आजचं मार्केट – १७ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ऑगस्ट २०१८

आज मार्केटने पुन्हा तेजीचे वळण घेतले. कारण ‘पटेटी’मुळे करन्सी मार्केट बंद होते. त्यामुळे करन्सी वधारली की घसरली याचा धोका समजत नव्हता.USA आणि चीन यांच्यामध्ये २३ ऑगस्ट २०१८ रोजी बोलणी होणार आहेत. त्यामुळे ट्रेंड वॉर आणि टॅरीफ वॉर हाही धोका टळला होता. त्यामुळे पुढचे  पुढे बघू आता रडत कशाला बसायचे असा विचार मार्केटने केला असेल असे वाटते.
GMR इंफ्राने PE इन्व्हेस्टर बरोबरचा Rs ४८०० कोटींचा विवाद मिटवला त्यामुळे GMR इंफ्राचा IPO येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. परिणामी हा शेअर वाढला.
ASTRA ZENECA च्या ओव्हरी कॅन्सरच्या औषधाची  विक्री आणि आयात यांना भारताने परवानगी दिली त्यामुळे हा शेअर वाढला.
ऑरोबिंदो फार्माच्या HIV  साठी असलेल्या औषधाला परवानगी मिळाली.
गती आणि अल कार्गो यांच्यामध्ये कोणतेही अग्रीमेंट झाले नाही असे सांगितले त्यामुळे गैरसमज दूर  झाला.
अशोक लेलँडला बांगलादेशातून तीनशे डबलडेकर बससाठी ऑर्डर मिळाली.
सिंडिकेट बँकेची  SIDBI मध्ये १.१८% हिस्सेदारी आहे. ही हिस्सेदारी सिंडिकेट बँक विकण्याच्या विचारात आहे.
सरकारने सिमेंट कंपन्यांना पेट कोक आयात करण्यासाठी परवानगी दिली. पेट कोक सौदी अरेबिया आणि युरोपमधून आयात होतो. यामुळे सिमेंट कंपन्यांच्या कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन मध्ये बचत होईल. याचा फायदा मुख्यत्वे श्री सिमेंटला होईल.
NBCC आणि हुडको ह्यांच्यातील आपला स्टेक सरकार OFS च्या माध्यमातून विकणार आहे. OFS ची माहिती तुम्हाला माझ्या पुस्तकातून मिळेल 
विशेष लक्षवेधी
  • केरळमध्ये पुराचे गंभीर संकट आले आहे. पण मार्केट नेहेमी कोणत्याही घटनेचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल याचे विश्लेषण करते. केरळमध्ये रबर, मसाले, चहा, कॉफी यांचे उत्पादन होते यामुळे या पुराचा फटका या मालाच्या उत्पादनाला बसेल. त्यामुळे केरळमध्ये असलेल्या उद्योगांचा विचार करता काही इंडस्ट्रीजना फायदा होईल तर काही इंडस्ट्रीजना तोटा होईल. V गार्ड इंडस्ट्रीज, मन्नापुरम फायनान्स, ओरिएंट इंडस्ट्रीज, NLC इंडस्ट्रीज, सागर सिमेंट,रामको सिमेंट, साऊथ इंडियन बँक, फेडरल बँक, यांच्या बिझिनेसवर परिणाम होईल.
वेध उद्याचा
  • २० ऑगस्ट २०१८ रोजी HDFC आणि मोतीलाल ओसवाल यांचे निकाल जाहीर होतील.
  • २३ ऑगस्ट २०१८ रोजी क्रेडिट ग्रामीण ऍक्सेस या कंपनीचे लिस्टिंग, तसेच ब्रिटानियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर्स स्प्लिटवर विचार करण्यासाठी  मीटिंग, आणि USA आणि चीनची मीटिंग आहे.
  • जेट एअरवेजचे निकाल २७ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर होतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७९४७ NSE निर्देशांक निफ्टी ११४७० आणि बँक निफ्टी २८१२८  वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.