आजचं मार्केट – २४ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ जुलै २०१८

आज सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्हीही निर्देशांक नव्या उच्चांकावर पोहोचले. लोकांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध नाहीत त्यामुळे पैसा मार्केटकडे येत आहे आणि निवडक लार्जकॅप शेअर्स मध्ये रॅली येत आहे. आज F&O मार्केट मध्ये ४६ शेअर्स मधील पोझिशन क्लोज करायला सांगितल्या मुळे अनपेक्षित शेअर वाढत होते. मिडकॅप आणि स्माल कॅप शेअर्स कोणत्याही मूलभूत कारणांमुळे पडत नसून ट्रेडिंगवरील निर्बंध, ASM, म्युच्युअल फंडांना करावी लागणारी अडजस्टमेन्ट, मार्जिन रिक्वायरमेंटमध्ये केलेली वाढ, आणि ४६ शेअर्स मध्ये अनिवार्य केलेली फिझिकल सेटलमेंट यामुळे पडत होते. विक्री वाढत गेली आणि किरकोळ गुंतवणूकदार घाबरल्यामुळे खरेदी थांबली. त्यामुळे अजूनही निफ्टी ज्युनियर मध्ये चांगले शेअर किफायती भावात उपलब्ध आहेत.

सरकार व्हाईट गुड्स( फ्रिज वाशिंग मशीन इत्यादी) वर २०% इम्पोर्ट ड्युटी बसवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे मर्क, वोल्टास, गोदरेज, व्हर्लपूल, सिम्फनी याचे शेअर्स वाढले

यावर्षी जेष्ठ अधिक महिना असल्यामुळे सगळे सणवार Q३ मध्ये येत आहेत त्यामुळे सर्व निकाल Q३ मध्ये येतील. दरवर्षी सणवार Q२ मध्ये येत असल्यामुळे दरवर्षी Q२ चे निकाल चांगले यायचे. आता ते सर्व निकाल Q३ मध्ये येतील.

आज आपण बजाज ऑटो या ऑटो क्षेत्रातील कंपनीची थोडी माहिती घेऊ. बजाज ऑटो आपला मार्केट शेअर वाढवण्यासाठी प्राईस कट करणार आहे. ही स्पर्धा HEALTHY म्हणता येणार नाही. यामुळे पुढील तीन वर्षे ऑपरेटिंग मार्जिन कमी होईल. प्राईस वार सुरु होईल. त्यामुळे गुंतवणूकदार दुचाकी वाहनक्षेत्रातील कंपन्यातुन बाहेर पडून चारचाकी वाहनांमध्ये घुसत आहेत.

विशेष लक्षवेधी

  • GSK फार्माचे निकाल चांगले आले कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
    रॅडिको खैतान, हेक्झावेअर, सेंच्युरी प्लायवूड, डेल्टा कॉर्प, इंडिया बुल व्हेंचर, L & T इन्फोटेक, L & T टेक्नॉलॉजी, टी व्ही १८ ब्रॉडकास्टींग,तेजस नेटवर्क, एशियन पेंट्स( डेकोरेटिव्ह पेंट्समध्ये डबल डिजिट ग्रोथ दिसली) यांचे निकाल चांगले आले.
  • ACC चे निकाल चांगले आले. सिमेंट वरील GST कमी होईल या अपेक्षेने सिमेंट क्षेत्रात तेजी दिसली.
    आता कमर्शियल वाहनांचे वर्किंग लाईफ सरकार ठरवेल. हे लाईफ २० वर्षापर्यंत असून त्यापेक्षा जुनी असलेली वाहने २०२० सालाट स्क्रॅप केली जातील.
  • NHPC मधली आपला स्टेक सरकार NTPC ला विकणार आहे.
  • आयडिया आणि व्होडाफोन यांच्या मर्जर साठी आवश्यक असलेली Rs ७३०० कोटींची बँक गॅरंटी सरकारला केल्यामुळे या मर्जरला आता सरकारची मंजुरी मिळेल.

वेध उद्याचा

सेबीने ज्या F & O मधील ४६ शेअर्सची एक्स्पायरी डेटला फिझिकल डिलिव्हरी देऊन/घेऊन सेटलमेंट करावी लागेल असे जाहीर केले आहे त्याची यादी खाली देत आहे.

अडाणी पॉवर, अजंता फार्मा, अलाहाबाद बँक, आंध्र बँक ,बलरामपूर चिनी, BEML , बर्जर पेंट्स, कॅन फिना होम्स, CG पॉवर & इंडस्ट्रियल सोल्युशन्स, चेन्नई पेट्रो DCB बँक, गॉडफ्रे फिलिप्स, गोदरेज इंडस्ट्रीज, GRANULES, GSFC HCC, हेक्सावेअर , IDBI बँक, IFCI जयप्रकाश अस्सोसिएट्स, जस्ट डायल, कावेरी सीड्स, KPIT टेकनॉलॉजीज, महानगर गॅस, MRPL, NHPC, NIIT टेक, ऑइल इंडिया, ओरॅकल फायनान्स, ओरिएंटल बँक PTC, PVR, R COM रिलायन्स नावल, रिलायन्स पॉवर, रेपको होम फायनांस, रामको सिमेंट, SREI इन्फ्रा, सिण्डिकेट बँक, SRF , टॉरंट पॉवर, TV १८ ब्रॉडकास्ट, युनायटेड ब्रुअरीज, व्ही गार्ड इंडस्ट्रीज, WOCKHARDT .

या ४६ शेअर्स मध्ये F & O मधील हालचालींप्रमाणे पुढील दोन दिवसात तेजी किंवा मंदी होऊ शकते. या शेअर्सवर लक्ष ठेवले तर आपण चांगले शेअर्स कमी किमतीत घेऊ शकाल किंवा आपल्याकडील पडीक शेअर्स त्यांची किंमत वाढली तर विकू शकता.

उद्यापासून HDFC AMC चा IPO ओपन होत आहे. ही कंपनी HDFC ग्रूपमधली कंपनी असून HDFC म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करते. या IPO मध्ये अर्ज करण्याचा विचार अवश्य करावा.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६८२५ NSE निर्देशांक निफ्टी १११३४ आणि बँक निफ्टी २६९७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.