आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आनंदी आनंद गडे – २३ ऑक्टोबर २०१७ ते २७ ऑक्टोबर २०१७
या आठवड्यात खूपच मजा आली. सरकार सांगत होते बँकांची स्थिती फारशी चांगली नाही. म्हणून बँकांमध्ये काही प्रमाणात भांडवल घालण्याची गरज आहे. प्रत्यक्षात काहीच घडत नव्हते. पण मंगळवारी अर्थमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केले की आम्ही सरकारी बँकांमध्ये Rs २.११ लाख कोटी २ वर्षाच्या कालावधीत घालू. त्यांनी या योजनेचा आराखडा सादर केला. त्यामुळे बुधवार तारीख २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे शेअर्स वधारले. काही बँकांचे शेअर्स तर ३०% ते ४०% ने वाढले. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांचे विशेषतः सामान्य लोकांचे पैसे या बँकांच्या शेअर्समध्ये अडकले होते त्यांना ते फायद्यात विकायला मिळाले. त्यामुळे खुशीची, आनंदाची लहर पसरली. BSE आणी NSE या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकानी नवीन उच्चांक प्रस्थापित केला. शेअर मार्केटमध्ये नवीन इतिहास रचला गेला.
सरकारी अनौन्समेंट
- सरकारने असे जाहीर केले की येत्या दोन वर्षात सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना Rs २.११ लाख कोटी एवढे भांडवल पूरवेल. इंद्रधनुष योजनेखाली Rs १८००० कोटी देणार. तसेच Rs १३५ कोटी बॉंडसच्या माध्यमातून तर Rs ०.५८ लाख कोटी इक्विटी कॅपिटलच्या माध्यमातून भांडवल म्हणून पुरवले जाईल. हे भांडवल पुरवले गेल्यामुळे सरकारी बॅंका अधिक कर्ज देऊ शकतील. यात MSME (मेडियम आणी स्माल एन्टरप्रायझेस) सेक्टरला कर्ज देण्यावर भर असेल. सरकारने सांगितले की ते बँकांच्या कार्यक्षमतेवर बारकाईने लक्ष ठेवतील आणी कार्यक्षमतेप्रमाणे बँकांना भांडवल पुरवले जाईल.
- तसेच हे सरकार येत्या पांच वर्षात रस्ते बांधणीसाठी Rs ६.९२ लाख कोटी खर्च करून ८३६७७ किलोमीटर्स रस्ते बांधेल. यात भारतमाला प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३४८०० किलोमीटर्सचा समावेश असेल. या दुहेरी उपायांमुळे रोजगार आणी बँक क्रेडीट यात लक्षणीय वाढ होईल
- सरकारने रब्बी पिकाच्या MSP (मिनिमम सपोर्ट प्राईस) जाहीर केल्या.
- सरकारने साखरेसाठी ठरवलेल्या स्टॉक लिमिटची मर्यादा ६ महिन्यांनी वाढवली ही कालमर्यादा २८ ऑक्टोबरला संपत होती
- सरकारने ‘भारत नेट फेज एक’ डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होईल असे सांगितले.
- सरकारने BEMLमधील स्टेक विकण्याचा विचार संरक्षण मंत्रालयाने विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढे ढकलला. तसेच NBCC मधील डायव्हेस्टमेंटचा विचार पुढे ढकलला.
- सरकारच्या एअरइंडियामधील विनिवेशासाठी सात बोली मिळाल्या.
- सरकारने NLC मधील ३% ते ५% स्टेक ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून डायव्हेस्ट केला ऑफरसाठी किमत प्रती शेअर Rs ९४ ठरवली. रिटेल इन्व्हेस्टरला ३.५% डीस्काउंट दिला ही ऑफर फॉर सेल तारीख २५ ऑक्टोबर (नॉन रिटेल कोटा) आणी २6 ऑक्टोबरला (रिटेल कोटा) झाली दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला.
- महाराष्ट्र सरकारने GVKMIAL ला Rs १६००० कोटींचे नवी मुबई विमानतळाचे काम दिले.
- सरकारने असे जाहीर केले की १ जानेवारी २०१८ पासून सर्व देशात डायरेक्ट फरटीलायझर सबसिडी योजना लागू केली जाईल.
- गुजरात सरकारने ड्रीप इरिगेशन पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना GST माफ केले आहे. या ड्रीप यंत्रणेवरचा GST राज्य सरकार भरेल.
- गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुकांसाठी ९ डिसेंबर आणी १४ डिसेंबरला मिळून एकूण १८२ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे गुजरातशी संबंधीत कंपन्या GNFC, GSFC, GHCL, GICPL, गुजरात अल्कली, गुजरात GAS या कंपन्यांनी शेअरमार्केटचे लक्ष वेधले आहे.
- खाण मंत्रालयाने नाल्कोमध्ये ९.३% स्टेकची डायव्हेस्टमेंट करायची ठरवली आहे.
- आता GST खाली सेवा क्षेत्रातील कंपन्या कॉम्पोझिशन योजनेचा फायदा घेऊ शकतील. त्याना आता ५% GST भरावा लागेल. कॉम्पोझिशन योजनेत सामील होण्याची मर्यादा Rs १ कोटी करण्याचा सरकार विचार करत आहे.
- मोठ्या बिझिनेसनी छोट्या बिझिनेस कडून केलेल्या खरेदीवर इनपुट TAX क्रेडीट मिळेल.
- नोव्हेंबर महिन्यात सरकार भारत ETF चा दुसरा हप्ता आणण्याची शक्यता आहे. सरकार Rs १०००० कोटी उभारेल.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- भारत सरकारने बँकांच्या रीकॅपिटलायझेशनसाठी केलेल्या उपाययोजनांचे RBI ने स्वागत केले. AXIS बँकेने जिंदाल स्टील आणी पॉवर या कंपनीला दिलेले कर्ज NPA म्हणून जाहीर करावे असे RBI ने सांगितले. तसेच HDFC बँकेला एक प्रोजेक्टसाठी दिलेले कर्ज NPA करायला सांगितले.
- सुप्रीम कोर्टाने जे पी ग्रुपला कोर्टात Rs २००० कोटी भरण्यासाठी ५ नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ दिली. जे पी ग्रुपने आपण यमुना एक्सप्रेस हायवे विकून हे पैसे भरू असे सांगितले.
- सुप्रीम कोर्टाने घर खरेदीदारांना रिफंड देण्यासाठी युनिटेकचे प्रमोटर संजय चंद्रा यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना Rs १००० कोटी कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- SBI ने TRACTOR फायनान्ससाठी एस्कॉर्टस लिमिटेड या कंपनीबरोबर करार केला.
- RAMCO सिस्टिम्स या कंपनीला पे रोल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मोठी ऑर्डर मिळाली.
- ITNL ला NHAI नी ‘बांसकोपा टोल प्लाझा’ वर टोल वसूल करण्याची परवानगी दिली.
- डेल्टा कॉर्पने नेपाळमध्ये कॅसिनो चालू करण्यासाठी एवरेस्ट HOSPITALITY बरोबर करार केला.
- KEC INTERNATIONALला Rs १९३१ कोटींची ऑर्डर मिळाली.
- L & T इन्फोटेक ने APTIUS बरोबर डिजिटल सोल्युशन्ससाठी करार केला.
- एका दिवसात सर्वात जास्त गाड्या विकण्याचे रेकॉर्ड हिरो मोटोचे झाले. त्यांनी एका दिवसात ३ लाख गाड्या विकल्या.
- श्री लंकेमध्ये थ्री व्हीलरवर बंदी येण्याची शक्यता आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सेफ्टी STANDARDS राखली जात नाहीत असे श्री लंकेचे म्हणणे आहे. कारण तिथे रिक्षांचा स्कूटर्ससारखा वापर केला जातो. म्हणून ३५ वर्षावरील नागरिकांनाच परवाना द्यावा असा विंचार श्री लंकेचे सरकार करीत आहे. याचा परिणाम बजाज ऑटो आणी टी व्ही एस मोटर्स या कंपन्यांवर होईल.
- आर्सेलर मित्तल ही जगातली सर्वात मोठी स्टील कंपनी भारतातील आजारी स्टील कंपन्या घेण्यामध्ये रुची दाखवत आहे. या मध्ये भूषण स्टील, मॉनेट इस्पात, विसा स्टील यांचा समावेश आहे. पूर्वी अशा कंपन्या विकत घेताना किंवा ट्रान्स्फर होताना विकल्या जाणार्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या मंजुरीची जरुरी होती आता अशी मंजुरी लागणार नाही.
- USAचे संरक्षणमंत्री टीलर्सन हे भारताच्या दौर्यावर येत आहेत. त्यावेळी संरक्षण आणी तत्संबंधित काही करार होण्याची शक्यता आहे. याचा फायदा संरक्षण सामुग्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. उदा BEL, BEML, वालचंदनगर इंडस्ट्रीज, ASTRA MICROWAVE.
- गायत्री प्रोजेक्ट्स आपल्या ७ रोड टोल प्रोजेक्ट वेगळ्या करून नवीन कंपनी बनवण्याच्या विचारात आहे.
- भेलला तेलंगाना सरकारकडून 4000MW थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी Rs २०००० कोटींची ऑर्डर मिळाली.
- आर कॉम ही कंपनी आपला 2G आणी 3G बिझिनेस ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत बंद करणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यावयास सांगितले आहे. सर्व 2G आणी 3G ग्राहकांचे 4G मध्ये रुपांतर करण्यात येईल. २१ नोव्हेंबर २०१७ पासून ते त्यांचा DTH बिझिनेस बंद करणार आहेत.
- WOCKHARDT, ल्युपिन, अल्केम LAB, GRANULES इंडिया, ऑरोबिंदो फार्मा या कंपन्यांच्या वेगवेगळ्या औषधांना USFDA ने मंजुरी दिली.
- ONGCने IOC आणी GAIL यांच्यातील स्टेक विकण्याचा आपला निर्णय पुढे ढकलला. तसेच HPCL चे अधिग्रहण डिसेंबरमध्ये पूर्ण होण्याच्या ऐवजी मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले.
- मारुती सुझुकीचा तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला. विक्री, PAT EBITDA वाढली.
- इन्फोसिसचा निकाल चांगला आला. इन्फोसिसने Rs १३ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. इन्फोसिसने जाहीर केले की पनाया आणी इतर डीलमध्ये काहीही चुकीचे झाले नाही.
- ITC ची सिगारेट्सची विक्री ४०% ने कमी झाली. त्यांचे इन्कम, नफा यांच्यात वाढ झाली.
- GIC हौसिंग, PNB हौसिंग, CROMPTON, इंडिया बुल्स व्हेन्चर, ज्युबिलंट फूड्स, सारेगम, विजया बँक, क्वेस कॉर्पोरेशन, मास्टेक, v गार्ड इंडस्ट्रीज, इमामी, RBL BANK, अंबुजा सिमेंट, RALLIS इंडिया, कॉरोमोन्डेल INT, रेडिको खेतान, HUL, नोसील, HAVELLS, झुआरी अग्रो, हिंदुस्थान झिंक, टीन प्लेट, इंडिया बुल्स हौसिंग, ग्राफाईट इंडिया, HDFC बँक, युनायटेड स्पिरीट, श्री कलाहस्ती पाईप्स यांचे तिमाही निकाल चांगले आले.
- येस बँक, कॅनरा बँक, बायोकॉन, इक्विटास, टाटा कम्युनिकेशन, GHCL, यांचे निकाल असमाधानकारक होते.
कॉर्पोरेट एक्शन
- कॅस्ट्रोल इंडियाने बोनसवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग ७ नोव्हेंबरला बोलावली आहे.
- पॉवर सेक्टरसाठी एक मोठी युनिव्हर्सल कंपनी स्थापन केली जाईल. या अंतर्गत NTPC ही NHPC आणी SJVN मध्ये मोठा स्टेक घेईल.
- पोलारीस कन्सल्टिंग या कंपनीने ३१ ऑक्टोबरला डीलिस्टिंग वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग बोलावली आहे.
नजीकच्या भविष्यकाळात येणारे IPO
- महिंद्र लॉजिस्टीक या महिंद्र ग्रूपमधील कंपनीचा IPO २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ओपन राहील. प्राईस BAND Rs ४२५ ते Rs ४२९ आहे. मिनिमम लॉट ३४ शेअर्सचा आहे.
- श्रेय इक्वीपमेंट फायनान्स या कंपनीच्या Rs २००० कोटींच्या IPO ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.
- HDFC लाईफ चा IPO ७ नोव्हेंबरला ओपन होऊन ९ नोव्हेंबरला बंद होईल प्राईस BAND Rs २७५ ते Rs २९० आहे.
- द न्यू इंडिया अशुअरंस कंपनी लिमिटेडचा IPO १ नोव्हेंबर २०१७ ला ओपन होऊन ३ नोव्हेंबर २०१७ ला बंद होईल. प्राईस BAND Rs ७७० ते Rs ८०० आहे. मिनिमम लॉट १८ शेअर्सचा आहे.
- खादीम ही रिटेल फुटवेअर क्षेत्रातील कंपनी Rs ५४३ कोटींचा IPO २ नोव्हेंबर २०१७ ते ६ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान आणत आहे. प्राईस BAND Rs ७४५ ते Rs ७५० आहे. मिनिमम लोट २० शेअर्सचा आहे
या आठवड्यातील लिस्टिंग
- इंडिया एनर्जी एक्स्चेंजचे लिस्टिंग Rs १५०० ला झाले या कंपनीने IPO मध्ये Rs १६२५ला शेअर्स दिले होते
- जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे लिस्टिंग Rs ८५० वर झाले. IPOमध्ये Rs ८६७ ना शेअर्स दिले होते.
मार्केटने काय शिकवले
खरे पाहता बँकांना प्रत्यक्षात पैसा मिळाला कां ? तर नाही हेच उत्तर द्यावे लागेल. कोणत्या वेळेला, कोणत्या बँकेला, किती आणी कोणत्या प्रमाणात पैसा, कोणत्या अटींवर मिळेल हे ही स्पष्ट झाले नाही. जे भांडवल देणार ते दोन वर्षांच्या कालावधीत देणार. दिलेला पैसा पुरेश्या प्रमाणात देणार कां? आणी एवढा पैसा दिल्यावर बँकांच्या परिस्थितीत समाधानकारक सुधारणा होईल कां? या सर्व प्रश्नाचे उत्तर लोकांचे लोकांनीच स्वतःचे स्वतःला दिले. आणी या एका बातमीच्या आधारावर सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांचे शेअर्स दिवसभर चढ्या भावात खरेदी केले. आणी नंतर निराश होऊन तिसरे दिवशी विकले सुद्धा! सरकारच्या हातून कोणतेही पैसे लवकर सुटत नाही हेच खरे
सर्व सरकारी बँका तोट्यात आहेत. NPA वाढत आहेत स्लीपेजीस आणी त्यांच्याकरता लागणारी प्रोविजन वाढत आहे. त्यामुळे मार्केट वाढत असले तरी बँकिंग सेक्टर मंदीत आहे. त्याला थोडा अपवाद खाजगी बँकांचा आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये ट्रेडर्सनी भरभरून SHORTING केले होते. ते SHORTS कव्हर करावे लागले असे दिसते. त्याचबरोबर खाजगी बँका आणी नॉन-बँकिंग फायनांशियल कंपन्या मंदीत होत्या. हाव आणी भीतीचे विचित्र समीकरण तयार झाले. त्यात भीती जणू काही हद्दपार झाली होती.
या आठवड्यात लागलेले बरेचसे निकाल काही समाधानकारक तर काही चांगले लागले. सरकारी घोषणा, डायव्हेस्टमेंट चालू आहे. मार्केटला आवश्यक असलेले ट्रिगर किंवा खुराक सरकार पुरवत आहे. सरकारी धोरणांमुळे कंपन्यांच्या बिझिनेसवर विपरीत परिणाम होईल, किंवा होतो आहे ही भीती आलेल्या चांगल्या निकालांमुळे कमी होत आहे. सरकारच्या उद्योगाशी सतत चालू असलेल्या संवादामुळे उद्योग जगतात सरकारविषयी एक प्रकारचा विश्वास निर्माण होत आहे. सरकार आपला खर्च, गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रात विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर, कृषी, उर्जा या क्षेत्रात वाढवीत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आशादायी वातावरण निर्माण होत आहे. आणी त्या त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होताना दिसत आहे.
ज्यांनी कधी काळी शेअर्समध्ये गुंतवणूक केली पण त्यात घाटा झाला, वेळ मिळेना, मार्केटमध्ये यशस्वी आणी फायदेशीर व्यवहार करणे जमेना, अशा अनेक कारणांनी मार्केटला राम राम ठोकला होता त्यांनी मार्केटकडे थोडेसे लक्ष देऊन त्यांचे खरेदी केलेले जुने शेअर्स फायद्यात असतील तर आलेल्या संधीचा फायदा घ्यावा. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. खूप काळ प्रतीक्षा केल्याचे चांगले फळ त्याना मिळू शकते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३१५७, NSE निर्देशांक निफ्टी १०३२३ तर बँक निफ्टी २४८४० वर बंद झाले.