आजचं मार्केट – २३ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ जुलै २०१८

आज नव्या आठवड्याला जोमाने सुरुवात झाली. नो कॉन्फिडन्स मोशनचा निकाल सरकारच्या बाजूने लागला. त्यामुळे एक अडथळा पार झाला. ट्रम्प साहेबाचे वक्तव्य भारी पडले फेड रिझर्व्हच्या टायटनिंग पॉलिसीवर केलेली टीका, ट्रेंड वार , युरोपियन युनियन आणि चीन त्यांच्या चलनात करत असलेले फेरबदल, यावर दिलेली कडवट प्रतिक्रिया यामुळे US $ घसरला. चीनचे वाढत चाललेले कर्ज आणि युरो रिजनचे विभाजन होण्याचे संभाव्य संकट याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
सध्याच्या मार्केटला ‘क्वालिटी बबल मार्केट’ असे म्हणता येईल. चांगल्या क्वालीटीचे शेअर्स अती  तेजीत आहेत आणि स्मॉलकॅप  मिडकॅप मंदीत आहेत त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये तोटा दिसतो. आज मार्केट सावरण्यात मुख्य हात होता ITC चा, ITC चे निफ्टीमध्ये असणारे मजबूत वेटेज आणि GST मधील दर कपातीने  दिलेला टेकू  ही कारणे होती
२३ एप्रिलच्या NSE च्या सर्क्युलर प्रमाणे जुलै २०१८च्या  एक्स्पायरी पासून ४६ शेअर्स मध्ये फिझिकल सेटलमेंट होणार आहे. त्यामुळे ब्रोकरनी  ट्रेडर्सना   गुरुवारच्या आधी दोन दिवस  आपल्या पोझिशन्स क्लोज/कॅरी फॉरवर्ड  करायला सांगितले आहे. जर गुरुवारपर्यंत तुमची पोझिशन ओपन  राहिली तर  तुम्हाला शेअर्सची फिझिकल डिलिव्हरी द्यावी /घ्यावी लागेल.
८८ वस्तूंवरचा GST  कमी करण्यात आला.
 • ग्रॅनाईट -पोकर्ण
 • हॉटेल -रॉयल  ऑर्चिड, लेमन ट्री, इंडियन  हॉटेल्स,
 •  हिटर आणि इस्त्री -बजाज इलेक्ट्रिकल्स V-गार्ड हॅवेल्स,
 • फूटवेअर- बाटा, लिबर्टी, खादिम, रिलॅक्सो
 • इथेनॉल – प्राज इंडस्ट्रीज, HPCL , इंडियन ग्लायकॉल ,
 • सॅनिटरी नॅपकिन – प्रॉक्टर अँड गॅम्बल
 • पेंट्स-एशियन पेंट्स बर्जर पेंट्स कन्साई नेरोलॅक
 •  टी व्ही- मर्क, BPL ,लील इलेक्ट्रिकल्स

याप्रमाणे GST चे दर कमी केल्याचा फायदा होईल.पुढील GST च्या बैठकीत बिल्डिंग साठी लागणाऱ्या सिमेंटवरचा GST कमी करण्याबाबत विचार केला जाईल.

VST इंडस्ट्रीजचा निकाल चांगला लागला.याचा परिणाम (रब ऑफ इफेक्ट )  गॉडफ्रे फिलिप्स आणि ITC या कंपन्यांच्या शेअर्स वर होऊन या शेअर्सच्या किमती वाढल्या.
शुक्रवारी मी आपल्याला हिंदाल्को विषयी माहिती दिली होती आज आपण UPL च्या अक्विझिशन विषयी बोलू. UPL  चा बिझिनेस बाझिलमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. ब्राझीलचे चलन WEAK झाले आहे. म्हणून मुळातच UPL च्या शेअर्सचा भाव गडगडला आहे. ARYSTA लाईफ सायन्सच्या अक्विझिशनच्या बातमीने शेअर १५% वाढला. हे अक्विझिशन UPL च्या ग्रोथच्या दृष्टीने फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. या अक्विझिशनमुळे UPL ही सर्वात मोठी पीक संरक्षण कंपनी होईल
विशेष लक्षवेधी 
 • विजया बँक, HOEC, हिंदुस्थान झिंक, L & T इन्फोटेक यांचे निकाल समाधानकारक होते.
 • MCX आणि साऊथ इंडियन बँक याचे निकाल असमाधानकारक होते.
 • मारुतीने त्यांच्या मानेसर प्लांटमध्ये २ कोटी कार्सचे उत्पादन केल्यामुळे मारुतेचा शेअर वाढला.
वेध उद्याचा 
आजच्या मार्केटमध्ये ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो चांगला होता मिडकॅप आणि स्माल कॅप वाढत होते त्यामुळे निफ्टीने ११०८०चा स्टार पार करून ११०८० च्यावर क्लोज झाला. या स्तरावर निफ्टी गेला तर १११३० पर्यंत जाईल आणि हा स्टार जर टिकवला नाही तर १०९३० पर्यंत खाली येईल.त्यामुळे लहान लहान ट्रेड  घ्यावा.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६७१८  NSE निर्देशांक निफ्टी १११०८४ आणि बँक निफ्टी २७००८  वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.