आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मूडीने रचला पाया S & P होईल का कळस? – २० नोव्हेंबर २०१७ ते २४ नोव्हेंबर २०१७
आपण आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजना संतांची उपमा दिली पाहिजे. बिचारे प्रत्येक गोष्टीचे रेटिंग करण्यासाठी परिमाणे, स्तर गोळा करत असतात. प्रत्येक देशाला, देशातील कंपन्यांना त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुचवत असतात. अधोगतीची कारणे शोधायला मदत करतात. संतांची वचने लोक कान देऊन ऐकत असतात पण आचरणात आणताना कच खातात आणि जे आचरणात आणतात ते स्वतःच संत होतात.
या तीन महिन्यात अशा दोन संतांची पहिली वर्ल्ड बँकआणी दुसरी मुडीजची भारतावर कृपा झाली. एकाने भारताला ‘ईज ऑफ डूइंग बिझिनेस’ मध्ये वरचे रेटिंग दिले तर मुडजने भारताचे रेटिंग वाढवले. अर्थात ही कृपा होण्यासाठी ‘चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे’ या उक्ती प्रमाणे GST लागू करणे, डीमॉनेटायझेशन,, बँकिंग सेक्टरची सफाई, IBC असे लोखंडाचे चणे पचवावे लागले.
या दोन अपग्रेडेशनमुळे भारताची जगात पत वाढली. भारतीय कंपन्यांना बॉंडद्वारे तसेच आंतरराष्ट्रीय बँका आणी संस्थाकडून कर्ज मिळणे सुलभ आणी स्वस्त झाले. BSE आणी NSE या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकांनी गेल्या आठवड्यात उच्चतम स्तर गाठला. कितीतरी लोकांचे शेअर्समध्ये अडकून पडलेले पैसे सुटे झाले.
आता मार्केट वाट पाहत आहे ‘इजा बिजा तिजा’ या म्हणण्याप्रमाणे आठवड्याच्या शेवटी S & P च्या ही रेटिंगमध्ये सुधारणा झाली तर आख्खे शेअर मार्केट्च ‘ब्लू स्काय टेरिटरित’ जाईल. मार्केटमधील गुंतवणूकदार, ट्रेडर्स, उद्योगपती, भारत सरकार, सर्व आनंदोत्सव साजरा करतील
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- फेडच्या मीटिंग मध्ये आता जरी रेटमध्ये कोठलीही वाढ केलेली नसली तरी डिसेंबरमध्ये रेट वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
सरकारी अन्नौसमेंट
- सरकारने लॉजिस्टिक सेक्टरला INFRASTRUCTURE चा दर्जा दिला. त्यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना स्वस्त दराने कर्ज मिळेल. उदा :- स्नोमन लॉजिस्टिक, गती, पटेल इंटिग्रेटेड, अलकार्गो, महिंद्र लॉजिस्टिक,.
- खाद्यतेलावरील इम्पोर्ट ड्युटी ३०% वरून ४५% पर्यंत वाढवली. त्यामुळे आयात तेलाचे प्रमाण कमी होईल. याचा परिणाम अडानी एन्टरप्राईझेसवर होईल.
- सरकारने रबर केमिकल PX13 वर ANTIDUMPING ड्युटी बसवली.
- सरकारने पेट कोकच्या आयातीला मनाई केली. SAND माईनिंग वर बंदी घातली. याचा परिणाम सिमेंट कंपन्यांवर होईल.
- सरकार लेदर सेक्टरला काही सोयीसुविधांचे PACKAGE देण्याच्या विचारात आहे. त्याचा परिणाम बाटा, लिबर्टी सुपर लेदर, मिर्झा TANNERS, खादीम’s या कंपन्यांवर होईल.
- सरकार बायो इथनोलसाठी Rs ५००० कोटीची गुंतवणूक करणार आहे. याचा परिणाम प्राज इंडस्ट्रीज आणी सर्व साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्स वर झाला.
- सरकार प्रवासी SVC चार्जेस ३८% ने वाढवण्याचा विचार करत आहे. याचा परिणाम प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांवर होईल.
- NPA अकौंटची मालमत्ता रेझोल्युशन प्रक्रीयेद्वारे पुन्हा ज्या प्रमोटर्सनी कर्ज बुडवले आहे त्यांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून सरकारने वटहुकुमाद्वारे IBC मध्ये सुधारणा केली यात अशी तरतूद केली आहे की खालील व्यक्ती रेझोल्युशनच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. (१) विलफुल DEFAULTERS ज्यांनी हेतुपुरस्सर कर्ज भरण्यासारखी परिस्थिती असताना कर्ज भरले नाही. (२) UNDISCHARGED INSOLVENT (३) अपात्र डायरेक्टर्स (३) प्रमोटर किंवा त्यांना हमी दिलेले इसम (४) ज्या इसमाला सेबीने सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करायला बंदी केली आहे, किंवा त्याला दोन वर्षापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे, त्या इसमाचा कोणत्याही प्रकारचा अकौंट १ वर्षापेक्षा अधिक काल NPA आहे , त्याला IBC खाली फ्राड्यूलट व्यवहारासाठी बंदी घातली आहे.किंवा कोणत्याही परदेशी कायद्याखाली बंदी घातली आहे, किंवा ज्या इसमाचा वरील निर्देश केलेल्या इसमांशी संबंध आहे. सरकारने काढलेल्या या वटहुकुमाला राष्ट्रपतींनी २२.११ २०१७ रोजी संमती दिली. रेझोल्युशन ऑथारिटी या तरतुदी वाढवू शकतात.
- मंत्रीमंडळाने १५ व्या वित्तीय आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली. हा आयोग १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५पर्यंत केंद्र आणी राज्ये यांच्यात रेव्हेन्यूची कोणत्या तत्वावर विभागणी करायची ते ठरवेल. हा आयोग GST अमलात आल्यावरचा पहिला वित्तीय आयोग आहे आणी GST च्या अंमलबजावणीत आलेले अनुभव लक्षात घेऊन आपल्या शिफारशी करेल.
- सरकारने प्रत्यक्ष करांच्या कोडमध्ये बदल सुचविण्यासाठी आणी नवीन प्रत्यक्ष कर कोड तयार करण्यासाठी एक ७ सदस्यांची उच्च स्तरीय समिती नेमली आहे ही समिती आपला अहवाल सहा महिन्यात सदर करेल.
- सरकारने तामिळनाडू राज्यात Rs १,००,००० कोटी रकमेच्या हायवे शिपिंग प्रोजेक्टसाठी मंजुरी दिली.
- सरकारने EPFO मध्ये ८५% रक्कम त्यात्या वेळी असलेल्या व्याजासकट परत दिली जाईल पण १५% रकम इक्विटीमध्ये गुतवून होणार्या सर्व फायाद्यांसकट ती रक्कम रिटायरमेंटच्या वेळी दिली जाईल अशी सुधारणा केली आहे.
- सरकारने ज्या ज्या वस्तूंवरील GST कमी केला आहे त्या त्या वस्तूंचे दर कमी करण्यासाठी संबंधीत कंपन्यांना सुचना दिली आहे. GST कमी होण्याआधीची MRP आणी GST कमी झाल्यावरची MRP ह्या दोन्ही वस्तूंवर दाखवल्या पाहिजेत असे सुचवले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नेस्लेनी त्यांच्या चॉकलेट, MAGGI आणी इतर उत्पादनाच्या किंमती कमी केल्या
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
- निफ्टीमधून सिपला आणी ल्युपिन बाहेर पडतील आणी इंडसइंद बँक आणी येस बँकेचा समावेश होईल.
- इंडो कौंट २९ जानेवारी २०१८ पासून F & O मधून बाहेर पडेल.
- MSCI स्माल कॅप इंडेक्समध्ये येस बँकेला समाविष्ट केले.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- युपी आणी महाराष्ट्रामध्ये साखरेचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांवर बसवलेले स्टॉक लिमिट उठवावे अशी मागणी ISMA या सरकारी संस्थेने केली.
- ऑरोबिंदो फार्माच्या युनिट १६ च्या पोर्तुगाल ड्रग रेग्युलेटरी औथोरिटीने १५ सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या तपासणीत क्लीन चीट दिली
- NPPA(NATIONAL PHARMA PRICING AUTHORITY) ने प्राईस कंट्रोलच्याअंतर्गत ५१ औषधांच्या किंमती निश्चित केल्या.
- J M फायनांसियलला NATIONAL हौसिंग बँकेकडून हौसिंग फायनान्स बिझिनेससाठी लायन्सेस मिळाले. JM फायनंसियल होम लोन्स या युनिटला परवानगी मिळाली.
- NGT(NATIONAL GREEN TRIBUNAL) ने दिल्ली विमानतळावर फक्त CNG वाहनेच जाऊ शकतील असा नियम केला आहे. वाहनांना CNG ENABLE करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- IFCI ने व्हीडीओकॉनमधील २२.५ लाख शेअर्स विकले.
- ADLAB या कंपनीने आपले खोपोली येथील ५ स्टार हॉटेल राधाकिशन दमाणी यांना विकले.
- पटेल इंजिनीअरिंगने ५ एकर जमीन लोढा ग्रूपला Rs ३७६ कोटींना विकली.
- HOEC च्या आसाममधील दिरलोक GAS फिल्डमध्ये कमर्शियल उत्पादन सुरु झाले.
- RCOMची दिल्ली आणी चेन्नई येथील मालमत्ता ब्रूकफिल्ड कोटील खरेदी करणार आहे.
- मर्क इलेक्ट्रॉनिक त्यांचा इलेक्ट्रोनिक इक्विपमेंटचा कारभार विकण्याच्या तयारीत आहेत. कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. कंपनी टर्नअराउंड झाली.
- लार्सेन AND टुब्रो CONSTRUCTION या कंपनीला ट्रान्सहार्बर लिंक प्रोजेक्टसाठी Rs ८६५० कोटींची ऑर्डर मिळाली. हा प्रोजेक्ट शिवडी ते न्हावाशेवापर्यंत आहे. ही कनेक्टीव्हिटी झाली तर जय कॉर्प, AD LAB, अशा कंपन्यांवर होईल.
- मारुती लिमिटेडने टोयोटा या कंपनीबरोबर इलेक्ट्रिक व्हेईकल साठी करार केला.
- ACC आणी अंबुजा सिमेंट यांनी सिमेंटचे दर पोत्यामागे Rs २० ने कमी केले. याचा परिणाम बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना होईल.
- दक्षिण कोरियाची कंपनी LOTTE कन्फेकशनरीने अहमदाबादची कंपनी HAVMOR Rs १०२० कोटींना खरेदी केली. हा HAVMOR BRAND आता क्वालिटी डेअरी LOTTE कडून खरेदी करणार आहे
- कॉपीराईट ट्रान्स्फर करताना सर्विस कर देण्याची गरज नाही. याचा फायदा मल्टीफ्लेक्सला होईल.
कॉर्पोरेट एक्शन
- करुर वैश्य बँकेने राईट्स इशूद्वारा ११.७ कोटी शेअर्स इशू केले.
- बँक ऑफ इंडियाला Rs ३००० कोटीचा, युनायटेड बँकेला Rs १००० कोटीचा, आणी इडीयन बँकेला QIP इशुद्वारे भांडवल उभारण्यास सरकारने मंजुरी दिली.
- स्टेट बँक ऑफ इंडियाने Rs १२०९ रकमेचे ६ NPA तर बँक ऑफ बरोडाने Rs १०९० कोटी रकमेचे NPA विकण्यासाठी बोली मागवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबईत आणी इतरत्र झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुनर्वसन करणाऱ्या डेव्हलपरला कर्ज देण्याची शक्यता आहे.
- भारती एअरटेल मधील ३% हिसा भारती फौंडेशनला देत असल्याची घोषणा केली. हे फौंडेशन शिक्षण क्षेत्रात काम करेल. आणी सत्य भारती विश्वविद्यालयाची स्थापना करेल.
- झुआरी अग्रो Rs ४०० कोटींचा QIP आणणार आहे.
- जेट एअरवेज आणी एअर फ्रान्स मध्ये करार होण्याची शक्यता आहे. यात एअर फ्रान्स जेटमध्ये स्टेक घेईल. या करारामुळे जेट एअरवेज युरोपात जास्त ठिकाणी पोहोचू शकेल. तसेच कार्गो आणी इंजिनिअरिंग सेवेसाठी करार होण्याची शक्यता आहे. यासंबंधात जेट एअरवेजने २९ नोव्हेंबरला प्रेस कॉन्फरन्स बोलावली आहे.
- टाटा बिझिनेस सपोर्ट सर्विसेस या कंपनीतील ५१% स्टेक क्वेस कॉर्पोरेशन या कंपनीने Rs १५३ कोटींना खरेदी केला.
- मयूर युनिकोटर ही कंपनी Rs ५५० प्रती शेअर या भावाने ४.५ लाख शेअर्स BUY BACK करणार आहे.
- विप्रो २९ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१७ याकाळात तर इन्फोसिस ही कंपनी ३० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत जाहीर केलेया योजनेनुसार शेअर ‘BUY BACK’ करेल .आपल्याला कंपनीने पाठवलेला ‘BUY BACK’ चा फॉर्म वेळेवर मिळाला नाहीतर कंपनीशी संपर्क साधावा नाहीतर कंपनीच्या साईटवरून डाऊनलोड करून घ्यावा.
- स्ट्राईड शसून या कंपनीचा भारतातील जनरिक बिझिनेस ERIS लाईफसायन्सेस ही कंपनी Rs ५०० कोटींना विकत घेणार आहे.
- HSIL ही SANITARYWEAR मध्ये कार्यरत असणारी कंपनी कन्झ्युमर प्रोडक्ट्स, डीस्ट्रीब्यूशन आणी मार्केटिंग बिझिनेस डीमर्ज करून सोमानी होम इनोव्हेशन ह्या नवीन कंपनीकडे सोपवणार आहेत.
- २८ नोव्हेंबरला स्वराज्य इंजिनची ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
- सिमेन्स या कंपनीने Rs ७ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
- JSPLच्या प्रमोटर्सनी कंपनीमधला आपला स्टेक वाढवला.
- EDELWEISS ने QIP द्वारा Rs १५२८ कोटी उभारले.
- DB रिअल्टीच्या ४ मालमत्ता बँक ऑफ इंडियाने Rs ३५० कोटी कर्जाच्या वसुलीसाठी ताब्यात घेतल्या. या कंपनीला हमी दिलेल्या लोकांचीही संपत्ती जप्त केली.
- लक्ष्मी विलास बँक Rs १२२ प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार आहे. बँक या इशू द्वारे Rs ७८७ कोटी भांडवल उभे करेल (राईट्स इशूविषयी खुलासेवार माहिती माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे).
मार्केटने काय शिकवले
जर दोन शेअर्स एकत्र वाढत असतील किंवा कमी होत असतील तर ते परस्परांशी संबंधीत आहेत का याचा शोध घ्या. VLS फायनान्स आणी रीलाक्सो या कंपन्यांचे शेअर्स असेच एकत्र वाढतात आणी एकत्र कमी होतात कारण VLS फायनान्स चा रीलाक्सोमध्ये स्टेक आहे.
DB रिअल्टीच्या ४ मालमत्ता बँक ऑफ इंडियाने Rs ३५० कोटी कर्जाच्या वसुलीसाठी ताब्यात घेतल्या. या कंपनीला हमी दिलेल्या लोकांचीही संपत्ती जप्त केली. ही बातमी बँक ऑफ इंडियाच्या दृष्टीने चांगली तर DB रिअल्टीचे दृष्टीने वाईट म्हणावी लागेल.
मार्केटमध्ये सतत एका कंपनीतील प्रमोटरनी स्टेक वाढवला तर दुसर्या कंपनीतून प्रमोटर आपला स्टेक विकून टाकत आहे.अशा बातम्या येत असतात. कॅम्लिन फाईनमध्ये SBI म्युच्युअल फंडाने स्टेक वाढवला. स्टेक घेतला किंवा प्रमोटर्सनी स्टेक वाढवला ही बातमी कंपनीच्या दृष्टीने चांगली पण किती चांगली हे स्टेक कोणी घेतला, किती भावावर घेतला यावर ठरवावे लागते. नाहीतर कर्ज दिलेल्या बँकांनी ५१% स्टेक एखाद्या कंपनीत घेतला ही बातमी कंपनीच्या शेवटाची नांदी ठरू शकते. जर प्रमोटर्स किंवा व्हेन्चर कॅपिटल फर्म्सनी स्टेक कमी केला असेल तो कोणी विकत घेतला ते पहावे.
मुडीज च्या रेटिंगनंतर S & P च्या रेटिंगकडे सर्वांचे लक्ष आहे अजून गुजराथच्या निवडणुकांचे निकाल यायला वेळ आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल होऊन गेले आहेत. बरेच IPO येऊन गेले आहेत. ETF २२ चा NFO ही येऊन गेला.पुढील पंधरा दिवसात RBI ची वित्तीय पॉलिसी जाहीर होईल, त्यामुळे सध्या तेजीसाठी किंवा मंदी करण्यासाठी काहीही ट्रिगर नाही. त्यामुळे मार्केट एका छोट्याशा रेंजमध्ये आराम करत आहे.
बघू या S & P च्या रेटिंगची वाट !
BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३३६७९ तर NSE निर्देशांक निफ्टी १०३८९ वर आणी बँक निफ्टी २५७७९ वर बंद झाले.
***************
S & P ने आपले रेटिंग ‘BBB’ आणी ऑउटलूक ‘STABLE’ कायम ठेवला. या दोन्हीहीमध्ये काहीही बदल केला नाही. २०१८ ते २०२० या दोन वर्षात भारताची प्रगती ‘STRONG’ राहील असे अनुमान जाहीर केले.
रेटिंग न सुधारण्याची काही कारणे अशी
- प्रॉब्लेम्स ओंन सप्लाय साईड आणी डिमांड साईड ऑफ लेंडिंग
- हाय फिस्कल डेफिसिट आणी हाय डोमेस्टिक DEBT
- WEAKER GROWTH IN CONSUMPTION
************************