आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१८

आज मार्केटने उच्चतम स्तर गाठला. सेन्सेक्स ३८३०० तर निफ्टी ११५५० ला पोहोचले. याला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या गोष्टी पुढील प्रमाणे –
 • L & T २३ ऑगस्टला  BUY BACK ऑफ शेअर्स वर विचार करण्यासाठी बैठक घेणार असल्याने शेअर वाढत होता.
 • ONGC विदेशचा IPO  येईल असा अंदाज आल्यामुळे आणि त्यांच्या मेहसाणा युनिटमधून गॅस काढण्यासाठी बोली मागवल्यामुळे ONGC चा आधार मिळाला.
 • सरकारने  FY  २०१९ मध्ये NTPC, IOC, ऑइल इंडिया,ONGC यांचा Rs १२००० कोटीचा  BUY BACK येण्याची शक्यता दर्शवली.
 • कोल इंडियाच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील करून Rs १०००० कोटी गोळा करणार आहे.
 • मुख्य आर्थीक सल्लागार Mr अरविंद यांनी भारताची प्रगती होत आहे आणि  निर्यात वाढत आहे  आणि या वर्षात म्हणजे २०१९ मध्ये  ७.५% ग्रोथ होईल.
 • रुपया वधारला आणि क्रूड घसरले त्यामुळे फॉरीन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्सनी निवडक शेअर्समध्ये खरेदी केली. त्यात HDFC, HDFC BANK आणि HDFC AMC आणि टाटा मोटर्स यांनी मार्केटच्या तेजीला हातभार लावला.
या तेजीला फक्त इन्फोसिसचे गालबोट लागले. इन्फोसिसचे CFO Mr रंगनाथन यांनी राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या पांच वर्षांमध्ये चौथा CFO शोधण्याची वेळ इन्फोसिसवर आली.
केरळ मधील पूरग्रस्त परिस्थेतीचा परिणाम काही कंपन्यांच्या FY २०१८ च्या  दुसऱ्या तिमाहीच्या निकालावर दिसेल. मुथूट फायनान्सच्या केरळ मधील ६४२ शाखांपैकी तीन शाखांवर या पुराचा परिणाम होईल. जनरल इन्शुअरन्स कंपन्यांच्या निकालांकडे लक्ष द्यावे लागेल कारण जनरल इन्शुअरन्स कंपन्यांना Rs १५००० कोटी ते Rs ३२००० कोटीच्या क्लेम पेमेंट करावे लागेल. १५ ऑगस्ट २०१८ ते २७ ऑगस्ट २०१८  या काळात ओणम या सणाच्या निमित्ताने जी मागणी येते ती कमी झाल्यामुळे ऑटो, FMCG क्षेत्रातील कंपन्यांवर परिणाम होईल. त्याच प्रमाणे मेरिको या कंपनीच्या कच्च्या मालाच्या म्हणजेच खोबऱ्याच्या किमती वाढतील. फेडरल बँक आणि साऊथ इंडियन बँकेच्या बहुसंख्य शाखा केरळ मधे असल्यामुळे रिकव्हरी मंदावेल आणि नवीन कर्ज देण्याची सक्ती सरकार करेल. अपोलो टायर्सचे  दोन प्लांट केरळमध्ये आहेत त्यामुळे या शेअरवरही परिणाम होईल. टायर उद्योगाला लागणारा कच्चा माल नैसर्गीक रबराचे उत्पादन कमी झाल्यामुळे नैसर्गीक रबराच्या किमती वाढतील. तसेच केरळ हे  मद्यार्कासाठी भरपूर मागणी असलेले राज्य आहे. पूरग्रस्त परिस्थीतीत मदत करण्यासाठी राज्य सरकारने लिकर कंपन्यांवर टॅक्स बसवला.
आदित्य बिर्ला ग्रुप ‘MORE’ हा बिझिनेस विकणार आहे. यासाठी समारा कॅपिटलबरोबर बोलणी चालू आहेत असे समजते.
नालकोने कॉस्टिक सोडयाच्या किमती ३% ने वाढवल्या
BSE त्याच्या नियमानुसार २१ ऑगस्ट २०१८ पासून  १७ कंपन्या डीलीस्ट करणार आहे.  या कंपन्या गेले सहा महिने सस्पेंडेड होत्या.
विशेष लक्षवेधी
 • नवनीत पब्लिकेशन या कंपनीने ४६.८७  लाख शेअर्स Rs १६० प्रती शेअर या भावाने BUY BACK करणार असे जाहीर केले. यासाठी Rs ७५ कोटी खर्च केले जातील. हे शेअर्स टेंडर ऑफर या पद्धतीने BUY बॅक केले जातील.
वेध उद्याचा
 • टिमकीन इंडियाने ABC बेअरिंगबरोबर  केलेले डील फायदेशीर आहे. ५ टिमकीन इंडियाच्या शेअर्सला ८ ABC बेअरिंग चे शेअर्स मिळणार.
 • उद्या HDFC AMC चा निकाल जाहीर होणार आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२७८ NSE निर्देशांक निफ्टी ११५५१ आणि बँक निफ्टी २८२७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

3 thoughts on “आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०१८

 1. Dr. Satish Paranjape

  Madam,
  I am amazed to read your journey in share market. I study a lot but FIND DIFFICULT TO FOLLOW DISCIPLINE. I am a student of technical analysis but not now confused as to what to follow. Do u use T.A. and any indicators to decide about buy/sale signal. WHAT STRATEGY U USE. I have a bad habit of testing new strategy every now and then.
  Please guide.
  Thanks
  Satish

  Reply
  1. surendraphatak

   मी technical आणि fundamental असे दोन्ही वापरते रिस्क रिवॉर्ड रेषो बघते

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.