like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २९ जून २०१८
आज मार्केट ४०० पाईंट वाढल्यामुळे आनंदी वातावरण होते. याला कारण म्हणजे
(१) रुपया US $ १ = Rs ६९.०९ वरून US $ १ =Rs ६८.४४ झाला. म्हणजे ६५ पैसे मजबूत झाला.
(२) आंतरराष्ट्रीय संकेत चांगले होते.
(३) क्रूडची किंमत कमी झाली.
(४) चीन आणि USA यांच्या ट्रेंड वॉर मध्ये चीनने शेतमाल, रसायने आणि धातू यावरील टॅरिफ कमी करायचे ठरवले.
(५) FII (फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर) ची विक्री कमी झाली
(६) VIX ६% कमी झाला
IDBI आणि एल आय सी यांच्यातील व्यवहाराला IRDA ची मंजुरी मिळेल अशी बातमी आहे. LIC IDBI बँकेमध्ये Rs १३००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. टॉरंट फार्मा यांच्या कोलेस्टेरॉलवरील औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. ICICI बँकेचे चेअरमन म्हणून चतुर्वेदींची (IAS कॅडर १९७७ ) यांची नेमणूक झाली
विशेष लक्षवेधी
- तळवलकर लाईफ स्टाइल्सचे लिस्टिंग Rs १३६.८० वर झाले.
- प्रिझम सिमेंटचे नाव आता प्रिझम जॉन्सन असे झाले.
- GALLANT इस्पात आपल्या एका शेअरचे १० शेअर्स मध्ये स्प्लिट करेल.
- PNB ने आपला ‘ICRA’ मधील ३.३% स्टेक विकला.
आज मी तुम्हाला पेज इंडस्ट्रीचा चार्ट देत आहे. या चार्टवरून हेड आणि शोल्डर पॅटर्न समजतो. शेअरची किंमत तेजीचा ट्रेंड असताना एका विशिष्ट्य पातळीपर्यंत वाढते. आणि तिथून पडायला सुरुवात होते. हा डावा शोल्डर झाला पुन्हा वाढते तेव्हा पहिल्या पातळीच्यावर किंमत जाते. ते हेड फॉर्म होते. नंतर मार्केटमध्ये पुन्हा मंदी येते. किंमत घसरते तेव्हा व्हॉल्युम कमी असतो. तिथून पुन्हा किंमत वाढायला सुरुवात होते ती डाव्या शोल्डरच्या पातळीएवढीच किंमत वाढते. दोन्ही वेळच्या बॉटम मधून एक लाईन ड्रा केली तर तिला नेक लाईन म्हणतात. उजवा शोल्डर फॉर्म झाल्यानंतर किंमत नेक लाईनपर्यंत आल्यावर हा पॅटर्न पूर्ण होतो. तेथून पुन्हा किंमत वाढायला सुरुवात झाली तर झपाट्याने वाढते. किंमत नेक लाईनच्या पातळीच्या खाली गेली तर किंमत पडायला सुरुवात होते .
पुढील आठवड्यातील विशेष लक्षवेधी
- रविवार १ जुलै पासून ऑटो विक्रीचे आकडे यायला सुरुवात होईल. बजाज ऑटो आणि मारुतीचे ऑटो विक्रीचे आकडे चांगले येतील असा अंदाज आहे.
- २ जुलै २०१८ रोजी RITES आणि फाईन केमिकल्स यांच्या शेअर्सचे लिस्टिंग आहे.
- ५ जुलै २०१८ रोजी रिलायन्सची सर्वसाधारण वार्षिक सभा आहे. त्यामध्ये रिलायंस रिटेल आणि रिलायन्स जिओ यांच्या IPO विषयी घोषणा होण्याची शक्यता आहे.
- ५ जुलै २०१८ ला गेल्या FOMC बैठकीचे मिनीट जाहीर केले जातील.
- ६ जुलै रोजी VARROC इंजिनीअरिंगच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
- १८ जुलै २०१८ पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होऊन १० ऑगस्ट २०१८ रोजी संपेल.
- ट्रम्प आणि पुतीन यांची शिखर परिषद २१ जुलै रोजी होईल.
- २१ जुलै २०१८ रोजी GST कॉऊन्सिलची बैठक आहे.
वरील सर्व ट्रिगर्समुळे जुलै महिन्यात मार्केटमध्ये चांगली आशादायी हालचाल असेल. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४२३ NSE निर्देशांक निफ्टी १०७१४ आणि बँक निफ्टी २६३६४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!