आजचं मार्केट – १९ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – १९ जून २०१८

सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी जो ओपनिंग ट्रेड झाला तोच  इंट्राडे हाय होता. त्यानंतर दिवसभर मार्केट पडतच राहिले. मार्केटने निफ्टी १०७०० चा स्तर  गाठला. या मध्ये सुधारणा होण्याची शक्यता धूसर आहे. बेअरीश बेल्ट होल्ड पॅटर्न तयार झाला.
USA  आणि चीन मधील ट्रेंड वॉर अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करू लागले आहे. USA  चे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन मधून आयात होणाऱ्या US $ २०० अब्ज  किमतीच्या मालावर  १०% अतिरिक्त ड्युटी लावण्याची घोषणा केली. याचा परिणाम म्हणजे चीनमध्ये रबराच्या किमती ७% कोसळल्या तर बेस मेटल २.५% पडले. त्यामुळे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट आणि शेअर मार्केटवर दिसून आला. रुपया आणखी कमजोर झाला. US $१=Rs ६८.३८  इतका रुपयांचा डॉलर बरोबर विनिमयाचा दर झाला.
सरकार ऑइल इंडिया मधील १०% हिस्सेदारी  विकून Rs २४५० कोटी गोळा करण्याच्या विचारात आहे. सार्वजनिक  क्षेत्रातील सरकारी बँकांबरोबर अर्थमंत्र्याची आज महत्वाची बैठक होती. यात क्रेडिट विशेषतः SME आणि इतर प्रायोरिटी सेक्टर मधील क्रेडिट कसे वाढवता येईल यावर विचार  होणार होता. सरकारी बँकांपैकी ११ बँका RBI च्या PCA खाली असल्यामुळे त्यांच्यावर बरीच बंधने आहेत.
TCS या कंपनीच्या BUY बॅक मध्ये किरकोळ शेअर होल्डर म्हणून भाग घ्यायचा असेल तर आपल्याजवळ ९५ किंवा त्यापेक्षा कमी शेअर्स पाहिजेत. या BUY बॅक मध्ये एका PAN  नंबरवर  BUY BACK साठी  एकच अर्ज करता येईल.
गोवा कार्बनने आपला पारादीप प्लांट बंद ठेवण्याची मुदत वाढवली.
वेदांताने असे जाहीर केले की त्यांच्या तानजीगढ प्लांट मध्ये पूर्ववत  उत्पादन सुरु झाले. टाटा पॉवर आणि IDBI  बँक यांच्यात ऑटोमेटेड बिल पेमेंटसाठी करार झाला. मेटने जाहीर केले की २३ जून ते २५ जून २०१८ पर्यंत मान्सून बिहार आणि झारखंड मध्ये दस्तक  देईल. व्हील्स इंडिया या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २२ जून रोजी बोलावली आहे. यात बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार होईल.
२० जून ते २२ जून २०१८ या दरम्यान RITES( Rs ६ किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सूट) आणि फाईन ऑरगॅनिक केमिकल्स यांचे IPO ओपन राहतील. भारत २२ ETF चा इशूही  किरकोळ  गुंतवणूकदारांसाठी ओपन होईल. यात २.५% डिस्काउंट असेल. VARROC इंजिनीरिंग या ऑटो अँसिलरी क्षेत्रात असणाऱ्या कंपनीचा US $ २८८ मिलियनचा IPO (याचा प्राईस बँड Rs ९६५ Rs ९६७ आहे) येत आहे. हा IPO २६ जून २०१८ पासून ओपन होईल. या आठवड्यात IPO ची धमाल आहे. त्यामुळे नाराज होण्याचे कारण नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२८६ NSE  निर्देशांक निफ्टी १०७१० आणि बँक निफ्टी २६२६५ वर बंद झा

 
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.