आजचं मार्केट – २१ जून २०१८

ike करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २१ जून २०१८
मार्केट हल्ली फार अस्थिर आहे. वरच्या स्तरावर मार्केट टिकाव धरत नाही.पण खालच्या स्तरावर खरेदी होते. बुधवार दिनांक २०/०६/२०१८ जपानच्या आणि USA च्या हवामान तज्ञानी जून आणि ऑगस्ट २०१८ मध्ये भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे सांगितल्यामुळे थोडेफार चिंतेचे वातावरण होते.
२ जुलै २०१८ रोजी रिलायांस इंडस्ट्रीज ची वार्षिक सर्वसाधारण मीटिंग आहे. इतिहासात डोकावले असता रिलायन्स चा शेअर AGM च्या आधी वाढतो. असे चित्र यावर्षीही दिसते आहे.
OPEC च्या बैठकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. उत्पादन वाढ होईल असा एकंदरीत अंदाज आहे. पण लिबियामध्ये दहशतवादामुळे क्रूडचे उत्पादन कमी झाले आहे. इराणवरून भारतात क्रूड येते पण इराणवर USA ने काही बंधने लादली आहेत. USA मध्ये ओबामाने पाईपलाईन टाकून दिली नाही. ही पाईपलाईन टाकायला किमान एक वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे USA मधून इतर देशांना क्रूडचा पुरवठा होणार नाही. सौदी आणि रशिया हे देश मात्र उत्पादनवाढ करावी या मताचे आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय आज ब्रेंट क्रूड पुन्हा US $ ७३ वर आले. आणि HPCL BPCL IOC चेन्नई पेट्रो हे शेअर्स वाढले.
फेमाच्या कायद्याचे उल्लंघन केले म्हणून इंडिगोवर नोटीस बजावली अशी बातमी होती. म्हणून काल इंडिगो चा शेअर पडला होता आज कंपनीने कंपनीस अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही असा खुलासा करताच पुन्हा शेअर वाढला.
बरेच फार्मा फंड येत आहेत. NFO ओपन होत आहेत. त्यामुळे फार्मा क्षेत्रामध्ये कोठे न कोठे खरेदी होत आहे. उदा ग्लेनमार्क फार्मा, लाल पाथ लॅब
सुंदरम फायनान्सच्या शेअरमध्ये विचित्र हालचाल होती. ५ मिनिटात Rs १०० शेअर वाढला पण त्याची कारणे मिळू शकली नाहीत . RITES या सरकारी क्षेत्रातील IPO ला बर्यापैकी प्रतिसाद मिळत आहे इमामी आणि ज्युबिलंट फूड्स हे दोन्ही शेअर्स आज एक्स बोनस झाले.
आंतरराष्ट्रीय मार्केमध्ये वेध घेत सध्या भारतीय शेअर मार्केट्सची वाटचाल चालू आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४३२ NSE निर्देशांक निफ्टी १०७४१ आणि बँक निफ्टी २६४९६ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

6 thoughts on “आजचं मार्केट – २१ जून २०१८

 1. devendra Post author

  DCM Sriram आणि TCS या दोन कंपनींपैकी कोणत्या कंपनीचे शेअर्स buy back साठी जास्त फायदेशीर आहेत.
  देवेंद्र बागुल.

  Reply
  1. bpphatak Post author

   DCM Sriram आणिTCS या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने buy back ऑफर आणत आहेत DCM Sriram open market पध्दतीने तर TCS Tender ऑफर पद्धतीने buy back करत आहे त्यामुळे तुलना करता येणार नाही TCS ची buy back ऑफर फायदेशीर आहे

   Reply
 2. devendra Post author

  TCS च्या Buy-back OFFER साठी ONLINE पद्धतीने शेअर्स submit करता येतील की physical form, submit करावे लागतील?

  Reply
  1. bpphatak Post author

   अजून खुलासेवार प्रक्रिया जाहीर झाली नाही टेंडर ऑफर असते तेव्हा buy back चा फॉर्म घरी येतो फॉर्म आला नाही तर फॉर्म डाउन लोड करून printout घ्यावे लागते नंतर फॉर्म भरुन पाठवावा लागतो

   Reply
  1. bpphatak Post author

   Health Insurance Sector लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला असला तरी correction च्या वेळी गुंतवणूक करा रिस्क रिवॉर्ड रेशीओचा विचार करा

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.