आजचं मार्केट – २३ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २३ ऑगस्ट २०१८

आज मार्केटमध्ये पुष्कळ अस्थिरता होती. USA चीनवर जे निर्बंध लावणार आहे ते शिथिल होतील की नाही या विचारातच मार्केटची वेळ संपली. दक्षिण कोरीया, कॅनडा, भारत, चीन, ग्रीस,तुर्कस्थान या देशातून येणाऱ्या स्टील पाईप्सवर USA ने कर लावला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज  Rs ८ लाख कोटी  मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी झाली.

लार्सन & टुब्रोने पहिला BUY BACK  जाहीर केला. कंपनी प्रती शेअर Rs १५०० या भावाने BUY BACK  वर Rs ९००० कोटी  खर्च करेल. कंपनी ४.२९% कॅपिटल म्हणजेच ६ कोटी शेअर्स BUY BACK  करेल. वर्तमान CMP वर १३% प्रीमियम देऊन कंपनी हा BUY BACK  करेल.

प्रताप स्नॅक्सने गुजराथमधील अवध  स्नॅक्समधील  ८० % हिस्सेदारी Rs १४८ कोटीना विकत घेतली. स्नॅक्स किंवा नमकीन हा व्यवसाय गुजराथमध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो. अवध स्नॅक्सच्या माध्यमातून प्रताप स्नॅक्सचा गुजराथमध्ये प्रवेश होईल. आणि प्रगतीची वाट चोखाळता येईल.

बंधन बँकेने PNB हौसिंग मधील स्टेकसाठी  बोली लावली. डिसेंबरपर्यंत हे डील पूर्ण होईल असे  PNB चे म्हणणे आहे.

DR रेड्डीजच्या श्रीकाकुलम प्लांटला EIR मिळाला.

लक्ष्मी विलास बँक २६% ते ५१% स्टेक विकण्याच्या तयारीत आहे.

HUL साबण, डिटर्जंट, स्किनकेअर यांचे भाव ५% ते ६ % ने वाढवणार आहे.

KKR मॅक्स इंडियाच्या हेल्थ इन्शुअरन्समध्ये स्टेक घेणार आहे. हे डील Rs  १७०० कोटींमध्ये होण्याची शक्यता आहे. मॅक्स इंडियाचा मॅक्स हेल्थ इन्शुअरन्समध्ये ४७% स्टेक असल्यामुळे शेअर वाढला.

महानगर गॅसचे प्रमोटर BG गॅस यांनी  त्यांचा  १४% स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकला . फ्लोअर  प्राईस Rs ८५१ होती म्हणून शेअर पडला.

ITI ला महाराष्ट्र सरकारकडून महा नेट १ या अंतर्गत Rs २६१० कोटीची ऑर्डर आणि लेटर ऑफ इंटेन्ट मिळाले.

अमृतांजन ही कंपनी सॅनिटरी नॅपकिन आणि फ्रुट ज्युस या व्यवसायात उतरली आहे.

विशेष लक्षवेधी

  • HDFC AMC चा निकाल खूप सुंदर आला तर GILLET आणि प्रॉक्टर एन्ड गॅम्बल यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही.कारण जाहिरातींवरचा खर्च वाढला. पण GILLET ने Rs २३ आणि प्रॉक्टर एन्ड गॅम्बलने Rs ४० लाभांश जाहीर केला.
  • आज वाडिया ग्रुपच्या सर्व शेअर्स मध्ये म्हणजे बॉमबे बर्मा, बॉम्बे डायिंग, नॅशनल पेरॉकसाईड, ब्रिटानिया इंडस्ट्रीज  या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली
  • JB  केमिकल्सची शेअर BUY  बॅकवर विचार करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी बैठक आहे. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण या कंपनीचे लिस्टिंग Rs ३९० वर झाले (IPO मध्ये Rs ४२२ किंमत होती) त्यामुळे लिस्टिंग गेन काही झाला नाही.
वेध उद्याचा 
  • उद्या LIC हौसिंग, सुंदरम फायनान्स, MAS फायनान्स यांचे निकाल आहेत.
BSE निर्देशांक सेन्सेक्स  ३८३३६ वर  NSE निर्देशांक निफ्टी ११५८२ वर आणि बँक निफ्टी २८०२७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.