आजचं मार्केट – २५ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ जुलै २०१८

ट्रम्पच्या ट्रेड वॉरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर BRICS च्या बैठकीत उपाय काढण्याचा प्रयत्न केला जाईल. यात ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश आहे. जगातील सर्व देशांमध्ये व्यापारी संबंधांचा तोल राखण्याचे आवाहन केले जाईल. आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडाने इंडियाला इशारा दिला आहे की CAD सावरण्यासाठी जागतिक अर्थ साहाय्यावर अवलंबून राहणे कमी करावे.अशा वातावरणात आजचे मार्केट सुरु झाले. त्यातच USA मध्ये क्रूडचा साठा कमी झाल्यामुळे आज क्रूड थोडेसे वाढले तरी रुपया बराच सुधारल्यामुळे त्याचा परिणाम मार्केटला जाणवला नाही. त्यातच उद्या असणारी एक्स्पायरी आणि अनेक कंपन्यांचे येत असलेले पहिल्या तिमाहीचे निकाल त्यामुळे मार्केट डोलायमान अवस्थेत होते.

हिरो मोटो च्या बाबतीत प्रॉब्लेम आहे की कमोडिटीच्या किमती वाढत आहेत तसेच त्यांच्या हरिद्वार प्लाण्टला मिळणारे टॅक्स बेनिफिट बंद झाले आहेत. बजाज ऑटोने आपल्या बाईकच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा परिणाम हिरो मोटोवर होईल. या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यातील किमान स्तरावर आहे आणि ऑटो क्षेत्रातील इतर कंपन्यांशी तुलना करता P/E रेशियोप्रमाणे स्वस्त आहे. त्यांचे निकाल चांगले आले तर शेअरवर चांगला परिणाम दिसेल.

बजाज अलायन्झने ‘आयुष्मान भारत’ योजनेखाली पश्चिम बंगाल राज्यासाठी बोली जिंकली. ४.८७ लाख टन रूळ खरेदी करण्यासाठी रेल्वेनी ग्लोबल टेंडर काढले आहे. JSPL ला १ लाख टन रूळ पुरवण्याचे काम मिळेल असा अंदाज आहे. PVR लवकरच म्हैसूर मध्ये ४ स्क्रीन मल्टिप्लेक्स चालू करणार आहे.ऑडिटोरियम मध्ये खाद्य पदार्थ न्यायला परवानगी देण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध केलेलया अपीलाची सुनावणी मुंबई हायकोर्टाने १५ दिवस पुढे ढकलली. CCI ने सिमेंट कंपन्यांना Rs ६३०० कोटी दंड ठोठावला होता. या दंडाविरुद्ध NCLAT कडे केलेले अपील NCLAT ने फेटाळले. त्यामुळे सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडले.

सरकार लवकरच नवीन औद्योगिक धोरण जाहीर करेल. यात आजारी उद्योगांना मदत करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्यावर भर असेल. प्रत्येक कंपनीला आयडेंटिफिकेशनसाठी एक युनिक नंबर दिला जाईल. कंपनीला मिळणारी विजेसाठी सबसिडी कंपनीच्या खात्यात जमा केली जाईल. सरकार एक इंडस्ट्रियल हेल्थ क्लिनिक स्थापन करेल. या संस्थेकडून आजारी उद्योगांना सर्व प्रकारची मदत आणि सल्ला मिळेल.

विशेष लक्षवेधी

 • म्युझिक ब्रॉडकास्टचे निकाल चांगले आले. ही कंपनी आपले १५ लाख शेअर्स प्रती शेअर Rs ३८५ या भावाने BUY बॅक करेल. यासाठी कंपनी Rs ५७ कोटी खर्च करेल.
 • SKF, नोसिल, क्रॉम्प्टन कंझ्युमर, ज्युबिलंट फूड्स, वेलस्पन एंटरप्राईझेस, एवरेस्ट इंडस्ट्रीज, JSW स्टील, KSB पंप्स, JSPL,BHEL, ICICI प्रु ( प्रीमियम इन्कम वाढले) यांचे निकाल चांगले आले.
 • सिम्फनीचे निकाल असमाधानकारक होते.
 • सरकार आपला NHPC मधील स्टेक NTPC या कंपनीला ट्रान्स्फर करणार आहे. यासाठी NTPC कडे असलेली कॅश वापरली जाईल आवश्यकता वाटल्यास सरकार यासाठी कर्ज काढेल.
 • सरकार BEL या कंपनीतील आपला ५% स्टेक OFS द्वारे विकणार आहे.
 • इंडिगो या विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीची A ३२० NEO या जातीची पांच विमाने एंजिनात बिघाड असल्यामुळे दिल्ली विमानतळावर थांबवली. यामुळे इंडिगोचा शेअर पडला.
 • मारुतीने १२७९ नवीन स्विफ्ट आणि DZIRE गाड्या परत मागवल्या. त्यामुळे मारुतीचा शेअर पडला.
 • PC ज्युवेलर्स च्या कमर्शियल पेपरचे रेटिंग कमी केले. शेअर जबरदस्त पडला.

वेध उद्याचा

 • लार्सन & टुब्रोचा निकाल चांगला आला. प्रॉफिट, विक्री, ऑर्डर इनफ्लो, तसेच ऑर्डर बुक यांच्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे या शेअरकडे लक्ष ठेवावे.
 • हिरो मोटो या कंपनीचे फायदा उत्पन्न मार्जिन अपेक्षेच्या मानाने कमी आले. हिरो मोटो कॉर्पच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी अथर एनर्जी मध्ये Rs १३० कोटी गुंतवणुकीला मंजुरी दिली
 • उद्या F & O मार्केटची जुलै महिन्याची एक्स्पायरी आहे. त्यामुळे मार्केट व्होलटाइल राहण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६८५८ NSE निर्देशांक निफ्टी १११३२ आणि बँक निफ्टी २७०३१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.