आजचं मार्केट – २५ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २५ जून २०१८
गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही मार्केटमध्ये तेजी मंदीच्या खेळाची सुरुवात झाली असे वाटते. आज पूर्ण दिवस मार्केटमध्ये मंदीचे साम्राज्य होते. ओपेकची मीटिंग म्हणजे मार्केटच्या दृष्टीने ‘बडा घर पोकळ वासा ‘ठरली. १० लाख बॅरेल प्रती दिवस उत्पादन वाढवले जाईल असे सांगण्यात आले. याचा फारसा फायदा होईल असे दिसले नाही. त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे आणि एव्हिएशन कंपन्यांचे शेअर्स मंदीत होते.
कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या बाबतीत काही गैर घडले असल्यास मार्केट शासन करते. कंपनीने कितीही खुलासा केला तरी मार्केटच्या पचनी पडायला वेळ लागतो असे जाणवते. KRBL चे डायरेक्टर ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर स्कॅम मध्ये सामील आहेत म्हणून ED ने त्यांना पकडलेअशी बातमी आली. हे डायरेक्टर इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून २००७ ते २०१३ या दरम्यान काम करत होते. ते आता डायरेक्टर नाहीत असा कंपनीने खुलासा केला तरी शेअर पडतच राहिला.
हीच अवस्था ICICI बँकेची. ICICI बँकेने दिलेल्या ३१ कर्ज खात्यात घोटाळा आहे अशी बातमी होती. बँकेने खुलासा केला की या बाबतीत आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे, प्रोव्हिजन केली आहे, आणि संबंधित ऑथॉरिटीजना कळवले आहे तरी हाही शेअर पडतच राहिला.
सरकारने सर्व बँकांना नॉन कोअर मालमत्ता विकून पैसे गोळा करायला सांगितले आहे. या अंतर्गत PNB ने PNB हौसिंगमधील स्टेक विक्रीसाठी ठेवला. हा स्टेक घेण्यासाठी कोटक महिंद्रा बँक आणि HDFC उत्सुक आहेत.
महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकबंदीचा निर्णय जोरकसपणे अमलांत आणला जात आहे. याचा फायदा CHEVIOT, LUDLOW या सारख्या तागाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. टाटा मोटर्सच्या इन्व्हेस्टर समिट मध्ये कंपनीने जी योजना मांडली ती गुंतवणूकदारांच्या पसंतीस आली नाही. त्यामुळे टाटा मोटर्सचा शेअर पडला. DR रेड्डीज या कंपनीला USA मध्ये कॅन्सर विषयी असलेल्या औषधाविषयीच्या पेटंटच्या केसमध्ये अपयश आले. ALI LILLY या कंपनीला हे पेटंट मिळाले. त्यामुळे २०२२ पर्यंत DR रेड्डीज हे औषध बाजारात आणू शकणार नाहीत. टाटा सन्स ची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे. या मध्ये टाटा टेली सर्विसेस आणि एअरटेल यांच्या मर्जरविषयी तसेच भूषण स्टील आणि भूषण स्टील आणि पॉवर खरेदी करण्याचे फायदे तसेच टाटा ग्रुप मधील विविध कंपन्यांचे M & A याविषयी माहिती दिली जाईल.
USA ने त्यांच्याकडे आयात होणाऱ्या वस्तूंवर आणि विशेषतः चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर ड्युटी बसवली. त्याचा परिणाम भारतातून तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर झाला.
विशेष लक्षवेधी
व्हील्स इंडिया या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
झुआरी ऍग्रोची राईट्स इशू आणि FCCB वर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. व्होल्टास ही कंपनी वाशिंग मशीन, फ्रिज, माइक्रोवेव्ह ओव्हन्स, आणि डिश वाशर्स या व्यवसायात उतरत आहेत. यासाठी कंपनी Rs १००० कोटींची गुंतवणूक करून १०% मार्केट शेअर मिळवण्याचा प्रयत्न करेल .
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४७० NSE निर्देशांक निफ्टी १०७६२ आणि बँक निफ्टी २६६०९ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.