आजचं मार्केट – २० जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जुलै २०१८

आज निफ्टीने पुन्हा ११००० चा स्तर पार केला. पण पूर्वीच्या आणि आजच्या रचनेमध्ये फरक होता. आज ब्रॉडबेस्ड खरेदी दिसली. मिडकॅप स्मॉल कॅप शेअर्सही काही प्रमाणात वधारले त्याच बरोबर बजाज ऑटो सारख्या कंपनीचे निकाल पसंतीस उतरले नाहीत म्हणून मार्केटने या शेअर्सना शासनही केले. आतापर्यंत आलेले निकाल बहुतांशी चांगले आले. क्रूड US $ ७३ च्या खालीच आहे, पण करंसीचे अवमूल्यन होते आहे. त्यामुळे जेवढा परिणाम दिसायला हवा तेवढा दिसत नाही. एक US$ ची किंमत Rs ७० होण्याची शक्यता आहे तर चीनी युवानची किंमत कमी होत आहे म्हणजेच युवान वीक होत आहे. ही खरी पाहता पोर्टफोलिओ नव्याने तयार करण्याची वेळ आहे. ‘A’ ग्रुप मधले ५ शेअर्स ५२ आठवड्यातील कमाल स्तरावर तर ४७ शेअर्स ५२ आठवड्यातील किमान स्तरावर आहेत.

हिंदाल्कोच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले की ‘अलेरीस’ कंपनी अक्वायर करण्याबाबत कोणतीही बोलणी चालू नाहीत. पण अजून ही गोष्ट गुंतवणूकदारांच्या पचनी पडलेली नाही. कोणतेही अक्विझिशन केल्यानंतर ती कंपनी टर्न अराउंड करण्याबाबत हिंडाल्कोचा इतिहास चांगला नाही. नोव्हालीसच्या अक्विझिशननंतर त्या कंपनीला टर्न अराउंड करायला ८ वर्ष लागली. त्यामुळे नवीन अक्विझिशनच्या बातमीने गुंतवणूकदारांत घबराट होऊन शेअर पडला.
बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व यांच्या निकालाचे गुंतवणूकदारांना आकलन झाले नव्हते. सुधारित अकौंटिंग स्टॅंडर्डप्रमाणे या कंपन्यांचे निकाल आले. या निकालाप्रमाणे चांगली ग्रोथ होईल असे जाणवताच गुंतवणूकदारांनी सपाटून खरेदी केली.

JSW स्टील या कंपनीला NCLT मध्ये गेलेली मॉनेट इस्पात ही कंपनी मिळते आहे असे दिसते. गुंतवणूकदारांनी दोन्ही कंपन्यांपासून काही काळ दूर राहावे. या रेझोल्यूशन प्लॅन प्रमाणे कर्ज देणार्या बँकांना तसेच गुंतवणूकदारांना फारसा फायदा होईल असे दिसत नाही. इलेकट्रोस्टील स्टिल्स चा अनुभव हेच दर्शवतो. इलेक्ट्रोस्टील स्टील्स चे ५० शेअर असलेल्या शेअरहोल्डर्सना भांडवल कमी करण्याच्या योजनेनुसार एक शेअर दिला जाणार आहे. ७५% ते ८०% हेअरकट घेतला जातो. शेअर कॅपिटलही कमी केले जाते म्हणजे कोणाचाच फायदा होत नाही. जो कंपनी घेतो आहे त्याच्या शिरावरही कर्जाचा बोजा वाढतो. बँकांना जेवढे पैसे मिळतात त्याच्यावर समाधान मानावे लागते.

सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की आता थर्ड पार्टी इन्शुअरन्स अनिवार्य असेल. चार चाकी वाहनांसाठी ३ वर्षांचा आणि दुचाकी वाहनांसाठी ५ वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुअरन्स काढणे वाहन खरेदी बरोबर अनिवार्य असेल. हा नियम १ सप्टेंबर २०१८ नंतर विकल्या जाणाऱ्या वाहनांना लागू होईल. त्यामुळे जनरल इन्शुअरन्स कंपन्यांचे शेअर्स वाढले. उदा न्यू इंडिया अशुअरन्स कंपनी , ICICI लोम्बार्ड

विशेष लक्षवेधी

 • फोर्टीज हेल्थ केअर साठी IHH ७ सप्टेंबर २०१८ ते २४ सप्टेंबर २०१८ या काळात ओपन ऑफर आणेल.
 • अलेम्बिक फार्माच्या काराखाडी युनिटला USFDA कडून मंजुरी मिळाली. त्यामुळे शेअर वाढला.
 • सिएट या कंपनीचा निकाल फारच चांगला आला. तोट्याऐवजी चांगला नफा झाला. यामुळे MRF, अपोलो टायर्स या आणि इतर टायर कंपन्यांचे निकाल समाधानकारक असतील असा अंदाज आहे. अतुल ऑटो या कंपनीचा निकाल चांगला आला.
 • TCNS क्लोदिंगचा IPO शेवटच्या दिवसपर्यंत ५.२ पट भरला होता.

वेध उद्याचा

पुढील आठवड्यात खालीलप्रमाणे कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

 • २३ जुलै २०१८ ग्रॅनुअल्स, HOEC, हिंदुस्थान झिंक, तेजस नेटवर्क, युनायटेड स्पिरिट्स, विजया बँक
 • २४ जुलै २०१८ एशियन पेंट्स, हेक्झावेअर, ICICI प्रु .
 • २५ जुलै २०१८ PVR, SKF, टाटा एलेक्सि, ज्युबिलंट फूड्स
 • २६ जुलै २०१८ भारती, कोलगेट, ग्राईंडवेल नॉर्टन, ITC, जम्मू अँड काश्मीर बँक, येस बँक .
 • २७ जुलै २०१८ बँक ऑफ बरोडा, ICICI बँक, HCL टेक

वरील वेळापत्रक लक्षात ठेवून आपण पहिल्या तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांच्या अपेक्षित निकालाप्रमाणे ट्रेडिंग/ गुंतवणूक करू शकता. दूरदर्शनवरील वाहिन्या वेळोवेळी या कंपन्यांचे निकाल कसे येतील याविषयीचा अंदाज व्यक्त करत असतात. त्याचीही मदत घ्यावी.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४९६ NSE निर्देशांक निफ्टी ११०१० आणि बँक निफ्टी २६८७३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

One thought on “आजचं मार्केट – २० जुलै २०१८

 1. रवी रानडे

  मराठीत शेअर मारकेट विषयी उपयुक्त माहिती उपलब्ध केले बददल धन्यवाद!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.