आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कठीण समय येता कोण कामास येतो – १९ फेब्रुवारी २०१८ ते २३ फेब्रुवारी २०१८
संकटे येऊ लागली की चोहोबाजूंनी येतात. US $ मजबूत होऊ लागला आहे त्यामुळे अर्थातच रुपया कमजोर होऊ लागला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. रोटोMAC, PNB, वक्रांगी, फोर्टिस असे एकामागून एक घोटाळे उघडकीस येत आहेत. त्यातच NPPA ने असा दावा केला की हॉस्पिटल्स नॉन शेड्युल्ड औषधे घ्या अशी त्यांच्या रुग्णावर सक्ती करत आहेत तसेच औषधाच्या किमती अव्वाच्या सव्वा लावत आहेत. रुपया पडतो आहे म्हणून मार्केटमध्ये IT सेक्टरमध्ये तेजी आली तर शुक्रवारी बातमी आली की USA H1B व्हिसाचे नियम कडक करत आहे. घोटाळे होतात म्हणून बँकांनी आपले नियम कडक केले त्याचाही फटका जेम्स आणी ज्युवेलरी तसेच इतर क्षेत्रांना बसत आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर होईल.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
USA च्या सेन्ट्रल बँक FED ची मार्च २०-२१ २०१८ ला बैठक आहे यात फेड आपले व्याजाचे दर वाढवील असा एकंदरीत अंदाज आहे. USA मध्ये H1B व्हिसाचे नियम अधिक कडक करणार आहे. आता परदेशी कंपन्यांना व्हिसासाठी आपण आपला माणूस स्पेशालिटी जोब साठी पाठवत आहोत हे व्हिसा ऑथोरिटीजना पटवावे लागेल. जे H1B व्हिसा होल्डर कंपनीत बेंचवर असतील (जादा कर्मचारी) त्यांचा व्हिसा आपोआप रिन्यू होणार नाही. जेवढा काळ H1B व्हिसा होल्डर कंपनीच्या कामावर असेल तेवढ्याच काळाकरता H1B व्हिसा रिन्यू होईल. पूर्वी हा व्हिसा ३ वर्षाकरता दिला जात होता या H1B व्हिसाच्या नियमामधील बदलांचा परिणाम IT क्षेत्रातील कंपन्यांवर होईल.
सरकारी अनौंसमेंट
- सरकारने कोळशाच्या खाणीचे वाटप करण्याचे नियम अधिक सोपे आणी पारदर्शक केले. तसेच हे वाटप खाजगी क्षेत्रातील खाण उद्योगांना खुले केले. याचा फायदा खते, धातू या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना होईल. सरकारच्या या निर्णयामुळे कोळसा क्षेत्रातील कोल इंडियाची एकाधिकारशाही संपेल.
- मंत्रिमंडळाने अनियंत्रित ठेवी योजना रद्द होतील असे जाहीर केले. आता अस्तिवात असलेल्या योजनांसाठी सरकारला कायदा करावा लागेल अन्यथा त्या सर्व रद्द होतील. नवीन डीपॉझीट योजना बिलाला मंजुरी दिली. तसेच सरकारने चीटफंड कायद्यात बदल करायला मंजुरी दिली.
- सरकारने स्वस्त घर योजनेसाठी Rs ६०००० कोटी मंजूर केले.
- मंत्रिमंडळाने अतिरिक्त अंदाजपत्रकास मंजुरी दिली.
- सरकार CNG च्या डीस्ट्रीब्युशनसाठी रोड शो करणार आहे. हे रोड शो मुंबई, दिल्ली आणी इतर मोठ्या शहरात करण्यात येतील. याचा फायदा जिंदाल SAW,महाराष्ट्र सीमलेस यासारख्या पाईप उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना IGL, MGL, गुजरात GAS या कंपन्यांना तसेच EKC या कंपन्यांना होईल.
- पुढील महिन्यात टेलिकॉम मंत्रालयाची बैठक आहे त्यात टेलिकॉम सेक्टरसाठी काही सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे.
- सरकारने PF वरील व्याजाचा दर Rs ८.६५% वरून ८.५५% केला. पण PF कायदा आता १० कर्मचारी काम करत असलेल्या आस्थापनाला लागू होईल.
- IDBI बँकेचे खाजगीकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- ड्रेजिंग कॉर्पोरेशनसाठी त्यातील कामगार Rs १८००० कोटींची बोली लावतील अशी शक्यता आहे.
- NHAI आपल्या ७०० किलोमीटर लांबीच्या ९ NATIONAL HIGHWAYS चा ३० वर्षासाठी आपल्या TOT –(टोल ऑपरेट ट्रान्स्फर) योजनेखाली लिलाव करणार आहे.यातून NHI ला कमीतकमी Rs ६०००० कोटी मिळतील असा अंदाज आहे.
- MTNL, BSNL, TCIL, आणी ITI या कंपन्यांनी आपापसात MOU केले.
अर्थव्यवस्थेच्या गोष्टी
- २ एप्रिल २०१८ पासून निफ्टीमध्ये RBL बंक, ग्रासिम, बजाज फिनसर्व, टायटन हे शेअर्स सामील होतील तर अंबुजा सिमेंट, कॅनरा बँक, ऑरोबिंदो फार्मा, BOSCH हे शेअर्स बाहेर पडतील.
- भारतातही ‘BOND YIELD’ वाढत आहेत. २०२८ च्या BOND वरील YIELD ७.१७% वरून ७.६७ वर तर २०२७ BOND YIELD ७’८४% झाले.
- रुपया सतत पडत आहे. गुरुवारी रुपयाचा दर १US $ = ६५.०५ होता. ‘BOND YIELD’ ७.९२% पर्यंत वाढेल आणी रुपयाचा दर १US $ = Rs ६६ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- SAIL या कंपनीने आपल्या स्टील सळ्या, बार, आणी शीट यांच्या किमती वाढवल्या.
- वेदान्ता आणी हिंदाल्को या कंपन्यांनी अल्युमिनियमच्या किंमती वाढवल्या.
- MCX ला क्रॉस करन्सी डेरिव्हेटीव सुरु करायला मंजुरी मिळाली हे एक्स्चेंज संध्याकाळी ७-३० पर्यंत उघडे राहील.
- रिलायंस इंडस्ट्रीज एरॉस INT च्या सबसिडीअरीमध्ये ५% स्टेक घेणार आहे.
- इंडियन हॉटेल भोपालमध्ये नवीन हॉटेल सुरु करणार आहे.
- बायोकॉन रेमिडीजच्या मलेशियातील प्लांटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले आणी ६ त्रुटी दाखवून फॉर्म ४८३ इशू केला. या युनिटमधून कंपनीला फारसे उत्पन्न होत नाही. या युनिटला युरोपिअन ऑथोरिटीजने परवानगी दिली आहे. ह्या युनिटमधून इन्शुलीनचा पुरवठा केला जाणार होता. त्यामुळे USFDA ने हे युनिट चालू होण्याच्याआधी हे इन्स्पेक्शन केले.
- महिंद्र लॉजिस्टिकने चाकण मध्ये मोठा इंडस्ट्रीयल पार्क उघडला.
- NTPC अंदमानमध्ये 50MW चा प्लांट लावणार आहे.
- HDFC म्युच्युअल फंडाने SKF, अतुल ऑटो आणी TEXMACO रेल या कंपनीच्या शेअर्सची खरेदी केली.
- नवी मुंबई येथे एक नवा विमानतळ होत आहे या विमानतळाच्या जवळपास जय कॉर्पची बरीच मोठी जमीन आहे.
- ऑरोबिंदो फार्माच्या युनिट ४ च्या इन्स्पेक्शनमध्ये USFDA ने काही त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ दिला. पण या त्रुटी डाटाशी संबंधीत नाहीत.
- सन फार्माच्या हलोल प्लांटचे १२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान USFDAने इन्स्पेक्शन केले. ३ त्रुटी दाखवल्या. कंपनीला १५ दिवसात रिपोर्ट देण्यास सांगितले आहे. सन फार्माच्या हलोल प्लांटमधून २० उत्पादने USAमध्ये पाठवली जातात.
- रोटोMAC या कंपनीची पांच बँकांकडे Rs ३६९५ कोटी कर्जाची बाकी आहे. यात युनियन बँक, बँक ऑफ बरोडा अलाहाबाद बँक यांनी दिलेली कर्जे सामील आहेत.
- फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीने आपल्या दुसऱ्या आणी तिसऱ्या तिमाहीचे निकाल २८ मार्चपर्यंत जाहीर केले नाहीत तर त्याच्या कंपनीचा शेअर वायदे बाजारातून वगळला जाईल असे NSEने जाहीर केले.
कॉर्पोरेट एक्शन
- फेडरल बँक EQUIRUS कॅपिटल या इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये २६% स्टेक घेणार आहे.
- सनोफी या कंपनीने प्रती शेअर Rs ५३ तर मर्कने Rs १५ लाभांश दिला.
- सिमेन्स त्यांचा मोबिलिटी आणी मेकॅनिकल बिझिनेस अलग करणार आहेत.
- २७ फेब्रुवारी २०१८ रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी ONGC ची बोर्ड बैठक बोलावली आहे.
- ASTER DM हेल्थकेअर या कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग सोमवारी २५ फेब्रुवारी २०१८ रोजी होईल.
मार्केटने काय शिकवले
जसे आपले शारिरीक आरोग्य माणसाने जपले पाहिजे तसेच आपल्या गुंतवणुकीचे आरोग्यही जपले पाहिजे. माणूस आजारी पडल्यावर काही पथ्ये पाळतो, औषधपाणी करतो तसेच आपल्या पोर्टफोलियोचे सिंहावलोकन करून जर काही शेअर्समधील गुंतवणूकीचे आरोग्य संशयास्पद वाटत असेल तर असे शेअर्स प्रथम होत असेल तो फायदा घेवून विकून टाकावेत हे उत्तम. पण काही शेअर्स असे असतात की त्यांची किमत पडत्या मार्केटमध्येही पडत नाही. अशा शेअर्सवर लक्ष ठेवावे. या शेअर्समध्ये प्रतिकारशक्ती जास्त असते. त्यामुळे असे शेअर्स आपल्या पोर्टफोलीओचीही प्रतिकारशक्ती वाढवतात. कठीण समयी कामास येतात. एखादा आजार झाल्यावर माणसाला उपचार केल्यानंतर, हॉस्पिटलमधून डीसचार्ज मिळाल्यावर त्याची तब्येत लगेच सुधारत नाही तसेच मार्केटमध्येही आहे. एखाद्या शेअरच्या बाबतीत सतत चांगल्या वाईट बातम्या येऊ लागल्या की त्याच्या किमतीमध्ये अस्थिरता येते. त्यामुळे फोर्टिस हेल्थकेअर, वक्रांगी, गीतांजली, आणी PNB, अलाहाबाद, युनियन बँक अशा शेअर्स पासून काही काळ दूर राहावे. तसेच मार्केटमधील टीपापासून दूर राहण्याचे पथ्य पाळावे. ह्या टिपा आपल्या मोबाईलवर SMS करून आपल्याला एखाद्या कंपनीचे १००० ते २००० शेअर्स घ्यावयाची शिफारस करतात आणी नंतर या शेअर्सची किंमत खूप पडते. तसेच आपण शेअर्स घेताना ते आपल्याला परवडतील अशा संख्येतच घ्या, वेगवेगळ्या शेअर्स मध्ये छोट्या प्रमाणात शेअर्स घ्या म्हणजे धोका वाटला जाईल. नाहीतर रोग बरा पण औषध नको असे म्हणायची पाळी यायला नको. शक्यतो आपल्या पैशाने शेअर्स घ्या म्हणजे त्यांच्या विक्रीविषयी आपल्याला स्वातंत्र्य राहील.
PNB घोटाळा निर्यात क्षेत्रात असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक आवरती घेतली, बँकांनी लेटर ऑफ क्रेडीटचे नियम आणी सामान्यतः आयात निर्यात क्षेत्रात अधिक सावधगिरी बाळगायला सुरुवात केली, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या महत्वाच्या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. रुपया पडत असल्यामुळे आपले क्रूडचे आयात बिल वाढत आहे, USA मध्ये H1B व्हिसाचे नियम अधिक कडक करण्यात येत आहेत.
२०-२१ मार्च २०१८ फेडची नव्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. मार्च महिन्यात टेलीकॉम क्षेत्रासाठी नवे PACKAGE जाहीर होईल. मुंबईसाठी DCR प्लान जाहीर करणार आहेत. यामध्ये FSI वाढवला जाईल अशी अटकळ आहे. NCLT मध्ये ज्या NPA च्या केसेस पोहोचल्या आहेत त्यांच्या रेझोल्युशंसाठी बोली येऊ लागल्या आहेत उदा एस्सार स्टील, भूषण स्टील, मॉनेट इस्पात, इलेक्ट्रो स्टील स्टील्स या कंपन्यांचे समाधानकारक रेझोल्युशन झाली तर बँकांना त्यांनी केलेल्या काही प्रोविजन रिव्हर्स करता येतील. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचे आरोग्य काही प्रमाणात सुधारेल. ADVANCE TAXचे आकडे येतील
मार्च महिन्यात एक्सपायरी ५ आठवड्यांची असते. जर आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर १० पैकी ६ वेळा मार्केट मध्ये तेजी राहिली आहे. त्यामुळे आशा करू या की मार्च २०१८ मध्ये मार्केट सुधारेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स 34142 वर तर NSE निर्देशांक निफ्टी 10491 आणी बँक निफ्टी 25302 वर बंद झाले