आजचं मार्केट – २४ ऑगस्ट २०१८

like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २४ ऑगस्ट २०१८

आज रुपया US $ १ = Rs ७०.१६ झाला तर क्रूडने US $ ७५ प्रती बॅरेल ची पातळी ओलांडली. काल  हँगिंग मॅन हा चार्ट पॅटर्न निफ्टी ५० मध्ये तयार झाला होता. मार्केटची तेजी थोडीशी मंदावेल, तेजीचा वेग कमी होईल असे हा पॅटर्न दर्शवतो. मार्केटमध्ये सातत्याने चर्नींग दिसून येत आहे.

बेअरिंग आशियाने हेक्झावेअरमधील १४% स्टेक विकला. आणि त्यामुळे शेअर पडला.

बंधन बँकेचे प्रमोटर्स त्यांचा  स्टेक ४०% पर्यंत कमी करणार हे कारण शेअर पडण्यासाठी पुरेसे ठरले.

युरोपियन युनियनमधून  ज्या ज्या गाड्या USA मध्ये आयात होतील त्या त्या गाड्यांवर २५% ड्युटी लावली जाईल असे USA ने जाहीर केले. याचा परिणाम टाटा मोटर्सवर होईल. त्यामुळे जरी टाटा सन्सने  टाटा मोटर्सचे  २ कोटी शेअर्स घेतले तरी टाटा मोटर्सच्या शेअरचे पडणे थांबले नाही.

कोलगेट पामऑलिव्ह आशिया पॅसिफिक ह्या कोलगेटच्या सबसिडीअरी कंपनीने भारतातील ‘बॉम्बे शेविंग कंपनी’ ह्या  पुरुष प्रसाधन उद्योगातील कंपनीतील स्टेक  खरेदी केला. कोलगेट ही आंतराष्ट्रीय कंपनी  Rs १८ कोटी कोलगेटच्या हाँगकांग येथील सबसिडीमध्ये गुंतवेल . ही हाँगकांगमधील सबसिडीअरी ही  रक्कम बॉम्बे शेविंग कंपनीमधील १४% स्टेक  विकत घेण्यासाठी खर्च करेल. CLSA ने असे मत दिले की कोलगेटच्या हाँगकांग सबसिडीअरीचे भारतातील हे पदार्पण कोलगेट पामऑलिव्ह इंडियाच्या भागधारकांसाठी फारसे चांगले मानता येणार नाही.

HDFC स्टॅंडर्ड लाईफचे CEO अमिताव चौधरी हे ऍक्सिस बँकेमध्ये CEO  म्हणून येतील अशी मार्केटची अटकळ आहे. म्हणून ऍक्सिस बँकेच्या शेअर कडे सर्वांचे लक्ष असते.

‘TAFAMIDIS’ हे हृदयरोगावरील औषध फायझर ही कंपनी बाजारात आणणार आहे. हे औषध फायझरला पुष्कळ उत्पन्न मिळवून देईल अशी अपेक्षा आहे. एक बिलियन US $ एवढे मार्केट फायझरला उपलब्ध होईल असा अंदाज आहे त्यामुळे फायझरचा शेअर Rs ५०० ने वाढला.

NBCC या कंपनीने महाराष्ट्रातील गोसीखुर्द इरिगेशन प्रोजेक्टचा १० किलोमीटरचा भाग वेळेच्या आधी पूर्ण केला. हे काम ८२ किलोमीटरचे आहे, ३२०० हेक्टरमध्ये Rs १०५८ कोटीचा  हा प्रोजेक्ट आहे.

लार्सन अएंड टुब्रो मध्ये एम्प्लॉयी ट्रस्ट चा १२.५% स्टेक आहे. तर हा ट्रस्ट BUY BACK मध्ये भाग घेणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा निर्णय एम्प्लॉयी ट्रस्ट घेईल असा खुलासा व्यवस्थापनाने केला.

अमृतांजन फक्त तुमची डोकेदुखी दूर  करत नसून ही कंपनी तुम्हाला चांगली कमाई करून देत आहे. गेल्या दोन दिवसात कंपनीचा शेअर २५% वाढला.

आज ल्युपिनच्या नागपूर प्लांटला EIR मिळाला. तर कॅडीलाच्या अहमदाबाद युनिटला क्लीन चीट मिळाली. ह्या युनिटची तपासणी १४ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट दरम्यान झाली होती .

विशेष लक्षवेधी 

  • MAS फायनान्सचा निकाल चांगला आला. तर क्युपिडने ५ शेअरवर १शेअर बोनस जाहीर केला.
  • आज फायझर ASTRA ZENEKA, MERC, ZYDUS, नॅशनल पेरॉकसाईड, भेल SREI इन्फ्रा या शेअर्स मध्ये तेजी होती,

वेध उद्याचा 

  •  २७ ऑगस्टला जेट एअरवेज, २९ ऑगस्टला PTC इंडिया यांचे निकाल येतील. ३० ऑगस्टला FNO ची ऑगस्ट एक्स्पायरी आणि बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी असेल. 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८२५१ NSE निर्देशांक निफ्टी ११५५७ आणि बँक निफ्टी २७८३४ वर बंद  झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.