आजच मार्केट – २७ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजच मार्केट – २७ जुलै २०१८

आज ऑगस्ट सिरीजच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी, आणि बँक निफ्टी या तिन्ही निर्देशाकांनी ऑल टाइम उच्चांक गाठला. सर्व क्षेत्रातल्या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले येत असल्यामुळे ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी खरेदी केली.

सध्याचे मार्केट फार गोंधळाचे आहे. एका बाजूला चांगला होत असलेला पाऊस, भारतात येत असणारा पैसा, कंपन्यांची होत असलेली प्रगती, पहिल्या तिमाहीचे येणारे चांगले कॉर्पोरेट निकाल, ह्या गोष्टी आहेत. तर ट्रेड वॉर, इंटरेस्ट रेट, निवडणुका, ट्रम्प साहेबांचे ट्विट या विरोधी गोष्टी सुरु आहेत. पूर्वीच्या बुल मार्केटचे शेअर्स आणि यावेळी वाढणारे शेअर्स भिन्न आहेत. मार्केटचे प्रतिबिंब पोर्टफोलिओमध्ये येण्यासाठी काळाप्रमाणे बदल करणे गरजेचे आहे. या मार्केटमध्ये युटिलिटी कंपन्याआणि कंझम्पशन कंपन्या, ऑइल गॅस आणि पेट्रोलियम कंपन्या हा थिम पुढील तीन वर्षांसाठी राहील असे वाटते.
चोलामंडलम फायनान्स, SBI लाईफ, बँक ऑफ बरोडा, QUESS कॉर्प, HCL टेक पेट्रोनेट, एस्सेल प्रोपॅक, प्रिसम जॉन्सन, JSW एनर्जी, रॉयल अर्चिड, बायोकॉन, नागार्जुना फर्टिलायझर, ज्युबीलीयंट लाईफ, M M फायनान्स कंपनी, फिलिप्स कार्बन, ITC, या कंपन्यांचे निकाल चांगले आले.

ITC चे सिगारेट्सचे व्हॉल्युम चांगले होते, याचा परिणाम गॉडफ्रे फिलिप्स, VST इंडस्ट्रीज यावर झाला. शॉपर्स स्टॉप, वेस्टसाईड डेव्हलपर्स या कंपन्या टर्न अराउंड झाल्या. IOB चा निकाल अतिशय निराशाजनक आला. ICICI बँकेचे NPA कमी झाले पण प्रोव्हिजन जास्त करायला लागल्यामुळे पहिल्या तिमाहीसाठी लॉस दाखवला. अडाणी पोर्टने धामरा पोर्टसाठी गेल बरोबर करार केला. हे पोर्ट २०३१ पर्यंत तयार होईल. हा करार ३० वर्षांसाठी आहे. या पोर्टचे काम लार्सन & टुब्रोने सुरु केले आहे. ‘युज आणि पे’ या तत्वावर हा करार आहे. अजंता फार्माच्या दहेज युनिटच्या USFDA ने २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान झालेल्या इन्स्पेक्शन मध्ये कोणतीही त्रुटी दाखवली नाही. ITNL ही कंपनी Rs ३००० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे.

सरकार आता फ्रीज, एअरकंडिशनर आणि लार्ज स्क्रीन टी वी यांच्या वरचा GST २८% वरून १८% करणार आहे. आता फक्त चैनीच्या वस्तूवरच २८% GST लावण्यात येईल.सॅमसंग या कंपनीने आपल्या उत्पादनांचे दर ७.८% ने कमी केले आहेत.

विशेष लक्षवेधी

 • HDFC AMC चा IPO शेवटच्या दिवशी ८३ वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला.
 • आज मार्केट बंद झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज चे निकाल अपेक्षेप्रमाणे आले.

वेध पुढील आठवड्याचा

पुढील आठवड्यात पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या घटना आहेत.

 • २८ जुलै २०१८ NTPC चे निकाल
 • ३० जुलै २०१८ HDFC, ऍक्सिस बँक, यांचे निकाल तसेच TCNS या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.
 • ३१ जुलै २०१८ UPL, टाटा मोटर्स, वेदांता यांचे निकाल
 • १ ऑगस्ट २०१८ RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल. याच दरम्यान फेड आपले धोरण ठरवेल.
 • २ ऑगस्ट २०१८ ONGC चे निकाल
 • ३ ऑगस्ट २०१८ टायटन चे निकाल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३३६ NSE निर्देशांक निफ्टी ११२७८ वर आणि बँक निफ्टी २७६३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजच मार्केट – २७ जुलै २०१८

 1. Hanif pathan

  आपल्या ब्लॉगवर खुप महत्त्वाचे असे पहलू शिकायला मिळतात हा ब्लॉग चालु केल्या बद्द्ल आपले मनपूर्वक आभार

  Reply
 2. Hanif pathan

  मेल वर आपला ब्लॉग वाचायला मिळतो म्हणुन मी रोज आपल्या ब्लॉग ची वाट पाहत असतो पण माझ्या पहिल्या मेल वर मेल येणं बंद झाले म्हणून खूप वाइट वाटलं मेल येणं का बंद झाले समजलं नाहीं कारण मिळाल तर

  Reply
  1. surendraphatak

   Namaskar Hanif, aamhi aamchya blog cha hosting change kelela aahe tyamule zala asel kadachit. Tumhi blog punha subscribe kara aani bagha farak padtoy ka?

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.