आजचं मार्केट – १९ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १९ जुलै २०१८

मार्केटचा ट्रेंड अजूनही निश्चित झालेला नाही. सर्व कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल येईपर्यंत तो निश्चित होण्याची शक्यता नाही. आज रुपया US $ १ = Rs ६९ च्या पुढे गेला. ( रुपयांची किंमत कमी झाली ) त्यातच कालपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन चालू झाले. यातच अविश्वासाचा ठराव मंजूर झाला अशी बातमी दाखवण्यात आली. खरे म्हणजे अविश्वासाचा ठराव लोकसभेत दाखल करून घ्यायला परवानगी दिली अशी बातमी पाहिजे होती. विरोधी पक्षाकडे आवश्यक ते संख्याबळ नसल्यामुळं अविश्वासाचा ठराव पास होणे शक्य नाही ही काळ्या दगडावरची रेघ! पण सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनाही आपापली बाजू मांडण्याची ही एक सुवर्ण संधी मिळाली. उद्या यावर मतदान अपेक्षित आहे.

ऑइल इंडिया आणि ONGC यांना सरकारला रॉयल्टी कमी द्यावी लागेल. प्रॉडक्शन शेअरिंग कॉन्ट्रँक्टला मंजुरी मिळाली.नवीन ब्लॉकमधून जे एक्स्प्लोरेशन केले जाईल त्याची किंमत ठरवण्याची मुभा कंपन्यांना दिली जाणार आहे. ONGC त्यांचा ‘पवन हंस’ मधील स्टेक विकणार आहे. ‘पवन हंस’ मध्ये सरकारचा ५१% आणि ONGC चा ४९% स्टेक आहे.या कारणामुळे ऑइल इंडिया, ONGC, सेलन एक्स्प्लोरेशन, गेल हे शेअर्स वाढले.

आघाडीवर असणारा ब्रिटानिया आणि अशोक लेलँड हे दोन्ही शेअर्स पडत आहेत. सरकारनी वाढवलेली MSP, FRP, वाढलेले गव्हाचे, दुधाचे, ड्राय फ्रूटचे भाव या सर्वांमुळे प्रॉडक्शन कॉस्ट वाढत आहे. म्हणून ब्रिटानियाच्या शेअर मध्ये प्रॉफिट बुकिंग चालू आहे.अशोक लेलँड च्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले की सरकारने वर्तमान वाहनातून वजन वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ केल्यामुळे अशोक लेलँडची विक्री कमी होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण वाहतूक करणारे या आधीच जास्त वजन वाहून नेत होते त्यामुळे सरकारने आता हे कायदेशीर केले इतकेच. त्यामुळे वाहनांना असणाऱ्या मागणीत फरक पडणार नाही. या स्पष्टीकरणानंतर थोडा वेळ सावरलेला हा शेअर पुन्हा पडायला लागला. ह्या शेअरची किंमत Rs १०० च्या आसपास स्थिरावेल अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रामध्ये Rs ३८३० कोटीच्या सिंचाई योजनेला परवानगी मिळाली. याचा फायदा शक्ती पम्प, रोटो पम्प, जैन इरिगेशन, फिनोलेक्स पाईप आणि इतर पाईप बनवणार्या कंपन्या यांना होईल. सचिन तेंडुलकरच्या ‘SMAAASH ENTERTAINMENT’ या कंपनीने IPO ला परवानगी मिळावी म्हणून सेबीकडे अर्ज केला आहे. P.N गाडगीळ अँड सन्स यांना IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली. ही कम्पनी जेम्स आणि ज्युवेलरी क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यात याचा बिझिनेस चालतो. ‘ALERIS’ ही कम्पनी हिंडाल्कोने US $ २५० कोटींना विकत घेतली.

विशेष लक्षवेधी

माईंड ट्रीचा निकाल सर्वसाधारण आला ऑपरेटिंग मार्जिन कमी झाले. J K टायर्स तोट्यातून फायद्यात आली. महिंद्रा CIE, बजाज फायनान्स , RBL बँक , कोटक महिंद्रा बँक सरलाईट टेक्नॉलॉजीज, GNA ऍक्सेल्स, यांचे निकाल चांगले आले.

वेध उद्याचा

  • उद्या विप्रो, बजाज ऑटो, हॅवेल्स, HDFC स्टॅंडर्ड लाईफ यांचे निकाल येणार आहेत. तेव्हा या शेअर्सवर लक्ष ठेवावे. यातील बजाज ऑटो, HDFC स्टॅंडर्ड लाईफ याचे निकाल चांगले लागतील असा अंदाज आहे.
  • उद्या ‘जस्ट डायल’ या कंपनीने शेअर ‘BUY BACK ‘ वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३५१ NSE निर्देशांक निफ्टी १०९५७ आणि बँक निफ्टी २६७८९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.