आठवड्याचे समालोचन – स्वच्छता अभियान शेअर मार्केटमध्ये – ५ मार्च ते ९ मार्च २०१८

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
स्वच्छता अभियान शेअर मार्केटमध्ये – ५ मार्च ते ९ मार्च २०१८
ब्राझील, मेक्सिको, युरोप हे देश USA ला स्टील आणी अल्युमिनियम पुरवतात. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्टीलवर २५% आणी अल्युमिनियमवर १०% इम्पोर्ट ड्युटी लावली. यामधून मेक्सिको आणी कॅनडा यांना सूट दिली’ .याचा सर्वात जास्त परिणाम चीनवर होईल असे दिसते. यामुळे जगात सर्वत्र ट्रेड वॉर छेडले जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण त्याचवेळी क्रूडचे भाव कमी होऊ लागले. पुट/कॉल रेशियो १.३८ वरून १.२९ झाला. त्याच बरोबर BJP चा त्रिपुरा, मेघालय,आणी NAGALAND मधील विजय महत्वाचा आहे. रुपया १९ पैसे मजबूत झाला. सध्या मार्केट PNB घोटाळ्याच्या छायेखाली असल्यामुळे कोणत्याही सकारात्मक गोष्टीला फारसा प्रतिसाद देत नाही.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • भारतातून USA ला २% स्टील निर्यात होते. त्यामुळे ट्रंप यांनी लावलेल्या इम्पोर्ट ड्युटीच्या परिणामाची काळजी नाही. पण चीन, जपान येथून USA मध्ये जाऊ न शकलेले स्टील आणी अल्युमिनियम यांचे भारतात ‘DUMPING’ होण्याची शक्यता आहे. जर NAFTA (नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड AGREEMENT) झाले तर ट्रंप आपल्या इम्पोर्ट ड्युटी बसवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची शक्यता आहे
 • चीनने आपल्या GDP वाढीचे लक्ष्य वर्ष २०१८ साठी ६.५% निश्चित केले.
 • आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तांदुळाच्या किमती US $ ३ ते US $ ५ ने वाढल्या आहेत. थायलंड, फिलिपाईन्स, येथे तांदुळाचे उत्पादन फारसे चांगले झाले नाही. याचा फायदा KRBL,कोहिनूर फूड्स, चमनलाल सेठी, आणी LT फूड्स यांना होईल. GST कौन्सिल निर्यातदारांच्या अडचणी सोडवणार आहे.

सरकारी अनौंसमेंट 

 • चण्यावर इम्पोर्ट ड्युटी ४०% वरून ६०% केली. याचा परिणाम अडाणी एन्टरप्राईझेस आणी गोदरेज अग्रोव्हेट कंपन्यांवर होईल.
 • रिफाईनड पाम ऑईलवर ३०% असलेली इम्पोर्ट ड्युटी  वाढवून  ४४% केली .याचा परिणाम ब्रिटानिया कंपनीवर होईल. त्यामुळे कच्च्या मालावरचा खर्च वाढेल.
 • IDBI बँक ‘टर्नअराउंड’ करण्याचे प्रयत्न चालू आहेत. IDBI ही राष्ट्रीयीकृत बँकेच्या अंतर्गत येत नाही. IDBI ACT या वेगळ्या कायद्याखाली तिचे गठन झाले आहे. या ACT च्या नियमांतर्गत तिचे काम चालते. प्रोजेक्ट ‘निश्चल’ च्या अंतर्गत सर्व NPA  PE फर्म्सना विकले जातील. काही मालमत्तेचे मॉनेटायझेशन केले जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सरकारी स्टेक विकताना सरकारला चांगला भाव प्रती शेअर मिळेल.
 • सरकारने Rs ५० कोटीपेक्षा जास्त कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर पासपोर्ट असणे अनिवार्य केले.
 • PNB आपले नॉनकोअर ASSET विकू शकते. PNB चे आर्थिक फंडामेंटल मजबूत आहेत अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली.
 • सरकार साखरेवरील एक्स्पोर्ट ड्युटी रद्द करण्याच्या विचारात आहे. तसेच साखरेवर सेस लावण्याचा सरकार विचार करत आहे.
 • स्पेक्ट्रम कॅप २५% वरून ३५% करणार आहेत. याचा फायदा आयडीया आणी वोडाफोन यांच्या मर्जरमध्ये होईल. स्पेक्ट्रम पेमेंटचा अवधी १० वर्षावरून १६ वर्षे केला.
 • सरकारकडून १०००० EV बसेसची ऑर्डर दिली जाणार आहे. याचा फायदा अशोक LEYLAND, महिंद्र & महिंद्र यांना होईल.
 • सरकार नवीन आरबिट्रेशन सेंटर आणी आरबीट्रेशन प्रमोशन कौन्सिल बनवण्याचा विचार करत आहे.
 • २३ मार्च २०१८ पासून राज्यसभेच्या निवडणुकांना सुरुवात होईल. जर राज्यसभेत NDA च्या जागा वाढल्या तर राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे जे ठराव पास होऊ शकत नव्हते ते आता मार्गी लागतील असे वाटते.
 • सरकार आणखी १० राष्ट्रीय महामार्ग TOT योजनेखाली खाजगी क्षेत्राला देऊन Rs ६६०० कोटी उभारण्याचा विचार करत आहे.
 • सरकारने FITCH या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीला भारताचे सॉवरीन रेटिंग वाढवण्याची विनंती केली आहे. देशाचे सुधारलेले ‘MACROECONOMIC INDICATORS’ आणी देशात केलेले STRUCTURAL रीफोर्म्स यासाठी लक्षात घेण्याची विनंती केली आहे.

RBI,सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था.

 • RBI ने AXIS बँकेने NPA च्या नियमांचे काटेकोर पालन केले नाही म्हणून Rs ३ कोटी दंड केला.
 • RBI अर्थव्यवस्थेमध्ये Rs १ लाख कोटी टाकणार आहे यामुळे बँकिंग क्षेत्रात लिक्विडीटी वाढेल.
 • SFIO ने (SERIOUS FRAUD INVESTIGATION OFFICE) AXIS बँक आणी ICICI बँकेच्या CEO अनुक्रमे शिखा शर्मा आणी चंदा कोचर यांना PNB घोटाळ्यात चौकशीसाठी बोलावले आहे. ICICI बँकेचे गीतांजली जेम्स मध्ये ८% एक्स्पोजर आहे. तर या घोटाळ्यातील पैशाचा माग काढण्यासाठी AXIS बँकेला बोलावले आहे.
 • दिल्ली मेट्रोच्या बाबतीत Rs ३५०० कोटी रकमेची केस आरबीट्रेशन मध्ये रिलायंस इंफ्राने जिंकली. सुप्रीम कोर्टाने दिल्ली मेट्रोला एस्क्रो अकौंटमध्ये Rs ३५०० कोटी जमा करण्यास सांगितले.
 • टाटा मोटर्सचे तिमाही निकाल अधिकृतरीत्या जाहीर होण्याच्या आधी WHATAPPS वर जाहीर झाले याबाबत चौकशी करण्यासाठी सेबीने कंपनीला नोटीस पाठवली आहे.
 • RBI सरकारला १ एप्रिल २०१८ पर्यंत Rs १०००० कोटी लाभांश देईल.
 • CCI (कॉम्पीटीशन कमीशन ऑफ इंडिया) ने जेट एअरवेजला Rs ३९ कोटी. स्पाईस जेटला Rs ५.१ कोटी तर इंटरग्लोबला ९.४ कोटी दंड लावला.
 • रिलायंस जीओला त्यांचे टॉवर, स्पेक्ट्रम आणी टेलिकॉम इन्फ्राचे ASSET विकण्यासाठी CCI ने परवानगी दिली.
 • भारती एअरटेल आणी टेलेनॉर यांच्या मर्जरला परवानगी मिळाली.
 • RBI ने इक्विटासवर परवानगीशिवाय काही फायनांसियल प्रोडक्ट्स विकून लायसन्सच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल Rs १० लाख दंड बसवला.
 • हायकोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय RCOM आपले ASSET विकू शकणार नाही.
 • NPA च्या बाबतीत केलेल्या नव्या नियमांमुळे NPA मध्ये वाढ होईल असा अंदाज ‘ICRA’ ने वर्तवला आहे.
 • ट्री हाउस या कंपनीमध्ये सेबीला काही घोटाळा आहे असा संशय आहे.
 • कॅपिटल फर्स्ट आणी IDFC बँकेच्या मर्जरला परवानगी मिळाली.
 • SEBI ने ALGO SCAM संबंधात NSE ने केलेला कन्सेंट अर्ज परत केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करू असे सांगितले. यामुळे NSE ची IPO आणण्याची योजना लांबणीवर पडली.
 • भूषण स्टील खरेदी करण्याच्या टाटा स्टीलच्या प्रस्तावाला आणी बिनानी सिमेंटच्या ASSET साठी दालमिया भारतच्या प्रस्तावाला कर्जदार बँकांनी संमती दिली. अर्थात त्यासाठी आवश्यक ती मंजुरी योग्य ऑथोरीटीजकडून घ्याव्या लागतील.
 • IOC ची बोनससाठीची रेकोर्ड डेट १७ मार्च २०१८ आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • USFDA ने ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद येथील युनिट 4 चे इन्स्पेक्शन केले. ९ त्रुटी दाखवल्या. फॉर्म नंबर ४८३ इशू केला. या त्रुटी साफसफाई, मेंटेनन्स,ट्रेनिंग यांच्याशी संबंधीत आहेत.
 • USFDA ने तेलंगणातील DR REDDI’S च्या मेडक युनिटसाठी फॉर्म ४८३ इशू केला आणी ५ त्रुटी दाखवल्या.
 • लॉरेन्स LAB च्या युनिटच्या इन्स्पेक्शन मध्ये काहीही त्रुटी आढळल्या नाहीत.
 • नोव्हार्तीस या कंपनीला Rs १९८२ कोटी कर परतावा मिळाला.
 • सरकारने फोर्टिस रेलीगेरे प्रकरणात कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. SFIO ने ९ मार्च २०१८ पर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. ३० मार्च नंतर फोर्टिस चा शेअर F& O मध्ये असणार नाही असे कळवले.
 • दिलीप बिल्डकॉन या कंपनीला कर्नाटक राज्यात Rs ४४८३ कोटींची ऑर्डर मिळाली.
 • USFDA ने सन फार्माच्या हलोल प्लांटचे १२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान इन्स्पेक्शन केले. SAMPLING, क्लिनिंग, टेस्टिंग या बाबतीत त्रुटी आढळल्या आहेत. या दुरुस्त करण्यासाठी ४ ते ६ महिने लागतील. पुन्हा इन्स्पेक्शनची गरज नाही असे कळवले.
 • USFDA ने WANBURY च्या आंध्र युनिट मध्ये ६ त्रुटी दाखवल्या.
 • रिलायंस जियोला श्रीलंका, भारत, आणी बांगलादेश यातील T-20 सामने प्रसारित करण्याचे हक्क मिळाले.
 • ज्युबिलियंट फूड्स या कंपनीने डॉमिनो’ज पिझ्झा विकण्यासाठी बांगला देशातील ‘ गोल्डन हार्वेष्ट’ या कंपनी बरोबर करार केला.
 • युनियन बँक Rs ५९६४ कोटींचे तर IFCI Rs १३६६८ कोटींचे NPA विक्रीस काढत आहे.
 • टाटा मोटर्सचे ऑटोविक्रीचे आकडे खराब आले.
 • FACT या सरकारी क्षेत्रातील खत उत्पादन करणाऱ्या कंपनीला सरकार Rs १९१० कोटींचे PACKAGE देण्याची शक्यता आहे. या कंपनीची Rs १७१६ कोटींची मार्केट कॅप आहे. या कंपनीला असलेले कर्ज व्याजासकट माफ केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कंपनी ६५१ एकर जमीन विकण्याची शक्यता आहे.
 • अल्ट्राटेक सिमेंट आणी टीमलीज या कंपन्यातील विदेशी निवेशाची मर्यादा वाढवली.
 • कोल इंडियाच्या कॅश प्राईस आणी फ्युचर मध्ये जो डीस्काउंट चालू आहे त्यावरून सर्वजण कंपनी Rs २० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर करेल असा अंदाज व्यक्त करत आहेत.
 • NBCC सुद्धा अंतरिम लाभांश देण्याची शक्यता आहे.
 • ONGC आंध्र प्रदेशात KGONN मध्ये ३ तेल विहिरी खणणार आहे.
 • सन फार्माच्या पोंटा साहिब या युनिटला डच रेग्युलेटरी ऑथोरीटीने GMC (GOOD MANUFACTURING CERTIFICATE) दिले
 • दालमिया भारत आणी अल्ट्राटेक दोघेही बिनानी इंडस्ट्रीजचे ASSET खरेदी करण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे दालमिया भारत पुन्हा बोली वाढवेल असा अंदाज आहे. अल्ट्राटेकने आधीच आपली बोली वाढवली आहे.
 • भेलला Rs ११७०० कोटींची 2400 MW पॉवर प्लांट उभारण्यासाठी EPC ऑर्डर मिळाली

 
कॉर्पोरेट एक्शन

 • IOC ची बोनससाठीची रेकोर्ड डेट १७ मार्च २०१८ आहे.
 • अलेम्बिक फार्मा ची ‘BUY BACK’वर विचार करण्यासाठी १२ मार्च २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
 • वेदान्ता आणी ONGC या कंपन्यांनी अंतरिम लाभांश देण्यावर विचार करण्यासाठे १३ मार्च २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बैठक बोलावली आहे.
 • BASF ही बायर इंडियाचा भाज्यांच्या बी बियाणांचा बिझिनेस खरेदी करणार आहे.
 • HEINEKEN ही डच कंपनी विजय मल्ल्याने गहाण न ठेवलेले युनायटेड ब्रुअरीजचे ४.२७ कोटी शेअर्स प्रती शेअर Rs १०६० या भावाने Rs ४३३१ कोटींना खरेदी करणार आहे. यामुळे या कंपनीचा युनायटेड ब्रुअरीजमध्ये ५८.२% स्टेक होईल.

नजीकच्या भविष्यात येणारे IPO 

 • बंधन बँकेचा IPO १५ मार्च २०१८ ते १९ मार्च २०१८ या दरम्यान येईल. य IPO चा प्राईस BAND Rs ३७० ते Rs ३७५ आहे. बँक या IPO द्वारा Rs ४५०० कोटी उभारेल.
 • भारत डायनामिक्स या सरंक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO १३ मार्च ते 15 मार्च पर्यंत ओपन असेल. या IPO चा प्राईस BAND Rs ४१३ ते Rs ४२८ असून मिनिमम लॉट ३५ शेअर्स चा आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी Rs १० सूट आहे. या कंपनीतील स्टेक विक्रीतून सरकारला Rs ९६० कोटी मिळतील.

या आठवड्यातील लिस्टिंग

 • HG इन्फ्रा या कंपनीच्या शेअरचे Rs २७० ला लिस्टिंग झाले.
 • ताराचंद लॉजिस्टिक्स चा IPO १३ मार्च ते १५ मार्चच्या दरम्यान ओपन होईल.

मार्केटने काय शिकवले
काही काही बातम्यांचा परिणाम तात्पुरता असतो. किंवा भावनिक असतो. ती शेअर्स खालच्या भावाला खरेदी करण्यासाठी आलेली संधी असते. USA च्या अध्यक्षांच्या सर्वच योजना त्यांच्याच पक्षात त्याना पाठींबा मिळाला नाही तर मागे घेतल्या जातात त्याच प्रमाणे मद्यार्क आणी सिगारेट यांच्या सेवनावर बंदी आणली तरी त्याचा फारसा परिणाम संबंधीत शेअर्सवर होत नाही. कारण लोकांचे व्यसन सहजासहजी सुटत नाही किंवा त्यांना सोडायचे नसते. हरयाणा सरकारने मद्यार्कावरील एक्साईज ड्युटी वाढवली, १८ वर्षाखाली वय असणाऱ्या व्यक्तीला मद्यार्काची विक्री करू नये असाही संकेत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून शेअर्स पडतात पण तात्पुरते.
मंगळवार तारीख ६/०३/२०१८ रोजी जी पडझड मार्केट मध्ये झाली त्यानंतर US $ कमजोर झाला. त्यामुळे अर्थातच रुपया मजबूत झाला. पुट/कॉल रेशियो १.१४ झाला.
२०१७ चे संपूर्ण वर्ष मार्केटच्या दृष्टीने ‘पोलिटिकल इअर’ म्हणावे लागेल. विधानसभांचे निकाल, २०१९ च्या निवडणुकीच्या आधी कोण पक्षात राहतो. कोण पक्षातून जातो, कोण कोणत्या आघाडीत राहतो कोण बाहेर पडतो यातूनच मार्केटला ट्रिगर मिळत आहेत. सध्या कर्नाटक राज्यातील निवडणुकांची हवा आहे. त्याचबरोबर USA च्या अध्यक्ष ट्रंप यांच्या धोरणात्मक घोषणा आणी त्यांना जगभरातील देशांतून मिळणारा प्रतिसाद यांचे पडघम आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच हालचाल निर्माण करीत आहेत. गारुड्याची पोतडी उघडली की एक एक अनोळखी आणी विस्मयकारक गोष्टी बाहेर येतात त्याप्रमाणे एका मागून एक FRAUD चे मामले बँकिंग क्षेत्रातून बाहेर येत आहेत. असे वाटते की एकदाच काय ते सर्व घोटाळे बाहेर येऊ देत म्हणजे बँकिंग क्षेत्र किती तकलादू पायावर उभे आहे ते कळेल. विना घोटाळा कंपन्यांचे शेअर्स स्वस्त मिळाले तर गुंतवणूकदार ते पटकन खरेदी करतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३३३०७ वर तर NSE निर्देशांक निफ्टी १०२२६ वर तर बँक निफ्टी २४२९६ वर बंद झाले.
 

One thought on “आठवड्याचे समालोचन – स्वच्छता अभियान शेअर मार्केटमध्ये – ५ मार्च ते ९ मार्च २०१८

 1. Pingback: Anonymous

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.