आजचं मार्केट – २० जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २० जून २०१८

आज विदेशी बाजार सुधारल्यामुळे स्थानिक शेअरमार्केटमध्येही तेजी आली. आज बुल्स नी चांगलीच मुसंडी मारली. स्वतःचा मार्केटवरील ताबा सुटू दिला नाही. मार्केट थोडे पडले तरी खरेदी होत होती. आणि दिवसअखेरी पर्यंत  तेजीचा किल्ला लढवला. यामुळे बुलिश हरामी कॅंडलस्टिक पॅटर्न तयार झाला. १९ जून २०१८ ची कँडल मोठी पण मंदीची होती पण आजची कँडल मात्र तेजीची आणि कालच्या कँडलमध्ये मावणारी अशी होती. हरामी याचा अर्थ जापनीज भाषेत गरोदर स्त्री असा होतो. हा रिव्हर्सल पॅटर्न आहे.   
आता ट्रेंड वॉरमध्ये यूरोपीय देशही सामील झाले.  USA मधून आयात होणाऱ्या युरो २००० बिलियन किमतीच्या मालावर आपण ड्युटी लावू असे त्यांनी  जाहीर केले.
या वर्षभरात सरकार MMTC (१०%), NHPC (१०% ), NTPC (५%), कोल इंडिया (५%) या प्रमाणे विनिवेश करेल.  IPO विषयीच्या नियमात बदल करण्यावर विचार विनिमय करण्यासाठी उद्या सेबीची बैठक आहे. वेदांताने तुतिकोरिन येथील प्लांटवरील  बंदी उठवण्यासाठी मद्रास हायकोर्टात अर्ज दिला. कोर्टाने २५ जून २०१८ रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे. सिप्ला या कंपनीच्या HIV वरील औषधासाठी मंजुरी मिळाली.
सरकारने इंटरनेट टेलिफोनीला मंजुरी दिली. आणि टेलिकॉम कंपन्यांना सरकारने जरुरी आदेश दिले आहेत.  टेलिकॉम कंपन्यां एप्सच्या सहाय्याने टेलिफोनी सेवा देतील. यामुळे आता तुम्हाला  सिमकार्ड शिवाय कॉल करता येतात.
ज्वेलरी क्षेत्रात हॉलमार्किंग सक्तीचे केले. यासाठी सरकारने ज्वेलर्सना सहा महिने ते एक वर्ष मुदत दिली आहे.
एव्हिएशन सेक्टर मध्ये गेल्या  मे  महिन्यात  गेल्या चार वर्षातील किमान संख्येपेक्षा प्रवाश्याची संख्या कमी होती. इंडिगोचा मार्केट शेअर  ४०.९% झाला. येत्या डिसेंबरपर्यंत १४ विमानतळ उडाण योजनेअंतर्गत तयार केले जातील.
पॉवर सेक्टरमधील NPA वर विचार करण्यासाठी DFS ने संबंधित पार्टिजची बैठक बोलावली आहे. यात ऊर्जा मंत्रालय, PFC, REC, पॉवर कंपन्या आणि त्यांना कर्ज देणार्या बँकांचे प्रतिनिधी समाविष्ट असतील.
सरकारने पब्लिक प्रॉक्युअरमेंट योजनेखाली संरक्षण खात्यासकट सर्व खात्यांना स्थानिक लेदर प्रोडक्टसचा समावेश करण्यासाठी आदेश दिले आहेत. पादत्राणांमध्ये ७०% तर लेदर वस्त्रप्रावरणा मध्ये ६०% स्थानिक लेदर प्रोडक्टस खरेदी करावेत असे आदेश दिले. या सरकारच्या निर्णयामुळे बाटा, खादिम’s, तसेच मिर्जा इंटरनॅशनल या शेअर्स वर अनुकूल परिणाम झाला.
BOSCH ही कंपनी येत्या ३ वर्षात Rs  ७०० कोटींची गुंतवणूक करेल. JSW स्टिल्स च्या प्रमोटर्सनी आज ३२ लाख शेअर्स गहाण ठेवले.
ज्या ४८३८ कंपन्यांच्या कर्ज घेण्यावर मर्यादा घालण्यात आली होती त्या कंपन्यांना आता सरकार काही सवलती देण्याचा विचार करत आहे. आजच्या मार्केटचे अवलोकन करताना बुल्सची सरशी झाली असे आढळते. हरामी पॅटर्न बघताना ट्रेंड बदलला पाहिजे असे वाटते. पण मूलभूत काही बदल झाले तर काही सांगता येत नाही.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५४७ वर  NSE  निर्देशांक निफ्टी १०७७२ वर तर बँक निफ्टी २६५५७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.