आजचं मार्केट – २७ जून २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २७ जून २०१८
गेले दोन आठवडे मार्केट निफ्टी १०७०० ते १०८०० या मर्यादेत फिरत होते. कोणत्यातरी बाजूने मार्केट सरकणार हे निश्चित होते रुपया US $ १ = ६८.५३ वर पोहोचला. हा रुपयांचा १९ महिन्यातील किमान दर आहे. क्रूड US $ ७६.५६ वर पोहोचले. USA ने अपील केले आहे की इराणकडून क्रूड खरेदी करू नका. वाढलेली क्रूड ची किंमत तसेच रुपयांचा कमी झालेला विनिमय दर यामुळे आज मार्केट निफ्टी १०० पाईंट पडले. आज करन्सी फ्युचर्सची एक्स्पायरी होती. RBI ने कोणतीही कारवाई न केल्यामुळे रुपया पडतच राहिला.
आज सरकारने साखर उत्पादकांवर दुहेरी सवलतींचा वर्षाव केली. Rs ५.५० प्रती क्विंटल ऊस सबसिडी जाहीर केली. यासाठी ठेवलेल्या सर्व अटी रद्द केल्या. तसेच इथेनॉलची किंमत Rs ३ प्रती लिटर वाढवण्यास मंजुरी दिली. सी ग्रेड मोलासिस आणि बी ग्रेड मोलासिस पासून काढलेल्या इथेनॉलवर किंमत वाढ जाहीर केली.
ITC च्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनची मुदत दोन वर्षांनी वाढवली. तसेच कंपनी नॉन सिगारेट बिझिनेसमध्ये Rs २५००० कोटींची गुंतवणूक करेल. FMGC बिझिनेससाठी २० जादा युनिट लावेल. कंपनीचा हॉटेल कारभार वाढवण्यावर भर असेल. HCL TECH ही कंपनी जर्मनीमधील H & D इंटरनॅशनल ला ३ कोटी युरो किमतीला खरेदी करेल. हा व्यवहार ऑगस्ट महिन्यात पुरा होईल. यामुळे कंपनीच्या जर्मनीमधील IT आणि इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या बिझिनेसमध्ये वाढ होईल. NCALTने इलेक्ट्रो स्टील स्टीलस कंपनीच्या शेअर्सचे डीलीस्टिंग थांबवण्यास नकार दिला. सरकारच्या ६३ मुन्स या कंपनीला टेकओव्हर करण्याच्या निर्णयावर स्टे देण्यास नकार दिला. गेटवे डिस्ट्रीपार्क ही कंपनी गेटवे रेल मधील ब्लॅकस्टोनचा स्टेक Rs ८१० कोटींना खरेदी करणार आहे. कॉक्स आणि किंग्स ऑस्ट्रियामध्ये नवीन हॉटेल काढणार आहे. फोर्टिस हेल्थकेअरचे तिमाही आणि वार्षिक निकाल निराशाजनक होते. तर मनपसंद बिव्हरेजीसचे निकाल समाधानकारक होते. एल आय सी जरी IDBI बँकेत स्टेक खरेदी करणार असली तरी व्यवस्थापन मात्र स्वतंत्रच राहील. IDBI बँक एल आय सी मध्ये मर्ज न होता एल आय सी ची सब्सिडीयरी म्हणून राहील.
विशेष लक्षवेधी

  • सेबीने HDFC AMC च्या IPO ला मंजुरी दिली.
  • GALANT इस्पात ची स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी २९ जून २०१८ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.
  • सोलारा एक्टिव फार्मा चे आज लिस्टिंग निराशाजनक झाले.
  • टाटा ग्रुपने खुलासा केला की वोल्टास मध्ये विनिवेश करण्याचा विचार नाही.
  • विश्वप्रधान कमर्शियल PVT LTD ही कंपनी ४५ दिवसात NDTV मध्ये ओपन ऑफर आणण्याची शक्यता आहे. कर्जाच्या वसुलीसाठी NDTV चे शेअर्स इशू केल्यामुळे ही ऑफर आणली जाईल. ही ऑफर २६ जुन २०१८ पासून ४५ दिवसाच्या आत आणावी लागेल. त्यामुळे NDTV चा शेअर वाढण्याची शक्यता आहे.

जे शेअर्स काही बाह्य परस्थितीजन्य कारणांमुळे पडतात पण इंटर्नल फॅक्टर्स इंटॅक्ट असतात आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी प्रश्न नसतील असे शेअर्स दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य असतात.
अजून उद्या जून महिन्यासाठीची F & O एक्स्पायरी आहे त्यामुळे मार्केट उद्याही व्होलटाइल राहण्याची शक्यता आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५२१७ NSE निर्देशांक निफ्टी १०६७१ आणि बँक निफ्टी २६४२३ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.