आठवड्याचे-समालोचन – होलीकोत्सवातून वसंतोत्सवाकडे शेअर मार्केट – 26 फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
होलीकोत्सवातून वसंतोत्सवाकडे शेअर मार्केट – 26 फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८
हा आठवडा होळीचा, वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघण्याचा पण मार्केटला लाल रंग पसंतीला आला असे दिसते. लाल रंगाला हिरव्या रंगाची किनार असे दृश दिसते. एकटा हरतो तेव्हा  दुसरा जिंकतो. जो जिंकतो त्याला उत्तेजन मिळते. केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असे वाटते. जो हारतो त्याने आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ असते. मार्केट लाल रंगात आल्याशिवाय लोकांना शेअर्स स्वस्तात कसे मिळतील मार्केट तेजीत असते तेव्हा करेक्शनची वाट बघतात. करेक्शन आले की दुःखी होतात. पण दुःखामुळे सुखाची किमत कळते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • USA मध्ये BOND YIELD २.८७% झाले. थोडी नरमी आली. फेडचे नवीन अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी पुढील वर्षात तीन वेळा रेट वाढवू असे जाहीर केले. चौथ्या वेळेला रेट वाढवण्याची गरज आहे का ? हे ही विचारात घेऊ आणी जरूर वाटली तरच रेट वाढवू असे सांगितले. पॉवेल यांच्या या भाषणानंतर BOND YIELD २.९२ झाले.
 • सौदी अरेबियाच्या पंतप्रधानांबरोबर रीफायनरीजमध्ये स्टेक घेण्याविषयी चर्चा झाली याचा फायदा TNPL, मनाली पेट्रो यांना होईल. सौदी आरामको या ऑईल आणी GAS क्षेत्रातील सौदी अरेबियन कंपनीचा IPO येणार आहे.
 • मूडी’जने २०१८ या आर्थिक वर्षात भारताच्या GDP ग्रोथचे ७.६% अनुमान केले आहे.
 • ऑस्ट्रेलियन एजन्सीने केलेले भारतातील मान्सून विषयी चांगले अनुमान केले आहे.

सरकारी अन्नौंसमेंट

 • GAS डीस्ट्रीब्युशनसाठी ८६ क्षेत्रांचा लिलाव होणार आहे. याचा परिणाम IGL, MGL, GAIL, गुजराथ GAS या कंपन्यांवर होईल.
 • बायोफ्युएल विषयी सरकार विचार करत आहे याचा फायदा प्राज इंडस्ट्रीज, इंडियन ग्लायकोल या कंपन्यांवर होईल.
 • सरकारने सेवा क्षेत्रातील १२ सेवांना उत्तेजन देण्याचे ठरवले असून त्यासाठी Rs ५००० कोटींची तरतूद केली आहे.
 • भारताची २०१७ -२०१८ च्या तिसर्या तिमाही मध्ये ७.२% GDP ग्रोथ झाली. शेती आणी बांधकाम क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाली. उत्पादनात १२% ग्रोथ झाली.
 • भारताची फिस्कल डेफीसीट २०१७-२०१८ च्या लक्ष्यापेक्षा ११३.७% झाली.एप्रिल ते जानेवारी या काळासाठी फिस्कल डेफीसीट Rs ६.७७ लाख कोटी झाली.
 • ऑस्ट्रेलियातील सिडनेस्थित MACQUARIE या कंपनीने NHAIच्या आधिपत्याखालील ९ हायवेज TOT योजने खाली Rs ९६८१ कोटींना घेण्याची ऑफर दिली.

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • फायनांसियल इंटेलिजन्स युनिटने ९४९१ हाय रिस्क NBFCची यादी जाहीर केली.
 • बँकांच्या नॉस्ट्रो अकौंटची माहिती सरकारने अलाहाबाद बँक, कॅनरा बँक यांच्याकडून मागवली आहे. बँकांच्या परदेशात असणाऱ्या शाखांविषयी माहिती मागवली आहे.सरकारने बँकांच्या परदेशातील ३५ शाखा बंद करण्याचा तर ६९ शाखाची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम असलेल्या NPA ची चौकशी घोटाळा असण्याच्या शक्यतेसाठी करायला सांगितली आहे. यामध्ये IBC मध्ये केस दाखल केलेल्या NPA  अकौंटचा समावेश असेल. यात RBI ने NPAच्या रिस्क व्यवस्थापनाविषयी १५ दिवसात बँकेने निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. जर कोणत्याही NPAच्या बाबतीत प्रमोटर्स वा बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापन सामील आहे असे दिसले तर त्याची माहिती CBI, ED आणी DRI यांना दिली पाहिजे. तसेच बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची जबाबदारी या बाबतीत निश्चित करायला सांगितली आहे. ह्या सर्व कारवाईमुळे रिझोल्युशन प्रोसेसला बाधा न येता ती पुढे चालू राहील. याच बाबतीत पुढची पायरी म्हणून मंत्रिमंडळाने फ्युजीटीव्ह ऑफेंडर बिलास मंजुरी दिली.
 • एअरसेल या मोबाईल क्षेत्रातील कंपनीने IBC कडे INSOLVENCY साठी अर्ज दाखल केला. SBIने या कंपनीला Rs ५००० कोटींचे कर्ज दिले आहे.
 • सेबीने HDFC बँकेला त्यांच्या WHATSAPP वर बँकेचे निकाल जाहीर होण्यापूर्वी दिलेल्या बँकेच्या निकालाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले तसेच जे दोषी आढळतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास आणी भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सिस्टीममध्ये योग्य ते बदल करायला सांगितले.
 • RIL आणी BP यांच्या JV ला डायरेक्टर ऑफ जनरल हायड्रोकार्बन या सरकारी संस्थेने KG बेसिनमध्ये तीन नैसर्गिक वायू डीसकव्हरीच्या सेटमध्ये US $ ४ बिलियन गुंतवणूक करायला मंजुरी दिली

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • ग्रासिम या कंपनीच्या भरूच येथील प्लांट आणी त्याच्या विस्ताराला पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
 • आयकर विभागाने SPARC या कंपनीला २०१४-२९१५ या वर्षासाठी Rs २३ कोटींची नोटीस पाठवली.
 • ए टू झेड या कंपनीने STANDARD CHARTERED बरोबरची केस Rs ३४५ कोटींऐवजी Rs १८५ कोटी देऊन मिटवली.
 • स्टरलाईट टेक्नोलॉजी या कंपनीला नौसेनेकडून Rs ३५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • EION आणी JSW स्टीलने मॉनेट इस्पात ही कंपनी खरेदी केली. त्यासाठी आवश्यक असलेल्यी मजुरी मिळाल्यावर ते डील फायनल होईल.
 • PFC ने UP पॉवर कंपनीबरोबर Rs ५०२०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी करार केला.
 • रेड्डीजच्या श्रीकाकुलम प्लांटचे इन्स्पेक्शन USFDA ने केले होते. त्यातही क्लीन चीट मिळाली नाही.
 • द्वारकाची ज्युवेलरी कंपनीने Rs ३९० कोटी OBC बँके बरोबर आणी सिम्भावली शुगर या कंपनीने घोटाळा केला आहे अशी बातमी आहे.
 • ONGC गुजराथमध्ये Rs ३७० कोटी खर्च करून शेल GAS साठी विहिरी खोदण्याचे काम करणार आहे. तसेच त्रिपुरा प्रोजेक्टमध्ये Rs ७६० कोटी खर्च करून ९ विहिरी खोदेल आणी ५४ किलोमीटरची पाईपलाईन टाकेल.
 • SBIने किरकोळ ठेवीदारांच्या व्याज दारात ०.१० ते ०.५० वाढ केली. तसेच आपल्या MCLR मध्येही वाढ केली.
 • रिलायंस इन्फ्राने आंरबिट्रेशन केस जिंकली त्यासाठी त्यांना गोवा सरकार कडून Rs ३८५ कोटी मिळाले.
 • दिलीप बिल्डकॉन या कंपनीला NHAI या सरकारी कंपनीकडून Rs ५३९० कोटींची ऑर्डर मिळाली.
 • फोर्टिस हेल्थकेअर या कंपनीचे दुसऱ्या आणी तिसऱ्या तिमाहीचे निकाल बराच गाजावाजा झाल्यावर जाहीर झाले. ऑडीटर समाधानी नाहीत. ऑडीटर्सनीही हात झटकून टाकले पण पूर्वीच्या प्रमोटर्सचा स्टेक आता फक्त ०.७७% उरला आहे फोर्टिस हेल्थकेअर विकायची असेल तर सोपे जाईल. प्रमोटर्समुळे कंपनी वाढली पाहिजे, प्रमोटर्स हे कंपनीचे ASSET असले पाहिजेत. पण या कंपनीच्या बाबतीत मात्र उलट सिद्ध झाले. कंपनीने आपले तिमाही निकाल १५ मार्चच्या आतच जाहीर केले. याचा अर्थ प्रमोटर्सना कंपनीचा शेअर F&O  मधून बाहेर पडू नये अशी त्यांची इच्छा दिसत आहे.या शेअरमध्ये बरीच खरेदी चालू आहे. त्यांचा उद्देश काय ते समजून घेतले पाहिजे पण कोणीही मोठ्या लोकांचे अंधानुकरण करायला जाऊ नये आपले अंथरून पाहून पाय पसरावेत. कंपनी विक्रीची प्रक्रिया खूप लांबलचक असते. आपले पैसे किती दिवस अडकून पडतील हे सांगणे कठीण आहे.
 • CERC ने टाटा पॉवरला दर वाढवायला परवानगी दिली.
 • सोया आणी मका यांचे चांगले पीक आल्याचा फायदा गोदरेज AGROVHEET या कंपनीलाही झाला. त्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत घट झाली.
 • बजाज ऑटोची विक्री ३१% वाढली त्यामध्ये टू व्हीलर्सची विक्री १११% ने तर निर्यात २६%वाढली. एस्कॉर्टसची विक्री ५२% ने वाढली. मारुतीची विक्री १५% तर निर्यात २४.९% वाढली. टाटा मोटर्सची विक्री ३३.५% ने वाढली. अशोक LEYLANDची विक्री २९%ने वाढली. सामान्यतः या तिमाहीमध्ये ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले.
 • NCC या कंपनीला Rs २९८० कोटीच्या ७ ऑर्डर मिळाल्या.
 • फूटसी मध्ये जे बदल केले त्यामुळे IIFL होल्डिंग आणी ICICI लोम्बार्ड या कंपन्यांच्या शेअर्सची किमत वाढली.
 • दालमिया भारत सिमेंट आणी इतर कंपन्यांनी सादर केलेली बिनानी सिमेंटच्या ASSET साठीची Rs ६७०० कोटींची ऑफर या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकांनी मंजूर केली.या रेझोल्युशनमध्ये बँकांना त्यांचे सर्व पैसे परत मिळणार आहेत. दालमिया भारतने मुरली सिमेंट आणी कल्याणपूर सिमेंट नंतर ही तिसरी कंपनी विकत घेतली आहे.

कॉर्पोरेट एक्शन

 • वीडीओकॉनचा D2H बिझिनेसमधील २६% स्टेक डीश टीव्ही घेणार आहे.
 • ACC आणी अंबुजा सिमेंटचे मर्जर तूर्तास तरी रद्द झाले.
 • सिल्व्हर व्हू इन्व्हेस्टमेंट ला ९२.७ लाख शेअर्स Rs १७२६ प्रती शेअर या भावाने HDFC इशू करणार आहे.
 • जैन इरिगेशन इनोव्हाफूड्स मध्ये १०० % स्टेक घेणार आहे .
 • सिम्भावली शुगर्सच्या सिलवारी युनिटला रिकव्हरी सरटीफिकेट मिळाले.
 • KKR मॉरीशसने कॅफे कॉफी डे मधील ६% स्टेक विकला.
 • PFC ने Rs १.८० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • PVR ने INOX बरोबर करार केला.
 • पांच राज्यातील निवडणुका जवळ येत असल्यामुळे मद्यार्क उत्पादन करणाऱ्या शेअर्सकडे लक्ष ठेवले पाहिजे. अल्युमिनियमच्या किमती ३% ने वाढल्या.

या आठवड्यातील IPO

 • HG इन्फ्रा इंजिनिअरिंग या कंपनीचा IPO २६ फेब्रुवारी २०१८ पासून ओपन झाला.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • या आठवड्यात ASTER DM हेल्थकेअर या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग Rs १८३ ला झाले

मार्केटने काय शिकवले.
गुरुवारी तारीख १ मार्च २०१८ रोजी होळी साजरी झाली. थंडी संपून हळूहळू उन्हाळा सुरु होतो. त्यामुळे AC, कूलर बनवणार्या कंपन्या, आईसक्रिम, शीत पेये, सरबत बनवणार्या कंपन्या, पेंट बनवणार्या कंपन्या, इलेक्ट्रिक व्हेईकल, कमर्शिएल व्हेईकल बनवणाऱ्या कंपन्या, रोड बांधणार्या कंपन्या, तसेच बांधकाम क्षेत्रातील कंपन्या, कॅपिटल गुड्स कंपन्या, मोठी आणी सरंक्षण क्षेत्रात इंजिनिअरिंगची कामे करणाऱ्या कंपन्यांच्या ऑर्डर बुकवर लक्ष ठेवावे. सरकार विशेषतः सरंक्षण आणी दळणवळण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. अन्नधान्य आणी डाळी यांचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे FMCG क्षेत्रातील कंपन्यांवर लक्ष ठेवावे. NAV वाढावा म्हणून म्युच्युअल फंड खरेदी करत आहेत.
आता आपण VENKY’ज या गेल्या काही महिन्यात MULTIBAGGER आलेल्या कंपनीविषयी विचार करू ही कंपनी अंडी आणी एक वर्षाची पिले, पूर्ण वाढ झालेली कोंबडी, पशुखाद्य, रिफाईनड ऑईल, डीऑईल्ड केक इत्यादी मुख्यतः पोल्ट्री क्षेत्रात काम करते. मध्यंतरी अंड्याचे, विविध प्रकारच्या चिकनचे भाव वाढले. नंतर सोया आणी मका यांचे अमाप पिक आल्यामुळे पशुखाद्य स्वस्त झाले. पण यांनी आपल्या प्रोडक्ट्सच्या किमती कमी केल्या नाहीत. यात एक विचार असाही आहे की तरुण पिढी मद्यार्क आणी प्रोटीन भरपूर असलेले खाद्यपदार्थ यावर भर देत असल्यामुळे पोल्ट्री प्रोडक्ट्सची मागणी वाढली आहे. यामुळे कंपनीला चांगला फायदा झाला. शेअरची किमत Rs 400 वरून Rs ४००० प्रती शेअर झाली. कंपनी आता तीन नवीन उत्पादन युनिट सुरु करत आहे.
होळी झाल्यानंतर वसंतोत्सवास सुरुवात होते. वसंत ऋतूचे आगमन होते. याप्रमाणे आपल्या गुंतवणुकीच्या आयुष्यात वसंताचे आगमन होईल. या करेक्शनमध्ये गुणवत्ता असलेले शेअर्स खरेदी करा, PULL BACK RALLI मध्ये किंवा रिलीफ RALLI मध्ये कमी गुणवत्तेचे शेअर्स विका. थोडा थोडा फायदा घेत ट्रेडिंग करा. दोष जाळून गुणाचा संचय करा म्हणजे खराब शेअर विकून ग्रोथ असणार्या कंपन्यांच्या  शेअर्सचा संचय करा. घाबरून न जाता प्रत्येक क्षण आपल्या बाजूने कसा वळवता येईल ते पहा.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४०४६ NSE निर्देशांक निफ्टी १०४५८ आणी बँक निफ्टी २४९०२ वर बंद झाले.
 

One thought on “आठवड्याचे-समालोचन – होलीकोत्सवातून वसंतोत्सवाकडे शेअर मार्केट – 26 फेब्रुवारी २०१८ ते २ मार्च २०१८

 1. Pingback: आठवड्याचेसमालोचन – स्वच्छता अभियान शेअर मार्केटमध्ये – ५ मार्च ते ९ मार्च २०१८ | Stock Market आणि मी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.