आजच मार्केट – २६ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजच मार्केट – २६ जुलै २०१८

मार्केटचा उच्चांक म्हणजे आमच्या दृष्टीने एव्हरेस्ट शिखर. कोणत्या बाजूने चढून शिखर गाठायचे पश्चिम पूर्व का उत्तर दक्षिणेच्या. कोणत्याही बाजूने गाठा पण शिखरावर पोहोचून झेंडा फडकवणे महत्वाचे.असाच आज निफ्टीने २९ जानेवारी २०१८ नंतर १२८ ट्रेडिंग सेशननंतर १११७०च्या वर जाऊन नवीन उच्चांक प्रस्थापित केला.पण त्याला एकच गालबोट म्हणजे मार्केट त्या ठिकाणी टिकू शकले नाही. २०१८ च्या सात महिन्यात निफ्टीने १४ वेळा कमाल स्तर पार केला आहे, आज बँक निफ्टीने निफ्टीला सुंदर साथ दिली.

आज जवळजवळ सर्व कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. त्यामुळे अच्छे दिन निदान या कंपन्यांबाबतीत तरी आले असे म्हणावे लागेल. सरकार ATF(एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) येत्या दोन महिन्यात GST च्या अमलाखाली आणेल. ATF वर १८% GST लावावा अशी सरकारने शिफारस केली आहे. यामुळे ATF वर होणारा विमान वाहतूक कंपन्यांचा खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे. पण आज मात्र विमान वाहतूक करणाया कंपन्यांच्या शेअर्सवर याचा परिणाम दिसला नाही.

वोडाफोन आणि आयडिया यांच्या मर्जरला DOT ने मंजुरी दिली. MMRDA या कायद्याच्या २५व्या कलमामध्ये मायनिंग उद्योगाला काही सूट देण्याचा विचार माननीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत केला जाईल. याचा फायदा गोव्यातील मायनिंग उद्योगाला म्हणजेच पर्यायाने वेदांताला होईल.

आज हिंदाल्कोची १००% सबसिडी असलेल्या नॉवेलीसने ‘अलेरीस’ या कंपनीचे US $ २६८ कोटींमध्ये अधिग्रहण केले. हे ऑल कॅश डील असेल. ३४३ औषधांची तपासणी करण्यात आली होती त्या तपासणीत ही औषधे घेण्यास अयोग्य आहेत असे आढळून आले याचा परिणाम सिप्ला,व्होकार्ट सन फार्मा यांच्यावर होईल.

डिश टीव्ही ची ओपन ऑफर चालू असल्यामुळे शेअरच्या किमतीला सपोर्ट मिळत होता. काल ओपन ऑफर पूर्ण झाली .

विशेष लक्षवेधी

कंपन्या आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत.
अंबुजा सिमेंट, भारती इंफ्राटेल, गृह फायनान्स, कोलगेट, श्रीराम ट्रान्सपोर्ट, KPIT टेक, हायडलबर्ग सिमेंट, येस बँक ( उत्पन्न आणि प्रॉफिट वाढले पण NPA आणि प्रोव्हिजन वाढली), कॅनरा बँक, DR रेडीज, बेयर क्रॉप, एफबी इंडस्ट्रीज, एव्हरेड़ी, टाटा पॉवर ( यात गुंतवणुकीसंबंधात झालेला नफा Rs १८७१ कोटी आहे) या कंपन्यांचे निकाल चांगले आले.

यावेळी मार्केटच्या पॅटर्नमध्ये एक गोष्ट लक्षात आली. आता गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स कोणत्याही शेअर्समध्ये जास्त वेळ थांबायला तयार नाहीत. अपेक्षित निकाल लक्षात घेऊन शेअरची खरेदी करायची आणि अपेक्षित निकाल कितीही चांगला असला तरी ताबडतोब आपल्याला होत असलेले प्रॉफिट घरी घेऊन जायचे. हा त्यांचा गेले काही दिवस असलेल्या मार्केटच्या पॅटर्नला प्रतिसाद आहे असे वाटते. आज याची उदाहरणे म्हणजे लार्सन आणि टुब्रो, DR रेडीज, आणि मारुती होय. मारुतीचा निकाल असमाधानकारक म्हणता येणार नाही पण ज्या अपेक्षेने शेअरचा भाव वाढला होता ती अपेक्षा पुरी न झाल्याने शेअर पडला.

सर्व कंपन्यांचे निकाल चांगले येत आहेत. याचा अर्थ कमीतकमी काही क्षेत्रात आपली प्रगती होत आहेत असा घ्यावयास हरकत नाही. बँकाही हळू हळू NPA च्या काळ्या सावलीतून बाहेर येत आहेत असे वाटते.

वेध उद्याचा

  • उद्या HDFC AMC च्या IPO चा शेवटचा दिवस आहे. ग्रे मार्केटमध्ये याचा भाव Rs १५०० पर्यंत चालू आहे. ग्रे मार्केट विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी ‘या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे.
  • गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनस इशू वर विचार करण्यासाठी बोलावली आहे.
  • उद्या F & O ची ऑगस्ट सिरीज सुरु होईल. त्यामुळे उद्याच्या मार्केटचा रंग थोडा वेगळा असेल

मार्केटचा हा चालू असलेला बुल रन ३ वर्ष तरी टिकेल. पण या काळात जेव्हा वेळोवेळी करेक्शन येईल त्या त्या वेळेला आपल्या पोर्ट फोलिओ मध्ये योग्य ते बदल करावे लागतील. सध्या IT आणि FMCG THEME चालू आहे. पण ही थिम बुल मार्केटच्या पुढच्या फेजमध्ये बदलू शकते . या क्षेत्रातलया कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती अवास्तव वाढतील. त्यावेळी नवीन थिम जन्माला येईल. सध्या मिडकॅप आणि स्माल कॅपमध्ये करेक्शन आले आहे. मार्केटमध्ये काही निवडक शेअर वाढत आहेत त्यामुळे बहुसंख्य गुंतवणूकदारांना कमी फायदा किंवा तोटा होत आहे.जसे दोनतीन खेळाडूंनी शतके केली तरी संघ समतोल असल्याशिवाय सामना जिंकता येत नाही. आणि सर्वांना आनंदात सहभागी होता येत नाही. त्यामुळे मार्केट शिखरावर असले तरी प्रत्येक ट्रेडर गुंतवणूकदार आनंदी नाही हे मला जाणवते आहे. पण आपल्याही शेअरला चांगला भाव मिळेल अशी इच्छा करू.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९८४ वर NSE निर्देशांक निफ्टी १११६७ वर आणि बँक निफ्टी २७४०६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.