आजचं मार्केट – २२ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २२ जुन २०१८
मार्केट मध्ये लपंडाव चालू आहे. एक दिवस तेजी तर एक दिवस मंदी !आज मार्केटने मंदीला बाय बाय करून मार्केट तेजीत ठेवून सुखद धक्का दिला. या श्रेयाचे वाटेकरी HDFC, HDFC बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, आणि ICICI बँक होते. मद्यार्क, सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
सरकार २,५०,००० ग्रामपंचायती वायफायने जोडणार आहे. या साठी Rs १०,००० कोटींचे टेंडर काढले जाणार आहे. याचा फायदा तेजस नेटवर्क , D -लिंक, स्मार्ट लिंक या कंपन्यांना होईल.
सोम डिस्टीलरीजना कर्नाटकमधील हसन प्लांट मध्ये विदेशी मद्यार्क बनविण्यासाठी परवानगी मिळाली .
आज JLR चा इन्व्हेस्टर डे आहे . टाटा मोटर्सचे नवे CFO पी . बालाजी गुंतवणूकदारांना भेटून कंपनीच्या योजना सांगणार आहेत. बजाज फायनान्स ही हौसिंग फायनान्समध्ये Rs १००० कोटी गुंतवणार आहे.
OPEC देशांनी काही प्रमाणात का होईना उत्पादन वाढवायचे मान्य केले. सौदी अरेबिया आणि इराणने उत्पादन वाढवायच्या बाजूने संकेत दिले.
विशेष लक्षवेधी
फाईन ऑरगॅनिक चा IPO पूर्णपणे भरला. RITES चा IPO ६५ वेळा भरला. IDBI बँक LIC च्या स्वाधीन करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकार आपला ४३% हिस्सा LIC ला विकणार आहे LIC च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी हा हिस्सा खरेदी करायला मंजुरी दिली.सध्या LIC कडे १०.८२ % स्टेक आहे सरकारचा स्टेक ८०.९६ % आहे या विनिवेशातून सरकारला Rs १०,००० ते Rs ११००० कोटी मिळतील असा अंदाज आहे.त्यामुळे IDBI बँकेचे व्यवस्थापनही LIC च्या ताब्यात जाईल..
MTNL आणि BSNL यांचे पुनरुज्जीवन करण्यावर PMO मध्ये विचारविनिमय चालू आहे MTNL ला ४G स्पेक्ट्रम देऊन त्यांची मालमत्ता विकायला सरकार परवानगी देण्याची शक्यता आहे.
पुढील आठवडा एक्स्पायरी वीक आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६८९ NSE निर्देशांक निफ्टी १०८२१ आणि बँक निफ्टी २६७६६ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
http://www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.