आजचं मार्केट – २६ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २६ जून २०१८
१ जुलै २०१७ ला GST लागू झाला. १ जुलै २०१८ ला GST लागू होऊन एक वर्ष होईल. हा GST चा वाढदिवस साजरा करत असताना सरकार काही वस्तूंवरचा GST कमी करणार आहे. या मध्ये सिमेंट. पेंट्स, डिजिटल कॅमेरा, सिनेमा तिकीट यावरचा GST कमी करणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्स वाढले.
SEQUENT सायंटिफिक आणि स्ट्राइड्स शासून यांनी API व्यवसाय अलग केला आणि त्यातून सोलारा ऍक्टिव फार्मा सायन्सेस लिमिटेड ही कंपनी २३ फेब्रुवारी २०१७ मध्ये स्थापन केली. ज्यांच्याजवळ स्ट्राइड्स चे ६ शेअर्स होते त्यांना सोलाराचा Rs १० दर्शनी किमतीचा एक शेअर मिळाला. आणि SEQUENT सायंटिफिक चे २५ शेअर असतील तर सोलाराचा Rs १० दर्शनी किमतीचा १ शेअर मिळाला. सोलारा ऍक्टिव्ह या कंपनीच्या शेअर्सचे उद्या लिस्टिंग आहे. हा शेअर लिस्टिंग नंतर १० दिवस ‘टी टू टी’ मध्ये राहील.
टाटा ग्रुप वोल्टास मधील ९% स्टेक विकून संरक्षण आणि एअरोस्पेस या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. युनायटेड स्पिरिट्सने ‘हिप बार’ या ऑन लाईन पेमेंट सिस्टीम मधला २६% स्टेक विकत घेतला. यामुळे त्यांची विक्री वाढेल. SBI या वर्षाच्या अखेरीपर्यंत चांगला नफा मिळवेल. SBI लाईफ मधला स्टेक विकणार आहे SBI कॅपिटल मध्ये कोणीतरी भागीदार आणणार आहे. UTI मधील स्टेक कमी करणार. तीन सब्सिडीयरीचा IPO आणणार. या तिमाहीपासून NPA कमी करणार असे SBI च्या व्यस्थापकीय संचालकांनी सांगितले. DTC ४०० नॉन AC आणि १०० AC बसेसची ऑर्डर अशोक लेलँड आणि टाटा मोटर्सना देणार आहे. IOB ने सांगितले की त्यांनी Rs ३८१८० कोटी NPA पैकी Rs १५००० कोटींची वसुली केली. त्यामुळे लवकरच PCA मधून बाहेर पडेल.
सेबी ICICI बँक आणि चंदा कोचर यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. ICICI बँकेला ३० कोटी पर्यंत दंड करण्याची शक्यता आहे.
विशेष लक्षवेधी

  • वराक इंजिनीरिंग IPO आज पासून ओपन झाला. प्राईस बँड Rs ९६५ ते Rs ९६७ असा आहे. मार्केट लॉट १५ शेअर्सचा आहे. हा IPO २८ जून २०१८ रोजी बंद होईल. हा OFS आहे त्यामुळे या IPO तुन मिळणारा पैसा कंपनीकडे जाणार नाही. तर प्रमोटर्सकडे जाईल.
  • करूर वैश्य बँकेने १० शेअर्सवर १ शेअर बोनस जाहीर केला.
  • अवंती फीड्स आज एक्स बोनस आणि एक्स स्प्लिट झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५४९० NSE निर्देशांक निफ्टी १०७६९ आणि बँक निफ्टी २६६०१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
 

One thought on “आजचं मार्केट – २६ जून २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.