आजचं मार्केट – ३१ जुलै २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३१ जुलै २०१८

जशा जशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तशी तशी सरकारला जाग येऊ लागली आहे. लोकांकडे एकच हत्यार असते ते म्हणजे मतपेटी. या मतपेटीकडे लक्ष ठेवून सरकार शैक्षणिक धोरणांचा नव्याने विचार करत आहे. यामध्ये गुणवत्ता, रिनोव्हेशन, संशोधन आणि रोजगार यावर भर दिला जाईल. शिक्षण व्यवसायाभिमुख असावे असा दृष्टिकोन असेल. यासाठी कौशल्य विकास आणि IT चा समावेश शैक्षणिक धोरणात केला जाणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील M T एज्युकेअर. NIIT, APTECH, करिअर पॉईंट, झी लर्न हे शेअर वाढले.

सरकार ITDC आणि एअर इंडिया यातील आपल्या स्टेकची डायव्हेस्टमेन्ट करणार होते पण यात यश आले नाही. म्हणून धोरणात ढिलाई द्यावी असा विचार चालू आहे. बोली लावणाऱयांची नेट वर्थची मर्यादा कमी करावी आणि त्याचप्रमाणे करात सूट द्यावी असा विचार आहे. त्यामुळे ITDC चा शेअर वाढला.

संरक्षणासंबधीत डील चालू झाली आहेत. संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स रिझनेबल भावाला उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील हिंदुस्थान ऐरोनॉटीक्स, BEML, कोची शिपयार्ड, वालचंदनगर, रोलटा, हे शेअर वाढले.

CPSE एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये नव्या सरकारी कंपन्या येतील किंवा वर्तमान कंपन्यातील सरकारचा स्टेक ५२% पर्यंत कमी केला जाईल या सर्वामुळे गेले दोन दिवस सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.

७५ वर्षाच्या वर इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून काम करायचे असल्यास कम्पनीला स्पेशल रेझोल्यूशन पास करावे लागेल. दीपक पारेख HDFC चे चेअरमन राहू नये असे २२% शेअरहोल्डर्सचे मत पडले. त्यामुळे HDFC चा शेअर Rs ६० पडला.

ब्रँड आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी जी रक्कम परदेशातील किंवा देशातील कंपनीला द्यावी लागते तिला रॉयल्टी असे म्हणतात. ही रॉयल्टी किती द्यावी यासंबंधी कायदा केला जाणार आहे. ही रॉयल्टीची रक्कम कालानुसार कमी होत गेली पाहिजे असे सरकारचे मत आहे. त्यामुळे हनीवेल, ABBOT, नेस्ले, ३M इंडिया, मारुती, HUL अशा MNC कंपन्यांचे शेअर वाढले.

बँक ऑफ जपानने दरांमध्ये कोणताहि बदल केला नाही. -०.१% व्याजाचा दर कायम केला. दरवर्षी ८० लाख येन किमतीचे बॉण्ड्स खरेदी केले जातील असे जाहीर केले.वित्तीय घाटा Rs ४.२९ लाख कोटी ( या पूर्वी हा Rs ४.४२ लाख कोटी होता ) आणि राजस्व घाटा Rs ३.८३ लाख कोटी आहे ( गेल्यावेळी हा Rs ३.५२ लाख कोटी होता.)

विशेष लक्षवेधी

  • UPL, अजंता फार्मा, BASF, डाबर, गुजरात गॅस, BEL, ओबेरॉय रिअल्टी, सुप्रीम इंडस्ट्रीज, ब्ल्यू डार्ट यांचे निकाल चांगले आले.
  • रेमंड, आणि स्नोमॅन लॉजिस्टिक या दोन कंपन्या टर्न अराउंड झाल्या.
  • बँक ऑफ इंडियाचा निकाल असमाधानकारक होता.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅप असलेली कंपनी झाली.
  • टाटा मोटर्सचा तोटा JLR मुळे वाढला आणि हा गेल्या ९ वर्षातील कमाल तोटा आहे.

वेध उदयाचा

  • १ ऑगस्ट २०१८ रोजी RBI उद्या दुपारी २-३० वाजता आपले वित्तीय धोरण जाहीर करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७६०६ NSE निर्देशांक निफ्टी ११३५६ आणि बँक निफ्टी २७७६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.