आजचं मार्केट – ३० जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३० जुलै २०१८

आज नवीन आठवड्याची सुरुवात धडाकेबाज झाली. चांगलेच फटाके फुटले. खरे पाहता इतकी चांगली सुरुवात होईल असे वाटले नव्हते. वायदेबाजार आणि तांत्रिक विश्लेषण दोन्हीही दृष्टिकोनातून मार्केट ओव्हरबॉट स्थितीत होते. १.७ पूट /कॉल रेशियो होता. मार्केट ताणलेले आहे हे समजत होते. पण तरीही बँक ऑफ बरोडाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांमुळे धमाल आली. सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकिंग क्षेत्रात थोडे आशादायक वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला मार्केटने आपला थोडासा रंग दाखवला खरा पण बुल्सनी रिलायन्सच्या साथीने किल्ला लढवला सर्व आंतरराष्ट्रीय आणि आर्थीक अडचणी झुगारून देऊन बुल्सनी आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे मार्केटमध्ये मुसंडी मारली.आणि मार्केट ब्ल्यू स्काय टेरिटरीत नेले.मार्केटने नवीन शिखरे पार केली. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी ब्ल्यू स्काय टेरिटरीत गेले. याला भारती एअरटेल, ICICI बँक यांनीही हातभार लावला हे विसरता येणार नाही. .

विशेष लक्षवेधी

 • RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसांची मीटिंग सुरु झाली.
 • PNB मेटलाईफचा IPO येणार आहे. PNB आपला २४.६४% स्टेक विकणार आहे. यातून PNB ला Rs २००० ते २५०० कोटी मिळतील. मेट लाईफ हा त्यांचा परदेशी भागीदार आपला ०.३६ % स्टेक विकणार आहे.या IPO चे सर्व प्रोसिड्स प्रमोटर्सना मिळतील.
 • निरमा ही कंपनी त्यांच्या सिमेंट डिव्हिजनचा IPO आणण्याच्या विचारात आहे. या युनिटचे लिस्टिंग २०१९ मार्चमध्ये होईल अशा बेतात IPO आणला जाईल.
 • ज्युबिलण्ट लाईफ ज्युबिलण्ट फार्माचा IPO आणून आपला ५% स्टेक विकणार आहे. त्यामुळे ज्युबिलण्ट लाईफचे कर्ज कमी होईल आणि डेट/ इक्विटी रेशियो सुधारेल.
 • HDFC IPO ची इशू प्राईस Rs ११०० ठरवली.
 • TCNS या कंपनीचा शेअर Rs ७१५ वर लिस्ट झाला. लिस्टिंग नंतर Rs ६२६ पर्यंत भाव गडगडला. (IPO विषयी सर्व माहिती आणि IPO चा फार्म भरण्याविषयी सर्व माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.)
 • गती या लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनीची चांगलीच घोडदौड चालू होती कारण TVS लॉजिस्टिक गती या कंपनीला Rs १५०० कोटींमध्ये खरेदी करणार आहे. त्यामुळे ओपन ऑफर येईल असा मार्केटचा अंदाज आहे.
 • रिलायन्स इन्फ्रा त्यांचा मुंबईचा इलेक्टीसिटी बिझिनेस अडानी ट्रान्समिशनला विकणार आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा डेट फ्री कंपनी होईल.
 • ल्युपिन च्या मंडीदीप युनिटला यूरोपीयन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची मंजुरी मिळाली.
 • इंडीगोच्या काही विमानांच्या एंजिनात दुरुस्ती करायची असल्यामुळे त्यांची काही विमानांची सेवा उपलब्ध नसेल.
  बँक ऑफ बरोडा, NTPC , कोरोमंडल, गोदावरी पॉवर, लुमॅक्स ऑटो, रामकृष्ण फोर्जिंग्ज, गोदरेज कन्झ्युमर,HDFC, न्यू इंडिया अशुअरंस, सेंच्युरी टेक्सटाईल्स, RITES, चेन्नई पेट्रो, स्पार्क, एस्कॉर्टस, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
 • टेक्स RAIL आणि शॉपर्स स्टॉप या कंपन्या टर्न अराउंड झाल्या.

वेध उदयाचा

 • थायरो केअरची शेअर ‘ BUY BACK’वर विचार करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
  गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस या कंपनीने तुमच्या जवळ दोन शेअर्स असतील तर तुम्हाला एक बोनस शेअर मिळेल असे जाहीर केले.
 • मार्केट संपल्यानंतर टेक महिंद्राचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला. अव्हेन्यू सुपटमार्टचा निकाल चांगला आला.
 • इंडीगो या विमान वाहतूक कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल मात्र तद्दन खराब आला.
  आयडिया सेल्युलरचा पहिल्या तिमाहीचा निकाल Rs ३३६४ कोटींचा(आयडिया सेल्युलर इन्फ्रा सर्व्हिसेसचे विक्री प्रोसिड्स ) एक मुश्त नफा होऊनही नक्त नफा फक्त Rs २५६ कोटी झाला.
 • वरील सर्व निकाल मार्केटची वेळ संपल्यानंतर आल्यामुळे मंगळवारचे मार्केट याची दखल घेईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४९४ वर NSE निर्देशांक निफ्टी ११३१९ वर आणि बँक निफ्टी २७८४२ वर बंद झाला.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.