आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१८

आज धावून धावून थकलेल्या मार्केटने थोडी विश्रांती घेतली असे जाणवले. गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सनासुद्धा विचाराला चालना देण्याची थोडीशी संधी मार्केटने उपलब्ध करून दिली.अगदी लहान ट्रेडिंग रेंजमध्ये दिवसभर मार्केट चालले.
ट्रम्प हे चीन आणि युरोपियन देशांवर नाखूष आहेत असे  समजते. हे सर्व देश आपल्या चलनाच्या वॅल्युएशनमध्ये मेनिप्युलेशन  करत  आहेत असे त्यांचे मत आहे. तर फेडरल रिझर्व्ह रेट वाढवत आहे हेही त्यांना पसंत नाही. US $ निर्देशांक थोडासा नरम पडल्यामुळे आज रुपया ३३ पैसे सुधारला.
मारुती त्यांच्या शोरूममधून ऑटो पार्ट पुरवठा करणाऱ्यांना त्यांचे पार्टस विकण्याची परवानगी देणार आहे.  म्हणून जय भारत मारुती आणि भारत सीट्स यांचे शेअर वाढले.
पिरामल एंटरप्राइझेसने डीमर्जरच्या संदर्भात काहीच वाच्यता केली नाही पण कोणतीही फार्मा कंपनी खरेदी करण्याची संधी मिळाल्यास आपण त्याचे सोने करू तसेच यासाठी पैशाची अडचण येणार नाही असे सांगितले. परीणामी पिरामल एंटरप्राइझेसचा शेअर वाढला.
बँक ऑफ बरोडाचे  जयकुमार यांचा कार्य काल १ वर्ष वाढवून दिला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बँक ऑफ बरोडाचा  शेअर वाढला.
युनिटेकच्या डायरेक्टर्सची संपत्ती लिलाव करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
रजिस्ट्रार ऑफ कंपनीने जेट एअरवेजच्या सर्व खात्यांची तपासणी करायला सांगितले .  केरळात करायला लागणाऱ्या पुनर्वसनासाठी बिल्डिंग मटेरिअल्स ची मागणी वाढेल त्यामुळे बिल्डिंग मटेरिअल्सचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर वाढतील. कजरिया सिरॅमिक्स नीटको टाईल्स, एसियन ग्रॅनीटो. चहा कॉफी रबराचे  पीक खराब झाल्यामुळे ज्या कंपन्यांकडे  चहा कॉफी रबर यांचा साठा आहे त्यांना फायदा होईल. त्या मालाच्या किमती वाढतील असे वाटून टाटा टी, टाटा कॉफी, हॅरिसन मल्याळम, आणि बॉमबे बर्मा यांचे शेअर्स वाढले.
लार्सन अँड टुब्रो या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग  २३ ऑगस्ट २०१८ ला ‘शेअर BUY BACK’ वर विचार करण्यासाठी बोलावली आहे. L &T इन्फो आणि L & T टेक्नॉलॉजी या IPO मधून त्याचप्रमाणे जनरल इन्शुअरन्स युनिट आणि पोटुपल्ली पोर्ट विकून लार्सन आणि टुब्रोला पैसा  मिळाला आहे. या कॅशचा उपयोग शेअर BUY BACK करण्यासाठी केला जाणार आहे. त्यांना त्यांचा ROE  (रिटर्न ऑन इक्विटी) सुधारायचा आहे. मार्केट एवढे तेजीत असूनही L & T च्या शेअरला चांगली किंमत मिळत नाही असे त्यांना वाटते आहे. हा शेअर सध्या २१च्या P /E वर आहे. नियमाप्रमाणे कंपनी १०% BUY BACK बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या परवानगीने आणि २५% BUY BACK शेअरहोल्डर्सच्या परवानगीने करू शकते. सध्या कंपनी Rs ५००० कोटीचे BUY BACK करेल असे वाटते. साधारण Rs १४५० ते Rs १४६० प्रती शेअर म्हणजेच (करंट मार्केट प्राईसच्या १०% प्रीमियमवर )   BUY BACK ची प्राईस असेल असा मार्केटचा अंदाज आहे. BUY BACK चा ऍक्सेप्टन्स रेशियो ३.५% असेल असा मार्केटचा अंदाज आहे. यामुळे  ROE  ९० बेसिक पाईंटने सुधारेल. आणि १४.८०% होईल. कंपनीला ROE १८ % व्ह्यायला पाहिजे आहे. त्यामुळे एकाच BUY BACK वर भागेल असे वाटत नाही पुन्हा पुन्हा BUY BACK  येईल असे वाटत आहे. अजूनही नाभा पॉवर, टोल रोड मधील InV iT  (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) युनिट्स  आणि हैदराबाद मेट्रो मधील स्टेक विकणार आहेत. या विक्रीतून Rs १४००० कोटी मिळतील. L & T  मध्ये प्रमोटर नाहीत त्यामुळे सर्व शेअरहोल्डर या BUY BACK मध्ये भाग घेऊ शकतील.
विशेष लक्षवेधी
 • HCL TECH  च्या Rs ४००० कोटी  BUY BACK ची रेकॉर्ड डेट  ३१ ऑगस्ट २०१८ ठरली आहे
वेध उद्याचा 
 • उद्या मार्केटला बकरी ईद ची सुट्टीआहे त्यामुळे आता आपली भेट गुरुवारी..
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२८५ NSE निर्देशांक निफ्टी ११५७१  आणि बँक निफ्टी २८२५७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

4 thoughts on “आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०१८

 1. Nandu karandikar

  Hello,
  I have gone through your site. Very impressive. Detailed analysis and that to in simple language and very eco friendly that even a lay man can become literature. I am interested to get your daily analysis and predictions about the market on day today basis. Please help me

  Reply
 2. rupesh

  अप्रतिम शेअर मार्केट अपडेट तुम्ही शेअर करता , मी तुमचे अपडेट फेसबुक वर शेअर करतो त्या बरोबर तुमचे नावही शेअर करतो .
  धन्यवाद पाठक मॅडम

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.