like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २८ जून २०१८
आज मार्केटची तब्येत जास्तच बिघडली. ब्रेंट क्रूड US $ ७८ वर पोहोचले. त्यातच रुपया सुद्धा US $ १ = Rs ६९.०९ पर्यंत पोहोचला. याला कारण म्हणजे FII म्हणजेच फॉरीन इंडीव्हिजुअल इन्व्हेस्टर्स त्यांची भारतातील गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यातच दुष्काळात तेरावा महिना असल्याप्रमाणे सेबीने १९ कंपन्यांवर २९जून २०१८ ते २६ जुलै २०१८ या कालावधीसाठी एक्स्पोजर मार्जिन वाढवले आहे. ASM लिस्ट मध्ये रोज दोन तीन शेअर्स समाविष्ट केले जात आहेत. अशा वेळी आयात करणाऱ्या कंपन्यांना तोटा तर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. ज्या कंपन्यांनी विदेशी चलनामध्ये कर्ज घेतले आहे त्या कंपन्यांची स्थिती बिकट होते. त्या विरुद्ध ज्यांना परदेशी चलनात पेमेंट मिळते त्यांचा फायदा होतो. उदा :- गुजरात पिपावाव आणि दीपक नायट्रेट.
मर्केटर लाईन्स या कंपनीला गुजरात सरकारकडून २० वर्षांसाठी मायनिंग लीज मिळाली. UPL या कंपनीचा मोठा बिझिनेस ब्राझीलशी संबंधित आहे. ब्राझीलची करन्सी कमजोर झाल्यामुळे UPL च्या शेअरवर परिणाम होतो. RBL बँकेने स्वाधार फिनसर्वमध्ये १००% स्टेक खरेदी केल्यामुळे आता ही कंपनी RBL बँकेची सबसिडीअरी झाली. महाराष्ट्रात छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना प्लास्टिकबंदीतून तीन महिन्यासाठी सूट दिली.
DR रेड्डीजच्या मेडक युनिटला USFDA ने क्लीनचिट दिली. पराग मिल्क या कंपनीने स्वीडनच्या कंपनीकडून पेटंट राईट्स खरेदी करण्यावर विचार करण्यासाठी येत्या सोमवारी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे. श्री सिमेंटने कर्नाटकातील कोंडला येथे वार्षिक ३० मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट सुरु केला.
रिलायांस इन्फ्रा चा मुंबईला पॉवर सप्लाय करण्याचा बिझिनेस अडाणी ट्रान्समिशनला विकण्यासाठी MERC ने ( महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन) मंजुरी दिली. रिलायन्स इंफ्राने सांगितले की यातून मिळालेला पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरला जाईल.
विशेष लक्षवेधी
- उद्या तारीख २९ जून २०१८ रोजी तळवलकर लाईफस्टाईल या कंपनीचे लिस्टिंग होणार आहे. ही कंपनी जिम्नॅशियमच्या बिझिनेसमध्ये आहे.
- इंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकेने जाहीर केलेला ६% लाभांश RBI ने दिलेल्या ऑर्डरनुसार रद्द केला.
- ज्योती लॅब या कंपनीच्या १:१ बोनसची आज एक्स डेट होती .
- VARROC इंजिनीअरिंगचा IPO १.१७ वेळा ओव्हर सबस्क्राईब झाला.
- रुपया आणि क्रूड दोन्ही सुधारल्याशिवाय मार्केटचे पडणे थांबेल असे वाटत नाही.
- ओव्हरसोल्ड झोन नंतर रिलीफ रॅली येईल. पण ट्रेडर सेल ऑन रॅलीज ही पद्धत अवलंबतील. जुलै महिन्यात पहिल्या तिमाहीचे निकाल सुरु झाले की मार्केटला नवीन ट्रिगर मिळेल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५०३७ NSE निर्देशांक निफ्टी १०५८९ तर बँक निफ्टी २६३२४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
नमस्कार मॅडम,
आपण जसे मार्केट बंद झाल्यानंतर समालोचन करता त्याचप्रमाणे उद्याच्या मार्केट विषयी थोडं सांगितलं तर आम्हाला अंदाज बांधता येईल की उद्या काय घडू शकते किंवा एखादया कंपनी विषयी सांगितलं तर त्यावर लक्ष ठेवता येईल
आपणास खूप खूप धन्यवाद,निरोगी रहा,आनंदी रहा.
आपण जसे मार्केट बंद झाल्यानंतर समालोचन करता त्याचप्रमाणे उद्याच्या मार्केट विषयी थोडं सांगितलं तर आम्हाला अंदाज बांधता येईल की उद्या काय घडू शकते किंवा एखादया कंपनी विषयी सांगितलं तर त्यावर लक्ष ठेवता येईल
आपणास खूप खूप धन्यवाद,निरोगी रहा,आनंदी रहा.