like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ३१ ऑगस्ट २०१८
मार्केटमध्ये सध्या नकारात्मक बातम्या जास्त आहेत पण त्याचा परिणाम फारसा दिसत नाही. रुपया US $ १ = Rs ७१ च्या स्तरावर पोहोचला. क्रूड US $ ७७ प्रती बॅरेलवर पोहोचले. गेल्या ५ वर्षांचा आढावा घेतला तर सप्टेंबर महिन्याच्या सिरीजमध्ये मंदी असते. त्यातून या वेळेला अधिक महिना आल्यामुळे सगळे सणवार एक महिना पुढे गेले आहेत. त्यामुळे या निमित्ताने होणाऱ्या खरेदीचा परिणाम ३ ऱ्या तिमाहीत दिसेल. पण तरीही अगदी थोड्या प्रमाणात मार्केटमध्ये मंदी येते , पुन्हा खरेदी होते आणि मार्केट सुधारते. त्यामुळे या वर्षीचे कंपन्यांचे अर्निंग सुधारेल असे गृहीत धरून मार्केट चालले आहे असे वाटते.
USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी USA WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन) मधून बाहेर पडेल असे सांगितले.
ASTON मार्टिन या कंपनीचा IPO येत आहे. ही कंपनी ००७ कार उत्पादन करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीचा IPO लंडन स्टॉक एक्स्चेंजवर येत आहे. या कंपनीला जे VALUATION मिळेल त्यावरून टाटा मोटर्सच्या ‘JAGUAR LANDROVER’ चे VALUATION मार्केट ठरवत आहे. म्हणून टाटा मोटर्सचा शेअर वाढला.
कोकाकोला या कंपनीने UK मधील ‘COSTA COFFEE CHAIN ‘ GBP ३.९ बिलियन मध्ये घेतली. मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे ५०० ते ९०० मिलियन GBP एवढा जास्त भाव या कंपनीला मिळाला. याचा अप्रत्यक्ष परिणाम ‘कॅफे कॉफी डे’ या शेअरवर झाल्यामुळे हा शेअर तेजीत होता. या पद्धतीने टाटा मोटर्सवर किंवा कॅफे कॉफी डेवर झालेल्या परिणामाला ‘RUB OFF EFFECT’ असे म्हणतात.
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ तसेच पेये घेऊन जायला परवानगी असेल की नाही यावर ३ सप्टेंबर २०१८ रोजी हायकोर्टाचा निर्णय येईल.. त्यामुळे PVR, आयनॉक्स अशा शेअर्स कडे लक्ष ठेवावे लागेल.
एप्रिल ते जून २०१८ या कालावधी साठी वित्तीय घाटा Rs ४.५ लाख कोटी जाहीर झाला. आणि राजस्व घाटा Rs ४.४ लाख कोटी जाहीर झाला.
JK पेपरच्या ओरिसामधील प्लांटमध्ये आजपासून काम बंद झाले.
विशेष लक्षवेधी
- JB केमिकल्स ने CMP वर १५% प्रीमियम देऊन म्हणजेच Rs ३९० प्रती शेअर या भावाने BUY BACK जाहीर केला. यासाठी Rs १३० कोटी खर्च करून ३३.३३ लाख शेअर्स टेंडर ऑफर रूटने BUY BACK केले जातील.
- रुपयाची किंमत सतत ढासळत असल्याने फार्मा क्षेत्रातील कंपन्या त्यातही विशेषतः MNC फार्मा कंपन्यांचे शेअर्स आज तेजीत होते.
- SAIL या सरकारी कंपनीने सरकारला लाभांश देण्यास आपली असमर्थता व्यक्त केली.
- वोडाफोन आणि आयडिया यांच्या मर्जरला NCLT ने परवानगी दिली. या मर्जरनंतर आयडिया ही कंपनी ‘वोडाफोन आयडिया’ अशी ओळखली जाईल .
- येस बँकेचे CEO राणा कपूर यांना RBI ने पुढील सूचना मिळेपर्यंत बँकेचे कामकाज पाहायला सांगितले. पण मार्केटने मात्र या बातमीला नापसंती दर्शवली त्यामुळे YES बँकेचा शेअर पडला.
वेध उद्याचा
- १ सप्टेंबर २०१८ पासून पोस्ट पेमेंट बँक सुरु होणार.
- निफ्टी सप्टेंबर २०१८ या F & O सिरीजसाठी ११४०० ते ११८०० या मर्यादेत राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- पुढील आठवड्याच्या साप्ताहिक एक्स्पायरीसाठी बँक निफ्टी २८००० ते २८५०० या मर्यादेत राहिल.
- केरळमधील पुरामुळे आलेल्या हाहाकारामध्ये बरेच लोक आपल्याकडील जे सोने किंवा सोन्याचे दागिने होते ते घेऊन बाहेर पडले. आता पुनर्वसनासाठी याच सोन्याचा आणि सोन्याच्या दागिन्यांचा त्यांना उपयोग होत आहे. या कटू अनुभवामुळे आणि हिरे आणि तत्सम रत्नाना, एकदा वापरले की किंमत मिळणें कठीण जाते किंवा किंमत खूपच कमी मिळते त्यामुळे लोक आता हिरे आणि रत्नांच्या दागिन्यांऐवजी सोन्याचे दागिने बनवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. सोन्याचा भाव दिवाळीपर्यंत १० ग्रामला Rs ३३००० पर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६४५ NSE निर्देशांक निफ्टी ११६८० आणि बँक निफ्टी २८०६१ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!