आठवड्याचे समालोचन -अंदाजपत्रकाची सुनामी – २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अंदाजपत्रकाची सुनामी ( २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८)
येणार येणार म्हणून गाजत असलेले २०१८-१९चे अंदाजपत्रक अर्थमंत्र्यांनी ‘सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय, सर्वजन कल्याणाय’ असे अंदाजपत्रक सादर करीत आहे असे सांगत सादर केले. आयकरात काही बदल केले नाहीत. लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे दिसते. पगारदार वर्गाची निराशा झाली. गुंतवणूकदारांची LTCG  (LONG TERM CAPITAL GAINS) कर लावला आणी STT सुद्धा सुरु ठेवला यामुळे नाराजी दिसते. परदेशातून येणारा पैशाचा ओघ कमी होईल असे वाटते. शेती आणी शेतीसंबंधीत उद्योगात असलेल्या कंपन्यांना फायदा होईल असे वाटते. मिनिमम सपोर्ट प्राईसचा फायदा शेतकर्याला व्यक्तीशः मिळतो की अडत्यांच्या सहकारी संस्था याचा फायदा उठवतात याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. सरकारी खर्चामुळे महागाई वाढेल, ‘BOND YIELD’ वाढल्यामुळे व्याजाचे दर वाढतील आणी मार्केटला लिक्विडीटीचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. हे कोडे अर्थमंत्री आणी सरकार कसे उलगडते ते पाहावे लागे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • जगभरातील मार्केटमध्ये ‘BOND YIELD’ वाढत आहे. त्यामुळे व्याजाचे दर वाढतील. याचा परिणाम लिक्विडीटीवर होईल. पर्यायाने मार्केटमधील तेजीवर होईल. कारण भारतीय मार्केटमधील तेजी परदेशातून येणार्या पैशावर आधारलेली आहे. या बरोबरच F & O सेक्टरसाठी सेबीने मार्जिन वाढवले आहे. म्युच्युअल फंडांची ADJUSTMENT सुरु आहे.
 • फेडने आपल्या व्याज दरात कोणतेही बदल केले नाहीत.

सरकारी अन्नौंसमेंट

 • चीन, युरोप, USA येथून कोटेड पेपरचे ‘DUMPING’ होत आहे. जर या प्रकारच्या म्हणण्यात तथ्य आढळले तर इम्पोर्ट ड्युटी लावली जाईल. याचा परिणाम इमामी पेपर, स्टार पेपर JK पेपर यांच्यावर होईल.
 • सरकारनी NCLT मधून युनिटेक टेकओव्हर करण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला.
 • पाकिस्तानमध्ये साखर उत्पादन खूप झाले आहे. ही साखर भारतात DUMP होण्याची शक्यता आहे. खाद्य मंत्रालयाने साखरेवरील ड्युटी ५०% वरून ८०% ते ९०% करावी अशी शिफारस केली आहे.
 • महाराष्ट्र एक्साईजकडून सोम डीस्टीलिअरीच्या तीन नवीन बीअर BRANDला मंजुरी मिळाली.
 • सोमवारपासून अंदाजपत्रकीय अधिवेशन सुरु झाले. सोमवारी अर्थमंत्र्यांनी इकॉनॉमिक सर्व्हे सादर केल्यावर अधिवेशन गुरुवारी तारीख १ फेब्रुवारी २०१८ पर्यंत स्थगीत ठेवण्यात आले. यामध्ये GDP दर वित्तीय वर्ष २०१८ साठी ६.७५% आणी वित्तीय वर्ष २०१९ साठी ७% ते ७.५% राहील असा अंदाज करण्यात आला. कृषी २.१% ने उद्योग ४.४% तर सेवा क्षेत्र ८.३ % ने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. क्रूडची वाढती किंमत हा चिंतेचा विषय आहे. तसेच निर्यातीत वाढ आणी GST ची कार्यवाही स्थिर होणे अशा काही विषयांना स्पर्श केला गेला.
 • सरकारने LTCG शेअर्स आणी म्युच्युअल फंडातून मिळालेल्या उत्पन्नावर लावला. या मध्ये एक सवलत अशी ठेवलेली आहे की ३१ जानेवारी २०१८ च्या आधी झालेल्या LTCG ला हे नियम लागू होणार नाहीत. नवीन नियम १ एप्रिल २०१८ पासून अमलात येतील. म्हणजे आपल्याला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यात झालेल्या LTCG वर कर भरावा लागणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर Rs १ लाखापेक्षा जास्त LTCG झाला तर एक लाखाच्यावर असलेल्या रकमेवर १०% LTCG कर भरावा लागेल. उदा.  ५ जानेवारी २०१७ रोजी अशोक LEYLAND चे Rs १०० प्रती शेअर या भावाने १००० शेअर्स आणी टाटा स्टील चे २०० शेअर्स Rs ५०० प्रती शेअर या भावाने घेतले. हे शेअर्स ३१ मार्च 2018 च्या आधी कधीही विकले आणी यात Rs १,४०,००० फायदा झाला तरीही याला LTCG  कर लागणार नाही कारण तो १ एप्रिल २०१८ पासून लागू होणार आहे. पण हे शेअर जर ३ एप्रिल २०१८ ला विकले तर Rs १००००० वरील फायद्यासाठी म्हणजेच Rs ४०००० वर १०% LTCG TAX लागेल. पण जर हेच शेअर्स ३१ जानेवारी २०१८ रोजी जी मार्केट प्राईस होती त्या किमतीला विकले असते तर Rs १,२०,००० ला विकले गेले असते त्यात फायदा फक्त Rs २०००० (Rs १४०००० वजा Rs १,२००००) झाला असता असे गृहीत धरून उरलेल्या Rs २०००० वर १०% LTCG कर लागेल. यालाच अर्थमंत्र्यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंतचे कॅपिटल गेन्स ‘GRANDFATHERED’ केले असे म्हटले आहे. (म्हणजेच ३१ जानेवारी २०१८ रोजी असलेली शेअर्सची मार्केट प्राईस  LTGC ची रक्कम ठरवताना विचारात घेतली जाईल.) पण हेच शेअर्स जर ३ जून २०१८ ला विकले आणी मला Rs ९२००० फायदा झाला तर मला LTCG कर लागणार नाही. (कारण फायदा Rs १००००० पेक्षा कमी आहे).२ फेब्रुवारी २०१८ ला घेऊन जुलै २०१८ मध्ये विकले तर फायद्यावर १५% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स कर लागेल
 • ज्या कंपन्यांचा टर्नओव्हर Rs २५० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना वित्तीय वर्ष २०१९ मध्ये आता ३०% ऐवजी २५ % कॉर्पोरेट कर भरावा लागेल.
 • NIC, OIC UNI या तीन सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या एक करून त्या कंपनीचे लिस्टिंग केले जाईल.
 • 14 CPSE चे लिस्टिंग केले जाईल.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • इंडोको रेमिडीज या कंपनीच्या गोवा प्लांटसाठी USFDAने ८ त्रुटी दाखवल्या.
 • शिल्पा मेडिकेअर च्या रायचूर प्लांटसाठी ३ त्रुटी दाखवल्या फॉर्म ४८३ इशू केला.
 • टाटा कॉफी, APL अपोलो ट्युब्स, सेंच्युरी टेक्स्टाईल, गोदरेज कंझ्युमर, चोलामंडलम फायनान्स, GIC हौसिंग फायनान्स, EIL, L&T, भारत फायनांसियल इन्क्लुजन, HDFC, टेक महिंद्र, TVS मोटर्स, सुंदरम फासनर्स, JSW स्टील, डाबर, ओबेराय रिअल्टी, HCC, हिंदाल्को, बजाज ऑटो, बायर क्रॉप याचे निकाल चांगले आले
 • ICICI बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल असमाधानकारक आला.
 • मार्कसन फार्माने ग्लोवा प्लांटमध्ये बनवलेली औषधे परत मागवली.
 • EID PARRY ही कंपनी SYNTHALITE या कंपनीबरोबर JV मध्ये तामिळनाडूमध्ये प्लांट लावण्यासाठी Rs ११ कोटींची गुंतवणूक करेल.
 • कोची शिपयार्डला १६ मच्छीमार जहाजांसाठी ऑर्डर मिळाली.
 • TVS मोटर्स (३१%), आयशर मोटर्स (५०%), M & M (३८%), टाटा मोटर्स (४५%) आणी अशोक leyland याची विक्री वाढली.

कॉर्पोरेट एक्शन

 • MOIL या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • IOC या ऑईल आणी GAS क्षेत्रातील कंपनीचे तिमाही निकाल चांगले आले कंपनीने प्रती शेअर Rs १९ लाभांश आणी १:१ या प्रमाणात बोनस जाहीर केला.
 • KPIT टेक्नोलॉजी ही कंपनी आपला सॉफटवेअर बिझिनेस बिर्ला सॉफटवेअर या कंपनीबरोबर मर्ज करेल. आपला इंजिनीअरिंग बिझिनेस अलग करून दोम्ही कंपन्यांचे लिस्टिंग करेल. कंपनी २०% स्टेकसाठी प्रती शेअर Rs १८२ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणणार आहे.
 • BEL या कंपनीने शेअर ‘BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली. या बैठकीत Rs १८२ प्रती शेअर या भावाने BUY BACK जाहीर केले.
 • युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्रने भांडवल उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • फिलीप कार्बन या कंपनीने भांडवल उभारणीसाठी आणी शेअर स्प्लिटवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • IOB च्या शेअर प्रीमियमचा उपयोग IOB ला झालेला तोटा भरून काढण्यासाठी वापरण्यासाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली.
 • JM फायनांसियल ही कंपनी Rs १६१.२४ प्रती शेअर आणी दीपक नायट्रेट ही कंपनी Rs २६४ प्रती शेअर या भावाने या भावाने QIP करीत आहे.
 • LICने आपला बँक ऑफ बरोडामधील स्टेक २%ने कमी केला.
 • बँक ऑफ बरोडा आपल्या BOB कॅपिटल मार्केट, BOB फायनांसियल सोल्युशन्स, बरोडा पायोनिअर ASSET MGM, आणी नैनिताल बँक या सबसिडीतील स्टेक विकून भांडवल उभारण्याची शक्यता आहे.
 • IDBI आपला IDBI FEDERAL इन्शुरन्स मधील ४८% स्टेक विकून Rs २२०० कोटी उभारण्याची शक्यता आहे.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • अंबर एन्टरप्राईझेस या कंपनीच्या शेअर्सचे Rs ११७५ ला झाले. गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन झाला.
 • न्यू जेन सॉफटवेअर या कंपनीच्या शेअर्सचे २५४ वर लिस्टिंग झाले.

मार्केटने काय शिकवले
मार्केट म्हणल्यानंतर तेजी आणी मंदी असणारच. सतत मार्केट वाढणे शक्य नाही त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेअर्सचा भाव कमी होतो आहे हे दुःखं पचवायला शिकले पाहिजे. या दुःखामध्ये हरवून न जाता आपण करावयाच्या खरेदीची यादी समोर घ्या. आपणाजवळ किती रक्कम आहे ते पहा. आणी प्रत्येक वेळी थोडी थोडी खरेदी करा. मार्केटने उसळी मारल्यास खरेदी केलेल्या शेअर्समध्ये फायदा होत असेल तर ते शेअर्स विकून मोकळे व्हा. पुन्हा खालच्या किंमतीत खरेदी करण्यासाठी नंबर लावा. पण तेजी किंवा मंदी दोन्ही गोष्टी कायम टिकत नाहीत. जो शेअर मंदीत आहे तो तेजीत येणार आणी तेजीत असलेला शेअर मंदीत जाईल हा मार्केटचा अलिखित नियम आहे. अर्थात नियमाला नेहेमी अपवाद असतातच.
अंदाजपत्रकाच्या सुनामीमुळे मार्केटचे स्वरूप बदलेल. अंदाज पत्रकातील तरतुदीनुसार ज्या क्षेत्राला फायदा होईल त्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वाढतील. ज्या क्षेत्रांना या तरतुदींचा फटका बसेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमी होतील.सरकारने शेती आणी संबंधीत उद्योगांसाठी येणाऱ्या खर्चाच्या १५०% MSP (मिनिमम सपोर्ट  प्राईस) जाहीर केल्यामुळे M&M, ESCORTS, सर्वांना विमा दिल्यामुळे सर्व विमा कंपन्या, हेल्थ आणी वेलनेस केंद्र काढणार असल्यामुळे हॉस्पिटल्सचे शेअर्स, अग्रो कंपन्यांना उत्तेजन दिल्यामुळे गोद्ररेज अग्रोव्हेट, अवंती फीड्स, वेंकी’ज, आणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकार भांडवल घालणार असल्यामुळे अडानी पोर्ट L&T या कंपन्यांवर परिणाम होईल.
नवीन आलेल्या LTCG चा धसका न घेता त्यातील तरतुदी नीट समजावून घ्या नव्या वातावरणाला साजेसा आणी फायदेशीर असा आपला पोर्टफोलीओ तयार करा. एप्रिलमध्ये येणार्या कंपन्यांच्या वार्षिक निकालांकडे लक्ष ठेवा स्वतः बदललेल्या परीस्थितीत स्थिरस्थावर करा आणी मार्केटलाही स्थिरस्थावर होऊ द्या. नव्याने मार्केटमध्ये  येणाऱ्यानी बदललेल्या परिस्थितीचे निरीक्षण करून ती समजावून घ्यावी. मी तुम्हाला पूर्वीच्या दोनतीन भागात सांगितले होतेच की २०१८ या वित्तीय वर्षाचे पहिले सहा महिने थोडे कठीण असतील. वारंवार तेजीमंदीचा लपंडाव खेळावाच लागेल. अशा वेळी प्रथम भांडवल सुरक्षित ठेवून मगच फायद्याचा विचार करावा.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५०६६ तर NSE निर्देशांक निफ्टी १०७६० तर बँक निफ्टी २६४५१ वर बंद झाले
 

3 thoughts on “आठवड्याचे समालोचन -अंदाजपत्रकाची सुनामी – २९ जानेवारी २०१८ ते २ फेब्रुवारी २०१८

 1. Samir Post author

  I just want to know if i book profit 3000 monthy and 36000 yearly respectivaly . how much tax i have to pay as per LTCG!

  Reply
  1. surendraphatak Post author

   आपल्प्याला झालेला कॅपिटल गेन्स आपण जर आपण खरेदी केलेले शेअर्स एक वर्षानंतर स्टॉक एक्स्चेंज मार्फत विकल्या नंतर झाला असेल तर पाल्याला LTCG कर लागणार नाही

   Reply
 2. Pingback: Anonymous

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.