आठवड्याचे-समालोचन – लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा – ९ ऑक्टोबर २०१७ ते १३ ऑक्टोबर २०१७

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
 
लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा – ९ ऑक्टोबर २०१७ ते १३ ऑक्टोबर २०१७
दिवाळीच्या आधी दिवाळी साजरी करायला सुरुवात झाली. सर्व गुंतवणूकदारांना आणी ट्रेडर्सना शेअरमार्केटने दिवाळी बोनस दिला असेच म्हणावे लागेल. लक्ष्मीशिवाय काहीच साध्य होत नाही हेच खरे ! आम्हा गृहिणींना तर सगळ्यांच्या सर्व मागण्या पुऱ्या कराव्या लागतात. लक्ष्मी असेल तर मुलांचे हट्ट पुरवता येतात. त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तीच माझ्या दृष्टीने दिवाळी ! पैशाचे सोंग आणता येत नाही. पण मला मार्केटचे आभार मानले पाहिजेत. कोणताही पक्षपात न करता मार्केटने सर्वांना खुश केलं, मार्केट जणु म्हणालं ‘ज्याला जेवढे दोन हातांनी कमवता येईल तेवढे कमवा. मी माझ्या अनंतहस्तांनी तुमच्यासाठी पैशांची आणी आनंदाची बरसात करत आहे.’
तुमचा शेअरमार्केटचा अभ्यास वाढवा, एक उद्योग असे स्वरूप न ठेवता त्याला व्यासंगाचे स्वरूप द्या. जनी मनी, स्वप्नी  तसेच विचारात लक्ष्मीचे स्वरूप ठेवून सातत्याने शेअरमार्केटचा व्यवसाय करा. म्हणजे जेथून परत येण्याचा मार्ग संपतो असे घर लक्ष्मीला मिळेल आणी ती तिथे निरंतर वास करेल. आणी ते घर तुमचेच असेल हा विश्वास बाळगा. नाहीतरी कृष्णाने सांगितले आहे माझा हो, माझी पूजा (श्रमांनी विश्वासाने) कर म्हणजे माझे घर म्हणजेच लक्ष्मीचे घर म्हणजे तुमचेच घर होईल.
या दिवाळीच्या निमित्ताने शेअर मार्केट मधील छोट्यामोठ्या, तज्ञ आणी नवख्या गुंतवणूकदाराना आणी ट्रेडर्सना आणी माझ्या शेअरमार्केट प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना विशेषतः नवीन सुरुवात केलेल्या माझ्या ब्लॉगच्या, पुस्तकांच्या वाचकांना लक्ष्मीने भरपूर अभ्यास, श्रम करण्याची ताकत देवो आणी त्यांच्या घरी निरंतर आणी वाढत्या प्रमाणात वास करो हीच माझी शुभेच्छा.
आंतरराष्ट्रीय घडामोडी        

 • क्रूडचे भाव वाढण्याची शक्यता आहे. कारण सौदीमध्ये US$ १०० बिलीयनचा एक इशू येत आहे. त्यासाठी त्याना क्रूडचा भाव तेजीत ठेवावा लागेल.
 • सौदी EMIRATES भारतात मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑईल एक्स्प्लोरेशन उद्योगात असणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. उदा. ABAN OFFSHORE, डॉल्फिन
 • सोमवारी पंतप्रधानांनी ऑईल आणी GAS सेक्टरमधील कंपन्यांच्या CEO ची मीटिंग बोलावली. या बैठकीत पंतप्रधानांनी उर्जाक्षेत्रासाठी व्यापक धोरण ठरवण्यासाठी ठराव मागवले. ऑईल, GAS आणी इलेक्ट्रिसिटी ह्या गोष्टी GST अंतर्गत आणण्याची मागणी झाली. पंतप्रधानानी GAS च्या किंमती कमी करण्याचा आणी GAS HUB स्थापन करण्याचे आवाहन केले.
 • सरकारने सांगितले की सोने आणी जडजवाहीर खरेदी करण्यासाठी KYC आवश्यक असण्याची मर्यादा आता Rs २ लाख ठेवली आहे. तसेच ज्युवेलर्सना आता Rs ५०००० पेक्षा जास्त खरेदी करणार्यांची माहिती PMLA ला देण्याची जरुरी नाही. यामुळे सणासुदीच्या दिवसात KYC नियम Rs ५०००० साठी आवश्यक केल्यामुळे कमी झालेली विक्री आता वाढेल. यामुळे जवाहिरे आणी सोन्याचे दागिने बनवणार्यांची एक मागणी सरकारने पुरी केली आहे.
 • सरकारने आता PPF आणी NSC, आणी KVC मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार सक्तीचे केले आहे.
 • ज्या कंपन्यांनी डीमॉनेटायझेशन नंतर मोठी रोकड जमा करून नंतर काढून घेतली त्यांच्यावर आता सरकार आपला रोख वळवणार आहे. अशा खात्यांची संख्या IDBI बँक, कॅनरा बँक आणी बँक ऑफ बरोडामध्ये सगळ्यात जास्त आहे.
 • सरकारने चीनमधून आयात होणार्या अलॉय आणी नॉन अलॉय स्टील वायर आणी रॉडसवर US $ ५३६ ते US $ ५४६ इतकी ANTI DUMPING ड्युटी लावली
 • महाराष्ट्र आणी गुजरात सरकारने पेट्रोल आणी डीझेल वरील VAT कमी केल्यामुळे पेट्रोल आणी डीझेल च्या किंमती कमी होतील.
 • GAILने GAS खरेदीसाठी बऱ्याच दीर्घ काळाकरता करार केले होते त्यामुळे GAS ची खरेदीची किंमत US $ १३ पडत होती. त्यामुळे GAS खरेदी महाग पडत होती. म्हणून GAS SWAPING करायला ‘GAIL’ला परवानगी दिली. जपानमधून स्वस्त  ‘GAS’ आयात करण्यासाठी परवानगी मिळाली. वाहतूक खर्चात बचत हा GAS SWAPING चा उद्देश आहे. प्रथम ‘GAIL’USA मधून GAS खरेदी करत होते. आता USA कडून GAS जपान घेईल. आणी भारत जपानकडून ‘GAS’ घेइल. हे समजावून घ्यायचे असेल तर जे लोक नोकरीला घेतले जातात त्याना त्यांच्या राहत्या घराच्या ५ किलोमिटरच्या परिघात पोस्टिंग देण्याचा प्रयत्न केला गेल्यास ज्या पद्धतीने असे पोस्टिंग दिल्यामुळे वाहतुकीत जाणारा वेळ खर्च आणी शक्ती यांचा अपव्यय टळतो तीच पद्धत GAS च्या बाबतीत वापरली आहे. जो देश ज्या देशाच्या जवळ असेल त्याने तेथून GAS घ्यावा असे ठरले. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचेल.
 • सरकार NATIONAL PROJECT CONSTRUCTION विकणार आहे. यासाठी ८ नोव्हेंबर पर्यंत बोली मागवल्या आहेत.

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

 • ऑगस्ट महिन्यासाठी IIPचे आकडे चांगले आले IIP ४.३% झाले.
 • सप्टेंबर महिन्यासाठी CPI ३.२८% झाला.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • GST कौन्सिलची मीटिंग ६ ऑक्टोबर २०१७ ला झाली. या मीटिंग मध्ये छोट्या व्यापाऱ्यांनी आणी SME नी व्यक्त केलेल्या अडचणी तसेच निर्यात करण्यात GST मुळे येणार्या अडचणी आणी त्यावरच्या उपायांबद्दल चर्चा आणी कारवाई झाली. ती खालीलप्रमाणे
  • GST कौन्सिलने २७ वस्तूंवरील GSTचे दर कमी केले. पंपासाठी जे स्पेअरपार्ट लागतात त्यांच्यावरील GST कमी केला त्याचा फायदा रोटो पंप, शक्ती पंप, तसेच KSB पंप्स आणी किर्लोस्कर BROS या कंपन्यांना फायदा होईल.
  • कॉम्पोझिशन स्कीम लागू होण्याची मर्यादा Rs ७५ लाखापासून Rs १ कोटी केली. आणी या योजनेखाली येणार्या छोट्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना रिटर्न भरण्यासाठी जास्त वेळ दिला.या योजनेत व्यापारी उद्योग आणी रेस्टॉरंट हे त्यांच्या टर्नओव्हरवर अनुक्रमे १% २% आणी ५% GST भरू शकतात.
  • ज्या उद्योगांचा टर्नओव्हर Rs १ कोटीपर्यंत आहे त्याना आता तिमाही रिटर्न भरावा लागेल.
  • E कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या पुरवठादारांना पेमेंट करताना TCS (TAX COLLECTED AT SOURCE) आणी TDS (TAX DEDUCTED AT SOURCE) वजा करण्याची तरतूद १ एप्रिल २०१८ पर्यंत तहकूब ठेवली,
  • सेवा पुरविणाऱ्या कंपन्याना आता त्यांचा टर्नओव्हर जर Rs २० लाखांपेक्षा कमी असेल तर जरी त्या इंटरस्टेट स्तरावर सेवा पुरवत असल्या तरी GST खाली रजिस्ट्रेशन करण्याची जरुरी नाही.
  • मर्चंट एक्स्पोर्टर्सला निर्यातीसाठी खरेदी केलेया देशांतर्गत मालावर ०.१% GST भरावा लागेल.
  • एक्स्पोर्टर्ससाठी E WALLET ची सोय एप्रिल २०१८ पासून उपलब्ध केली जाईल. सरकारने उपलब्ध केलेल्या वेगवेगळ्या योजनाखाली जे निर्यातदार निर्यात करीत आहेत त्यांना GST भरावा लागणार नाही.
  • GST रोल ऑऊट होण्याच्या पूर्वी वाहन लीजवर घेतले असेल तर ६५% लीज VALUE वर आताच्या GST दराप्रमाणे कर आकारला जाईल. ही सुट लीजवर घेतलेले वाहन विकले असले तरी उपलब्ध असेल.
  • अर्थमंत्र्यांनी सांगितले की आम्ही उद्योगाच्या मागणीचा विचार करत आहोत आणी त्यावर विचार करण्यासाठी एक GOM (GROUP OF MINISTERS)ची नेमणूक केली जाईल. हा GOM  दोन आठवड्यात त्यांचा रिपोर्ट देईल.
 • सेबीने म्युच्युअल फंडांचे खालील पाच प्रकारात वर्गीकरण केले. (१) इक्विटी (२) DEBT (३) हायब्रीड (४) सोल्युशनओरिएनटेड (५) अन्य योजना. सेबीने याचे पुढे इक्विटीचे १० प्रकारात, DEBTचे १६ प्रकारात आणी हायब्रीडचे ६ प्रकारात वर्गीकरण केले आहे.यासाठी सेबीने BSE वरील ग्रेडिंगप्रमाणे पहिल्या १०० शेअर्सचे लार्जकॅप, नंतरचे १०१ ते २५० पर्यंत मिडकॅप तर बाकीचे सर्व शेअर्स स्माल कॅप म्हणून ठरवले आहेत. म्युच्युअल फंडांच्या या प्रत्येक प्रकाराप्रमाणे एक योजना आणावी असे सांगितले आहे. म्युच्युअल फंडाना यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली आहे. यामुळे ग्राहकांना म्युच्युअल फंडांची त्यांना हवी तशी योजना निवडणे सोपे जाईल.
 • सेबीने बऱ्याच कंपन्यांचे सर्किट फिल्टर १०% वरून २०% केले.
 • RBI ने OBC वर PCA (PROMPT CORRECTIVE ACTION) अंतर्गत कारवाई केली.या कारवाईमुळे बँकेच्या स्वायत्ततेवर बरेच निर्बंध येतात.
 • MCX वर दिवाळीपर्यंत सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु होईल.
 • कोची शिपयार्डला इंडियन नेव्हीकडून Rs ५४०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • सदभाव इंजिनिअरिंगला गुजरात सरकारकडून कांडला बंदराच्या संदर्भात Rs १७० कोटीचे काम मिळाले.
 • PSP प्रोजेक्टला Rs १५७० कोटींची मोठी ऑर्डर मिळाली.
 • सरकार इथनॉलचे दर Rs २ नी वाढवणार आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होईल. ८ लाख साखरेचे उत्पादन व्हायला पाहिजे होते ते यावेळी फक्त ३.५ लाख तन झाले. सणासुदीच्या दिवसात साखरेसाठी मागणी असल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत. या उत्पादनात उत्तर प्रदेशात रेकॉर्ड उत्पादन होईल.
 • सिम्बायोमिक्स थेरांप्यूटिक्स एल एल सी या कंपनीचे अधिग्रहण ल्युपिन ने US $ १५ कोटींमध्ये केले.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • टाटा समुहाने सरकारला कळविले आहे की त्यांची गेली २१ वर्षे सुरु असलेली टाटा टेलीसर्विसेस ही कंपनी बंद करण्याचा मानस आहे. कंपनीजवळ असलेले स्पेक्ट्रम विकण्यासाठी किंवा सरकारला सरेंडर करण्यासाठी प्रक्रिया कळवण्याची विनंती सरकारला केली आहे. भारती एअरटेल टाटा टेलीसर्विसेसचा मोबाईल कारभार खरेदी करणार आहे. त्याचबरोबर टाटा टेलीसर्विसेसचे स्पेक्ट्रम तसेच ४० मिलियन ग्राहक भारती एअरटेलकडे ट्रान्स्फर होतील. हे एक नॉनकॅश आणी नॉन DEBT अग्रीमेंट आहे. टाटा टेलीचा फिक्स्ड लाईन आणी BROADBAND बिझिनेस टाटा स्काय कडे तर एन्टरप्राईझ टाटा कम्युनिकेशन कडे सोपवला जाईल.
 • रिलायंस इंडस्ट्रीज आपला USA मधील शेल GAS मालमत्तेचा काही भाग US$ १२६ मिलियनला विकणार आहे.
 • IOC ने असे जाहीर केले की GAIL आणी ऑईल इंडिया या कंपन्यातील सरकारी हिस्सा विकत घेण्यास ते तयार आहेत. ही कंपनी म्यानमार आणी बांगलादेशमध्ये ऑफिस उघडणार आहे एन्नोरे येथे LNG टर्मिनस बांधून ते डिसेंबर २०१८ पर्यंत कार्यान्वित करणार.
 • सरकारने आर्बिट्रेशन अवार्डमध्ये मंजूर झालेली रकम कंपन्यांना द्यावी असे सांगितल्यामुळे JMC प्रोजेक्ट्स, पटेल इंजिनिअरिंग, मान इन्फ्रा, अशा कंपन्यांना आर्बिट्रेशन अवार्ड प्रमाणे पैसा मिळेल.
 • जिंदाल स्टील एंड पॉवर ही कंपनी आपले रायगढ आणी अंशुल येथील ऑक्सिजन प्लांट श्रेय इन्फ्रास्ट्रक्चरला Rs ११२० कोटींना विकणार आहे.
 • मार्कसंस फार्मा या कंपनीच्या गोवा युनिटच्या ३ एप्रिल ते ७ एप्रिल २०१७ दरम्यान USFDA ने केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये क्लीन चीट दिली
 • टाटा पॉवर आपला इंडियन एनर्जी एक्स्चेंज मधील स्टेक विकणार आहे.
 • साउथ इंडियन बँकेचे तसेच लक्ष्मी विलास बँकेचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. जास्त प्रोविजन करायला लागल्यामुळे नफा ८०% ते ९०% ने कमी झाला.NPA ची स्थिती काहीशी स्थिर आहे
 • पेपर PACKAGING कंपन्यांना GST मुळे फायदा होतो आहे उदा हुतात्माकी PPL
 • MCX वर दिवाळीच्या आसपास सोन्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग सुरु होत आहे. याचा फायदा EDELWEISS, मोतिलाल ओसवाल, जे एम फायनांसियल, जीओजित, रेलीगेरे यांना होईल. MCX चा दुसऱ्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक होता.
 • T I फायनान्स या शेअरला टी टू टी ग्रूप A ग्रूप मध्ये आणून या कंपनीचे सर्किट २०% चे केले.
 • केमिकल बनवणाऱ्या किंवा या उद्योगाशी संबंधीत असणार्या कंपन्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले लागतील असे वाटते. उदा. हिमाद्री केमिकल्स, बोडल केमिकल्स, कनोरिया, GNFC, एस एच केळकर.
 • मर्केटर या कंपनीने आपले एक जहाज विकले.
 • लार्सन आणी टुब्रो या कंपनीला मीटर्ससाठी मोठी ऑर्डर मिळाली. लार्सेन एन्ड टुब्रो आपले नॉन कोअर ASSET विकण्याच्या विचारात आहे.
 • सुवेन लाईफ सायन्सेस या कंपनीला नसांच्या आजारावरील औषधासाठी न्यूझीलंडकडून सन २०३४ पर्यंत पेटंट मिळाले.
 • MOODY’ज नी GMR इंफ्राच्या हैदराबाद विमानतळाला Ba1 ग्रेड दिली याचा अर्थ काही गोष्टी चिंताजनक आहेत.
 • दिल्लीत वर्ल्ड ट्रेड सेंटर बनवण्यासाठी NBCC ला Rs २००० कोटींचे काम मिळाले.
 • USFDA कडून दादरा युनिटला क्लीन चीट मिळाल्यामुळे आता हलोल प्लान्टलाही क्लीन चीट मिळेल असे वाटते
 • मॉनसंटो आणी कावेरी सीड्स यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.
 • STC, MMTC आणी PFC याना लाभांश देण्यातून सूट मिळाली.
 • बजाज कॉर्प, CYIENT, इंडसइंद बँक, GM ब्रुअरीज, गोवा कार्बन, कर्नाटक बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे दुसर्या तीमाहीचे निकाल चांगले आले टी सी एस चे निकाल चांगले आले. प्रॉफीट ८.५% ने वाढले. प्रॉफीट Rs ६४५० कोटी तर इन्कम Rs ३०५४१ आणी EBITDA Rs ७६६० कोटी झाला. टी सी एस ने प्रती शेअर Rs ७ अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअरच्या मार्केट कॅपने Rs ५५० लाख कोटींचे लक्ष्य ओलांडून एक विक्रम केला.
 • मान इंडस्ट्रीजला ‘GAIL’ कडून Rs ९३० कोटींची ऑर्डर मिळाली. या कंपनीची मार्केट कॅप Rs ६०० कोटींची आहे. त्यामुळे ही ऑर्डर मोठीच म्हणावी लागेल.
 • इंडिया बुल्स रिअल इस्टेट ही कंपनी सिंगापूरमधील सबसिडीअरी डीलिस्ट करणार आहे. तसेच आपला रेसिडेनशियल आणी कमर्शियल बिझिनेस वेगळे करणार आहेत.
 • कोची शिपयार्डला इंडियन नेव्हीकडून Rs ५४०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • डिक्सन या कंपनीला फ्लिपकार्टकडून मोठी ऑर्डर मिळाली.
 • DCW तामिळनाडूमध्ये नवीन प्लांट चालू करणार आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • झी एन्टरटेनमेंट एन्टरप्राईझेस या कंपनीने 9X MEDIA आणी INX MUSIC ह्या अनुक्रमे हिंदी आणी पंजाबी दूरदर्शनवाहिन्या Rs १६० कोटींना खरेदी केल्या.
 • IPO गोदरेज अग्रोचेट चा IPO एकूण ९५.३ वेळा तर रिटेल कोटा ७.५ वेळेला आणी HNI कोटा २३६ वेळेला ओव्हर सबस्क्राईब झाला. या कंपनीच्या शेअर्सचे १६ ऑक्टोबर २०१७ रोजी लिस्टिंग आहे.
 • HCL इन्फो ही कंपनी Rs ५०० कोटींचा राईट्स इशू आणत आहे. या कंपनीचा पोस्ट खात्याबरोबर वाद चालला होता तो पुढील आठवड्यात मिटेल.
 • इन्फोसिसच्या ‘BUY BACK’ योजनेची रेकोर्ड डेट १ नोव्हेंबर २०१७ ही ठरवली.
 • रिलायंस इंफ्राचा मुंबईमधील ट्रान्समिशन बिझिनेस ‘अडाणी ट्रान्समिशन’ Rs १००० कोटीना खरेदी करणार आहे. हा पैसा कर्ज कमी करण्यासाठी वापरण्यात येईल.
 • रिलायंस निपॉन या AMC(ASSET MANAGEMENT COMPANY) चा IPO २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान ओपन राहील. प्राईस BAND Rs २४७ ते Rs २५२ आहे. या शेअर्सचे लिस्टिंग ६ नोव्हेंबर रोजी होईल.
 • चेन्नई पेट्रो या कंपनीत इराणची भागीदारी असल्यामुळे IOC ने चेन्नई पेट्रो बरोबरचे मर्जर रद्द केले.
 • BASF इंडिया BAYERS इंडियाचा बिझिनेस खरेदी करणार आहे.
 • एस्कॉर्टस ही कंपनी रेलटेक ही कंपनी खरेदी करणार आहे.
 • NBCC ही सरकारी कंपनी इंजिनीअरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड, HSCC आणी NPCC या तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या अक्वायर करण्याची शक्यता आहे.

मार्केटने काय शिकवले
CLSA ने मारुतीचे रेटिंग कमी करून महिंद्र आणी महिंद्रचे रेटिंग वाढवले. याचा अर्थ काहीतरी बातमी येऊ घातली आहे. आपण आपला प्रॉफीट बुक करावा आणी महिंद्र आणी महिंद्र मध्ये काय घडते यावर लक्ष ठेवून या कंपनीतील गुंतवणूक वाढवावी कां याचा विचार करावा.
T I फायनान्स या शेअरला टी टू टी ग्रूप मधून काढून A ग्रूप मध्ये घालून त्याचे सर्किट २०% चे केले. म्हणजेच पेशंटमध्ये सुधारणा दिसते आहे म्हणून डॉक्टरनी डायेट बदलले पथ्य कमी केले अशापैकीच आहे.
मार्केटमध्ये येणाऱ्या बातम्या, आकडेवारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, आणी मानसिकता यांचा परिणाम मार्केटवर होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बुधवार तारीख ११ ऑक्टोबर २०१७ रोजी घडलेली घटना तेच दर्शविते. USA ची ‘वॉरशिप’ चीनच्या समुद्रात आली अशी बातमी आल्याबरोबर ट्रेडर्सनी विक्री सुरु केली. जवळ जवळ ३०० पॉइंट मार्केट पडले. म्हणजे बातमी तेवढी भीतीदायक नव्हती. पण प्रतिक्रिया मात्र फार तीव्र झाली. अशा वेळी एक गोष्ट पक्की की शेअर्स स्वस्तही मिळतात आणी चढ्या भावाला विकले जातात. पण सबुरी आणी निरीक्षण हवे. तेजीच्या मार्केटचा फायदा उठवण्यासाठी ज्ञान हवे त्याचवेळी समृद्धीची ज्योत उजळेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२४३२, NSE निर्देशांक निफ्टी १०१६७ वर तर बॅंक निफ्टी २४६८९ वर बंद झाले.

One thought on “आठवड्याचे-समालोचन – लक्ष्मी आली घरा तोची दिवाळी दसरा – ९ ऑक्टोबर २०१७ ते १३ ऑक्टोबर २०१७

 1. Pingback: आठवड्याचे समालोचन – आतिषबाजी शेअरमार्केटमध्ये -१६ ऑक्टोबर २०१७ ते १९ ऑक्टोबर २०१७ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.