आहे तर तो ती पॉलिसी बंद करतो. त्यामुळे या रेशियोचा PERSISTENCY रेशियोशी संबंध जोडता येतो.

 • ऑपरेटीव रेशियो

हा रेशियो कंपनी किती प्राफीट मार्जिनवर काम करते ते सांगतो.

 • AUM म्हणजे ASSET UNDER MANAGEMENT म्हणजेच आता चालू असलेल्या सर्व प्रकारच्या पॉलिसीजची बेरीज.
 • प्राईस टू एम्बेडेड VALUE यामध्ये एम्बेडेड value = भावी नफ्याचे वर्तमान मूल्य + adjusted नेट asset value

ह्या सर्व रेशियोचा अभ्यास करून विमा क्षेत्रातील कोणता शेअर चांगला आहे ते ठरवता येते
मार्केटने काय शिकवले
मार्केटचे निरीक्षण केल्यास बऱ्याच गोष्टींचे अंदाज येऊ शकतात. या आठवड्यात IPO चांगले आले. पण फारसे भरले नाहीत. कां बरं असं झालं असेल ? असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत आणी त्याची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ICICI लोम्बार्ड आणी SBI लाईफ हे दोन्ही इश्यू महाग किमतीला आले त्यामुळे त्यामध्ये फारसे लिस्टिंग गेन्स होणार नाहीत असे गृहीत धरून HNI ने आपला हात आखडता घेतला. यामागे लिस्टिंगनन्तर शेअर पडेल तेव्हा कमी भावात खरेदी करू हा व्यावहारिक विचार आहेच. तर MATRIMONI.COM ने दिलेला Rs ९८ चा डिस्काउंट देण्याची युक्ती त्यांच्याच शेअरसाठी संकटाची ठरली. पूर्वीच्या दोनतीन वर्षात तोटा आणी २०१७ मध्ये कंपनी नफ्यात कशी! काही गडबड तर नसेल ना! अशी शंका आल्यामुळे लिस्टिंग खराब झाले. ग्रे मार्केटमध्येसुद्धा ICICI लोम्बार्ड आणी SBI लाईफ याना Rs १० ते Rs १५ एवढा प्रीमियम आहे तर CAPACITEला भरपूर प्रीमियम मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण यावेळी फॉर्म विकत घेतले जात नाहीत असे दिसते
सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्राच्या प्रत्येक दिवशीचा रंग, प्रत्येक दिवशीचे देवीचे स्वरूप वेगळे असते. पण आपण मार्केट मध्ये झालेल्या बदलाप्रमाणे  आपल्या मार्केटमधील व्यवहारात बदल करतो का ? गुंतवणुकीच्या प्रकारात झालेले बदल लक्षात घेतो का ? बदलत्या आर्थिक सामाजिक आणी डिजिटल परिस्थितीमुळे काही कंपन्यांचा निभाव लागत नाही.(ABOF कंपनीने अमेझोन आणी फ्लीपकार्ट या कंपन्याच्या स्पर्धेला तोंड देऊ शकत नसल्यामुळे आपले E पोर्टल ३१ डिसेंबर २०१७ पासून बंद केले आहे)  तर काही कंपन्यांचे फायद्याचे प्रमाण वाढत जाते. आपल्याला सगळीकडेच हा अनुभव येतो. चौथीपर्यंत हुशार असलेली मुले पांचवी ते सातवीत टिकत नाहीत. किंवा अभ्यासात उत्तम असणारे व्यवहारात पाहिजे तेवढे चातुर्य दाखवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या पोर्टफोलीयोत असलेल्या प्रत्येक शेअरचा मागोवा घेत राहावे. आपल्या पोर्टफोलियोचे सतत निरीक्षण करत राहावे त्यात सतत बदल करत राहावे. ‘माझेच खरे’असे म्हणू नये किंवा दुसऱ्यांवर अंधविश्वास ठेवू नये. सर्वांचे विचार ऐकून त्यांचे योग्य मूल्यमापन करून योग्य वाटल्यास वेळोवेळी त्याप्रमाणे बदल करावेत.म्हणजेच जुन्या किंवा कालानुरूप नसलेल्या विचारांचे सीमोल्लंघन करून नव्या विचारांचे घट बसवावेत , ही शिस्त पाळल्यास सोन्यासारखेच चोख  असे मार्केटचे व्यवहार करता येतील आणी दसऱ्याला प्रतीकात्मक सोन्याबरोबर खरे सोने आनंदाने लुटता येईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३१९१४ तर NSE चा निर्देशांक निफ्टी ९९६२ तर बँक निफ्टी २४३६८ वर बंद झाले.
 
 

4 thoughts on “आठवड्याचे-समालोचन – नव्या विचारांची घटस्थापना, जुन्या विचारांचे सीमोल्लंघन – 18 सप्टेंबर २०१७ ते २२ सप्टेंबर २०१७

 1. Pingback: आठवड्याचे-समालोचन – नवरात्रीचे रंग मार्केटच्या संग- २५ सप्टेंबर २०१७ ते २९ सप्टेंबर २०१७ | Stock Market

 2. Pingback: आठवड्याचे-समालोचन – नवरात्रीचे रंग मार्केटच्या संग- २५ सप्टेंबर २०१७ ते २९ सप्टेंबर २०१७ | Stock Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.