आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
**** हे समालोचन ‘मार्केट आणि मी’ (www.marketaanime.com) या ब्लॉग वर भाग्यश्री फाटक यांनी प्रकाशित केलेलं आहे. जर तुम्ही इतर माध्यमात हि माहिती share करत असाल तर मूळ लेखक आणि ब्लॉग यांची नोंद करून share करा ***
मार्केटचे प्रगतीपुस्तक – २३ एप्रिल २०१८ ते २७ एप्रिल २०१८
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनचा दौरा सुरु आहे. मारुती लिमिटेड या कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. पण मानेसर येथील जमिनीचा वाद, येनच्या वाढलेल्या किमतीमुळे रॉयल्टीची वाढलेली रक्कम, तसेच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती यामुळे नक्त नफा कमी झाला. कंपनीचा मार्केट शेअर आणी विक्री दोन्ही वाढली. कंपनीने Rs ८० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. पण मार्केटच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. याउलट AXIS बँकेचा चौथ्या तिमाहीचा निकाल सर्वतोपरी असमाधानकारक होता. NPA आणी त्यावर कराव्या लागणार्या प्रोविजनमध्ये वाढ यामुळे बँकेला Rs २१८९ कोटी तोटा झाला. पण ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ या न्यांयाने AXIS बँकेचा शेअर जवळजवळ Rs १०० वाढला तर मारुतीचा शेअर Rs ४०० पडला.
या आठवड्यात बॉंड यील्ड ३% झाले क्रूड प्रती BARREL US $ ७५ झाले, US $ आणी भारतीय रुपयाचा विनिमयदर १ US $ = Rs ६६ झाला. या सर्व घडामोडींना दाद न देता मार्केट आपल्या तालात आणी डौलात चालत राहिले. बुल्स आणी बेअर्सच्या लढाईत बुल्सची सरशी झाली.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- उत्तर कोरियाने जाहीर केले की तूर्तास तरी ते नवीन मिसाईल किंवा न्युक्लीअर परीक्षण करणार नाहीत.
USA १ मे पासून स्टील आणी अल्युमिनियमवर ड्युटी वाढवण्याची शक्यता आहे.
सरकारी अन्नौंसमेंट
- इथेनॉलवर GST ५% करण्याचा विचार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किमत पडत आहे. त्यामुळे साखरेची निर्यात करणे फायदेशीर होत नाही. पुरवठा आणी मागणी यांच्यात तफावत आहे. साखरेची किंमत
- आंतरराष्ट्रीय स्तरावर ९ वर्षांच्या किमान स्तरावर तर भारतातील २८ महिन्यांच्या किमान स्तरावर आहे. सरकार साखरेवर प्रती किलो Rs १ ते Rs १.५० शुगर सेस लावण्याच्या विचारात आहे.
- तागाची MSP सरकारने Rs ३५०० प्रती क्विंटल वरून Rs ३७०० केली. याचा परिणाम ज्युटशी संबंधीत असलेल्या शेअर्सवर झाला. उदा. लुडलो, ग्लॉसस्टर, CHEVIOT.
- सरकारने जाहीर केले की खत उत्पादक कंपन्यांच्या खात्यांमध्ये DBT योजनेअंतर्गत १५ दिवसांच्या आत सबसिडीची रक्कम जमा केली जाईल. ही योजना FY १८ मध्ये टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. या बातमीचा अनुकूल परिणाम खत उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअर्स वर दिसला. उदा FACT, चंबळ, RCF, मद्रास फरटीलायझर्स
- आता ज्या लोकांनी बिल्डर कंपनीकडून FLAT खरेदी केले असतील त्यांना या कंपनीचे क्रेडीटर समजण्यात येईल.
सरकारने बँकांना त्या ज्या सेवा किमान रक्कम जमा ठेवणाऱ्या खातेदारांना फ्री ऑफ चार्ज पुरवतात त्या सेवांच्या रकमेवर कर भरण्यास सांगितले आहे. कोटक महिंद्र बँक, ICICI बँक, AXIS बँक, HDFC बँक याना हा कर भरण्यासाठी नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. - सरकार नफ्यात चालत असलेले १५ विमानतळांचे खाजगीकरण करण्याच्या विचारात आहे. याचा उद्देश भारतातील एव्हीएशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्याचा आहे.
- सरकार तेल विहिरीतून काढण्यात येणार्या क्रूडचे प्रमाण वाढावे म्हणून जर क्रूड US $ ८० प्रती BARREL या भावाच्या खाली राहिले तर ऑईल इंडस्ट्री डेव्हलपमेंट सेसमध्ये ऑफशोअर आणी ऑनशोअर फिल्डसाठी १० वर्षापर्यंत ५०% सूट देईल. याचा फायदा ONGC, ऑईल इंडिया आणी रिलायंस इंडस्ट्रीज, वेदांत, अबन ऑफ शोअर, GOL ऑफ शोअर यांना होईल.
RBI SEBI आणी इतर प्रशासनिक संस्था
- CCI ने टाटा स्टील या कंपनीने भूषण स्टील्स ही कंपनी टेक ओव्हर करायला मंजुरी दिली.
एस्सार स्टील या NCLT मध्ये पोहोचलेल्या कंपनीच्या खरेदीसाठी NUMETAL या कंपनीच्या कनसॉरशियमने Rs ३२००० कोटींची ऑफर दिली. या कंपनीने आर्सेलर मित्तल या कंपनीच्या बरोबरीने ऑफर देण्यासाठी आपली ऑफर ७५% ने सुधारली.
खाजगी कंपन्यांच्या घडामोडी
- भारती इन्फ्राटेल आणी इंडस टॉवर यांचे मर्जर होणार आहे. एका इंडस टॉवरच्या शेअरमागे १५६५ भारती इन्फ्राटेलचे शेअर्स मिळतील.या कंपनीचे व्यवस्थापन भारती एअरटेल आणी वोडाफोन मिळून करणार आहेत. आयडिया त्याचा स्टेक ठेवू शकते किंवा विकू शकते. भारती एअरटेल आणी वोडाफोन त्यांचा ६६.६% स्टेक विकण्याच्या प्रयत्नात आहेत.
- इंडियन ह्यूम पाईप या कंपनीला Rs ५७८ कोटींची ऑर्डर मिळाली.
- युनिकेम labच्या गाझियाबाद युनिटची USFDAने तपासणी केली. त्यात कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत.
सिप्लाच्या पिठमपूर युनिटच्या USFDA केलेल्या तपासणीत ३ त्रुटी आढळल्या. - सुवेन लाईफ सायन्सेस या कंपनीच्या मेडक येथील युनिटच्या तपासणीत USFDA ने ७ त्रुटी दाखवल्या.
मान्सून सामान्य असेल तर टेक्स्टाईलचे उत्पादन आणी मागणी चांगली येईल. याचा फायदा रेमंड अरविंद या कंपन्यांना होईल. - आयलंड स्टारने फिनिक्स मिल्सची जमीन Rs ६७८ कोटींना खरेदी केली.
- मोरपेन LAB ही कंपनी २०१९ मध्ये कर्जमुक्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
CDSL, चोलामंडलम फायनांस, भारती एअरटेल, ओबेरॉय रिअल्टी, GIC हौसिंग, HDFC बँक, सुप्रीम इंडस्ट्रीज, इंडिया बुल्स रिअल इस्टेट,येस बँक, हैदराबाद इंडस्ट्रीज,SBI लाईफ, महिंद्र लाईफस्पेस, अतुल ऑटो, AU स्माल फायनान्स बँक, बंधन बँक या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. - विप्रो (२०१९ साठी गायडंस कमी), ICICI प्रुडन्स, पर्सिस्टंट सिस्टम्स, IDFC बँक, यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षाभंग करणारे होते.
- BPCL ला रोहटक या शहरातील GAS डीस्ट्रीब्युशनचे अधिकार मिळाले.
- नारायणा हृदयालय या कंपनीने नियमातील बदल प्रतिकूल असल्यामुळे आपली मलेशियातील हॉस्पिटल्स बंद करण्याचा निर्णय घेतला.
- फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. आता IHH हेल्थकेअर या कंपनीने बाइंडीन्ग ऑफर देऊन ताबडतोब Rs ६५० कोटी गुंतवण्याची तयारी दाखवली आहे. तर रेडीयंट या कंपनीने Rs १२५० कोटीचे फोर्टिसचे शेअर्स घेण्यासाठी बाइंडीन्ग ऑफर दिली आहे. मणिपाल हॉस्पिटल्सने आपली ऑफर Rs १६० पती शेअर एवढी सुधारली आहे. याबरोबरच मुंजाल आणी बर्मन यांनी दिलेली ऑफर आहेच.
- टी सी एस ही भारतातील US $ १०० बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन असलेली दुसरी कंपनी झाली. पहिली कंपनी २००७ मध्ये रिलायंस इंडस्ट्रीज झाली.
- IDFC आपला ASSET MANAGEMENT आणी स्टॉक ब्रोकिंग, आणी म्युच्युअल फंड कारभार विकण्यासाठी येस बँक, इंडस इंड बँक आणी काही खाजगी इक्विटी फंडाबरोबर बोलणी करीत आहे. या दोन बिझिनेसच्या विक्रीचे IDFCला Rs ६००० कोटी मिळण्याची शक्यता आहे.
- रिलायंस नावल १ जून पासून वायदेबाजारातून बाहेर पडेल.
कॉर्पोरेट एक्शन
- झेन्सार टेक्नोलॉजी या कंपनीने एका शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केले. (स्प्लीट लाभांश, शेअर ‘BUY BACK’ राईट्स इशू इत्यादी सर्व कॉर्पोरेट एक्शनविषयी माझ्या ‘मार्केट आणी मी’ या पुस्तकात दिली आहे.)
- हिंदुस्थान झिंक त्यांचा चांदी उत्पादनाचा कारभार अलग करणार आहेत. चांदी ही झिंकचे बायप्रोडक्ट आहे. या कंपनीत सरकारचा २९% स्टेक असल्यामुळे या कॉर्पोरेट एक्शनसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
HDFC बँकेने ने Rs १३ प्रती शेअर तर इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स या कंपनीने Rs १० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. - इमामी या कंपनीची ३ मे रोजी चौथ्या तिमाहीच्या निकालासाठी बैठक आहे याच बैठकीत बोनसवर विचार करण्यात येईल.
- एसेल PROPACK या कंपनीने १;१ असा बोनस जाहीर केला.
नजीकच्या काळात येणारे IPO
- लोढा ग्रूप ही रिअल्टी क्षेत्रातील कंपनी Rs ५००० कोटींचा IPO येत्या तीन ते चार महिन्यात आणणार आहे. या कंपनीने २००९मध्ये आणलेला IPO गुंतवणूकदारांच्या थंड्या प्रतिसादामुळे मागे घ्यावा लागला होता.
मार्केटने काय शिकवले
- ज्यावेळी भारताची करन्सी विदेशी करन्सीच्या तुलनेत ‘WEAK’ होते त्यावेळी ज्या कंपन्यांचं कर्ज परदेशी चलनात असेल त्याना त्रास होतो. उदा:- GMR इन्फ्रा, HPCL, अदानी पोर्ट, रिलायंस नाव्हल.
तसेच ज्या कंपन्यांना त्यांच्या विक्रीचे पैसे परदेशी चलनात मिळतात विशेषतः निर्यात क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होतो. उदा IT क्षेत्र, फार्मा क्षेत्र - एक्सपायरीच्या वेळी दिसणाऱ्या आकडेवारीवरून पोझिशन घेताना सावध राहावे. FIIची खरेदी दिसली तरी हुरळून जाण्याचे कारण नाही.
- या आठवड्यात दोन वेळा HANGING MAN PATTERN तयार झाला. वरच्या स्तरावर विक्री होत असली तरी खालच्या स्तरावर खरेदी होत होती.
- आताचा येणारा महिना चौथ्या तिमाहीच्या निकालांचा आहे. त्यात बँकेचे निकालही येऊ लागतील. यावेळच्या बँकांच्या निकालात आपणास बँकांनी जाहीर केलेले NPA आणी RBI ऑडीट मध्ये RBI ऑडीटरनी निश्चित केलेले NPA यांच्या रकमेतील फरक तसेच या NPA साठी बँकेने केलेली प्रोविजन आणी RBIच्या नियमानुसार करावी लागणारी प्रोविजन यांच्या रकमेत फरक आहे का ? हे पहावे लागेल. नियमांपासून दूर जाणे म्हणजेच डायव्हर्जन्स या कडे लक्ष द्यावे लागेल. आतापर्यंत जाहीर झालेल्या येस बँक ( NPA डायव्हर्जंस Rs ६३५५ कोटी आणी प्रोविजन डायव्हर्जन्स ( Rs १५३६ कोटी) आणी कोटक महिंद्र बँक याच्या निकालात असे डायव्हरजन्स दिसून आले आहेत. याचा अर्थ असा होतो की बँका NPA आणी त्याकरता कराव्या लागणाऱ्या प्रोविजन्साठी RBI ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती आहे त्यापेक्षा चांगली दाखवण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाकडून केला जातो.
- आठवडा संपता रिलायंस इंडस्ट्रीजच्या निकालाने सुखद धक्का दिला. रिलायंस इंडस्ट्रीजचे एकूण उत्पन्न Rs १.१७ लाख कोटी, PAT Rs ९४३५ कोटी, EBITDA Rs १८४६९ कोटी, EBITDA मार्जिन १५.८% आणी GRM US $ ११ PER BARREL होते. कंपनीने Rs ६ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. डिजिटल बिझिनेसचे उत्पन्न Rs ८४२१ कोटी, रिलायंस ‘जीओ’ चे PAT Rs ५१० कोटी झाले. तर ARPUs Rs १३७.१० होते (AVERAGE REVENUE पर USER) पेटकेम आणी रिफायनिंग मध्ये सर्वात जास्त EBIT आहे.
- पुढील आठवड्यात १ आणी २ मे रोजी फेडची बैठक, १२ मे रोजी होणार्या कर्नाटक राज्यातील निवडणुका आणी १५ मे रोजी त्यांचे येणारे निकाल, आणी एप्रिल २०१८ साठी ऑटो विक्रीचे आकडे, हिरो मोटो कॉर्प्स, HDFC इत्यादी कंपन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवावे.
- तांत्रिकदृष्ट्या महत्वाची असलेली निफ्टी १०६०० ची लक्ष्मण रेषा मार्केटने लीलया पार केली. सेन्सेक्सही ३५००० च्यावर पोहोचला. त्यामुळे पुन्हा एकदा मार्केट ११००० चा टप्पा गाठेल की काय अशी आशा गुंतवणूकदारांना वाटू लागली. जर कर्नाटकच्या निवडणुकीतील निकालांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तर निफ्टीला ११००० चा टप्पा गाठणे कठीण नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४९६९ वर NSE निर्देशांक निफ्टी १०६९२ वर तर बँक निफ्टी २५३९४ वर बंद झाले.
**** हे समालोचन ‘मार्केट आणि मी’ (www.marketaanime.com) या ब्लॉग वर भाग्यश्री फाटक यांनी प्रकाशित केलेलं आहे. जर तुम्ही इतर माध्यमात हि माहिती share करत असाल तर मूळ लेखक आणि ब्लॉग यांची नोंद करून share करा ***