आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रात्र थोडी सोंगे फार – २६ मार्च २०१८ ते ३० मार्च २०१८
हा आठवडा ट्रंकेटेड होता म्हणजेच या आठवड्यात मार्केट दोन दिवस बंद होते. आधीच वर्षातला शेवटचा आठवडा सर्वजणांची वेगवेगळे कर भरण्याची, अकौंटमधील सर्व adjustments करून फायनल अकौंट बनवायची घाई चालू असते. या आठवड्यात मार्केटला दोन दिवस सुट्टी होती. या आठवड्यात चीन USA मधील ट्रेडवॉरमध्ये तडजोडीसाठी बोलणी सुरु झाली. सरकारने त्यांचा कर्ज उभारणीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाने कर्नाटक राज्य विधानसभेसाठी १२ मे २०१८ रोजी मतदान होईल आणी १५ मे २०१८ रोजी निकाल जाहीर होतील असे जाहीर केले. त्यात आनंदाची बातमी म्हणजे सरकार एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या काळात Rs २.८८ लाख कोटी कर्ज उभारेल गेल्या वर्षी ही रक्कम ३.७२ लाख कोटी होती. म्हणजेच सरकारी BORROWING कमी झाले. याचा परिणाम म्हणजे BOND YIELD २९ बेसिस पाईंटने कमी होऊन ७.३३% झाले. कदाचित बॅंका व्याजाचे दर कमी करतील. बँकांचे ‘मार्क टू मार्केट’ लॉस कमी होतील. सोमवारची RALLY जागतिक स्तरावरील बातमीमुळे होती, मंगळवारची RALLY स्वदेशी आणी बुधवारची RALLY एक्सपायरीची होती. म्हणजेच थोडक्यात काय तीन दिवसाचा आठवडा आणी त्यात अनेक घटनांचा भडीमार !
सोमवारच्या RALLYचे वैशिष्ट म्हणजे बँकांचे शेअर्स वाढले. त्यात कॅनरा बँक आणी येस बँक खूप वाढली. कॅनरा बँक कॅनफिना होम्स मधील स्टेक विकणार आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे डील होण्याचा संभव आणी त्यात येस बँकेचा असलेला १५% स्टेक. ICICI बँक मात्र वाढली नाही.
सरकारी अनौंसमेंट
- तेलंगणा राज्य सरकार हैदराबाद येथे एव्हीएशन HUB व्हावा असा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विमानाला लागणाऱ्या इंधनावरील VAT त्यांनी १६% वरून १% इतका कमी केला. एव्हीएशन क्षेत्रात इंधनाचा खर्च ४०% असतो. त्यामुळे सर्व विमाने इंधनासाठी तेलंगणात येतील असा त्यांचा कयास आहे. GMR इन्फ्राकडे या विमानतळाचे व्यवस्थापन आहे. ही कंपनी दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापनही पहाते. नोइडामध्ये आणखी एक विमानतळ बनत आहे. त्याचेही काम GMR इंफ्राला मिळण्याची शक्यता आहे.
- सरकार ECB विषयीचे (EXTERNAL COMMERCIAL BORROWING) नियम शिथिल करणार आहे याचा फायदा विमान कंपन्यांना अधिक होईल.
- आयकर विभागाने आधार PAN लिंक करण्यासाठीची मुदत तारीख ३० जून २०१८ पर्यंत वाढवली आहे.
- खाद्य मंत्रालयाने साखरेवर ५% सेस लागू करण्याची शिफारस केली आहे. आगामी GST कौन्सिलच्या बैठकीत यावर विचार केला जाईल.
- सरकार एअर इंडियामधील ७६% स्टेक ओपन बिडिंगच्या प्रक्रियेतून विकणार आहे.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- RBI ने ICICI बँकेला Rs ५९ कोटी दंड ठोठावला आहे.
- सेबीने आपल्या २८ मार्च २०१८ ला झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेतले.
- कंपन्यांनी एप्रिल २०२० पासून CHAIRMAN आणी MANAGING डायरेक्टर ही दोन पदे वेगळी करावीत.
- QIP / PREFERENTIAL इशूच्या प्रोसीड्सचा उपयोग कसा केला जाईल याची माहिती शेअरहोल्डरना द्यावी
- टॉप ५०० कम्पनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये एप्रिल २०१९ पासुन एक तरी स्वतंत्र महिला डायरेक्टर असावी. टॉप १००० कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये किमान ६ डायरेक्टर्स असावेत.
- एक व्यक्ती एकावेळी ८ लिस्टेड कंपन्यांचा डायरेक्टर राहू शकतो.
- कंपनीने ऑडीटर्स नेमताना त्यांची गुणवत्ता, अनुभव, त्यांना देण्यात येणारी फी आणी जर एखाद्या ऑडीटरने राजीनामा दिला असेल तर त्याची कारणे सांगितली पाहिजेत.
- टॉप १०० लिस्टेड कंपन्यांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेबकास्ट करावे.
- म्युच्युअल फंड चार्ज करत असलेला ADDITIONAL EXPENSES चा दर आता ५ बेसिक पाईंट एवढा केला.
- वायदा बाजारात स्टॉक डेरिव्हेटीवजमध्ये हळू हळू फिझीकल सेटलमेंट केली जाईल.
- इलेक्ट्रो स्टील स्टील्स या कंपनीच्या रेझोल्युशनसाठी कर्ज देणाऱ्या बँकांनी वेदांत या कंपनीला हायेस्ट बीडर म्हणून मान्यता दिली आहे.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- IDBI मध्ये पुन्हा Rs २२७ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. RBI ने अर्थ मंत्रालयाला IDBI बँकेची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे कळवले आहे
- GRANULES च्या गागलापूर आणी हैदराबाद युनिटमध्ये USFDA ने त्रुटी दाखवल्या.
- सिपलाने ALOXI इंजेक्शन मार्केटमध्ये आणले.
- अडानीला IOC बरोबर करार केल्याने सिटी GAS डीस्ट्रीब्युशनसाठी परवानगी मिळाली.
- पुढील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे यावर्षी सरकारला आपण लाभांश देऊ शकणार नाही असे कळवले. (१) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (२) SAIL (३) ड्रेजिंग कॉर्पोरेशन (४) EIL (५) हिंदुस्थान पेस्टीसाईड (६) स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (७) डेडीकेटेड फ्रेट कॅरिअर
- पर्सिस्टंट या IT क्षेत्रातील कंपनीने आपले INTELLECTUAL प्रॉपर्टीपासून येणारे उत्पन्न कमी होईल अशी प्रॉफीट वार्निंग दिली.
- अल्केम LAB च्या दमन युनिटचे USFDA ने १९ मार्च ते २७ मार्च २०१८ मध्ये केलेल्या इन्स्पेक्शनमध्ये १३ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
- गोव्यामध्ये कॅसिनो चालवणाऱ्या कंपनीच्या लायसेन्स फीमध्ये तसेच इतर फीमध्ये गोवा राज्य सरकार वाढ करणार आहे. त्यामुळे डेल्टा कॉर्प या कंपनीचा शेअर पडला. कंपनी ही दरवाढ त्यांच्या ग्राहकांकडे पास ऑन करू शकते का? हे बघायचे.
- JSW स्टील USA मधील ACERO ही कंपनी US $ ८१ मिलियनला खरेदी करणार आहे.
कॉर्पोरेट एक्शन
- सरकार स्कूटर्स इंडिया मधील आपला ९३.७४ % स्टेक विकणार आहे. सरकारने त्यासाठी बोली मागवल्या आहेत.
- GAIL आणी ऑईल इंडिया या दोन्ही कंपन्यांच्या बोनस इशुची २७ मार्च २०१८ ही एक्स DATE होती.
- STC आणी MMTC याच्या होणार्या मर्जरच्या बातमीने पुन्हा एकदा पकड घेतली आहे. पण सरकार कधी कधी अचानक बेत रहित करते त्यामुळे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या भानगडीत न पडता ट्रेडिंग करणेच श्रेयस्कर.
- इंडिया बुल्स हाउसिंग आणी इंडिया बुल्स रिअल या दोन्ही कंपन्यांनी BLACK STONE ला हिस्सेदारी विकली. त्यातून Rs ४८५० कोटी मिळतील.
- टाटा पॉवरनी टाटा सन्सला ५९ कोटी शेअर्स Rs ४८५० कोटींना विकले.
- गोदरेज एग्रोव्हेट रुची सोयाचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे अशी बातमी आहे.
- सॉफट बँक, तमासेक होल्डिंग आणी मोर्गन STANLEY चा PE फंड FINO (फायनांसियल इनफॉरमेशन एंड नेटवर्क ऑपरेशन) या पेमेंटबँक आणी टेक्नोलॉजी कंपनीमध्ये २६% स्टेक घेण्याचा विचार करत आहेत.
- अल्ट्राटेक सिमेंटला बिनानी सिमेंटचे ASSET विकत घेण्यासाठी CCI ने मंजुरी दिली.
या आठवड्यात येणारे IPO
- ICICI सिक्युरिटीजच्या IPO ची साईझ IPO ला थंडा प्रतिसाद (८८%) मिळाल्यामुळे कमी करावी लागेल.
- लेमन ट्री हॉटेल्स या कंपनीचा IPO १.१९ वेळा भरला.
या आठवड्यातील लिस्टिंग
- बंधन बँकेचे लिस्टिंग Rs ४८७ ला झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ३७५ ला दिला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला लिस्टिंग गेन्स झाला.
- हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे लिस्टिंग Rs ११७० ला झाले. ही कंपनी चांगली असूनही ट्रेडर्स आणी गुंतवणूकदारानी फारच थंडा प्रतिसाद दिला. हा शेअर किरकोळ गुंतवणूकदाराना Rs १२१५ ला दिला होता.
मार्केटने काय शिकवले
या आठवड्यात दोन लक्षवेधी बातम्यांनी ट्रेडर्स आणी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.
- पहिली बातमी होती GSK कन्झ्युमर हेल्थकेअर या प्रस्थापित कंपनीने NOVARTIS इंडियाचा जागतिक कन्झ्युमर हेल्थकेअर बिझिनेस US$ १३०० बिलियनला विकत घेतला. हे पैसे कंपनी आपले हॉरलिक्स आणी इतर ब्रांड विकून उभे करेल अशी बातमी आली. जर कंपनीने भारतीय सबसिडीअरी मधील ७२.५% स्टेक विकला तर CMP पेक्षा वरच्या लेव्हलला स्टेक विकला जाईल आणी ओपन ऑफर येईल. जर फक्त हॉरलिक्स आणी इतर ब्रांड विकले तर कंपनीकडे बर्याच मोठ्या प्रमाणात कॅश येईल. दोन्ही पर्यायात रिटेल शेअरहोल्डर्सना फायदा होईल. नोव्हार्तीसचा बिझिनेस GSK खरेदी करेल अशी बातमी आली तेव्हा शेअर्सची किमत वाढली पण हॉर्लीक्स आणी बूस्ट यासारखे इतर ब्रांड विकून पैसे उभारण्यात येतील ही बातमी आल्यावर शेअर सपाटून पडला. हे ब्रांड विकत घेण्यात ITC, नेस्ले, युनिलीवर, पेप्सी कंपनी यांनी रस दाखवला आहे. कदाचित ट्रेडर्सना आणी गुंतवणूकदारांना कंपनीचे धोरण ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे’ असे वाटले असेल. कंपनी आता OVER THE COUNTER आणी ORAL हेल्थकेअर प्रोडक्ट्सवर आपले लक्ष केंद्रित करेल. उदा SENSODYNE, INO. OTRIVIN आणी CROCIN
- दुसरी बातमी होती फोर्टिस हेल्थकेअरमधील हॉस्पिटल डिविजन आणी फोर्टिस मलार आणी SLR डायग्नोस्टीक्स या कंपन्यात मणिपाल हॉस्पिटल्स मेजॉरीटी स्टेक घेण्याची होती. फोर्टिस हेल्थकेअर आपली हॉस्पिटलची साखळी डीमर्ज करून ती मणिपाल हॉस्पिटल्स मध्ये विलीन करेल. फोर्टिस हेल्थकेअर ब्रांड सुद्धा मणिपाल हॉस्पिटल्सकडे ट्रान्स्फर होईल. मणिपाल हॉस्पिटल SRL मध्ये मेजॉरीटी स्टेक घेईल.
या कॉर्पोरेट एक्शननंतर मणिपाल हॉस्पिटल्सचे लिस्टिंग होईल. आणी ती भारतातील सर्वात जास्त रेव्हेन्यू असलेली हॉस्पिटल सेवा पुरवणारी कंपनी होईल. फोर्टिस हेल्थकेअरच्या प्रत्येक शेअरहोल्डरला त्याच्या जवळ असलेल्या १०० फोर्टिस हेल्थकेअरच्या शेअर्स ऐवजी मणिपाल हॉस्पिटल्सचे १०.८३ शेअर्स मिळतील. हे डील पूर्ण झाल्यावर SRL ही मणिपाल हॉस्पिटल्सची सबसिडीअरी होईल. शेअर SWAP रेशियो फोर्टिसच्या शेअरहोल्डर्सना फायदेशीर नाही. म्हणून फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर पडला. मणिपाल हॉस्पिटल्सचे प्रमोटर कंपनीमध्ये Rs ३९०० कोटी भांडवल आणतील. फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी त्यांच्यात आणी दाईइच्छी या जपानी कंपनी सोबत त्यांच्या असलेल्या विवादाने गाजत होती. मणिपाल हॉस्पिटल्सने फोर्टिस मलारच्या २६% स्टेकसाठी प्रती शेअर Rs ६४.४५ या भावाने ओपन ऑफर आणली आहे.
NCLT मध्ये गेलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये फायदा मिळेल अशी अपेक्षा धरू नका. या केसेसमध्ये ओपन ऑफर येत नाही. नेहेमी ज्या कंपनीचा उद्योग पूर्णतः किंवा अंशतः विकला जातो तो शेअर वाढतो कारण त्या कंपनीला पैसा मिळतो. पण NCLTमध्ये गेलेल्या कंपन्यांच्या बाबतीत मात्र जी कंपनी खरेदी करेल तिच्यात प्रगती होण्याची शक्यता असते. नेहेमीपेक्षा या केसेसमध्ये उलटा विचार करावा.
पुढील आठवड्यात पुढीलप्रमाणे प्रसंग लक्ष ठेवण्यासारखे आहेत.
- ५ एप्रिल रोजी RBI आपली द्विमासिक वित्तीय पॉलिसी जाहीर करेल.
- २ एप्रिल रोजी करडा कनस्ट्रकशन, संधार टेक्नोलॉजी याच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
- ५ एप्रिल रोजी ICICI सिक्युरिटीजच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
अर्थशास्त्र आणी गुंतवणूकदारांची भावना यांचा मेळ यावेळच्या IPO मध्ये बसला नाही त्यामुळे चांगले IPO येउनही ऑफर प्राईस जास्त असल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
बुधवारी वायदा एक्सपायरी होती. महिन्याची आणी आठवड्याची एक्सपायरी होती. टेक्निकल विश्लेषणाच्या दृष्टीने बुधवारचे क्लोजिंग महत्वाचे ठरेल. लॉंग वीक एंड आहे. त्यामुळे ट्रेडर्स पोझिशन कॅरी करणार नाहीत. कारण मार्केट सोमवारी कसे असेल हे माहीत नाही. नवीन पोझिशन कोणी घेत नाही. याला LACK ऑफ BUYING असे म्हणतात. १०१५० आणी १०२५० वर PUT रायटिंग दिसत आहे. पुट/ कॉल रेशियो १.१५ आहे.
२०१७-२०१८ हे साल हे काही अपवाद वगळता ट्रेडर्स आणी गुंतवणूकदारांना अमाप फायदा देऊन गेले. इतका फायदा की सरकारचे त्याकडे लक्ष जाऊन सरकारने लॉंग टर्म कॅपिटल गेन्स कर परत आणला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये मिळणाऱ्या फायद्यातील सरकारचा वाटा वाढला. 2018-२०१९ मध्ये आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स कराबरोबर LTCG वरही लक्ष ठेवावे लागेल. परंतु आपण आशा करू या की आपल्याला हा कर देऊनही पुरेसे प्रॉफीट मिळेल. तेव्हा या सर्व गोष्टींचा आपल्या शेअरमार्केटवरील व्यवहारावर परिणाम न होऊ देता लक्ष केंद्रित केले तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. तेव्हा नवी विटी नवे राज्य नवे नियम सर्व लक्षात घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये व्यवहार करू या. आणी यशस्वी होऊ या.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३२९६८ वर NSE निर्देशांक निफ्टी १०११३ वर आणी बँक निफ्टी २४२६३ वर बंद झाले.